पाऊले शाळेच्या दिशेने झप झप पडत होती. शर्ट घामाने ओलाचिंब झाला होता. निम्म्या रस्त्यात असतानाच शाळा भरल्याची घंटा कानावर पडली होती त्यामुळे मनात धाकधुक वाढली होती. चालता चालता अचानक चपलेचा बंध निसटला, आणि दत्ता थोडासा अडखळला. रबरी चप्पला पार झिजून गेल्या होत्या. "तुलाबी आत्ताच तुटायंच व्हतं" स्वतःशीच वैतागून त्याने तुटलेली चप्पल हातात घेतली. तेवढ्यात पहिल्या तासाची घंटा त्याच्या कानावर पडली. त्याच्या काळजात चर्र झाले. पहिले सलग दोन तास कांटे सरांचे होते. कांटे सर त्यांना मराठी शिकवीत तसेच ते त्यांचे वर्गशिक्षक देखिल होते. अतिशय कडक शिस्तीचे म्हणून त्यांची संपूर्ण शाळेत ख्याती होती. एरवी दंगामस्ती करणारी मुले देखिल त्यांच्या पुढे उभे रहाताना चळाचळा कापत. दत्ताने तुटलेला बंध कसाबसा बसवला व चप्पल ओढीत तो तसाच पुढे चालू लागला. शाळेत पोहचताच त्याने तडक वर्गात धाव घेतली. तो दरवाजात उभा राहिला. सर शिकवण्यात दंग होते.
"सर आत मध्ये येऊ का?" दत्ताच्या तोंडातून कसे बसे शब्द बाहेर पडले. सरांची तंद्री भंगली. त्यांनी दरवाजाकडे पाहिले. घामाने भिजलेला पांढरा शर्ट, खाकी मळकट पॅंट, पायात रबरी चप्पल, हातात दोन एक वह्या शर्ट पुढून निम्मा पॅंन्टमध्ये खोचलेला, मागून निम्मा तसाच सोडलेला, केस वेडेवाकडे झालेले अशा अवतारातील दत्ता त्यांच्या दृष्टीस पडला.
"किती वाजले?" एक दरडावणारा प्रश्न दत्ताच्या कानावर आदळला. त्याचे पाय थरथरू लागले. कानशीलं गरम झाली.
"काय विचारतोय मी"
दत्ताची मान खाली गेली.
"पुढे ये असा!" सरांच्या डोळ्यात राग दिसू लागला. कुणी तरी ओढून नेत असल्यासारखा दत्ता पुढे जाऊ लागला. जवळ जाताच पाठीवर दाणकन एक रट्टा पडला.
दत्ता कोलमडला, हातातील वह्या खाली पडल्या.
"ही काय धर्मशाळा वाटली काय रे तुला? कधी ही या! कधीही जा!" एका हाताने दत्ताचा कान ओढत सरांनी विचारले. वेदनेचा अस्पष्ट हुंकार त्याच्या तोंडातून उमटला. डोळ्यात पाणी जमा झाले. तो तसाच मान खाली घालून उभा राहिला.
"उशीर का झाला?"
दत्ताच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले. तेवढ्यात त्याची आणखी एक चूक सरांच्या नजरेत आली.
"आणि शर्ट इन का नाही केला?" पुन्हा सरांचा हात दत्ताच्या पाठीवर कोसळला. दत्ता मुक पणे रडू लागला. पण त्याचे रडणे सरांचा राग शांत करू शकले नाहीत . "चल पलीकडे भिंतीकडे तोंड करून अंगठे धर" सरांच्या या वाक्यांने दत्ताच्या मनात काहूर माजल. तो तसाच उभा राहिला.
"एकायला येत नाही का तुला?"
सरांच्या संतापाचा पारा आणखी वर चढला पण दत्ता अश्रू ढाळीत तिथेच उभा राहिला. आता सरांनी स्वतःच त्याल ओढून कोपऱ्यात नेले आणि वाकवून अंगठे धरावयांस लागले. दत्ता खाली वाकताच वर्गात खस खस पिकली. एकाकी मुलांना हसायला काय झाले हे सरांच्या लक्षात आले नाही.
"तुम्हाला काय झाले हसायला?" सर बाकीच्यांवर डाफरले. तेवढ्यापुरती मुले शांत झाली. सर फळ्याकडे वळताच मुले पुन्हा हसू लागली. आत्ता मात्र सरांचे पीत्त खवळले. पुढच्या बाकावरील मुलांच्या पाठीत एक एक रट्टा बसला.
"उठ पटकन! काय झाले हसायला?
बोल लवकर" सरांच्या डोळ्यातला राग पाहून तो मुलगा भेदरला. तोंडातून आवाजही न काढता त्याने अंगठे धरलेल्या दत्ताकडे बोट दाखवले. सरांनी तिकडे पाहिले आणि एकाएकी त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारले. दत्ताची पॅंट मागून फाटली होती, आणि त्या जागी ठिगळ लावले होते. ते ठिगळ लपवण्यासाठी त्याने शर्ट इन केला नव्हता. सरांनी त्याला उठवले. त्याच्या पाठीवर थोपटले व त्याला जागेवर बसायला सांगितले. सर पुढे शिकवू लागले पण त्यात नेहमीचा उत्साह नव्हता. त्यांच्या डोळ्यापुढून
ठिगळ लावलेली पॅंट घालून अंगठे धरलेला दत्ताचा रडका चेहरा काही जात नव्हता. तास संपल्याची घंटा झाली. सर बाहेर निघून गेले. दत्ता मान खाली घालुन बसून राहिला. सर्व मुली मुले आपल्याकडे पाहून हसत आहेत असा भास त्याला होत होता. दुसरे शिक्षक आले ते शिकवून गेले. चौथ्या तासानंतर मधली सुट्टी झाली. वर्गातील काही मित्र त्याला बाहेर घेऊन जाऊ लागले पण दत्ता जागचा उठला नाही. पुढचे चारही तास त्याने असेच बसून काढले. शाळा सुटायच्या दहा मिनीटे अगोदर शाळेचा शिपाई त्याला बोलवायला आला. कांटे सरांनी बोलावलंय हे एकून पुन्हा त्याच्या अंगांतले त्राण गेले. मुलांनी काही चुक केलीतर त्यांच्या पालकांना चिठ्ठी पाठवून बोलावले जाई. तसेच काहीतरी असेल असे त्याला व इतर मुलांना वाटले. दत्ता आपल्या दोन वह्या व तुटलेली चप्पल ओढत ओढत शिपायाच्या मागे गेला.
दुसर्या दिवशी प्रार्थना संपवून मुले वर्गात बसली होती. तेवढ्यात कांटे सर हसत हसत आले, आणि त्यांच्या मागे नविन कपडे आणि चप्पल घातलेला दत्ता हसतमुख दत्ता प्रवेशकर्ता झाला.
. . . . . धनंजय . . . . .
अतिशय सुरेख कथा. आवडली.
अतिशय सुरेख कथा. आवडली.
अपेक्शित शेव ट
अपेक्शित शेव ट
अपेक्शित शेव ट
अपेक्शित शेव ट
छान आहे कथा.
छान आहे कथा.
अपेक्षीत शेवट..पन तरीही
अपेक्षीत शेवट..पन तरीही आवडला..
अतिशय सुरेख कथा. आवडली. >>>
अतिशय सुरेख कथा. आवडली. >>> +१००
सुरेख !!
सुरेख !!
अपेक्षीत शेवट..पण तरीही
अपेक्षीत शेवट..पण तरीही आवडला..>> +१
वर्णनशैली आवडली.. छान
वर्णनशैली आवडली.. छान सकारात्मक शेवट
आवडली.
आवडली.
खूप सुरेख! टचकन पाणी आले
खूप सुरेख! टचकन पाणी आले डोळ्यात!!!
कथा आवडली.
कथा आवडली.
अतिशय सुरेख कथा. आवडली. >>>
अतिशय सुरेख कथा. आवडली. >>> +१००
वर्णनशैली आवडली.. छान
वर्णनशैली आवडली.. छान सकारात्मक शेवट>> +१
छान आहे.. आटोपशिर लिहायला छान
छान आहे..
आटोपशिर लिहायला छान जमत तुम्हाला
प्रतिसादाबद्दल तुम्हा
प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार .
अतिशय सुरेख कथा
अतिशय सुरेख कथा
मस्त कथा आणी शेवट! आवडली.
मस्त कथा आणी शेवट! आवडली.
सुरेख कथा
सुरेख कथा
कथा आवडली.
कथा आवडली.
शेवट वाचून बरं वाटलं. कुणास
शेवट वाचून बरं वाटलं.
कुणास ठाऊक का पण दु:खी शेवट होतो की काय अशी भिती वाटलेली.
छान लिहिलंय
व्वा...!!!
व्वा...!!!
छान लिहिलीय.. आवडली .
छान लिहिलीय.. आवडली .
भिडली....
भिडली....
मस्त
मस्त
धनंजय, लहानशीच कथा पण परिणाम
धनंजय,
लहानशीच कथा पण परिणाम साधणारी. वर्णन खूप छान. एवढ्या कमी शब्दांमध्ये हृदयाला भिडणे सोप्पे नाही. प्रभावशाली लेखन..
लिहित रहा, पुलेशु.