"जळ्ळं मेलं 'लक'शण!!" गद्य STY - १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 16:35

भारत विभूषण आपल्या सिंगल रूममध्ये विमनस्क स्थितीत बसला होता.. आत्ता या घडीला 'सबसे अनलकी कौन' असा गेम शो कुठे असता तर तो नक्कीच जिंकला असता.
तसा तो जन्मापासूनच अनलकी होता. जन्म देतानाच आय मेली अन् बाप आधीच गेला होता घर सोडून. आठवत होतं तेव्हापासून त्याच्या आज्यानंच त्याला वाढवलं होतं.. चार वर्षापूर्वी तोही गेला, अन् हा एकाकी झाला बिचारा.

त्याला बॉलीवूडचा नेक्स्ट 'मगनभाई ड्रेसवाला' बनायचं होतं.. डीझायनर ड्रेस कॅटवॉकपुरते ठीक हो, बाकी, ड्रेस सप्लायरच लागतो लोकांना.. तो बनायचं स्वप्न होतं त्याचं.. त्या स्वप्नापायीच त्याने होती-नव्हती ती पुंजी लावून अंधेरीला खोपटंही टाकलं होतं, दोन टेलर, चार मशिन टाकून काम सुरूही केलं होतं.. त्या निमित्तानं फिल्म लायनीतल्या लोकांच्या बातम्या, गॉसिपही कळत होतं.. पण तिथही नशीब आड आलं! भारतने धंदा सुरु केला तोवर प्रसिद्ध निर्माता 'उदास घाई'चा धंदा पार बसला होता. तो पार कर्जात बुडाला होता.. बहुतेक ड्रेस सप्लायरचा धंदाही मंदा झाला होता कारण दोन चार हातरुमालांमध्ये हिरवणींचे काम भागायला लागले होते. हिरो ही ६-८-१० पॅकच्या नादात असल्याने ड्रेस सप्लायर्सचे धंदे पॅक ह्यायची वेळ आली होती.

त्यातच दुकान टाकताना तिथल्या रामूदादाला पन्नास हजार द्यायचे कबूल केले होते त्यानं.. आता त्याची मदार 'संजीव मिली भोपाली' च्या 'हम देवदास हो चुके सनम' वर होती पण भोपालीनं घातला की सिनेमा डब्यात! सिनेमाच नाही, तर पैसे कुठले??? रामूदादानं वाट पाहिली, पाहिली आणि एक रात्री सोडले चार गुंड दुकानावर! मेल्यांनी पार नासधूस करून टाकली 'भारतभाई ड्रेसवाला'ची! मशिनं मोडली, टेलर गेले पळून वर भारतभाईचे टाकेही ढिले केले.

आता कपाळावर हात मारून बसण्यापलिकडे भारतकडे काहीच करण्याजोगं नव्हतं.. हाती ना पैसा, ना काम, ना कोणी जीवाभावाचा/ची ज्याच्याकडे मन मोकळं करू शकेल.. प्लेन अनलकी फेलो..

स्वत:च्या नशीबाला शिव्या घालता घालता त्याला आठवलं की त्याच्या आज्याने राम म्हणायच्या आधी त्याला एक चपटी लाकडी पेटी दिली होती.. कुठे गेली बरं? रूममध्ये थोडी उचकापाचक केल्यानंतर ट्रंकेच्या तळाला पडलेली ती पेटी त्याच्या हाती लागली. बाहेर काढून, थोडी साफ करून भारत तिच्याकडे निरखून पहायला लागला.. वीतभर लांबी-रुंदीची आतून रिकामी असलेली साधी पेटी होती ती.. पण ती त्याला देताना काय बरं म्हणाला होता म्हातारा.. हां..

'बिभिषणा (आजा त्याला ह्याच नावानं लाडानं हाक मारायचा..) ही पेटी जपून ठिव रंऽऽ सोन्या.. येकदम पावरबाज पेटी हाय, अशीतशी समजू नगंस.. ही पेटी येखाद्याचं नशीब खोलू शकते बग.. म्या फिम्लीस्तानमदी स्पॉटला व्हतो बग, तवा तिथं शूटींग बगायला आलेल्या येका साधूनं दिली व्हती ही.. हां, येकदम पॉवरबाज.. लै बेक्कार दिवस आलं आन् कोनचाच दरवाजा हुघडत न्हाई आसं वाटल ना, की ह्या पेटीवर हात ठिवायचा आन् मंत्र म्हणायचा 'वक्त की फितरत खोलले किस्मत, खुद पे भरोसा है तो आजमाले अपना लक' आन् मग बगंच, अशीऽऽऽ किस्मत खुलेल तुजी.. हां पण ध्यान्यात ठ्येव, पैश्यापायी, लोभापायी पेटीला कामाला लावायचं न्हाई.. फकस्त अडचण आस्ली, तरास आस्ला, काय करावं, कसं करावं कळंना झालं, की मंगच पेटीकडं जायाचं.. हुब्या जिनगानीत तुला अजून काय देऊ नाय शकलो बग.. हीच काय ती माजी इष्टेट.. तुला दीतोय.. पन द्येव करो आणि तुला ती कधी वापरायची येळ न येओ..'

भारतचे डोळे चमकले! वेळ आली होती, पेटी वापरायची वेळ आली होती.. सगळे दरवाजे तर बंद झाले होते.. आता लक आजमावायची वेळ आली होतीच.. काय करावं? भारत अस्वस्थ झाला..

इतक्यात.. 'भारतभाऽऽऽय' अशी हाळी आली खालून.. कोण ते आलं या वक्ताला? म्हणून भारतने खाली पाहिलं तर चक्क एरीयाचा दादा सत्तूभायचा उजवा हात पक्या खाली उभा!

"आयला पक्या! अब्बी कैसे?"
"नीच्चे आ बे.. भाय बुलारा.."
"कौन? सत्तूभाय????" भारतचा विश्वास बसेना..
"और कोन? और कोन भाय है बे इधर????" पक्या चिडला की डेंजर माणूस!
"आलो आलो.."

तिच्यायला! तिकडे अंधेरीत रामूदादा आणि इकडे गिरगावला हा सत्तूदादा. साला तो तिकडे टाका ढिला करतो आता हा इकडे काय उसवतोय?

असावी म्हणून भारतने ती पेटी शर्टच्या आतल्या पैरणीच्या खिश्यात सरकवली आणि जिना उतरायला लागला..

------------------------------------------------------------------------------------

काय झालं पुढे? पेटीने खरंच लक बदललं का? भारतचा 'भारत ड्रेसवाला' झाला का? का पेटीत अजून काही रहस्य होतं?

चला, लिहूया आपणच सर्व- आपली कल्पनाशक्ती पणाला लावून खेळूया सर्व मायबोलीकर हा STY..

तत्पूर्वी, काही अटी:
१) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
२) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
३) चारपेक्षा जास्त नवीन पात्रे एका प्रसंगात नव्याने इन्ट्रोड्यूस करू नये.
४) गाणी घालू शकता (घालाच )
५) स्थळं, काळ, वेळ याला बंधन नाही, लॉजिकचाही हट्ट नाही, पण किमान सूत्र असावं.

चला, करूया सूतकताई या गणेशोत्सवात..

------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुशबू हळूहळू चालत हील्सची टकटक करत सत्तूच्या जवळ आली अन् म्हणाली....

ढॅण टॅ ढॅण्..

सत्तूचं रडणं खाडकन थांबलं. तो चांगलाच दचकला. ही अशी काय ओरडतेय? आता नाचायलाही लागतेय की काय ही? कारण खुशबूने चित्रविचित्र हातवारेही सुरु केले होते. ढॅण टॅ ढॅण चा घोष थांबायलाच तयार नव्हता. खुशबू कधी आपल्या डाव्या खांद्यावर लटकवलेल्या स्टायलीश बुच्ची बॅगेत हात घालायची तर कधी जांभळ्या कुर्त्याच्या खिशात. ही रिंग टोन म्हणजे नक्किच सॅम सी चा कॉल. तिचे सगळे भवितव्य या कॉलवर अवलंबून होते. शेवटी तो चिमुकला सेलफोन लागला तिच्या हाताला एकदाचा आणि तो आवाज आणि तिचे हातवारे थांबले म्हणून सत्तु सकट सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हॅलो... खुशबू आपल्या किणकिणत्या आवाजात फोनवर गुणगुणली.
इकडे सम्राटसिंग चांगलाच भडकलेला होता इतका वेळ लागतोय तरी आपला फोन उचलला जात नाहीये म्हणून. पण आवाजात चीड व्यक्त न होऊ देता त्याने अगदी प्रेमळ आवाजात म्हटले " जायची तयारी करायची आता बेबी."
"क्काय?" खुशबू आनंदाने किंचाळली. याचा अर्थ करुण बोअर धर्माच्या नव्या 'हर नेम इज सावंत ' या चित्रपटासाठी तिची निवड झाली तर. आता डायरेक्ट अमेरिकेला शुटिंगसाठी जायला मिळणार. खुशबूला नाचावसं वाटत होतं.
" सॅम तु कित्ती ग्रेट आहेस! माझ्यासाठी किती प्रयत्न केलेस. सांग आता मी तुझ्यासाठी काय करु?" खुशबूने आवाजात शक्य तितका लाडिकपणा ओतत प्रश्न केला.
सम्राटसिंगच्या जागी दुसरा कोणीही असता तर त्याने या खुल्या दर्यादिलीचा चांगलाच फायदा उठवला असता. पण तो सम्राटसिंग बहुरुपी होता. कोणी आलतू फालतू फिल्म प्रोड्युसर नव्हता. त्याची रुपं अनेक होती. फिल्म इंडस्ट्रीमधे तो नुसते ड्रेसेसच पुरवत नव्हता तर एक नामवंत ड्रेस डिझायनर म्हणूनही त्याने नाव कमावलं होतं. सॅम सी या लेबल खाली त्याचे ड्रेसेस बॉलिवुडपासून हॉलिवुडपर्यंत सुप्रसिद्ध होते. अर्थात त्याचे अजून एक रुप होते जे अजून कुणालाच माहित नव्हते.
"बेबी मला काही नको. माझा एक जवळचा मित्र आहे भारत. त्याला तुझा पर्सनल ड्रेस डिझायनर म्हणून घेऊन जायचस. "
"भारत? कधी नाव ऐकलं नाही. " खुशबू या विचित्र मागणी मुळे जरा बुचकळ्यातच पडली. सॅमचे ड्रेसेस या निमित्ताने घालायला मिळणार म्हणून ती केव्हढी खुश झाली होती. आणि हा कोण फडतूस भारत? अर्थातच तिला सॅम म्हणेल ते मान्य करायलाच हवं होतं. तिला तिचे जुने दिवस चांगलेच आठवत होते जेव्हा ती कोणीच नव्हती. मिस स्लमडॉग स्पर्धेमधे शेवटच्या फेरीत घालायला तिच्याजवळ चांगला गाऊनही नव्हता. रामू तर तिने या असल्या स्पर्धेमधे उतरुन आपल्या इज्जतीचा फालुदा बनवला म्हणून भडकला होता. त्याच्याकडून काही मदत मिळणं शक्यच नव्हतं.
सम्राट बहुरुपीच्या प्रचंड मोठ्या शोरुमबाहेर ती डोळे भरुन आतले कपडे पहात असताना तिला सम्राटसिंगाने बघितले होते आणि आत बोलावून सॅम सी लेबलचा तो सुरेख सप्तरंगी गाउन तिला दिला होता. भाड्याचे पैसेही लावले नव्हते. तिला अजूनही माहित नव्हतं सम्राटसींग म्हणजेच स्वतः सॅम सी.
ते काही असो मिस स्लमडॉग ते आत्ताचा करुण बोअर धर्माची नवी नायिका हा सगळा प्रवास त्याच्यामुळेच तर शक्य झाला होता आणि ती त्याचा शब्द मोडणार नव्हती.

तिकडे सम्राटसिंगचे बोलणे ऐकत असलेला भारत विभिषण आपलं नशिब असं अचानक उघडू पहात आहे हे बघून खुशच झाला. खुशबूला त्याने पाहिले नव्हते पण एका नव्या हिरॉइनसाठी ड्रेस डिझाईन करण्याची संधी ती सुद्धा करुण बोअरची हिरॉईन. आता ते मास्क नकोत शिवायला आणि पेटीही नको उघडायला.

" माझं एक काम मात्र करायचं." सम्राटाने त्याच्या सेक्रेटरीला बोलावून त्याची बॅग आणायला सांगीतलं. बॅग आल्यावर त्याने ती उघडली. भारत कुतुहलाने पहात होता.
बॅगेत एक जॅकेट होतं. रंगिबेरंगी कापडांच्या तुकड्यांनी शिवलेलं. आत कापूस भरल्यासारखं गुबगुबीत सुद्धा.
सम्राटसिंगाने ते जॅकेट प्रेमाने हातात घेतले.
"माझ्या वडिलांनी आपल्या हातांनी शिवलं आहे हे." सम्राट गहिवरल्या आवाजात म्हणाला.
"हे नुसतं जॅकेट नाही. यामधे एक शक्ती सुद्धा आहे. वेळ येताच ती तुला समजेल. "
भारत आता आश्चर्याने थक्क झाला. एक ही पेटी आणि आता हे जॅकेट. आपलं नशीब चांगलच जोरावर दिसतय.
" हे तु घेऊन जा आणि अमेरिकेत माझा जुळा भाऊ असतो त्याला कसंही करुन नेऊन दे."
अरेच्चा. म्हणजे कायम आपल्याला नाही मिळणार तर हे.
ह्या जॅकेटाच्या आत दहा कोटींचे वगैरे हिरे तर लपवले नसतील हिंदी पिक्चरमधे दाखवतात तसे? त्याच्या मनात गमतीशीर विचारही आला.
"काय नाव तुमच्या भावाचं? आणि ते कुठे रहातात?" त्याने विचारलं. जॅकेट पोचवण भारतला काही तितकसं कठीण वाटलं नाही.
"माझ्या भावाचं नाव ?" असं म्हणून सम्राट थोडावेळ थांबला. मग त्याने खिशातून एक कागद काढून त्यावर भावाचे नाव लिहिले. भारतने ते वाचले आणि तो प्रचंड दचकला.

..भारतने ते वाचले आणि तो प्रचंड दचकला. पण त्याने तसं चेहर्‍यावर दाखवलं नाही. कितीही झालं तरी गेली दहा बारा वर्षं तो फिल्म इंडस्ट्रीत काम करत होता. तेव्हा कोणत्या वेळी चेहर्‍यावर काय भाव असले पाहिजेत हे त्याला चांगलंच माहित होतं. "काळजी करु नका. मी करेन तुमचं काम." असं म्हणून त्याने स्.सि. च्या हाताला थोपटलं आणि सदगदित होऊन भारत हॉस्पिटलमधल्या त्या रुम मधून बाहेर आला. आज सकाळपासून किती चमत्कारिक घटना घडत होत्या. कशाची कशाला संगती लावायची तर खरंच कशाचा कशाला संबंध नव्हता. तरीही हे सगळं भारतच्या बाबतीत घडत होतं. आता करुण बोअरच्या सिनेमासाठी काम करायचं.. करुण बोअरच का? अन त्याला गाणं आठवायला लागलं..आणि तो स्वत्:साठीच ते आहे अशी कल्पना करु लागला.

मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू
(चाललो बोंबलत त्या अमेरिकेतल्या भावाला हे जाकिट द्यायला .. :राग:)
क्या पाया नही तूने क्या ढूंढ रहा है तू
(पाया तर नव्हताच कधी टाळक्यावरचं छप्परही उडून गेलंय.. Sad )
जो है अनकही जो है अनसुनी वो बात क्या है बता
(आता काय सांगायचं तिच्या $%& अनकही आणि अनसुनी बात! पैशाचं काय! ते कुणीच सांगत नाहीये! :राग:)
मितवा...कहे धडकने तुझसे क्या
मितवा ये खुदसे तो ना तू छुपा

जीवन डगर मे प्रेम नगर में
(पैसे आले की प्रेमनगरच्या झोपडपट्टीतून बस्तान हलवूच या कसं..)
आया नजर में जबसे है कोई
(च्यायला, पण त्या भाईच्या नजरेला पडलो तर पुन्हा? Sad )
तू सोचता है तू पूछता है
(कुणाला विचारावं.. Uhoh )
जिसकी कमी थी क्या ये वही है
(कमी असायला आधी होतंच काय खोपट्यात! Proud )
तू एक प्यासा और ये नदी है
(हाईला! खुशबूकडे जायचं तर आंघोळ तरी केली पाहिजे.. किती महिने झाले नदीवर जाऊन.. :अओ:)
काहे नही उसको तू खुलके बताए
(घ्या! आपल्याला पण इज्जत आहे राव! :फिदी:)
मितवा...कहे धडकने तुझसे क्या
मितवा ये खुदसे तो ना तू छुपा

तेरी निगाहे पा गयी राहे
(वाटतंय खरं.. :))
पर तू ये सोचे जाऊ ना जाऊ
(ते ही खरंच.. नायतर तिथं दुसरीच आफत वाट पाहत असायची!)
ये जिंदगी जो है नाचती तो क्यूं बेडियों में है तेरे पांव
(बेड्याच पडायची वेळ आली असती. त्या गँगवॉर मध्ये अडकलो असतो तर! Sad )
प्रीत की धुन पर नाच ले पागल..
(कशी दिसते ही खुशबू? Blush )
उडता अगर है उडने दे आंचल..
(आंचलवाला ड्रेसच नको ना शिवायला.. :डोमा:)
मितवा...कहे धडकने तुझसे क्या
मितवा ये खुदसे तो ना तू छुपा
(सगळं मनातल्या मनात तर चाललंय की! Blush Happy )

असं मनातल्या गुलाबी फुलानं गुदगुल्या होत असतानाच तो चौकात आला.

आशु.. जहबहरीच..

तू एक प्यासा और ये नदी है
(हाईला! खुशबूकडे जायचं तर आंघोळ तरी केली पाहिजे.. किती महिने झाले नदीवर जाऊन.. )
>>>>
हे तर खल्लासच...

सही चालले आहे. Lol

आशु तुझ्या मितवा गाण्यात एक बदल कर. आधी गुणगुणुन बघ मग टाक.

मी तवाऽऽऽ तू कढई आहेऽस का
मी तवाऽऽऽ तू कढई आहेऽस का Proud

केपी, Lol बदल चांगला आहे.. पण मी हे गाणं मूळ आहे तसंच ठेवलंय आणि त्याच्या मनात येणारे विचार दाखवले आहेत. वरच्या "मौला" प्रमाणे भाषांतरीत नाही ना हे! पण ते तुझ्या पोस्टीत असू दे.

आशु , जबराट, सुपरहिट !!! ह्या सगळ्यांनीच खरं म्हणजे फिल्मलाइन मधे जायला पहिजे, धमाल उडवतील.

तू एक प्यासा और ये नदी है
(हाईला! खुशबूकडे जायचं तर आंघोळ तरी केली पाहिजे.. किती महिने झाले नदीवर जाऊन.. )
>>> Lol

ट्यु, आशू सही! आता कसं मस्त वाटतंय... सही विणलेत धागे! Happy
नेक्स्ट कोन लिखेला बे? Proud

असं मनातल्या गुलाबी फुलानं गुदगुल्या होत असतानाच तो चौकात आला.>>>

गुलाबी फुलामुळे त्याला अचानक शेजारच्या रामुधोब्याची गुलाबो आठवली. आज्याची पेटी मिळाल्यावर कधीही आपले नशीब उघडले तर ऐनवेळी धावपळ करायला नको म्हणुन त्याने या आधी शिवलेले दुकानतले सगळे ड्रेस तिच्याकडे धुवायला टाकले होते.

'खुशबूला भेटण्याआधी कामाची एक यादी करावी लागणार असं दिसतय' असे म्हणत तो कामाची उजळणी करायला लागला. मास्कचे कापड सत्याच्या दत्त्याकडुन मागवणे, गुलाबोकडुन कपडे आणणे, सॅमसीने दिलेला कोट व्यवस्थीत बॅगेत ठेवणे, अंघोळ ई.

घराकडे परत जाताना नेमका वाटेत त्याला रा. त्री. शृंगारपुरे भेटलाच. '^&*%&* हे येडच्याप पण नेमके आत्ताच टपकले. आता गेला आपला अर्धा तास' या विचारानेच भारत हबकुन गेला. हा शृंगारपुर्‍या फिल्म लायनीत मेकप साहीत्य सप्लाय करत होता. त्याच्याकडे वेगवेगळी रेडीमेड पॅकेज होती. परदेश मेकप, ब्रेकअप मेकप, रीमेक मेकप, हॉट शॉट मेकप वगैरे. इम्रानचा चित्रपट म्हणले की भरतसारख्या ड्रेसवाल्यांना काही कमाई होत नसेल पण शृंगारपुरे नुसत्या लिपस्टीकमधे करोडपती झाला अशी इंडस्ट्रीत वदंता आहे. भरतने त्याचाकडुन उसने पैसे घेतल्यामुळे पुढचा अर्धा तास हीरवीणीच काय तर हल्ली बालगंधर्व यांचा आदर्श बाळगणार्‍या हीरो लोकांकडे पण माझी लिपस्टीक कशी खपते. बॉबी डार्लींगमुळे दिवसाला आपण कीती कमवतो वगैरे गुर्‍हाळ चालु ठेवले.

भरत याच्या कचाट्यातुन कसे सुटायचे हा विचार करत असतानाच पक्याची स्कॉर्पीओ तिथे उभी राहीली. शृंगारपुरेनी लगेच 'बसाछान कापु' यांच्या दर्शनाची वेळ झाली म्हणुन तिथुन कल्टी मारली.

पक्या गाडीतुन उतरला व एकदम भरतच्या पाया पडायला वाकला. भरतला तो नक्की काय करतोय हे न कळल्याने तो पटकन मागे सरकला व पडला. एवढा वेळ हातात सांभाळलेली पेटी त्याच्या हातातुन उडाली व समोरच्या शेकोटीजवळ जाऊन पडली.

'भरतशेठ, काय राव. आपल्याला पण एखादा रोल द्या ना. सरकीट, शॉर्ट सरकीट कुठलाही रोल करायला आपण तयार हाये' असे काहीसे शब्द भरतच्या कानावर पडले पण त्याचे सगळे लक्ष त्या पेटीकडे होते. 'जळले मेले लक' क्षणभरच भरतला असे वाटुन गेले आणी त्याच्या समोर ट्रॅकपँटवर अंडरपँट व बनीयन घातलेला शक्तीमॅनचा डमी समोर उभा होता.

पक्याभायला काय झालं हेच भारतला कळेना!
तो म्हणाला,"भाई आधी मला तर काम मिळू दे! मग तुमच्यासाठी नक्की शब्द टाकीन मी. "
"त्या खुशबूच्या शिनेमाचं काम करनार हायेस ना?"
"हो..म्हणजे मिळायला हवं.."
"फिर तो मुझे उस गुलछ्डी के साथ एक सीन मे तो दिखना मंगता!"
अच्छा.. असं आहे तर्..भाईची खुशबूने विकेट घेतलेली दिसते. आयतंच मांजर दाराशी आलंय तर घंटा अडकवून टाकावी गळ्यात.
"पाहतो.. पण त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी किंमत द्यावी लागेल"
"अबे तू बस बोल के तो देख"
"सत्तूभायचं माझं जे देणं आहे ते खलास झालं पायजे!"
"हो गया! बरेच हिसाब बाकी है उसके साथ अपुन के!"
"ठीक आहे मग.. निघतो मी. संध्याकाळी येतो अड्ड्यावर."
तो पर्यंत पक्याभायचे पंटरनी गाणं सुरुच केलं होतं..
पक्याभाय्...पक्याभाय
पवई का चष्मा, बीड की चड्डी
और हरियाणी चाय..
है पक्याभाय..
चेहरा तेरा.. कयामत है
बॉलीवूड की फूटी किस्मत है
है पक्याभाय..
ना तू अशोक ना तू लक्ष्या
ना तू प्रशांत पक्याभाय..
एकदा तरी दाढी करुन
हिरो बनून जा पक्याभाय
अलकाताई पस्तावतील अन
निशिगंधा करेल का हाय!
पक्या भाय..
है पक्याभाय..

इकडे ते सम्राटसिंगने दिलेलं जाकीट अंगात घालून भारत चालत असतानाच समोरून एक पिवळ्या रंगाची हाफ पँट, त्यावर मोठे डिझाईन असलेला हिरवा झब्बा, डोक्याला सरदरांची पगडी, डोळ्याला लाल काचांचा गॉगल असं आख्खं रंगाचं दुकानच चालत येत होतं.. तो भारत्ला पास झाला आणि..
एकदम भारतच्या खांद्यावर थाप पडली. भारत दचकला. पाहतो तर त्या ध्यानानंच त्याला थांबवलं होतं.
"हॅलो! सिंग इज किंग! ये जाकीट तुम्हारे पास कैसे?"
तो सिंग इज किंग! करताना बल्ले बल्ले ची अ‍ॅक्शन का करतोय ते भारतला समजत नव्हतं..
"आँ ? सिंग इज किंग! ये क्या? जाकीट से आपको क्या?"

"(बल्ले बल्ले ची अ‍ॅक्शन. )सिंग इज किंग! पहले बताओ.. नही तो.."
"कॉलर छोड. ये मेरे दोस्त का है. उसके भाई को देना है"
"सिंग इज किंग! क्या नाम है दोस्त का?"
पुन्हा बल्ले बल्ले ची अ‍ॅक्शन.
"अबे! सिंग इज किंग के बच्चे! पुलिसवाला है क्या?"
"सिंग इज किंग! नाम बता.."
बल्ले बल्ले ..
"सम्राटसिंग.."
"ओ गॉड! कहा है वो?"
"होस्पिटल मे. तुम कौन?"
"अरे मैं ही सिंग इज किंग! उस्का भाय! सँटासिंग!"
"वो तो यूएसए मे है बता रहा था,"
"कब सुधरेगा तू मेरे भाय! अबे यूएसए बोले तो स्मानाबाद के संतनगरमे डिव्ह्जन मे मा शंकर पार्टमेंट मे रहता हूं मे! अब अड्रेस बताते बताते थक गया मै लोगों को.. इसलिये उसे फोन पे बताया था शॉर्टफॉर्म करके! इतना भी नही समझा! तभी मै सोच रहा था.. चार साल हो गए घरपे क्यू नही आता मेरे! चल अब मुझे उसके पास लेके चल! "
सिंग इज किंग!
सिंग इज किंग!
सिंग इज किंग!..

Biggrin
श्या आशू! खुशबू आणि पक्या???? कुठे ते रत्न आणि कुठे हा कावळा?
उस्को मैने भारतकेलिये बनाया है रे Wink

रूमाल नाही टाकत, नेट मेलं टिकत नाहीये इतका वेळ Sad
पुढचं लिहा रे कोणीतरी.. हे उद्या संपवायचंय म्हणे.. हे STY पाचच दिवस असणारे.. पुढच्या पाच दिवसांसाठी नेक्स्ट स्टोरी आहे..

खुशबू आणि पक्या???? कुठे ते रत्न आणि कुठे हा कावळा? >> ओ मॅडम, हिरवीण शेवटी हिरोलाच मिळणार.. पण प्रेमत्रिकोण , व्हिलन वगैरे नसतील तर काय मजा? मला वाटतं आता पात्र वाढवायाला नको. आहेत तीच निस्तरा..तरी मी संटा आणि सम्राटाची गाठ घालून दिली.. नाहितर आपला गरीब भारत यूएस ला जाईपर्यंत अजून भीकेला लागला असता.. आता त्या भाईलोकांची वाट लावून खुशबू आणि भारत (काय पण कॉम्बो आहे नावात! :फिदी:) यांना वाटेला लावा.. हो! नावाशी इमान राखा बरं कथेच्या! केप्या, ती पेटी बाहेर काढ शेकोटीतून! Proud
मग शेवटचं गाणं टाकेन मी उद्या! Happy

ती पेटी बाहेर काढ शेकोटीतून!>>>
ती पुढच्याने काढायची होती पण तू हात भाजतील या भितीने सरळ चालते केलेस भरतला जॅकेट वगैरे घालुन. Proud

सिंग इज किंग.. Lol
पूनम, टुलिप, केपी, आशू.. महान!!

हे यस्टीवाय पाचच दिवस? Sad आता कुठे २ गाणी झालीयेत राव. अख्खा शिनुमा बाकी आहे अजून. Sad

उद्या शेवटचा दिवस असेल, तर रुमाल टाकायला पाहिजेच आता. टाकलाच मी.
चांगल्या २-३ डझन भरून गाठी मारून ठेवतो. Proud

आयला, त्या गुंडांच्या दोन टीमा सिग्नलला उभ्या ठाकल्यात, अन त्यांच्यातलाच पक्या तिथनं निघून इकडे भारतभाय्कडे काम मागायला कसा काय आला? Sad
आणि केपीने आणलेल्या शक्तीमॅनचं काय झालं? जरा बॅटर्‍या दावा रे. Sad

आणि त्या भारतला मी अमेरिकेत पाठवून खुशबूसोबत मस्त नाचवून लवस्टोरी बनवणार होतो, तर या आशूने त्याला उस्मानाबादेत पाठवला. Uhoh

भारत विभुषण हैराण झाला. फुटक्या नशिबाच्या भारतला अचानक भलतीच मागणी आली होती सगळीकडून. आधी भाई लोकांची मोठी ऑर्डर, मग त्याहीपेक्षा मोठे ड्रेस डिझायनरचे काम, करूण बोअरच्या पिक्चरमध्ये. मग एक भाई पाय पडत काय आला, दुसर्‍या भाईचे देणे परस्पर काय मिटले, सिंग बंधूंची भेट काय झाली, आता शक्तीमॅनसारखं दिसणारं पात्र अचानक मदतीला काय आलं.. सारा चमत्कारच! अख्खा पावसाळा गळणारं, मातीच्या भिंतींचं घर अन बचकभर कर्ज डोस्क्यावर ठेऊन गेला, म्हणुन आज्ज्याला शिव्या देणार्‍या भारतने आधी आज्ज्याची मनोमन क्षमा मागितली. पेटीचा मोठा ठेवा आज्जा ठेऊन गेल होता, अन तिनंच आता भा.वि. साठी एकापाठोपाठ नशिबाचे दरवाजे उघडायला सुरूवात केली होती..
--

इकडे भर सिग्नलवर नाटक भलतंच रंगलं होतं. बहिणीच्या आठवणीचं नाटक करणारा संतूभाई खुशबूचं बोलणं ऐकतच होता. राम्याची बहीण, तीही आता बॉलीवुडची हिरॉईन.. जुन्या खुन्नसचा वचपा काढण्याची याहून चांगली संधी पुढे कधी मिळाली असती?
क्रुर चेहेरा करत सत्त्या अचानक उठला, खुशबूला एक हातात पकडून दुसर्‍या हाताने तिच्यावर पिस्तूल रोखले आणि गरजला, 'अब आया साला ऊट पहाडके नीचे! सब कट्टे और घोडे इधरही रखने को बोल तेरे कुत्तोंको. और निकल अभी पतली गली से. नही तो ये जो तेरी फुल जैसी बहन है ना, इसको तो मै..'
राम्या ते बघून बेभान झाला, आणि सत्त्याच्या अंगावर धावून गेला. सत्त्याचे दत्तू लोक पण तयारच होते. ते मध्ये पडले, पण राम्यानेही बंदूक रोखून त्यातल्या एकाला उडवलाच सरळ. सत्त्याही कच्चा नव्हताच. फुकट का भाई झाला होता? खुशबूला दोघा तिघा दत्तूंकडे सोपवत तिला गाडीत कोंबा म्हणून तो ओरडला, आणि धुंवाधार गोळ्या चालवत राम्या अन त्याच्या लोकांवर धावून गेला. राम्याला गोळी लागली, तीही नेमकी छातीत. प्रचंड आवाज करीत ते धुड चौकात मध्यभागी कोसळले, तसा राम्याच्या उरल्यासुरल्या लोकांनी पळ काढला. आणि सत्त्याने राम्याच्या धडावर पाय ठेऊन गर्जना केली.. 'मुंबईका भाय कोन? मै! मै!!'
--
सत्त्याने खुशबूला डांबून ठेवले, तिच्याकडून सगळी माहितीही वदवून घेतली. भारतला मिळालेले करूण बोअरच्या सिनेम्याचे काम, सिंग बंधूंच्या जॅकेटचे गौडबंगाल, सिनेम्यात काम मिळविण्यासाठी आपला उजवा हात समजला जाणारा पक्या फितूर झालेला.. या सगळ्या गोष्टी त्याला खुशबूकडून अन आपल्या हस्तकांकडून कळल्या होत्या. जॅकेटचा सस्पेन्स त्यालाही माहिती होता, आणि ते जॅकेट मिळाले की जगातला सर्वात श्रीमंत माणूस आपणच, हेही त्याला माहिती होते.
आता घाई करायलाच हवी, सत्त्याभायने विचार केला. मनात आल्यावर वेळ दवडणारा माणूस नव्हताच तो. खुशबूला सुरक्षित ठिकाणी ठेऊन तो भारतच्या मागावर निघाला. भारतकडे आल्यावर त्याला दृष्य दिसले.. भारतच्या हातात ते जॅकेट, शेजारी सिंगइजकिंग अर्थात एक विचित्र सरदार, त्याच्याशेजारी पक्या उभा, अन बाजूला शक्तीमॅनसदृष दिसणारे एक कॅरेक्टर. सत्त्याने गाड्या थोड्या बाजूला थांबवून परिस्थितीचा अंदाज घेतला.

भारत त्या हाफ चड्डितल्या सुपरमॅन कम शक्तीमॅनला विचारत होता.. "तु कोण बाबा आता? इथे कसा आलास?"
"मी फ्लाईंग मास्टर भोभो. तुझ्याच मदतीसाठी आलो आहे.."
"मदतच करायची असेल, तर ती माझी पेटी पहिले त्या जाळातून काढ बाहेर. त्या पेटीत माझे अख्खे भाग्य लपले आहे बघ. लवकर.."
फ्लाईंग मास्टर भोभोने हवेतच एक गिरकी घेतली, आणि जादूगारासारखे बनियनच्या बाहीतून पाणी काढत आग विझवली आणि पेटी भारतच्या हातात देणार...
तोच सत्त्या उडी घेऊन मध्ये आला, अन ती पेटी वरचेवर झेलली. शिवाय भारतकडून जॅकेट हिसकावून घेऊन त्याची अन त्या सिंगइजकिंग ची गचांडी पकडून त्यांना गाड्यांमध्ये ढकलले आणि मुसक्या बांधा म्हणुन ओरडून सांगितले. पक्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला खरा, पण प्रचंड गोळ्यांच्या वर्षावात तो पडला. पडला काय, सरळ मेलाच. फ्लाईंग मास्टर भोभोला असल्या गोळीबाराची, सत्त्याच्या भयानक ओरडण्याची सवय नसावी.. तो बिचारा हवेत गिरक्या घेत दिसेनासा झाला. पण जाता जाता त्याने भारतला काहीतरी खुणा केल्या, बहूतेक मी योग्य त्या वेळेला भेटेन असे सांगत असावा.

बिचारा भारत.. पेटी हातची गेली, जॅकेटही नाही. खुशबूसकट त्याचे भवितव्य अंधारात, म्हणजे अंधारकोठडीत लटकत होते. फ्लाईंग मास्टर भोभो काहीतरी करेल, एवढी एकच आशा त्याला आता होती..
--

तिकडे सम्राटसिंगला आपल्या भावाला, म्हणजे सिंगइजकिंगला भारत आणि खुशबूसकट सत्त्याने किडनॅप केले आहे, हे कळले. इतकी वर्षे तो इंडस्ट्रीत होता, म्हणजे काही नुसतीच गाजरे नव्हती खाल्ली. त्याने डोळे मिटून शांतपणे विच्वार केला आणि 'हर नेम इज सावंत' च्या फायनान्ससरला (करूण बोअर धर्माचे बॅनर असले, तरी पैसा वेगळ्याच ठिकाणाहून येत होता, हे निराळे सांगायला नकोच) फोन केला. सत्त्याभाई भारत, जॅकेट, पेटी, खुशबू याबाबत सारे काही सांगितले. आणि निर्धास्तपणे सिगार पेटवला..
--

डांबरसिंग! म्हणजे अंडरवर्ल्डमधला क्रुरकर्माच म्हणा ना! पन्नाशी उलटली, तरी अजून तश्शीच रग, तोच आवेश, अन तसाच खुनशीपणा!!

डांबरसिंगने सम्राटसिंगचा फोन खाली ठेवला. आपल्या सिनेम्याची हिर्वीण किडनॅप झाल्याचं असो, पण हे जॅकेट अन पेटी आपली झाली पाहिजे अन आजकाल फार त्रास देणार्‍या या सत्त्याचा काटा काढला पाहिजे, हे त्याने बंदूकीत दारूगोळा ठासल्यागत मनात ठासून घेतले.

लालभडक डोळे गरागरा फिरवत त्याने आपल्या कापडी पिशवीतून तंबाखूचा गप्पकन बोकाणा भरला. खाटेवर पालथे पडून हातावर चढणार्‍या मुंगळ्याकडे खुनशी नजरेने पाहत भस्सकन पकडला, आणि सरळ चिरडून टाकला. खाटेवरून ताडकन उठत तो गर्जला..
"सुव्वरके बच्चोsssss! शिमगा कब हय रेsssss!!
--

बापरे! Lol साजिराला रागोवच्या 'आग'ची बाधा झालीये! Proud
आमच्या लवईष्टोरीचा पार व्हायलेन्सपट करून टाकला की राव!

Pages