विटॅमीन D3चा अभाव आणि सप्लिमेन्ट

Submitted by हर्ट on 30 September, 2015 - 04:35

विटकीन डी-३ असे आहे की ते बहुतकरुन सकाळाच्या सुर्यप्रकाशातून मिळते. नाहीतर मासे खात असाल तर त्यातून मिळते. अलिकडे माझ्या शरिरात ह्या विटॅमीनचा अभाव निर्माण झाला आहे. इथे कुणी विटॅमीन D3च्या सप्लिमेन्ट घेतल्या आहेत का? कुठला ब्रान्ड चांगला आहे? नियमीत किती दिवस घ्यावी? काही साईड ईफेक्टस आहेत का? जाणवतात का?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळाच्या सुर्यप्रकाशातून विटकीन डी-३ मिळेल तेवढे घ्यावे. नाही तर औषधी म्ह्णुन मासे खावे.

डायटेशीयन मालती कारवारकर चा सल्ला घेता आला तर जरुर घ्या.त्या चांगले मार्गदर्शन करतील.

वरील मताशी सहमत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊच नका गोळ्या.
** संपादित**
माझ्या पत्नीस व सासरेबुआंना D3 Deficiency आहे. त्यांना डॉकने काही गोळ्या घ्यायला सांगितले आहे. आठवडयातून एकदा. फरक जाणवला. ६ महिन्यांच्या कोर्स नंतर. मधे खंड पडला आणि आहारातून D3 मिळत नाही विशेष म्हणून अधून मधून दुखणं असतच.

@सकुरा
डॉ. मालती कारवारकर यांचा अथवा त्यांच्या क्लिनिकचा कॉन्टक्ट नंबर आहे का?
त्या अजुन प्रॅक्टिस करतात हे माहिती नव्हते.

मानव,

बघावा लागेल ८-१० वर्षा आधी मी गेले होते त्यांच्या कडे तेंव्हा त्या ठाण्याला त्यांच्या घरी व बांद्राला एके ठिकाणी बसायच्या त्यांनी सप्लिमेंट म्हणुन काही गोळ्या त्यांच्या कडच्या
व काही बाहेरच्या लिहुन दिल्या होत्या.
मुख्य म्हणजे आहारा विषयी सल्ला व डायट चार्ट लिहुन दिला होता खुप फायदा झाला होता अजुन ही काही गोष्टी पाळतो आहोत.

कॉन्टक्ट नंबर मिळाला तर जरुर देईन.

मी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधे गेलो होतो तेंव्हा त्यांनी मला डी-३ च्या कॅपसुल्स दिलेल्या. आठवड्यातून एकदा घ्यायला सांगितल्या होत्या. मी ३/४ महिने घेतल्यात. फरकही जाणवला. पण सहा महिने खंड पडला आणि परत टाचेचा आणि पोटर्‍यांचा त्रास सुरु झाला. अगदी फ्रस्टेशन येत आहे.

क्याल्शियम व्विट्यामिन डी च्या गोळ्या मिळतात. कोणतही स्वस्त ब्रान्ड घ्या.

अआहार चांगला घ्या. दूध , सीताफळ . इ

रंगाशेठ , एक फु.स. - प्लिज ते गोळ्यांचं नाव प्रतिसादातून काढून टाकता का?
जगातली काही लोकं इतकी मुर्ख असतात की मी नेटवर शोधलं तर मला हे औषध मिळालं म्हणून हे घेऊयात म्हणून घेऊनही टाकतील Uhoh

>>>त्यांनी मला डी-३ च्या कॅपसुल्स दिलेल्या. आठवड्यातून एकदा घ्यायला सांगितल्या होत्या. मी ३/४ महिने घेतल्यात. फरकही जाणवला. पण सहा महिने खंड पडला आणि परत टाचेचा आणि पोटर्‍यांचा त्रास सुरु झाला<<<

ह्यावर मायबोलीकर काय सुचवणार बी?

रीयाशी सहमत!गोळ्यांचे नाव खरंच काढून टाका.प्रत्येकाच्या तब्येतीनुसार डॉक्टर सुचवतील तेच औषध घेणे चांगले.

बी टाच व पाउलाचा पंजा जर असा फ्रिक्वेंटली व विनाकारण दुखत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने युरिक अ‍ॅसिड ची ब्लड टेस्ट करा. मी या कारणासाठी परवा ऑर्थो कडे गेलो होतो. त्यांनी मला ही टेस्ट सांगितली. मी केली असता माझे युरिक अ‍ॅसिड वाढले आहे. मद्य मांस डाळ अंडी सध्या बंद करायला सांगितले आहे

??