अ‍ॅस्ट्रोसॅटचे ऊड्डाण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

भारताने आपली पहिली प्रयोगशाळा अवकाशात स्थापन केली आहे. संपूर्ण चमूचं अभिनंदन. यावर काही बातमी न दिसल्याने निदान येवढं इथे नोंदवावं म्हणून हा सोपस्कार. इतरत्र कुठे धागा असल्यास हा काढून टाकेन. बाकी माहिती जमल्यास नंतर.

प्रकार: 
शब्दखुणा: 

सर्व चमूचे अभिनंदन! ही प्रचंड अभिमानास्पद बातमी आहे. जेवढे ऐकले आहे त्यानुसार या उपग्रहाबरोबर इस्रो व संलग्न संस्थांनी ५/६ अत्याधुनिक अवकाश निरीक्षक यंत्रे पाठवली आहेत. त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल Happy

अश्चिग, ह्या आनंदाच्या आणि अभिमानास्पद बातमीबद्दल तूच चांगलं डिटेलवार लिहू शकशील असं वाटलं होतं आणि तुझ्याकडूनच आपल्या मायबोलीवर लिहिलं जावं अशी अपेक्षा होतीच. त्याप्रमाणे आत्ता सकाळी माबो उघडल्यावर हा धागा दिसला. आता ह्या मिशनबद्दल व ह्या प्रयोगशाळेबद्दल काहितरी लिहावंस ही विनंती Happy

भारत, इस्रो आणि संलग्न संस्थांचं अभिनंदन.

तिच्यायला कोण कुठला सेलिब्रिटी हा#लापा#ला तर रकाने भरून बातम्या ओसंडून वाहतात. पण जी खरी ग्लॅमरन्यूज आहे तिकडे साफ दुर्लक्ष!

इस्रोच्या शास्त्रज्ञांचं आणि तंत्रज्ञांचं अभिनंदन.

aschig यांच्या परिश्रमांस अभिवादन.

-गा.पै.

अ‍ॅस्ट्रोसॅट चे यश हा इस्त्रो आणि भारताच्या अवकाश मोहीमांच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा आहे. पी एस एल व्ही ह्या भारताच्या सर्वात यशस्वी प्रक्षेपकाचे हे अजुन एक यशस्वी उड्डाण होते. अमेरिकेच्या हबल दुर्बीणी सारखीच ही भारताची "अवकाश दुर्बीण" असणार आहे. परंतु ही दुर्बीण 'हबल' एवढी मोठी नाही व तिचे आयुष्यमानही ५ वर्षे एवढेच आहे. तरिही भारतासाठी तिचे महत्व अनन्यसाधारण आहे. ह्या दुर्बीणीतील अनेक उपकरणे तयार करण्यात टी आय एफ आर ( टाटा मुलभुत संशोधन प्रयोगशाळा) चा मोठा वाटा आहे. न्युट्रॉन तारे, कृष्ण विवरे, दोन सूर्य असणार्या सूर्यमाला, तार्‍यांचा जन्म / म्रुत्यू होतानाची परिस्थिती इ. खगोलशास्त्रीय घटनांचा आता भारतीय शास्त्रज्ञांना अभ्यास करता येणार आहे. अवकाशात स्वतःची दुर्बीण असणार्‍या जगातील मोजक्या ४ देशांमधे आता भारताने स्थान मिळविले आहे. आजपर्यंत इस्त्रो च्या मोहीमा पृथ्वी वरील परिस्थितीचे विश्लेषण व आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास (मंगलयान) ह्या पुरत्या मर्यादित होत्या. अ‍ॅस्ट्रोसॅट मुळे आता इस्त्रो ने आपले डोळे सूर्यमाले पलिकडे सुद्धा रोखले आहेत.
अ‍ॅस्ट्रोसॅट बरोबरच ह्या प्रक्षेपणात अमेरिकेचे ४, कॅनडाचा १ व इंडोनेशियाचा १ असे ६ नॅनो उपग्रह सुद्धा यशस्वीरित्या कक्षेत पाठवण्यात आले.

-- सर्व माहिती आंतरजालावरून साभार.

भारत, इस्रो आणि संलग्न संस्थांचं अभिनंदन. +१००
यासंबंधी अधिक माहिती aschig यांनी लिहावी हि विनंती. नक्की वाचायला आवडेल.

भारत, इस्रो आणि संलग्न संस्थांचं अभिनंदन. +१००
यासंबंधी अधिक माहिती aschig यांनी लिहावी हि विनंती. नक्की वाचायला आवडेल. +१

रांचो, रीया व झक्की, ह्या संबंधी मिळाली ती माहिती मी वर चार ओळींमधे खरडली आहे. ती वाचलीत का?