व्यसने - परिणाम आणि दुष्परिणाम

Submitted by उडन खटोला on 8 September, 2015 - 10:58

अनादि काळापासून मानवी समाजात काही वस्तून्च्या सेवनाला "व्यसन" म्हणून त्याज्य ठरवले जाते ... त्या गोष्टीन्चा मोरल ग्राउन्ड्स वर निषेध केला जातो ... यात दारु ,तंबाखू, गांजा-भांग-चरस -एल एस डी इत्यादी गोष्टी येतात

उघड आहे की या गोष्टीना नैतिक /सामाजिक व कायदेशीर दॄष्ट्या त्याज्ज्य अथवा प्रतिबंधित करण्यामागे काही ठोस कारणे आहेत . सामाजिक अथवा नैतिक दॄष्ट्या धोकादायक ठरेल असे वर्तन ही द्रव्ये सेवन करणारुया व्यक्तींकडून घडते ,तसेच आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो . हे १००% मान्य आहे ... परंतु......

जे लोक काही मानसिक /आर्थिक अथवा सामाजिक परिस्थितींची शिकार होवून अथवा आध्यात्मिक / सुपरनॅचरल अनुभवांच्या शोधात अशा द्रव्यांचे संयमित स्वरूपात सेवन करतात ,तेव्हा अशा व्यक्तींचे अनुभव निराळे असू शकतात ...

अमेरिकेतील अनेक संघटनांचे / संस्थांचे / संशोधक लोकांचे असे म्हणणे आहे की कॅनाबिज अथवा भांग / गांजा या वनस्पतींचा वापर करून बनवलेली औषधे कॅन्सरवर रामबाण उपाय आहेत . तसेच कॅनाबिज /इन्फेक्टेड मश्रूम / एल एस डी यासारख्या गोष्टींचा वापर "मेडिटेशन बूस्टर" म्हणून करता येतो व त्यामुळे अध्यात्मिक साधना करणार्या व्यक्तीना उच्चतम अनुभव येतात .

परंतु अमेरिकेतील प्रभावी फार्मा कंपन्या , ज्या कॅन्सरवरील पेनकिलर औषधे विकून अब्जावधी डॉलर वर्षाला कमावतात, अशा क्कंपन्यांच्या दबावामुळे सरकार कॅनाबिज ला प्रतिबन्धित ड्रग कॅतेगरी मध्ये टाकत आहे................

आपल्यापैकी कोणाला अशा "प्रतिबन्धित ड्रग"चा अनुभव आहे का? असल्यास कसा?

मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही
धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यसनाने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. there are older drunkards than old doctors...
ही उगीच सोळ्भोक , बूर्झ्वा, मध्यमवर्गीय , दाम्भिक पुळचट लोकानी उठवलेली भुमका आहे. अन्यथा शतकानुशतके व्यसने कशी टिकून राहिली असती? त्या मागे परमेस्वरी योजना असली पाहिजे. किम्बहुना तो एक आध्यत्मिक अनुभूतीकडे जान्याचा एक मार्गच आहे...

मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत >>>> जरा आजून उलगडून सांगता का ? कश्या प्रकारचे आध्यात्मिक अनुभव आले आहेत ते ?

भांग / गांजा या वनस्पतींचा वापर करून बनवलेली औषधे कॅन्सरवर रामबाण उपाय आहेत .
>>>>>>
असेलही,
पण मुळात त्यावर प्रक्रिया काय होते हे महत्वाचे ना..

धान्यांपासून पोषक असे अन्नपदार्थही बनतात आणि दारूही बनते.

@मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही>> अरे व्वा! एंडोर्फ़िन बरच वाढलय की.. चान चान प्र गती आहे!

सकुरा, गोरगरीबांच्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी व्यत्यय नको म्हणून किंवा विशिष्टं सेवा पुरवणार्‍या स्त्रिया रात्रीच्या सेवाव्रतात खंड नको म्हणून आपापल्या मुलांना ती अगदी तीन महिन्याची असल्यापासून भांग घालतात.

बापरे भयानकच आहे याचा मुलांच्या स्वास्थ वर मेंदू वर काही वाईट परिणाम होत नाही का?

कॅनाबिज अथवा भांग / गांजा या वनस्पतींचा वापर करून बनवलेली औषधे कॅन्सरवर रामबाण उपाय आहेत . >>

जळ्ळे कॅन्सरवरचे असले रामबाण उपाय आमच्या मेडीकलच्या ऑथेंटीक जर्नलांतून का येत नसतील बरं?

आमच्या जर्नालांत हे असे उपाय केवळ सिम्प्टोमॅटीक रिलीफ म्हणून देतात मेले, रामबाण म्हणून नाहीच देत.
Happy

म्मी ५ वर्षाअपूर्वी उत्तर भारतात गेलो असताना सर्वप्रथम भान्गेच्या ३ गोल्या घेतल्या ....त्यानन्त्६अर माझी कुन्डलिनी जागरुक झाल्याचे जानवले .... तसेच एक एनर्जी प्युर्ण पाठिचाअ कणा शुद्ध्ह करित आहे असे जानवले

त्रूतीय नेत्र जागरण व मेन्दुतील ब्लॉकिन्ग्स निघाल्याचे देखिल जाणवले

म्मी ५ वर्षाअपूर्वी उत्तर भारतात गेलो असताना सर्वप्रथम भान्गेच्या ३ गोल्या घेतल्या ....त्यानन्त्६अर माझी कुन्डलिनी जागरुक झाल्याचे जानवले .... तसेच एक एनर्जी प्युर्ण पाठिचाअ कणा शुद्ध्ह करित आहे असे जानवले

त्रूतीय नेत्र जागरण व मेन्दुतील ब्लॉकिन्ग्स निघाल्याचे देखिल जाणवले
>>>

डोंबल

प्रेमाचा सल्ला:-
लवकर डॉक्टर चा सल्ला घ्या ,नाह़ीतर उडन मधला ख जाऊन फ़क्त टोला बसायचा शिल्लक उरेल..आणि असे लेखन सुद्धा तुम्ही करू शकणार नाहित..

साती | 9 September, 2015 - 01:05
सकुरा, गोरगरीबांच्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी व्यत्यय नको म्हणून किंवा विशिष्टं सेवा पुरवणार्‍या स्त्रिया रात्रीच्या सेवाव्रतात खंड नको म्हणून आपापल्या मुलांना ती अगदी तीन महिन्याची असल्यापासून भांग घालतात.

भांग की अफु?

शीर्षक व मांडलेल्या विषयाचा संबंध कळत नाहीये.
यावर बरेच लिहीता येईल, पण सध्या टॅम्प्लिज.
तरीही एक नक्की सांगतो, की गृहस्थाश्रमी व्यक्तिने हे मार्ग अवलंबू नयेत.
या पद्धतींचा कशाकरता(?) उपयोग होतो की नाही, होत असल्यास कसा होतो हे नंतरचे विषय.

अफुच्या बियांमध्ये (Hemp seeds) प्रोटीन्स सगळ्यात जास्त प्रमाणात असतांत असे वाचल्याचे स्मरते.