निशब्द

Submitted by vilasrao on 16 September, 2015 - 11:34

दाटून येतात नुसतेच, कधीच टपकत नाही
पापणकाठावरून खंबिर अश्रु घसरत नाही !

नसेल जे माझे नसूद्या ! असेन तरी असूद्या !
दु:खाला सुखाला आता मी पण मिरवत नाहीं !

माझ्याशी असते मलापण बोलायचे कैकदा
संपतेय निशब्द आयुष्य, शब्दच गवसत नाही !

आरास सजते ' स्वप्नांची' कशाला काळरात्री
वाट असते पहाटेची अन् सुर्य उगवत नाही !

राग लोभाच्या पलिकडले निर्मणूष्य वाळवंट
शोधावे का पावले जिथे ठसे उमटत नाही ?

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद बेफिकीर सर !
थोडे विस्तृत करून चुका सांगितल्यास मला मदत होईल असे म्हणायचे मला !
अपेक्षा ठेवू का ?