फेसबुक फॅण्टसी (Movie Review - Phantom)

Submitted by रसप on 30 August, 2015 - 09:04

सध्या विचारवंत व विविध जाणकारांचं एक भलं मोठं पीक सोशल नेटवर्किंगवर आलेलं दिसतं. आणि ह्यांचं सगळ्यात आवडतं 'विचारकुरण' आहे 'भारत-पाकिस्तान संबंध व सीमाप्रश्न' ! पाकिस्तानकडून सीमेवर काही हालचाल जरी झाली तरी हजारो मैलांवरील सुरक्षित एअरकन्डीशंड खोल्यांत बसून काही फेसबुकवीर आर्मीला ऑर्डर्स देतात की, 'घुसा पाकिस्तानात आणि मारा एकेकाला!' कुठे दहशतवादी हल्ला झाला की लगेच फतवे निघतात की, 'आपणही त्यांच्या शहरांवर असेच हल्ले करायला हवे !' कुणी म्हणतं, 'अमेरिकेने कसं ओसामा बिन लादेनला आत घुसून मारलं, तसंच आपणही दाऊदला मारायला हवं, हाफिज सईदला टिपायला हवं, वगैरे'.
सर्वसामान्य माणसांनी भावनेच्या भरात असं काही लिहिणं, बोलणं हे अगदी स्वाभाविक आहे. ह्या सगळ्या 'फेसबुक फॅण्टसीज'ना जास्तच मनावर घेऊन साजिद नाडियादवाला नामक नियमितपणे सामान्य चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याने काही कोटी रुपये ओतून एक चित्रपट बनवावा, हेही एक वेळ समजून घेता येईल. पण सिद्धार्थ रॉय कपूरसारखा सहसा बाष्कळपणा न करणारा निर्माताही त्या चित्रपटाची सह-निर्मिती करतो आणि 'काबुल एक्स्प्रेस', 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' सारखे अचूक नस पकडणारे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक कबीर खानही ह्यावर वेळ वाया घालवतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटतं.

पूर्वी हजारो, लाखो लोक केवळ सचिनसाठी क्रिकेट पाहायचे. तो नक्कीच चांगला खेळेल, अशी प्रत्येक वेळेस त्या भाबड्या रसिकांना खात्रीच असायची आणि जेव्हा सचिन विशेष काही न करता माघारी येई, तेव्हा स्टेडियममधून प्रेक्षक बाहेर पडत आणि घरा-घरातले टीव्ही बंद होऊन लोक काम-धंद्याला लागत. 'फॅण्टम'च्या सुरुवातीला २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर कसाब व साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी सांगितली जाते. ओम पुरींचा धीरगंभीर आवाज काळजाला डागण्या देणाऱ्या अप्रिय स्मृती जागृत करतो. पुढच्या ५-१० मिनिटांत अपेक्षा थोड्या अजून वाढतात. आणि मग परदेशात राहत असताना शिस्तीचे धडे गिरवलेला भारतीय परत आपल्या देशात आल्यावर ज्याप्रकारे सर्रास सिग्नल तोडणे, कचरा करणे, वगैरे सुरु करतो, त्याचप्रकारे कबीर खान सारासारविचारशक्तीची विकेट भावनावेगाला अलगदपणे बहाल करून टाकतात आणि मध्यंतरापर्यंत आपल्यालाही सचिन बाद झाल्यावर निराश होणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणे बाहेर पडायची इच्छा होते. पण आपण थांबतो. कारण कधी तरी आपणही काही 'वैचारिक तारे' तोडलेले असतात ! आपली लुकलुक कुठे तरी झगमगाटात बदलेल अशी एक वेडी आशा बाळगून आपण हा सगळा पोरखेळ शेवटपर्यंत सहन करतो. अखेरीस आपल्या हाती ना दोन घटिका मनोरंजन येतं, ना कुठला थरारक अनुभव.

आर्मीतून हकालपट्टी झालेल्या 'दानियाल खान' (सैफ अली खान) ला भारतीय गुप्तचर विभाग एका अनधिकृत मोहिमेसाठी पाठवतो. २६/११ च्या हल्ल्याच्या सूत्रधारांना अमेरिका, लंडन व पाकिस्तानात शिरून अश्या प्रकारे मारायचं की दिसायला तो अपघात दिसला पाहिजे आणि समजायला समजूनही आलं पाहिजे की त्यांना मारण्यात आलं आहे ! ह्या कामात त्याला एक एजंट नवाझ मिस्त्री (कतरिना कैफ) मदत करते आणि हा सगळा प्लान गुप्तचर विभागातला एक कनिष्ठ अधिकारी 'समित मिश्रा' (मोहम्मद झीशान अय्युब) च्या सुपीक डोक्यात पिकला असतो.
पुढे काय होतं, कसं होतं हे सांगायची आवश्यकता नसावी आणि ते न सांगितल्याने काही फरक पडेल असंही वाटत नाही. त्यामुळे इतकंच !

phantom-hindi-featured.jpg

कतरिना कैफला इंडस्ट्रीत १२ वर्षं झालीत. तिला हिंदी येण्यासाठीचं इंडस्ट्रीचं हे तप वाया गेलं आहे. आजही तिचे वाईट उच्चार चालवून घेण्यासाठी तिची व्यक्तिरेखा युरोप/ अमेरिकेत वगैरे वाढलेली दाखवायला लागते. हे कशासाठी ? तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून ! कारण कतरिना कैफ आणि अभिनय ह्यांच्यात एक तर काही नातंच नाही आहे किंवा असलं तरी खूप दूरचं असावं. फार क्वचित ते दोघे एकत्र दिसतात आणि कसलासा तीव्र मतभेद असल्याप्रमाणे एकत्र दिसले तरी विसंवाद पाळतात.

दुसरीकडे नवाब सैफ अली खान आणि अभिनय म्हणजे श्रावणातला उन्हं-पावसाचा खेळ असावा. त्याचा मध्येच एखादा 'कॉकटेल'सारखा चित्रपट येतो आणि आपल्या अपेक्षा वाढल्या की तो 'हमशकल्स' मध्ये झळकतो. 'फॅण्टम' सैफ गेल्या काही काळातल्या सततच्या अपयशाची मालिका तोडत नाही. त्याच्या गालांवरची दाढी आणि नाकावरची माशी काही केल्या जात नाही. कतरिनाची अभिनयमर्यादा उघडी पडू नये, ह्याची खबरदारी त्याने स्वत:ला त्या मर्यादेपलीकडे न जाऊ देता घेतली आहे.

मोहम्मद झीशान अय्युब, हा एक गुणी अभिनेता. त्याने 'रांझणा', 'तनू वेड्स मनू - रिटर्न्स' मध्ये अक्षरश: धमाल केली होती. त्याचा अत्युत्साही गुप्तचर विभाग अधिकारी अत्यंत उथळ वाटतो. पण त्यात त्याची काही चूक नसावी. ती व्यक्तिरेखाच अतिशय ढिलाईने रेखाटलेली आहे. तो एक ज्युनियर आहे, ज्याचं डोकं इतर सर्व सिनियर्सपेक्षा वेगळं आणि चांगलं चालतं, हे आपल्याला स्वीकारता येण्यासाठी काहीही घडत नाही. केवळ इतर लोक म्हणत आहेत, म्हणून आपण हे मान्य करायचं आहे.

'फॅण्टम'मध्ये खऱ्या अर्थाने कथालेखक आणि दिग्दर्शक 'फॅण्टम' आहेत. त्यामुळे एक 'अतिरंजित बाष्कळ मेलोड्रामा' ह्यापुढे ही कहाणी जात नाही. कुठेही ती प्रेक्षकाची पकड घेतच नाही. चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपल्या मनात चित्रपटातलं कुठलंही दृश्य, कुठलाही डायलॉग राहत नाही. ना कुणी व्यक्तिरेखा लक्षात राहते, ना अभिनेता. सुमार व्हीएफएक्ससुद्धा आपण विसरुन जातो. मात्र मनात एक दु:ख राहते. एक चांगला 'प्लॉट' वाया गेला ह्याचं नव्हे, तर पण दु;ख अजून एका गोष्टीचं होतं -
'फॅण्टम' ची 'टॅगलाईन' आहे "A Story You Wish Were True!" ह्या ओळीतच हे अध्याहृत आहे की, 'हे असं काही घडू शकणार नाही!' पण आपली लाचारी इतकी आहे की आपण चित्रपटातसुद्धा 'हाफिज सईद' हे नाव घेऊ शकत नाही. ते आपल्याला 'हारीस सईद' असं करायला लागतं. 'झकीउर रहमान लखवी' हे नाव आपण घेऊ शकत नाही. त्याऐवजी आपल्याला 'सबाउद्दीन उमवी' घ्यायला लागतं. आणि असे सगळे बदल करूनही चित्रपटावर पाकिस्तानात बंदी असतेच. कारण आपण काही करू शकत नाही, हे कडवट सत्य जसं आपल्याला पचत नाही, तसंच 'आपण बरंच काही केलंय' हे कडवट सत्य त्यांनाही पचत नसावं !
असो.

To cut the long story short, काही वर्षांपूर्वी 'धमाल' हा 'एसएमएस जोक्स' चा मिळून एक चित्रपट इंदरकुमारनी बनवला होता. तसंच 'फॅण्टम' ही एक 'फेसबुक फॅण्टसी' आहे. पण 'धमाल'मधले विनोद थरारक होते. 'फॅण्टम'चा थरार हास्यास्पद आहे, हाच काय तो फरक. 'धमाल'मध्ये सगळ्यांनीच अभिनयही कमाल केला होता आणि 'फॅण्टम'मध्ये तीच सगळ्यात मोठी बोंब आहे !

रेटिंग - *

http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-phantom.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ३० ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

113337504.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच बघितला , आवडला .
वन टाईम वॉच वाटला . परत नाही बघणार .

डोक्यात बेबी , हॉलिडे , एक था टायगर असे काहितरी घेउन गेलात तर निराशाच होईल .
बेबी जाम थरारक होता . डोकेबाज होता .
त्यामानाने हा फिक्का वाटतो . तरीपण जे काही होत ते बर्यापैकी खिळवून ठेवत .
काही काही रोमांटीक सीन वगळता अजिबात कंटाळा आला नाही.

पण हां , सैफ आणि कटरीना यान्ची निवड चुकलीचं.
तिथे जॉन,अक्षय नाहीतर भाईजानच पाहिजे .

मोहम्मद झीशान अय्युब, हा एक गुणी अभिनेता. त्याने 'रांझणा', 'तनू वेड्स मनू - रिटर्न्स' मध्ये अक्षरश: धमाल केली होती. त्याचा अत्युत्साही गुप्तचर विभाग अधिकारी अत्यंत उथळ वाटतो. >>>> + १००० .
तरीही मला तो आवडला. :).

शेवटी ती फॅन्टसी आहे हेच खरं.
पण शेवट मलातरी आवडला . इट एन्ड्स ऑन राईट नोट .

बाकी आवड आपली आपली .

आणि आमच्याकडे हा चित्रपट बघायचाच होता Lol

अफगाण जिलेबीचे काहीतरी गाणे लावून असतात रोज Proud

हे कशासाठी ? तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून ! >>>>>>>
सुंदरता फक्त नसते या क्षेत्रात. चित्रपट हे द्रुश्य माध्यम आहे.
जो अच्छा दिखता है वही बिकता है, और जो बिकता है वही बारबार दिखता है !

अवांतर - कतरीना चित्रपटात म्हणजे किमान एक आयटम साँग मोफत Happy

ऋ , मग त्यापेक्शा गाणं युट्युब वर बघायला सांग .
कारण चित्रपटात त्या गाण्यात कॅट नाही आहे .
क्रेडिट्समध्येही हे गाणं बहूदा नाही आहे .

चित्रपटातलं गाणं मला आवडलं . त्या कतरीनाच्या वळवळण्यापेक्शा चांगलं आहे Wink .

>> हे कशासाठी ? तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून ! >>>>>>>
सुंदरता फक्त नसते या क्षेत्रात. चित्रपट हे द्रुश्य माध्यम आहे.
जो अच्छा दिखता है वही बिकता है, और जो बिकता है वही बारबार दिखता है ! <<

इन दॅट केस, मला असं वाटतं की तुमच्या चित्रपटविषयक अपेक्षा, संकल्पना व समजुती खूपच वरवरच्या आहेत. कारण नसीरुद्दीन शाह, इरफान खान, अजय देवगण सारखे अभिनेते आणि कोंकना सेन-शर्मा, प्रियांका चोप्रा, मुक्ता बर्वे सारख्या अभिनेत्र्या 'सुंदर' नक्कीच नाहीत. (प्रियांका चोप्राबद्दल वाद होऊ शकतो. पण मला असं वाटतं की ती काही नैसर्गिक सुंदर नाही. ती सुंदर वाटते कारण तिचा वावर अत्यंत आल्हाददायक व आश्वासक असतो. बेसिकली शी कॅरीज हर सेल्फ वंडरफुली वेल.) पण तरी त्यांना 'मार्केट' आहेच.
माझ्या मते 'सौंदर्य' (तुमच्या मते 'सुंदरता') ही बाब 'फक्त'च आहे. ईट्स जस्ट वन फॅक्टर आऊट ऑफ मेनी.

............ आणि हे फक्त चित्रपटविषयक नाहीच. People always want BEAUTY WITH BRAIN.

रणजित,

नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट परिक्षण...चित्रपट यथा तथा च असेल ह्याची शाश्वती होती च Wink
>>...People always want BEAUTY WITH BRAIN >> १०० % पते की बात !!
नवाझुद्दीन सिद्दीकी, दस्तरखुद्द ओम पुरी, पंकज कपुर हे अभिनेते आणि स्मिता पाटील, दिप्ती नवल, आणि शबाना ही नावे पण लक्षात घ्या जरा ऋन्मेष भाऊ !!
>>जो अच्छा दिखता है वही बिकता है, और जो बिकता है वही बारबार दिखता है ! << हे वाक्य टाकताना सई-पुई असेल नाही डोळ्यासमोर Wink !!

रसप तुम्ही गल्लत करत आहात,
तिच्याकडे जे आहे ते या क्षेत्रातील एक बलस्थान आहे हा माझा मुद्दा होता.
याचा अर्थ इतरांची बलस्थाने व्यर्थ आहेत असा नाही होत.
अभिनय येतात ते अर्थातच या अभिनयाच्या क्षेत्रात टिकणारच, त्याबद्दल चर्चा करणे म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी बॅटींग किंवा बॉलिंग आलीच पाहिजे असे म्हटल्यासारखे होईल,
पण तो जेमतेम असताना सौंदर्य... नव्हे अफलातून सौंदर्य हे तिचे बलस्थान आहे, त्या जिवावर ती टिकून आहे.
भले ती गॉड गिफ्ट असेल वा सोबत ते सौंदर्य आणि फिगर टिकवण्यामागे तिचीही मेहनत असेल, वा नसेलही..
पण ती या फिल्म ईंडस्ट्रीमध्ये उगाचच आहे असे नाही म्हणू शकत, तिला आजवर जे जे काम मिळालेय ते ती डिजर्व्ह करतेच Happy

>> हे कशासाठी ? तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून ! >>>>>>>
सुंदरता फक्त नसते या क्षेत्रात. चित्रपट हे द्रुश्य माध्यम आहे.
जो अच्छा दिखता है वही बिकता है, और जो बिकता है वही बारबार दिखता है ! <<

इन दॅट केस, मला असं वाटतं की तुमच्या चित्रपटविषयक अपेक्षा, संकल्पना व समजुती खूपच वरवरच्या आहेत. कारण नसीरुद्दीन शाह, इरफान खान, अजय देवगण सारखे अभिनेते आणि कोंकना सेन-शर्मा, प्रियांका चोप्रा, मुक्ता बर्वे सारख्या अभिनेत्र्या 'सुंदर' नक्कीच नाहीत. (प्रियांका चोप्राबद्दल वाद होऊ शकतो. पण मला असं वाटतं की ती काही नैसर्गिक सुंदर नाही. ती सुंदर वाटते कारण तिचा वावर अत्यंत आल्हाददायक व आश्वासक असतो. बेसिकली शी कॅरीज हर सेल्फ वंडरफुली वेल.) पण तरी त्यांना 'मार्केट' आहेच.
माझ्या मते 'सौंदर्य' (तुमच्या मते 'सुंदरता') ही बाब 'फक्त'च आहे. ईट्स जस्ट वन फॅक्टर आऊट ऑफ मेनी.

............ आणि हे फक्त चित्रपटविषयक नाहीच. People always want BEAUTY WITH BRAIN.+१११११११११११

वर कोणी प्रियांका चोप्रा सुंदर नाही असे बोलत आहेत आणि त्याला +१ देखील मिळत आहेत.

दिसण्याचा निकष लावता गेल्या ८-१० वर्षातील बॉलीवूडची ती नंबर वन हिरोईन आहे याबाबत दुमत होऊ शकते यावरही माझा विश्वास नव्हता पण इथे तर चक्क!!...

राजकारणाप्रमाणेच काही कलाकार चक्क आपल्यावर लादले गेले आहेत. परत त्यांच्याकडे पैसा इतका आहे की कितीही फ्लॉप दिले तरी त्याना काहीही फरक पडत नाही. गुणवत्ता असो किंवा नसो, त्यांना पैसा आणि प्रसिद्धी मिळतेय.

सैफ अली हा कमकुवत कलाकार आहे. दुर्दैवाने त्याच्याकडून 'ओंकारा' सारखे काम करून घेणारा दिग्दर्शक कबीर खान नाही!

सामान्य कलाकार, सामान्य दिग्दर्शन, सामान्य चित्रपट!

सहमत

सैफ अली खान हा शाहरूख-आमीर सारख्यांच्या जोडीला शोभणारा एक सहाय्यक अभिनेता / साईड हिरोच्या पात्रतेचा कलाकार आहे.
त्याचा सुदैवाने "हम तुम" हा चित्रपट वेगळ्या सादरीकरणामुळे हिट गेला आणि तो स्वताला सोलो हिरो समजू लागला.
मला बरेचदा सैफ अली खान आणि विवेक ओबेरॉय या दोघांमध्ये फरक करणे कठीण जाते.

या सिनेमाच्या बाबतीत काहीतरीजबरदस्त गंडलेलं आहे (कथानक नाही, एकूणातच निर्मितीप्रक्रिया) बजरंगी भाईजानची पब्लिसिटी पहिल्या दिवसापासून पद्धतशीर होती. (अगदी कुठले फोटॉ ट्विटरवर टाकायचे इथपासून) हा सिनेमा मात्र पब्लिसिटीमध्ये फार कमी पडलाय. अफगाण जलेबी गाणं पण खूप उशीरा लाँच झालंय. समहाऊ निर्मात्यांना नंतर काही इंटरेस्टच राहिला नाही असं वाटतंय.

अधिक गॉसिप शोधायला हवंय.

'काबुल एक्स्प्रेस', 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' सारखे अचूक नस पकडणारे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक कबीर खानही ह्यावर वेळ वाया घालवतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटतं.

काय अन कसली डोम्बलाची अचूक नस पकडलेय या चित्रपटात? टायगर अन भायजान तर तद्दन फालतू सलमानपट आहेत ....

काही ही हां रसप जी Wink

मंदारराव,

'नस पकडणे' म्हणजे काय ते जरा समजून घ्या हो आधी ! मी अत्यंत विचारपूर्वक शब्द वापरतो, कधी कधी.. Happy

कमॉन.. उत्कंठावर्धक चित्रपट आहे हा..
मी बघायला घेतलाय.. निम्मा बघून झालाय.. बघण्याच्या नादात एक स्टेशन पुढे जाऊन आलो.. कारण मोबाईलवरून नजर हटवायला जराही वेळ देत नाही हा चित्रपट ..

आता पर्यंत जेवढा पाहिला त्यानुसार पैसा वेळ वसूल चित्रपट आहे..

आणि अबाऊट कतरीना...

आता पर्यंत जेवढी यात कतरीना पाहिली आहे.. गॉजिअस.. तिला तोडच नाही.. तिची ब्यूटी आणि पर्सनॅलिटीच या भुमिकेची खरी गरज आहे.. अभिनय म्हणाल तर तिने स्मिता पाटील किंवा शबाना आझमी बनायची गरज नाही.. कुठेही ती अभिनयाच्या बाबतीत असह्य होत नाही, किंबहुना सुसह्य अभिनय म्हणावा यापेक्षाही एक घर पुढे जात या भुमिकेला सूट झालीय.

क्रमशः

हा ऋन्मेष त्याच कटरिना बद्दल बोलतोय का?
कैफांचे एकटरिना
जी तोंडातल्या तोंडात बोलते. कधी कधी तोंड आल्यासारखं बोलते, कधी कधी आलं तोंडात धरल्यासारखी बोलते.
जी रडणे, हसणे, एक्साईट होणे, दु:खी होणे या सगळ्यासाठी एकच अ‍ॅक्टींग करते.
जी सदैव मख्ख चेहर्‍याने ववर असते? Uhoh
तीच का ती जिने १०० जन्म कोणतंही व्रत केलं तरी ती स्मित अपाटील आणि शबाना आझमीच्या आसपासही जाऊ शकत नाही

तीच का ती?

कैफांचे एकटरिना>>> कटरीना टूर्केट (अथवा टर्केट)
तिला "कैफ" हे नाव दिलंय टायगर श्रॉफच्या मम्मीने.
आयेशा श्रॉफने प्रोड्युस केलेला आणी कैझद गुस्तादनं दिग्दर्शित केलेला अतिशय "किळसवाणा" (दुसरा शब्द नाही त्याला) चित्रपट म्हणजे बूम. त्यात कटरीना कैफ "डिस्कवर" केली होती. पिक्चर आपटलाच, पण कटरीनाला तोपर्यंत सल्लूमियांचा सहारा मिळाला. त्यांच्या आशीर्वादानं तिचं फिल्म इंडस्टीमधलं बस्तान चांगलंच बसलं.

परवा टीव्हीवर बूम लागलेला पाहिला. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या. घाणेरडा पिक्चर आहे.

ऋन्मेऽऽष हा आयडी एक गोष्ट करत असतो
सतत सर्वसाधारण मताच्या उलट्या मताच्या पिंक टाकत राहायच्या .
मग आपोआप अटेंशन सिकर होता .

जी सदैव मख्ख चेहर्‍याने ववर असते? >> जगातली सर्वात सुंदर स्त्री, इनफॅक्ट सुपरमॉडेल, मिस कतरीना कैफ चा चेहरा मख्ख आहे .. क्या बात है Happy

असो, बाकी मी कुठेही तिच्या अभिनयाचे गोडवे गायलेले नाहीयेतच,

पण ज्यांना अभिनय एके अभिनय हा एकच गुण दिसतो, आणि त्यावरच जे कलाकारांना जोखतात, त्यांना चित्रपट हे माध्यमच समजले नाही एवढे मात्र नक्की म्हणेन. Happy

मला तिचा चेहरा सुंदर वाटत नाही.
मझ्यामते सुंदर - माधुरी, मधुबाला,सुश्मिता सेन, स्मिता पाटील *आलिया (गोड आहे खरी ती, अभिनय शिकतेय (तरी अजुन जमत नाहीये) तो भाग अलहिदा)

जगातली सुंदर ???????? Lol
राहूच द्यात!

* हिला कशी विसरले मी Sad

मला तिचा चेहरा सुंदर वाटत नाही. >>> रिया आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे पण त्याने सत्य तर नाही ना बदलणार.
तिचे सौंदर्य जगाने मान्य केले आहे.
अन्यथा मला सांगा जर तिला अभिनयही येत नसता आणि ती सुंदरही नसती तर चित्रपटात तिला नक्की का घेतात Happy

असो,
सौंदर्याच्या तुलनेसाठी आपण मधुबाला, माधुरी यांना घेतले याबद्दल धन्यवाद. कतरीना त्यांच्या पंगतीत शोभते.
सुश्मिता सेन हे नाव या यादीत फारसे रुचले नाही. पण असो, तिच्या मिस युनिवर्स असण्याचा मान ठेऊया.
आलियाताई नक्कीच गोड चेहर्‍याच्या आहेत. Happy

मला एक गंमत वाटते, ज्या कतरीनाचे सौंदर्य जगाने मान्य केले आहे ती मला सुंदर वाटते पण आपल्याला नाही.

ज्या दुनियादारी चित्रपटाला लोकांनी डोक्यावर उचलून बॉक्स ऑफिसवर हिट केला आहे तो मला आवडतो पण आपल्याला नाही.

आणि तरीही माझी मते जगावेगळी पण आपली नाहीत.

हे असे का कोणी सांगेल का Happy

सौंदर्याच्या तुलनेसाठी आपण मधुबाला, माधुरी यांना घेतले याबद्दल धन्यवाद. कतरीना त्यांच्याच पंगतीत शोभते.
>>
बाप्रे!
आवर बाबा स्वतःला Angry

अन्यथा मला सांगा जर तिला अभिनयही येत नसता आणि ती सुंदरही नसती तर चित्रपटात तिला नक्की का घेतात
>>
राखी सावंत ना सुंदर आहे ना तिला अभिनय येत तरी घेतलंच आहे ना तिला चित्रपटात?
सेम विथ मल्लिक शेरावत

जी उत्तर तू दर्जाहिन चित्रपट का बनतात त्यासाठी देतोयेस तिच उत्तर इथे लागू पडतील.

राखी सावंत ना सुंदर आहे ना तिला अभिनय येत तरी घेतलंच आहे ना तिला चित्रपटात?
>>>
कमॉन!!
कुठल्या चित्रपटात? कुठल्या भुमिकेसाठी?

सेम विथ मल्लिक शेरावत
>>>
या मॅडमनाही त्यांच्या मर्यादेनुसारच काम मिळालेय.

बाकी कतरीना कैफनी कोणत्या कोणत्या ब्लॉकबस्टरमध्ये, केवढ्या मोठमोठ्या बॅनरखाली, आणि किती बड्याबड्या सुपर्रस्टारबरोबर काम केलेय हे सांगायची गरज नसावी Happy

Pages