मायबोलीचा एकोणिसावा वर्धापनदिन

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मायबोलीने या गणेशचतुर्थीला एकोणीस वर्षे पूर्ण केली (तारखेप्रमाणे १६ सप्टेंबरला) आणि विसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!

गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केलं, याचा हा एक मागोवा.

नवीन उपक्रम

२०१२मध्ये बातम्या.कॉम ही वेबसाईट मायबोली समूहाचा भाग बनली. बातम्या.कॉमच्या साच्यावर आधारित हिंदी आणि कानडी या भाषांत २०१४ साली दोन नवीन वेबसाईट सुरू करून महाराष्ट्राच्या अंगणापलीकडे पाय टाकण्याचं धाडस आपण केलं. यानंतर आता गुजराती आणि बंगाली भाषांमध्येही आपण नवीन वेबसाईट सुरु केल्या आहेत.

gujarati.khabar.io ગુજરાતી.ખબર.આયો
ખબર આયો, સમાચાર લાવે !

bangla.khabar.io বাংলা.খবর.আযো
অনলাইন সংবাদ এক জায়গায় !

***

मागे वळून पाहताना, इतर वर्षांच्या तुलनेत काही उपक्रम नक्कीच कमी झाले आहेत. काही उपक्रमांना मिळणारा प्रतिसादही नक्कीच कमी झाला आहे. त्यामुळे मायबोलीच्या मूळ स्वरूपात बदल होतो आहे. या बदलाची चिंता सुरुवातीला मायबोली प्रशासनाला नक्कीच वाटली होती. पण मायबोलीच्या वाचकांच्या प्रतिसादामुळे ही भीती शिल्ल्क राहिली नाही. कारण मायबोलीवरच्या वाचकांची आणि सभासदांची संख्या वाढते आहे. मायबोलीकरांच्या मायबोलीवर असलेल्या वेळेत फरक पडला नाही. जगातल्या सगळ्याच देशांतून वाढता प्रतिसाद आहे. विशेषतः फेसबुकवर असलेल्या चाहत्यांची संख्या १,००,०००+ झाल्यावर जाहिरातदार, हितचिंतक, पार्टनर यांच्याकडून जास्त जोमाने विचारणा होत आहे. 'एक मराठी वेबसाईट' यापलीकडे मायबोलीला जास्त गंभीरपणे विचारात घेतलं जाते आहे. "जुने जाऊद्या मरणालागुनी" या केशवसुतांच्या ओळींना स्मरून ज्या उपक्रमांना प्रतिसाद मिळतो आहे, ते सुरू ठेवावेत आणि ज्यांना मिळत नाही, ते बंद झाले तरी हरकत नाही, या धोरणानुसार आपण पुढे जाणार आहोत.

मायबोली.कॉम

लेखनस्पर्धा २०१४ -

गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही मायबोलीवर आपण लेखनस्पर्धा आयोजित केली होती. मनोविकास प्रकाशन हे या स्पर्धेचे प्रायोजक होते. स्पर्धेसाठी दोन विषय होते व एकूण ४८ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.

ज्येष्ठ संपादक श्री. संजय आवटे यांनी पहिल्या विषयाचं व श्रीमती सुजाता देशमुख यांनी दुसर्‍या विषयाचं परीक्षण केलं.

गणेशोत्सव २०१४ -

गणेशोत्सव संयोजक समितीने २०१४चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजित केला. लहान मुलांसाठी 'गणोबा आपल्या गावात' व 'रंगूनी रंगात सार्‍या' हे उपक्रम, पाककलानिपुण मायबोलीकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त खास स्पर्धा, 'सुरक्षेचा गणेशा' ही यावर्षीची वैशिष्ट्यं होती.

दिवाळी अंक २०१४ -

पेशवा (जयवंत) यांच्या नेतृत्वाखाली आपण २०१४चा अंक प्रकाशित केला. या वर्षीच्या अंकात शब्दरूपी साहित्याबरोबरच नृत्य, वीणकाम, पाककृती, संगीतादी दृक्‌श्राव्य कला सादर झाल्या. यापुढे एक पाऊल जाऊन डिजिटल माध्यमाच्या शक्तींचा शक्य तितका उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. कथा-कविता वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचादेखील अनुभव घेता आला. मजकूर लक्षवेधी करण्याच्या दृष्टीने अंकाच्या जाहिरातींमध्ये, तसंच अंकातील काही सदरांत अ‍ॅनिमेशन तंत्राचा उपयोग केला गेला. त्याचबरोबरीने शब्दकोडी, अवांतर माहिती, मेन(ड)केचे सल्ले यांसारखी छापील अंकांची खास वैशिष्ट्यं डिजिटल अंकात समाविष्ट केली गेली. आजच्या युगातील किशोरांना वाचायला आवडेल, त्यांच्या अनुभवविश्वाशी जोडता येईल, असं साहित्य 'किशोरविश्व' सदरात घेतलं. अन्न, संवाद, बदल आणि चळवळ या मनुष्याच्या समाजजीवनाच्या प्राथमिक गुणवैशिष्ट्यांवर आधारित लेख हे यंदाच्या दिवाळी अंकाचे खास वैशिष्ट्य!

मायबोली माध्यम प्रायोजक -

यावर्षी 'हायवे' या बहुचर्चीत चित्रपटाचं माध्यम प्रायोजकत्व आपण केले.तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या लॉस एंजलीस येथे भरलेल्या १७व्या अधिवेशनाचे आपण माध्यम प्रायोजक होतो.

मदत समिती आणि स्वागत समिती -

सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

अक्षरवार्ता -

नवीन पुस्तकांच्या ओळखीचा हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.

वर्षाविहार २०१५ -

यंदा वर्षाविहाराचे १३वे वर्ष होते. यंदाचा हा मैत्रीचा सोहळा २६ जुलैला खोपोली येथील यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीने संपन्न झाला. पुणे आणि मुंबई येथील मायबोलीकरांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

सोशल नेटवर्क आणि मायबोली :

गेली काही वर्षं आपण मायबोलीबाहेरच्या सोशल नेटवर्कवरही कार्यरत आहोत. मायबोलीबाहेरच्या वाचकांना या माध्यमातून मायबोलीवरच्या लेखनाची, प्रकाशचित्रांची ओळख आपण करून देत असतो. फेसबुकवरच्या मायबोलीच्या चाहत्यांची संख्या या वर्षी १०२,०००+ झाली आहे. गूगल प्लस या नेटवर्कवर मायबोलीच्या चाहत्यांची संख्या एका वर्षाच्या आत ३,४०,०००वर गेली आहे. युट्यूब या माध्यमात आपण या वर्षी थोडे अधिक कार्यरत झालो आहोत.

बातम्या.कॉम

बातम्या.कॉमच्या साच्यावर आधारित गुजराती आणि बंगाली या भाषांत दोन नवीन वेबसाईट सुरू करून महाराष्ट्राच्या अंगणापलीकडे पाय टाकण्याचं धाडस आपण केलं.

खरेदी विभाग

काही अपरिहार्य तांत्रिक अडचणींमुळे खरेदी विभाग बंद ठेवावा लागला आहे. तो पुन्हा सुरु करण्यासाठी काम सुरू आहे.

जाहिरात विभाग

जाहिरात विभागात फार मोठे बदल झाले नाहीत. त्याला मायबोलीकरांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. विशेषतः विवाहविषयक विभागास या वर्षात भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. जाहिरात विभागाचे वेगळे फेसबुकपानही सुरू केले असून त्याला आतापर्यंत ४९००+ चाहते मिळाले आहेत.

कानोकानी.कॉम

या विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.


इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे

याशिवाय हार्डवेअर / सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गीकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात.

मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रीकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्त्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

***

विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकर -

मदत समिती - रुनी पॉटर, नंद्या, मंजूडी

लेखनस्पर्धा २०१४ - अमितव, इन्ना, चिनूक्स, जिप्सी, सशल, फारएण्ड

गणेशोत्सव २०१४ -

संयोजक - आशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया, स्नेहश्री

दिवाळी अंक २०१४ -

मुख्य संपादक - पेशवा
संपादक मंडळ - अरुंधती कुलकर्णी, आगाऊ, तृप्ती आवटी, देवा, सुनिधी, योकु, rmd, टण्या,

सल्लागार - मंजूडी, चिन्मय दामले
मुखपृष्ठ - सुप्रिया पैठणकर-काळे

मुखपृष्ठासाठी संगीत - योगेश जोशी (योग)

कथावाचन -

मोहना जोगळेकर
मनिषा लिमये
anudon
एबाबा
राहुल जोग
rar (आरती रानडे)

कवितावाचन -

मनिषा लिमये
किरण सामंत (किरू)
नीरजा पटवर्धन (नीधप)

गझलवाचन -

नीरजा पटवर्धन (नीधप)
किरण सामंत (किरू)
मिलिंद छत्रे (मिल्या)

मुद्रितशोधन - मृण्मयी, अमितव,आर्फी, आनंदयात्री, गजानन, चिनूक्स, चैतन्य दीक्षित, नंद्या, पौर्णिमा, पराग, बिल्वा, भरत मयेकर, मंजूडी, rar, शुगोल, सशल, स्वाती_आंबोळे

देवनागरीकरण / टंकलेखन - अश्विनी के

रेखाटनकार -

अ‍ॅबस्ट्रॅक्ट दिवाळी - अ‍ॅड. स्वाती दीक्षित
डिजिटल चित्रे - प्राजक्ता पटवे-पाटील
पानांच्या चौकटीवरील नक्षी, खलिता- अश्विनी के, या चित्रांचे संगणकीकरण- प्राजक्ता पटवे-पाटील
पारंपरिक मराठी दिवाळी - अजय पाटील, मिनोती
मुखपृष्ठ रेखाचित्रे - सुप्रिया पैठणकर-काळे
मुखपृष्ठावरील नक्षी- मिनोती
मुशोकार रेखाचित्र - तेजस मोडक
मेंडकेची रेखाचित्रे - प्रश्न क्र. १ ते ११- कंसराज, प्रश्न क्र. १२- मिनोती
रांगोळ्या - मिनोती, अश्विनी के, डॅफोडिल्स, शिल्पा
लहान मुलांची दिवाळी - सृष्टी शहाजी चव्हाण
वारली शैलीतली दिवाळी - नलिनी
व्यंग्यचित्रे - समीर किबे
संपादक चमूची रेखाचित्रे - मैत्रेयी
साहित्याच्या अनुषंगाने रेखाटने - डॅफोडिल्स, अल्पना, अश्विनी के, कंसराज, मिनोती, गजानन
संपादकीय पानावरील सुलेखन - पल्ली
सुलेखन इतरत्र - हिम्सकूल
हेडरमधली दीपावली चौकट आणि सुलेखन - अश्विनी के

तांत्रिक साहाय्य - दीपाली, मुक्ता चिटणीस

प्रकाशचित्र संस्करण - मिनोती, राहुल जोग

वर्षाविहार - मयूरेश , anandmaitri, MallinathK, अरुंधती कुलकर्णी, दक्षिणा, बागुलबुवा, मुग्धानंद, योकु, राजू७६, विनय भिडे, संदिप एस, हिम्सकूल

माध्यम प्रायोजक - जाई., चिनूक्स, सई, आर्फी, मीपुणेकर, ADM, जाई., योकु, चैत्राली, हर्पेन

***

एखादे नाव नजरचुकीने राहून गेले असेल तर क्षमस्व.

***
विषय: 
प्रकार: 

अभिनंदन अ‍ॅडमिन, अ‍ॅडमिन टीम आणि समस्त मायबोलीकर.

एक प्रेमाची सुचना की मायबोली.कॉम चे मुख्यपृष्ठ सतत अपडेट करत राहण्याची गरज आहे. दोन दोन वर्षांपासूनचे धागेच त्यावर अजूनही दिसत आहेत.

अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. Happy

मामी + १. ही सुचना मी अ‍ॅडमीनला विपुत पण केली होती पण काही उपयोग झाला नाही. मुखपृष्ठावर फक्त ठरावीक गोष्टी\लेख वेळच्यावेळी उपडेट होतात.

अ‍ॅडमीन टीम,

ह्या धाग्याची खिडकी उघडल्यावर खिडकीचे शीर्षक (कर्सर ठेवल्यावर) इंग्रजीत दिसत आहे. मायबोली ह्या मराठी संकेतस्थलाच्या वाटचालीतील ह्या मोठ्या टप्प्यावर ते शीर्षक मराठीत दिसवे अशी विनंती! (माझ्या संगणकाचा प्रॉब्लेम असेल तर माफी असावी)

>>>>> 'एक मराठी वेबसाईट' यापलीकडे मायबोलीला जास्त गंभीरपणे विचारात घेतलं जाते आहे. <<<<<<
काही वर्षांपूर्वी पासूनच मला हेच घडणे अपेक्षित होते. Happy
किंबहूना, इथे लिहीते होणे अभिमानास्पद वाटावे अशा प्रकारे मायबोली चालकांनी ही साईट चालविली आहे यात शंका नाही.
त्याचबरोबर इथे लिहीते होताना, वाद घालताना, चर्चा करताना, एखादा विषय समजुन घेताना, एखाद्या नविन विषयाची ओळख करुन घेताना, त्या त्या क्षेत्रातील "दिग्गजच" म्हणावेत अशा बौद्धिकदृष्ट्या ज्येष्ठ अन श्रेष्ठ मायबोलीकर सभासदांच्या येथिल सहभागामुळेही, इथे येणे, इथे प्रतिसाद देणे अभिमानास्पद वाटते.

मायबोलीच्या उत्तरोत्तर प्रगतीकरता शुभेच्छा... Happy

मायबोली व प्रशासक टीमचे हार्दिक अभिनंदन.

"स्वयंसेवकांअभावी काही उपक्रम नाईलाजाने बंद करावे लागत आहेत. " असं साधं सरळ लिहीण्यापेक्षा "जुने जाऊद्या मरणालागुनी" चा वापर अप्रशस्त वाटला. मग त्यापुढे जाऊन "जाळूनी किंवा पुरूनी टाका" म्हणायला काय हरकत आहे? ज्यांनी काम केले त्यावर बोळा फिरल्यासारखे वाटले.

एक संस्था चालवण्यपेक्षाही कितीतरी कष्ट असे संकेतस्थळ चालवण्यास लागतात. एवढ्या वर्षांपासून अविरत तसेच सतत दर्जा राखून काम करणार्या टीमचं अभिनंदन! हे काम सोपे निश्चितच नाही. तरी अजून नव्या उपक्रमांकडे वाटचाल कौतुकास्पद आहे. अश्या अनेक वर्षांसाठी मनापासून शुभेच्छा.

मायबोलीच्या एकंदर वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

स्वयंसेवकांअभावी काही उपक्रम नाईलाजाने बंद करावे लागत आहेत<<< असे कुठले उपक्रम बंद झाले आहेत?

बातम्या.कॉमच्या साच्यावर आधारित हिंदी आणि कानडी या भाषांत २०१४ साली दोन नवीन वेबसाईट सुरू करून महाराष्ट्राच्या अंगणापलीकडे पाय टाकण्याचं धाडस आपण केलं. यानंतर आता गुजराती आणि बंगाली भाषांमध्येही आपण नवीन वेबसाईट सुरु केल्या आहेत.>> याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!

"जुने जाऊद्या मरणालागुनी" या केशवसुतांच्या ओळींना स्मरून ज्या उपक्रमांना प्रतिसाद मिळतो आहे, ते सुरू ठेवावेत आणि ज्यांना मिळत नाही, ते बंद झाले तरी हरकत नाही, या धोरणानुसार आपण पुढे जाणार आहोत.>>> ही उपमा खटकली. असो!
ज्या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो त्या उपक्रमांच्या संयोजनासाठी मायबोली प्रशासनाकडून लवकर हालचाली झाल्या तर बरं होईल.
गणेशोत्सव संपला, दिवाळी दीड महिन्यावर आली, तरी दिवाळी अंकाच्या संपादक टीमसाठी अजून आवाहनही केलेले नाही.

अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! Happy

एक प्रेमाची सुचना की मायबोली.कॉम चे मुख्यपृष्ठ सतत अपडेट करत राहण्याची गरज आहे. दोन दोन वर्षांपासूनचे धागेच त्यावर अजूनही दिसत आहेत. +१

ज्या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो त्या उपक्रमांच्या संयोजनासाठी मायबोली प्रशासनाकडून लवकर हालचाली झाल्या तर बरं होईल.
+१

मायबोली प्रशासन आणि त्याना विविध प्रकारे सातत्याने सहकार्य करणारी मंडळी....ज्यांच्या नावांचा लेखात अगदी अगत्याने उल्लेख केलेला आहे....सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

अभिनंदन.. ते मुखपृष्ठाचे बघाच. त्यानंतर इथे अनेक चांगले लेख, प्रकाशचित्रे सादर झाली, पण ते मात्र बदलत नाही.
आणि नवीन लेखन, वर टिचकी मारण्याआधी हेच बघितले जाते.

एखाद्या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसेल तर तो का, याचा शोध नाही का घेता येणार ? मायबोली सर्व्हे ( संयुक्ताचा नाही ) कधी झाल्याचे आठवत नाही.

गुजराथी आणि बंगालीमधे प्रसिद्ध झालेले साहित्य, भाषांतर करून मायबोलीवर आणता येईल का ?

मायबोली प्रशासन आणि त्याना विविध प्रकारे सातत्याने सहकार्य करणारी मंडळी....ज्यांच्या नावांचा लेखात अगदी अगत्याने उल्लेख केलेला आहे....सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !>>> माझ्याकडुनही Happy

Pages