R for ….. एक प्रयत्न !!!

Submitted by एम . प्रविण on 8 August, 2015 - 22:43

नमस्कार माबोकर ,

बरेच दिवसानंतर एक चित्र काढता आले. खरे म्हणजे एक विषय डोक्यात खूप दिवस झाले थैमान घालत होता खूप लिहायचे होते पण मग वाटले एक दुसऱ्या माध्यमातून व्यक्त व्हाव. आपण सर्व जन हे जाणून घ्यालच यात शंका नसे.

अजून बऱ्याच चित्रांना सुरवात केलीय पूर्ण होताच उपलोड करीन.

माध्यम : जलरंग , ९ इंच * १२ इंच water color cold press , acid free paper

आपला रविवार सुखद जावो Happy !!!!

Respect.jpg

२. Respect-2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रकलेतला उत्साह वाढवल्याबद्दल के राज , ससा , मराठी कुडी , सृष्टी , नंदिनी , सायली, दक्षिणा , आत्मधून आपण सर्वांचे आभार .

Thanks !!!

जागतिक महिला दिनी हे चित्र काढले होते . थोडासा विचार या मागे कि महिला म्हंटले कि समाज अजून हि भोगवस्तू म्हणूनच पाहतो. पहिल्या चित्रातली स्त्री पहिली असता तिचे लालचुटुक ओठ लक्ष वेधून घेतात पण तिच्या मनाचा थांगपत्ता पाहायचा असल्यास तिच्या मनाच्या कोपऱ्यापर्यंत जायला तिच्या नजरेतूनच जावं लागेल तेव्हाच कुठे तिच्या मनाचा काठ सापडेल. फक्त बाहेरील रूप रंग पाहून स्त्री चे स्त्रीत्व नाही समजणार. तो मनाचा अंतरंग शोधताना तिचे डोळे सहजासहजी दिसणार नाहीत त्याला मनपूर्वक प्रयत्न करावे लागतील. म्हणून ती डोळ्यावर हॅट घेऊन आहे

दुसऱ्या चित्रात असे दाखवायचं कि कमी कपड्यात बाहेर पडता हजारो नजरांच्या वादळारूपी चकरा तिचा भोवताली फिरत असतात ज्यातून ती फार मुश्किलीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय. तिची छत्री म्हणजेच समाजातले आज हि असलेलं चांगले तत्व . जिची गरज सदैव आपल्या हि घरच्या प्रत्येक स्त्री ला हवी असते.

असो विचारांच्या जोडीला रंगाचा मिलाफ .( R ... for RESPECT) चू. भु.. द्या . घयावी