खोप्या मधे खोपा.... पिल्लासाठी .....(कुम्भारिण माशीचा मातीचा )

Submitted by जो_एस on 25 August, 2015 - 12:11

खिडकीच्या गजावर हे मातीचं घर करायला सुरुवात केली या माशीनी
मातीचे गोळे आणून त्याना आकार देतानाच स्किल बघण्या सारख आहे .
kb0_.jpgkb1_.jpgkb2_.jpgkb3_.jpgkb4_.jpg

याच्या आत आळी सारख काहीतरी दिसतय्
kb6_.jpg

एक झाल्यावर बाजूला आणि मग वर आजून बांधकाम चालू झालं
kb7_.jpgkb8_.jpgkb9_.jpg

नंतर अधीच्या घरांवर कसले तरी थर देत असते मधेच
हे फोटो मोबाईलनी १,२ इंचा वरून काढलेत्

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे कसले फोटो काढलेत, जो-एस.. सुपर्ब..
एकेक अ‍ॅक्शन क्लिअर टिपलीये.. अगदी डिसकवरी चॅनेल वर दाखवतात तशी..
सुप्पर लाईक..
खतरनाक दिसतीये कुंभारीण, मन लावून कामात गढलीये अगदी!!!

वॉव कसलं क्लास आहे हे Happy
फारच पेशन्सचं काम असणार हे (माशीचं पण आणि तुमचं पण):)
आळ्यांबद्दल आणि घराला होल पाडण्याबद्दल माहीत नव्हतं Happy
घरी दाखवेन आज सगळ्यांना Happy

इतके दिवस मी कुठल्या तरी पक्षाच्या घरट्याचे फोटोज असतील म्हणुन उघडून बघत नव्हते.
आता हा धागा वर आला की सारखं बघणं होईल Happy
खुप खुप धन्यवाद या धाग्यासाठी जो Happy

फ़ारच छान!

या माशीची लाईफ़ सायकल आणि त्याला जोडुन थोडेसे अध्यात्म. हे माझ्या आजोबांनी सांगितलेले- माशी घर बांधते आणि त्यात अंडी घालते. त्यातुन मग अळी बाहेर येते. त्या अळी च्या जीवाला खुप भीती असते. त्यांच्याच जातीतली दुसरी माशी खावुन टाकेल अशी. ती बिचारी अळी सारखी घराच्या तोंडा कडे (वर) डोळे लावुन असते. ती इतकी घाबरलेली असते की त्या माशीचा ध्यास घेते. सतत घाबरुन त्या माशीचा ध्यास घेवुन एके दिवशी ती अळी स्वत: च 'ती' माशी बनते.
संतानी (अर्थातच खर्‍या) असच देवाचा ध्यास घेतला म्हणुन ते संत झाले.
जो एस धन्यवाद... आठवणींना उजाळा मिळाला. -/\-

अरे वा खुपच सुरेख फोटो आहेत. आणि तुमच्या पेशन्स ची कमाल आहे. ती माशी किती डेंजर दिसतेय. तरीही एवढ्या जवळून फोटो काढलेत.

Pages