Submitted by आईची_लेक on 17 August, 2015 - 08:02
आमच्या घरी एकाच देवाच्या बऱ्याच मूर्ती , फोटो ,जुन्या जपमाळा ,देवांची वस्त्र अस बरच काही आहे
त्याच काय कराव ?
मी अस ऐकल आहे कि अशा मूर्ती पाण्यात विसर्जित कराव्यात ,हे खर आहे का ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा
पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा -
त्या सुस्थितीत असतील तर एखाद्या मंदिरात दान करून टाका
नसतील तर - आम्ही वस्त्र देव्हारा पुसायला घेतो. फोटो ची फ्रेम फुटलेली असेल तर काचा आणि बॉर्डर फेकून देऊन कागद निर्माल्यात (निर्माल्य कुंडात) टाकून देतो. फोटो खराब झाला असेल तरी निर्माल्य कुंडात.
मातीची मुर्ती (लहान) असेल तर विसर्जन करतो मुद्दाम.
जपमाळेचं माहीत नाही पण बहुदा मी ती पण निर्माल्य कुंडात टाकू दिली असती.
यावरून अवांतर पण मह्त्वाचं - मला नेहमी वाटतं की सोसायटी मधे एखादा खड्डा खणून त्यात असे निर्माल्य टाकायची सोय करावी. त्याचं झालेलं खत झाडांना टाकावं (तुळशीला म्हणजे ज्येष्ठांच्या पण भावना दुखावल्या जात नाहीत) पण त्याचा व्याप मोठा आहे त्यामुळे मी यात पडत नाही. पण शक्य असेल तर मस्तच ना हे
मनरंग, तुम्ही इथे फोन करून
मनरंग,
तुम्ही इथे फोन करून विचारू शकता. : http://www.sanatan.org/en/a/154_how-to-reach-ashram.html
आ.न.,
-गा.पै.
आम्ही काही जुन्या देवतांच्या
आम्ही काही जुन्या देवतांच्या दुर्मिळ मूर्ती राजा केळकर संग्रहालयाला भेट दिल्या होत्या.