मायबोली गणेशोत्सव २०१५ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २ - क्रांतिकारक निर्मिती! " १९ सप्टेंबर - समाप्त!

Submitted by संयोजक on 18 September, 2015 - 12:56

गणपती बाप्पा मोरया!

श्रीगणराया ही बुद्धीची देवता आणि याच बुद्धीचा विशेष वरदहस्त लाभलेली आपली मानवप्रजाती... या मानवानं आपल्या बुद्धीचा सदुपयोग करुन अश्या अनेक गोष्टी बनवल्या ज्यायोगे मानवजातीचा पुढचा प्रवास सुखकर झाला. एकेक निर्मिती ही त्या त्या क्षेत्रातील क्रांतीच म्हणा ना! मग ते चालत्याला धावतं बनवणारं चाक असो, स्वप्नांना पंख देणारं विमान असो, दूरच्या लोकांना जवळ आणणारा फोन असो किंवा दोन किनार्‍यांना जोडणारा पूल असो.

याच निर्मितीला आपल्याला सलाम करायचा आहे मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळताना!

'क्रांतिकारक निर्मिती'

मानवाच्या आयुष्यात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणार्‍या अश्या निर्मितीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ क्रांतिकारक परीवर्तन घडवून आणणार्‍या निर्मितीची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-
Slide1_1.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20150919-WA0010-800x600.jpg

दुसर्याला डिस्टर्ब न करता आपल्या आवडत्या संगीताचा आनंद आपल्याला घेता येण्यासारखे दुसरे सुख नाही.... हेडफोन बनवण्याची कल्पना ज्याच्या डोक्यात आली असेल त्याला सलाम!

घर टू हिंजेवाडी या अतिशय बोअर प्रवासातला माझा साथी आहे हा!

मौखिक संभाषणाच्या कलेत पारंगत झालेल्या माणसाच्या जीवनातला पुढचा टप्पा म्हणजे लिपी आणि हे लिखाण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावं / चिरस्थायी असावं (बहुदा) ह्या भावनेने आलेली लिखाण कोरून ठेवण्याची कला एक सर्जनशील निर्मीती

प्राचीन तिबेटी लिपीमधील अक्षरे - कैलास परिक्रमेच्या वेळी घेतलेला फोटो

अक्षरशः अक्षरांचा श्रम केला Happy

DSC02531.JPG

पहिल्या जीवनावश्यक गोष्टीचा फोटो नाय टाकू देत संयोजक. एकदम कडक आहेत. बर, त्याच्या नियमात बसणारा आहे एक फोटो शोधून टाकतो. Happy

वर्षू नील .... एकच नंबर!

IMG_0876-1-1600x1111.jpg
बिनवीजेच्या जगाकडून वीजेच्या जगाकडे

cur.jpg
करंसी
या मुळे सगळच बदलून गेलं
आणि इतर गोष्टींसाठी हे की यासाठी इतर गोष्टी हेच कळेनास झालं.

computer.jpg

कॉम्पुटर.. .. ह्याच्या मुळे आज आपण सगळे टच मधे आहोत..... सध्याचा आपल्या जीवनातिल अविभाज्य घटक ...

मनात विचार आला -- फोटो काढला --अप लोड केला Happy

Pages