शोधा उत्तर

Submitted by आईची_लेक on 20 September, 2015 - 10:35

दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात
पण १ मोती उरतो . नंतर तिसरा माणूस येतो परत समान वाटप होते १ मोती उरतो , चौथा माणूस येतो ,पाचवा येतो ,सहावा माणूस येतो तरीही प्रत्येक वेळी
१ मोती उरतो शेवटी सातवा माणूस आल्यावर समान वाटप होते आणि एकही मोती उरत नाही
तर आता सांगा माळेत एकूण मोती किती ?

तुमच्याकडे १,२,५,१०,२० व ५० च्या अनेक नोटा आहेत आणि तुम्हाला दुकानदाराला १०० रुपये द्यायचे आहेत
तुम्ही एकूण १० नोटा द्यायच्या आहेत पण १० च्या १० नोटा द्यायच्या नाहीत व एकूण नोटा १० च दिल्या पाहिजेत
कमी किंवा जास्त नाही
तर आता सांगा तुम्ही १०० रुपये कसे देणार ?...

(प्रत्येक मूल्याची नोट वापरली पाहिजे अशी अट नाही )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ भरत मयेकर बरोबर आहेत दोन्ही उत्तरं , आता हे पुढच कोडं

एका माणसाच वय त्याच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुप्पट आहे
पाच वर्षांपुर्वी त्या माणसाच वय त्याच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेच्या तिप्पट होत
तर त्या माणसाच आताच वय किती ?

५ वर्षांपूर्वी मुलांच्या वयाची बेरीज = क्ष
५ वर्षांपूर्वी बापाचं वय = ३क्ष
आज मुलांच्या वयाची बेरीज = क्ष + १०
आज बापाचं वय = ३क्ष + ५

दिलेल्या माहितीनुसार

३क्ष + ५ = २*(क्ष + १०)
= २क्ष + २०

म्हणून, क्ष = १५

म्हणून बापाचं आजचं वय = ५०

सगळे आकडे वर्षात घ्या बरं. नाहीतर भलताच घोळ व्हायचा! Wink

-गा.पै.

आताची वयं :

बाप = क्ष , मुलांचं एकत्रित वय = म

म्हणून क्ष = २म ----(१)

५ वर्षांपूर्वीची वयं

बाप = क्ष - ५ , मुलांची एकत्रित वयं = म - १० ( दोन्ही मुलांची पाच पाच वर्षं कमी म्हणून एकूण १० कमी)

त्यावेळी क्ष - ५ = ३ ( म - १०) -----(२)

समीकरण (२) मध्ये समीकरण (१) वरून क्ष ची किंमत घालून

२म - ५ = ३ (म - १०)
२म - ५ = ३म - ३०
म = २५
म्हणून क्ष = ५०

बापाचे सध्याचे वय ५० वर्षे आहे.

ताळा : ५ वर्षांपूर्वी मुलांच्या वयाची बेरीज होती २५-१० = १५ वर्षे
आणि बापाचे वय होते ४५ वर्षे.
४५ = १५ गुणिले ३

८ पुरुष व ६ मुले ह्यांची रोजची एकूण कमाई ३३० रुपये आहे
जर ४ पुरुषांची कमाई हि ५ मुलांच्या कमाई पेक्षा ४५ रुपयांनी जास्त आहे
तर एका पुरुषाची व एका मुलाची कमाई किती ?
म्हणजे प्रत्येकी एकाची कमाई किती ?

एका तीन अंकी संख्येतील मधला अंक ० आहे आणि बाकीच्या दोन अंकांची बेरीज ९ आहे
जर १ल्या व ३ऱ्या अंकांची अदलाबदल केली तर तयार होणारी नवीन संख्या हि मूळ संख्येपेक्षा २९७ ने मोठी आहे
तर मूळ संख्या शोधा

१२, १५

एका मुलीच्या कडेवर एक मुलगा असतो.
एकजण तिला विचारतो "हा तुझा कोण?"
ती म्हणते "याचा बाप ज्याचा सारसा, त्याचा बाप माझा सासरा"

तर दोघांचे नाते काय?

एक बाई एका मुलाबरोबर जात असते.
एकजण तिला विचारतो "हा तुझा कोण?"
ती म्हणते "ह्याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो"
तर दोघांचे नाते काय?

एका मुलीच्या कडेवर एक मुलगा असतो.
एकजण तिला विचारतो "हा तुझा कोण?"
ती म्हणते "याचा बाप ज्याचा सारसा, त्याचा बाप माझा सासरा"

तर दोघांचे नाते काय?>>>>>>>>>>>>>>बहीण - भाउ