'कट्टी' हा एक नकार आणि 'बट्टी' म्हणजे होकार. मैत्री आणि प्रेमात असे होकार-नकार चालू असतात. ह्या होकार-नकारामध्ये कायमस्वरूपी कुणा एकाचा विजय होणार असेल, तर तो नकाराचाच होऊ शकतो. कारण नकार म्हणजे एक पूर्णविराम असतो आणि होकार म्हणजे अनेक नकारांवर सतत मात करत राहणे अपेक्षित असणे. म्हणताना आपण म्हणतो की सकारात्मकतेत खूप मोठी ताकद असते, मात्र मतभेदांच्या नकारात्मक कात्रीला जर धार मिळाली, तर एखाद्या नाजूक नात्याचा धागा अगदी सहजपणे कापला जातो. एकाच ओळीचे दोन तुकडे होऊन तिला दोन जागी स्वतंत्र पूर्णविराम मिळू शकतात.
'कट्टी-बट्टी' ही कहाणी अश्याच एका नाजूक नात्यातल्या 'कट्टी-बट्टी'बद्दल आहे आणि हा चित्रपट स्वत:सुद्धा अनेक सकारात्मक-नकारात्मकतांसह आहे. चित्रपट व प्रेक्षक ह्यांच्यातल्या मतभेदांच्या कात्रीला चित्रपटाचा शेवट जवळ येईपर्यंत चांगलीच धार येते आणि त्या नाजूक नात्याचा धागा तुटतो. मात्र हे विभक्त होणं कटुता ठेवून होत नाही, हे विशेष.
ही कहाणी माधव काबरा 'मॅडी' (इम्रान खान) आणि पायल (कंगना राणावत) ची आहे. बड्या बापाची टवाळ, उनाड व बिनधास्त मुलगी पायल मॅडीला दिसते आणि पाहताक्षणीच मॅडी तिच्यासाठी मॅड होतो. तिला वारंवार आपल्या मनाची गोष्ट सांगतो, मात्र तिला कुठलीही वचनबद्धता (शुद्ध मराठीत 'कमीटमेंट') करण्याचा 'मूड' नसतो. अखेरीस सरळसाधा भाबडा मॅडी विना-कमीटमेंट नात्यासाठी तयारी दर्शवतो आणि दोघे आधी शुद्ध टाईमपास म्हणून एकत्र फिरायला लागतात. कालांतराने 'मॅडी' आर्किटेक्ट होतो, नोकरी करायला लागतो आणि दोघे 'लिव्ह इन रिलेशनशिप' स्वीकारतात. पण पाच वर्षं चाललेल्या नात्यात काही कारणाने कटुता येते आणि धागा तुटतो. तुटलेला धागा परत जोडण्यासाठी 'मॅडी' करत असलेलं जीवाचं रान म्हणजे 'कट्टी-बट्टी'चं कथानक.
आता आधी ह्यातल्या सकारात्मकता पाहू.
'फ्लॅशबॅक' तंत्राचा खुबीने वापर करत ही साधीसरळ कथा रंजकतेने मांडली आहे. 'हीरो' च्या सेटवर स्वत:च्या नावाने रिकामी खुर्ची बसवून निखिल अडवानी बहुतेक 'कट्टी-बट्टी' करत असावेत. कारण जशी 'हीरो'मध्ये प्रकर्षाने त्यांची अनुपस्थिती जाणवते, तशी इथे त्यांची उपस्थिती बऱ्यापैकी लक्षात येण्याइतपत आहे !
अंशुल सिंघलसोबत मिळून त्यांनी लिहिलेली पटकथाही चांगली आहे. 'कल हो न हो' ची जादू परत करण्याचा हा प्रयत्न असावा, हेही जाणवतं.
फार वाव नसला, तरी जिथे जिथे संधी मिळाली आहे तिथे तिथे 'तुषार कांती रे' ह्यांच्या छायाचित्रणाने छाप सोडली आहे. चित्रपट 'टवटवीत' आणि 'कोमेजलेला', अश्या दोन पातळ्यांवर एकाच वेळी चालत राहतो. दोन-तीन दृश्यांत मुंबईचं ओघाने आलेलं ओझरतं गगनचुंबी दर्शन क्षणभर आपल्याला विस्मयचकित करतं की, 'हे खरं आहे का ?' पण हीच कॅमेराची कमाल असावी.
कंगना राणावत एक अभिनेत्री म्हणून आजचं अत्यंत आश्वासक नाव. 'क्वीन', 'तनू वेड्स मनू -रिटर्न्स' मध्ये आपल्या मनाचा ताबा घेणारी कंगना इथे दिसत नाही, मात्र ती अगदीच फसतही नाही. बिनधास्त 'पायल' साकारणं हे काही आव्हानात्मक काम नव्हतंच आणि उत्तम कलाकार आव्हानात्मकतेमुळे प्रोत्साहित होतात. त्यामुळे उत्तरार्धाच्या उत्तरार्धात जेव्हा 'पायल' ची व्यक्तिरेखा जराशी आव्हानात्मक होते, तेव्हा कंगना खऱ्या अर्थाने रंगात येते. एरव्ही, ती तिचं दिलेलं काम प्रामाणिकपणे करते, इतकंच.
आता ह्यातल्या नकारात्मकता पाहू.
'कल हो न हो' ची जादू पुन्हा करण्याचा हा प्रयत्न सपशेल फसतो ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फुळकट संगीत. हे संगीत 'शंकर एहसान लॉय' चं आहे, ह्यावर विश्वास ठेवणं आधी जरा कठीण जातं. मग त्यांच्या गेल्या काही चित्रपटांतील कामाकडे पाहिल्यावर दुर्दैवाने आश्चर्यच वाटत नाही ! गेल्या काही वर्षांत चित्रपटात 'संगीत' हा भाग दुय्यमतेकडून 'तिय्यम' वगैरे झाल्यामुळे असावं, पण संगीतकारांचाही उत्साह एकूणच मावळल्यासारखा वाटतो. पूर्वी कर्णमधुर संगीत देणारे 'विशाल-शेखर' कधीच कर्णकर्कश्य झाले आहेत आणि 'शंकर एहसान लॉय' सुद्धा रटाळ होत चालले आहेत.
१०-१२ चित्रपट केल्यानंतरही 'इम्रान खान' मध्ये फारसा फरक पडलेला नाही. मी शाळेत असताना चौथी आणि सातवीतल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी काही मुलांना पालक जबरदस्तीने बसवत. त्या मुलांची कुवत नसे आणि ते अपयशीच ठरत. इम्रान खानला अश्या प्रकारची जबरदस्ती करून कोण कॅमेऱ्यासमोर उभं करतंय, माहित नाही. पण त्याचीही बिचाऱ्याची कुवतच नसावी. तो कुठल्याच जागी आश्वासक वाटतच नाही. ऑफिसमध्ये मित्रासोबतची भांडणं आणि 'देवदास'चं मंचीय सादरीकरण ह्या दोन भागांत तर तो असह्यच आहे !
'देवदास' वाला भाग तर एकंदरीतच इतका भोंगळ आहे की वैतागच येतो ! अशक्य पांचटपणा व शुद्ध बिनडोक जुळवाजुळव ह्यांमुळे हा सगळा तमाशा कधी एकदा उरकतोय असं वाटतं त्या दहा मिनिटांत !
तितकाच अत्याचारी कंटाळा आणतो फक्त २-३ दृश्यांत दिसणारा 'मॅडी'चा 'बॉस'. हा नगीना कुठून शोधून काढला आहे कुणास ठाऊक. पण 'प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे' हाच त्याचा एककलमी कार्यक्रम असावा बहुतेक. विनोदाच्या नावाखाली तो जो काही आचरटपणा करतो, तो संतापजनक आहे.
नकारात्मकतेत सगळ्यात मोठा हातभार आहे शेवटाचा. चित्रपटाचा शेवट साधारण अर्धा तास चालतो. ह्या अर्ध्या तासात तो एक विचित्र कलाटणी घेतो. ही अतिरंजित कलाटणी 'कैच्याकै' सदरात मोडू शकते. पण तरी त्यातल्या त्यात बरं हेच की इथून पुढे कंगना फॉर्मात येते आणि इम्रान खान जरासा लपतो !
कट्टी आणि बट्टीचा हा 'सी-सॉ' चा खेळ सव्वा दोन तासांनी संपतो. ह्या सव्वा दोन तासांत जे जे काही आपल्या मनाच्या पाटीवर लिहिलं जातं, ते सगळं शेवटानंतर पुसलं जातं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाटी घेऊन आपण बाहेर पडतो. ही कुठली अजरामर लव्ह स्टोरी नाही. अप्रतिम चित्रपटही नाही. पण सगळ्या नकारात्मकतेनंतरही मनावर कुठला चरा उमटत नाही, ह्याएकाच कारणासाठी हा चित्रपट पाहता येऊ शकेल.
बाहेर आल्यावर इम्रानशी कट्टी आणि कंगनाशी बट्टी होईल होईल, ह्याची मात्र १००% ग्यारंटी !
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/09/movie-review-katti-batti.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये २० सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
या इम्रानचा "एक मै और एक तू"
या इम्रानचा "एक मै और एक तू" चित्रपट मी एका वॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंडच्या नादाने दोघांचे तिकीट पॉपकॉर्न मिळून हजार रुपये खर्च करून पाहिलेला. तेव्हाच शप्पथ घेतलेली की या वशिलाच्या तट्टूचा एकही चित्रपट आयुष्यात कधी बघणार नाही. अगदी परीक्षणही वाचणार नव्हतोच. पण तुम्हीही त्याच्याशी कट्टी केलीत म्हणून वाचले.
आजही आपल्यासाठी इम्रान खान म्हटले की पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान.
आणि नुसते इम्रान म्हटले की इम्रान हाशमी
ऋन्मेऽऽष +१. परिक्षण छान
ऋन्मेऽऽष
+१.
परिक्षण छान लिहिले आहे.
सगळेच रिव्ह्यू वाईट म्हणताहेत
सगळेच रिव्ह्यू वाईट म्हणताहेत या चित्रपटाला. उत्तम क्षमता असलेले कलाकार आहेत कि आता, कधीपर्यंत या वशिल्यांच्या तट्टूंना संधी देत राहणार ?
आजच पेपरात सिनेमांची लिस्ट
आजच पेपरात सिनेमांची लिस्ट पाहताना लक्षात आलं की अनेक चित्रपटगृहात दाखवला जातोय. भली मोठी लिस्ट आहे. शिवाय प्रमोशनही मस्त केलंय पण एकूण सिनेमा डब्यात जाणार तर?
मी तसा ही पाहणार नव्हतेच, पण पाहून पैसे वाया घालवणार्यांकरता वाईट वाटतंय
पण एकूण सिनेमा डब्यात जाणार
पण एकूण सिनेमा डब्यात जाणार तर?
>>>>>
हे रसप यांच्या वरील परीक्षणावरून ठरवले असेल तर सांगू इच्छितो त्यांच्या परीक्षणाचा आणि बॉक्स ऑफिसचा आपसात काही संबंध नसतो.
हे रसप यांच्या परीक्षणांच्या विरोधात लिहिलेले मत नसून, माझे असे निरीक्षण आहे की बरेचदा ते ईथे मसालापटांची मस्त घेतात, पण ते बॉक्स ऑफिसवर आठवड्याभरातच गल्ला कमावतात. बाकी चित्रपटविषयक कितीही वैचारीक मतभेद असले तरी तुमची खास स्वताच्या शैलीतील परीक्षणे आवडतातच, न चुकता वाचतोच, हे वे सां न.
चित्रपटाचा दर्जा आणि बॉक्स
चित्रपटाचा दर्जा आणि बॉक्स ऑफिस यांचा काही सम्बन्ध आहे का?
चित्रपटाचा दर्जा आणि बॉक्स
चित्रपटाचा दर्जा आणि बॉक्स ऑफिस यांचा काही सम्बन्ध आहे का?
>>>
असतो,
अन्यथा मी चित्रपट दिग्दर्शक झालो नसतो
चित्रपटाचा दर्जा आणि बॉक्स
चित्रपटाचा दर्जा आणि बॉक्स ऑफिसचा संबंध नक्कीच असतो.
फक्त आपण आपल्या आवडीनुसार चित्रपटाच्या जातकुळीवर चित्रपटाचा दर्जा ठरवायची चुकी करतो.
उदाहरणार्थ, सलमानचा एखादा सौथेंडीयन मसालापट म्हटले की सो कॉलड उच्च अभिरुची राखून असलेले त्याला नाकं मुरडणार आणि त्याचा दर्जा कनिष्ठ असे ठरवून मोकळे होणार. भले त्याची मनोरंजन वॅल्यू अफाट का असेना.
त्याच उलट वरील जातकुळीचे म्हणजे सलमानपट आवडणारी पब्लिक एखाद्या संथ कलात्मक चित्रपटाची फुकटचा टाईम आणि पैसा वेस्ट म्हणून खिल्ली उडवणार. भले तो कितीही आशयघन चित्रपट का असेना, कोण पैसे देऊन विकतची डोकेदुखी घेणार म्हणत त्यावर काट मारणार.
आता या चित्रपटांच्या आणि चित्रपट रसिकांच्या बर्याच जातकुळी आहेत. पण त्या त्या जातकुळीतही त्यानुसार चित्रपट दर्जेदार असेल तरच चालतो.
एखाद्या पर्टिक्युलर जातकुळीतील सारेच चित्रपट एकसारखे व्यवसाय नाही करत, जो त्या ठराविक आवडीच्या लोकांना रुचेल असा दर्जा गाठतो तोच बॉक्स ऑफिसवर चालतो किंवा तोच पुरस्कार मिळवतो.
सारेच मसालापट एकसारखेच मनोरंजन नाही करत तर सारेच कलात्मक चित्रपट एकसारखेच आतवर नाही भिडत.
वर मी म्हणालो की काही संबंध नसला तर मी दिग्दर्शक नसतो का बनलो, हे मी गंमतीने म्हणालो असे तुम्हाला वाटेल, पण तसे नाहीये.
आता दुनियादारीचेच घ्या. मराठी बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड मोडला त्याने. अर्थात काही मूळ पुस्तक प्रेमी त्याच्याही दर्ज्यावर शंका घेतातच. पण मला सांगा, जर तो खरेच दर्जाहिन चित्रपट असता तर असे चित्रपट परत परत नसते का बनले. चला ईतरांनी नाही पण त्या दिग्दर्शकाने तरी नक्कीच तो फॉर्म्युला वापरून अजून २-४ असे चित्रपट बनवत पैसे कमावले असते. दर्जाहिन चित्रपट बनवून जर सहज पैसा मिळत असेल तर कोण नाकारणार. कारण दर्जाहिन चित्रपट बनवणे हे दर्जेदार चित्रपट बनवण्यापेक्षा नक्कीच सोपे असावे नाही
ऋन्मेष, तुमच्या पदझेंडूंचा
ऋन्मेष,
तुमच्या पदझेंडूंचा एक फोटो टाका राव इथे ! दर्शनाने पावन होईल मायबोलीकर जनता..!!
__/\__
बेबे मी तुला शाणी समजत होते
बेबे मी तुला शाणी समजत होते राव
तु कधी पास्नं आ बैल मुझे मार कराय लागलीस?
>>अन्यथा मी चित्रपट दिग्दर्शक
>>अन्यथा मी चित्रपट दिग्दर्शक झालो नसतो..
(मला लागलेला अर्थ - हे महाशय चित्रपट दिग्दर्शक आहेत)
>> वर मी म्हणालो की काही संबंध नसला तर मी दिग्दर्शक नसतो का बनलो
(मला लागलेला अर्थ - हे महाशय चित्रपट दिग्दर्शक नाही आहेत)
मी मराठी माध्यमातून शिकलो असल्यामुळे माझे मराठी कच्चे आहे..

बाकी चालू दे!!
आता दुनियादारीचेच घ्या. मराठी
आता दुनियादारीचेच घ्या. मराठी बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड मोडला त्याने. >> आँ हो का?
अर्थात काही मूळ पुस्तक प्रेमी त्याच्याही दर्ज्यावर शंका घेतातच.>> पुर्ण १००% वाव आहे दर्जाबाबत शंका घ्यायला. पुस्तक हे कधीही त्या पुस्तकावर बनवलेल्या सिनेमापेक्षा वरचढ(च) असते.
पण मला सांगा, जर तो खरेच दर्जाहिन चित्रपट असता तर असे चित्रपट परत परत नसते का बनले. >> मराठी नीट लिहित चला ऋन्मेष महाराज. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला तरी कळतंय का?
दर्जाहिन चित्रपट पुन्हा पुन्हा बनतात?
दुनियादारी दर्जाहिन आहे म्हणूनच परत बनला नाही आहे.
चला ईतरांनी नाही पण त्या दिग्दर्शकाने तरी नक्कीच तो फॉर्म्युला वापरून अजून २-४ असे चित्रपट बनवत पैसे कमावले असते. दर्जाहिन चित्रपट बनवून जर सहज पैसा मिळत असेल तर कोण नाकारणार. कारण दर्जाहिन चित्रपट बनवणे हे दर्जेदार चित्रपट बनवण्यापेक्षा नक्कीच सोपे असावे नाही. >>
हो ना. दर्जाहिन चित्रपट बनवणारे आणि पाहणारे आणी वाखाणणारे (तुमच्यासारखे) असतातच की दुनियेत.
बाकी सिनेमाचा दर्जा बॉक्स ऑफिसवर किती पैसे मिळवले यावर अवलंबून आहे असं आपलं म्हणणं असेल तर रसप प्रमाणे मलाही आपला पदकमलांचा एक फोटो पाठवावात.
बेबे तुला बोलता बोलता मी ही हात धुवून घेतले. कारण वर लिहिलेलं असह्य आहे.
>>तुमच्या पदझेंडूंचा एक फोटो
>>तुमच्या पदझेंडूंचा एक फोटो टाका राव इथे ! दर्शनाने पावन होईल मायबोलीकर जनता..!! << +१००१
रणजित, काय हे...फक्त फोटो ??
मी तर ऋन्मेष ह्यांचे एक मंदिर बांधावे असा विचार करतो आहे, त्या मध्ये सई-पुई, स्व(ढोल्या)जो, शा.खा. ह्यांच्या मुर्त्या असतील व त्या समोर दास्-मारुती रुपात साक्षात ऋन्मेष असतील.
ह्या मंदिरात अनवाणी गेले असता हमखास ग.फ्रे. लाभेल अशी प्रसिद्धी ही करणार आहे.
समस्त मा.बो. करांनो सढळ हाताने देणगी द्या...
बाकी रणजित आपला लेख छान च नेहमी प्रमाणे. ठेटरात जाउन पिक्चर बघण्याचे पैसे वाचवल्याबद्दल
धन्यवाद !!
उगाच आपलं एक वैचारिक पिल्लू
उगाच आपलं एक वैचारिक पिल्लू सोडतोय. माहित आहे की जवळ केलं जाणार नाही, पण लैच घुटमळतंय पायात म्हणून...
'दर्जाहीन चित्रपट बनवायचा आहे', अश्या हेतूने, विचाराने आणि प्लॅनिंगने कुणी कुठला चित्रपट बनवत नसावं. चित्रपट दर्जाहीन 'होतो'. कधी काही ठिकाणी चुका होतात, काही ठिकाणी नशीब फसतं, काही ठिकाणी मेहनत कमी पडते आणि बहुतांश ठिकाणी कुवत. काही वेळेस चित्रपट बनल्यानंतर स्वत: चित्रपटकर्त्यांनाही कळतं की हे प्रकरण गंडलंय. किंबहुना, जर खरा कलाकार असेल तर त्याला कितीही चांगलं काम केलं तरी स्वत:च्या कामात काही न काही दोष दिसतोच आणि पुढच्या प्रयत्नात तो त्या दोषावर मात करायचा प्रयत्न करतो. अर्थात, हे सगळं तेव्हाच होतं, जेव्हा 'कुवत' असेल. जर 'कुवत'च नसेल तर नाही होणार !
त्यामुळे ऋन्मेष ह्यांच्या इतर अनेक वक्तव्यांप्रमाणे त्यांचे -
दर्जाहिन चित्रपट बनवून जर सहज पैसा मिळत असेल तर कोण नाकारणार. कारण दर्जाहिन चित्रपट बनवणे हे दर्जेदार चित्रपट बनवण्यापेक्षा नक्कीच सोपे असावे नाही.
हे वक्तव्यही तर्कशून्य आहे. बोले तो इल्लॉजिकल.
दर्जाहीन चित्रपट बनवायचा
दर्जाहीन चित्रपट बनवायचा आहे', अश्या हेतूने, विचाराने आणि प्लॅनिंगने कुणी कुठला चित्रपट बनवत नसावं. <<< यावर मध्यंतरी अँकीनं१ या आयडीनं एक मस्त पोस्ट लिहिली होती. कुठे मिळाली तर लिंक देते.
आता दुनियादारीचेच घ्या. मराठी बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड मोडला त्याने.<<< नॉलेज अपडेट करा. दुनियादारीचे रेकॉर्ड देखील मोडले गेले आहे.
कंगनासाठी कट्टी बट्टी
कंगनासाठी कट्टी बट्टी पाहाणारच.भले इम्रान ला सहन करावे लागले तरी चालेन.
बाकी सिनेमाचा दर्जा बॉक्स
बाकी सिनेमाचा दर्जा बॉक्स ऑफिसवर किती पैसे मिळवले यावर अवलंबून आहे असं आपलं म्हणणं असेल तर >>>
अंह, वाक्याचा चुकीचा अर्थ काढताय, बॉक्स ऑफिसनुसार दर्जा ठरवत नाहीये, तर बॉक्स ऑफिसवर यश मिळालेले चित्रपटांना आपण दर्जाहीन नाही म्हणून शकत. असे मी म्हणतोय.
पण तरीही हे खरे मानले तर याचा अर्थ असा होतो की बहुसंख्य भारतीय प्रेक्षकांची अभिरुचीही दर्जाहीनच आहे. आणि हे मला मान्य नाही ! तुम्हाला मान्य आहे ?
..
नॉलेज अपडेट करा. दुनियादारीचे रेकॉर्ड देखील मोडले गेले आहे. >> देखील
मायलॉर्डमायबोलीकर हा देखील शब्द नोट करून ठेवा
अगदीच राहवेना म्हणून गं.
अगदीच राहवेना म्हणून गं. पुढे काय वाढून येणार माहीत होते, तरीही चूक केली.