असेही पालकत्व

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 October, 2012 - 04:30

काल माहेरी गेले. जाताच माझ्या भाच्या मी भेटल्या पर्यंतच्या ताज्या बातम्या मला लगेच देतात. तशाच त्या मी गेल्याबरोबर धावत आल्या आणि म्हणाल्य आत्या आत्या भुषणच्या मांजरीला ३-४ कुत्र्यांनी मारून टाकल. आता तिची तिन बाळं बाटलीने दुध पितात. पहिला त्या मांजरीबद्दल आणि अनाथ झालेल्या पिल्लांबद्दल वाईट वाटले. मग ही पिल्ले बाटलीने दूध कशी पितात त्या बद्दल उत्सुकता लागली. कॅमेरा नेहमीप्रमाणे होताच बरोबर. भाच्यांना सांगितले भुषणला सांगा मी फोटो काढायला येतेच दूध पाजायचे असल्यावर मला हाक मार.

भुषण म्हणजे माझ्या आईच्या शेजारी असलेल्या कुटूंबातील ८ वीतील मुलगा. आमच मानलेल नात आहे. तोही मला आत्याच म्हणतो. माझ्या भाच्यांचाही तो मानस भाऊ. त्यांच्याकडे ती मांजर अशीच आली होती. भुषणला प्राण्यांची आवड म्हणून तो तिला खाऊ घालायचा आणि मग मांजरीने आपले उदरनिर्वाह होत आहे म्हणून तिथेच वास्तव्य स्विकारले. तिथेच तिने पिलांना जन्म दिला आणि आपला अखेरचा श्वास तिथेच सोडून तिने आपले पालकत्व भुषण आणि त्याच्या कुटूंबीयांवर सोपवले.

ह्या मांजरीने प्राण सोडले तेंव्हा माझी छोटी भाची ओक्साबोक्शी रडली असे माझी वहिनी सांगत होती. त्या मांजरीबरोबर आणि पिलांबरोबर माझ्या दोन्ही भाच्या तसेच माझी मुलगी जायची तेंव्हा ती ही त्यांच्याबरोबर खेळायची.

मांजर गेल्यावर आता ह्या पिलांना कसे वाढवायचे हा मोठा प्रश्न भुषणला पडला. मग त्याच्या आईने व ताईने दुधाच्या बाटलीचा पर्याय सुचवून बाळांची जबाबदारी स्विकारली. ह्या पिलांना दर २-३ तासांनी बाटलीने दूध पाजावे लागते. पहा तर ही गोंडस पिल्ले. तिघांची नावे आहेत रोझी,सुझी,बझी.

ही पिल्ले खुप चतुर आहेत. फोटो काढताना एकत्र येतच नव्हती.

१)

२) माझ्या भाच्या किंवा भुषण ह्यांच्या जवळ बसला की त्यांच्या अंगावर चढून खेळतात तिघे पण.

३) हे पाहूनच गहिवरायला होत.

४)

५)

६)

७)

८) रिकाम्या बाटलीवरही अशी आशा असते.

९) खेळताना.

१०)

११) ही रोझी

१२) ही सुझी असावी.

१३) ही बझी आणि ह्या तिन माउंचा झालेला पालक भुषण.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईग! बिचारी पिल्ले या वयात काय नशिबी आले त्यांच्या. भुषण चे खरच कौतुक वाटते ...या वयात पुर्ण जबाबदारीने पिल्लांचे सगळे करतो.

खूप कौतुक वाटले भुषणचे! शाब्बास!

तिसरा फोटो मलाही खूप आवडला. कित्ती गोड दिसतंय ते बाळ दूदू पिताना. डोळे मिटून, पंज्यात बाटली पकडून चाल्लंय दूदू पिणे! व्हेरी क्युट! Happy

भूषणचे मनापासून कौतुक!!!
टि.व्ही.वर जसे अनाथ प्राण्यांचे संगोपन दाखवतात तसेच दिसते.

<<<बिचारी पिल्ले या वयात काय नशिबी आले त्यांच्या. भुषण चे खरच कौतुक वाटते ...या वयात पुर्ण जबाबदारीने पिल्लांचे सगळे करतो.>>> अगदि खरं आहे.

Pages