श्री
माझ्या आयुष्यातील प्रथम लिखाण... मायबोलीकरांच्या प्रेरणेने...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुन्हा एकदा डोक्यातून कळ आली. हात पाय थंड पडायला लागले. श्वास घेता येत नाहीय. सगळ रक्त डोक्याकडे वाहतंय आणि डोक्याचा pressure cooker झालाय असा वाटतय. आत्ताच डोकं फुटून सगळं संपणार असा वाटतंय. मी थरथरत coffee shop मध्ये शिरलो आणि “one coffee” असे ओरडून डोकं गच्च धरून बसलो.
आता काही खरं नाही. आता पुढचे ३-४ तास इथेच ह्या टेबलावर बसून राहावे लागणार, माझी फीट संपेपर्यंत. त्यासुमरास माझ्या हातून काही बर-वाईट होऊ नये आणि सगळ्यांसमोर तमाशा होऊ नये, असे वाटत होता. कधी नव्हे ते आज देवाचे नाव मनात आले.
आता बर वाटतंय. श्वास घेता येतोय. डोकं शांत झालंय. खूप थकवा आलाय, पण coffee shop च्या थंड वातावरणाने बर वाटतंय.शांत वाटतय. समोरची coffee गारढोण झालीय.
३-४ तास झाले वाटत…
आता माझयाबद्दल सांगतो. मी श्रीरंग काळे. BE in Computer Engineering. आई-बाबांचा एकुलता लेक. लहानपणापासूनच अभ्यास आणि स्पोर्ट्स सगळ्यामध्ये पुढे. त्यामुळे घरी आणि शाळेत सगळ्यांचा लाडका. त्यामुळेच असेल कदाचित, फारशी कुणी रोक-टोक केली नाही. यामुळे स्वभाव धाडसी आणि बिनधास्त झाला. पुढे कॉलेजमध्ये तशीच मित्रावळ मिळाली आणि स्वभावाला खतपाणी मिळालं.
मी,दिन्या,पश्या आणि मन्या आम्हीं चौघे म्हणजे धमाल चौकडी होती.(होती?.... शब्द मनात आला आणि डोक्यात काहीतरी झालं.). engineering सारख्या कठीण अभ्यासक्रमाबरोबर आमची उनाड्गिरी चालूच होती. खरेतर, आमचे मार्क्स बघून घरच्यांनीही काळजी करणे सोडून दिले होते. त्यांना वाटायचे, मुले अभ्यास करतात आणि छान मार्क्स मिळवतात, तर कशाला टोकावे?(टोकले असते तर आज ही वेळ आली नसती... कि आली असती? )
------------------------------------------------------------------------------------------------------------------
engineering चा नुकताच final paper झाला होता आणि बऱ्याच दिवसात मिळाला नव्हता असा मोकळेपणा मिळाला. कट्ट्यावर बसून गप्पा सुरु झाल्या.
“कालच्या पेपर मध्ये 1 a चा काय उत्तर लिहिला रे?”मी विचारलं.
“ए रंग्या, फार झाला अभ्यास. आता तो विषय काढू नकोस ” पश्या वैतागला.
“”नाही तर काय? एकदा पेपर दिला तो पुरे. पुन्हा तुझ्यासमोर नाही द्यायचा.” दिन्या म्हणाला.
“आता reasult येईपर्यंत नाव नाही काढणार. बस?” मी म्हणालो.
“हो. आता महिनाभर मस्त मज्जा करू या.” मन्याने अनुमोदन दिले.
“काय करायचे? picture टाकू या.” मी सुचवलं.
“ते तर टाकु. पण मी ठरवला आहे. यावेळेस मस्त gym लावणार आणि सलमान सारखी बॉडी करणार.” पश्या वर बघत म्हणाला.
“बॉडी तर करशील रे. पण थोबाडाचा काय करणार? ते बावळट राहणार.” मन्याने चिडवलं.
“ए मन्या, मी बावळट असलो न तरी मला job मिळाला आहे. तुमच्या सगळ्यांसारखा इकडे तिकडे फिरणार नाही.” पश्या खरच भडकला होता.
“भांडू नका रे. आपण सगळे महाबळेश्वरला जाऊ या. motorcycle ने.”मी सुचवलं.
“भन्नाट idea आहे. खूपच मजा येईल.” दिन्याने टुणकन उडीच मारली.”नेहाला आणि श्रेयाला बोलावू या.”
“अरे यार. हा परत chance मारतोय. कशाला हव्यात त्या दोघी. तू जा तुझ्या श्रेयाबारोबर नन्तर. आम्हाला मध्ये नको घालू. ” पश्या कारादावला.
“ठरला तर. आपण चौघे motorcycle ने महाबळेश्वरला जाऊ या.” मी भांडण सोडवत म्हटलं.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो खरे........ पण पुढे काय झाले काहीच आठवत नाही. पण त्या प्रवासात काय घडलं? खरच काही का आठवत नाहीय? असा वाटतंय जसे बरेच काहीतरी विसरतो आहे. काय बर नक्की? मनाच्या तळाशी काहीतरी लपवून ठेवलाय असा वाटतय. पण नक्की काय ते आठवत नाही. (जर गेलो नसतो तर... पण, या पश्चातबुद्धीचा आता काय उपयोग?)
त्या trip वरून आलो आणि ह्या फिट्स सुरु झाल्या. बऱ्याच दिवसात कुणाला भेटलो नाही कि कुणाशी बोललो नाही. थकवा खूप जाणवतोय. गेले काही महिने फिट्समुळे अशाक्तताही आलाय.पूर्वी फक्त रात्री फिट्स यायच्या. पण आजकाल दुपारीही सुरु झालाय. सगळे डॉक्टर्सही अचंबित आहेत.
आज ठरवलं, खुप झाला. आता आपल्या career ला जोमाने सुरुवात करायची. किती दिवस असा आजाऱ्या सारखे घरात राहायचे? आज interview होता. Interview मुळे घरी वेळेवर पोहोचता नाही आला. पण, आज interview च्यावेळी फीट नाही आली हेच देवाचे उपकार. (काय होतंय मला? आजपर्यंत देवावर विश्वासही नव्हता. आज सारखी-सारखी देवाची का आठवण येतेय?)
खरच coffeeची गरज होती. घड्याळाकडे बघितलं आणि दचकलो. ३-४ तास नाही, तर एकच तास झाला होता. आज इतक्या लवकर आटोपले सगळे?? कसे काय? खरेतर आजपर्यंत फीटची वेळ वाढतच असायची. मग आज असे काय झाले कि ती वेळ इतकी कमी व्हावी?
माझ्या लक्षात आले कि माझ्यासमोर एक मुलगी बसली आहे. दिसायला अतिशय देखणी.२३ ते २७ वर्षाची. सडसडीत बांधा. लांबसडक केसांची काहीतरी hairstyle केली होती. पण कुठल्याही प्रकारचा makeup केला नव्हता. एक साधा पांढर्याशुभ्र रंगाचा कुर्ता आणि निळी jeans असा साधा पोशाख आणि डोळ्यावर goggle. कुठल्यातरी कॉलेजमध्ये शिकत असावी. पण मुख्य म्हणजे ती माझेच निरीक्षण करत आहे.
“Hello. मी भार्गवी.” ती मधुर आवाजात म्हणाली “मी इथे बसले तर चालेल का?”
इतकी सुंदर मुलगी आपल्यासमोर बसतेय तर कोण मूर्ख नाही म्हणणार. मी मानेनेच होकार दिला. (उगाच desperate वाटायला नको.)
ती coffee पीतपीत माझ्याकडे बघत होती. पण तिच्या बघण्याने मनाच्या तळाशी साचलेला काही तरी हेन्दकाळलं. हळू हळू मनाचा ताल ढवळून निघाला. डोक्यात कळ आली.
पण तिनेच आपला लक्ष coffee कडे वळवले आणि सगळे बरे वाटायला लागले.
“मी इकडे जवळच राहते. तुम्ही please माझ्या घरी येणार का?” तिने अचानक विचारले.
क्रमशः
-स्फिंक्स
छान सुरुवात..येऊ द्या पुढे..
छान सुरुवात..येऊ द्या पुढे..
छान चालली आहे कथा.
छान चालली आहे कथा.
छान सुरुवात
छान सुरुवात
छान! पहिला प्रयत्न वाटत नाही
छान!
पहिला प्रयत्न वाटत नाही इतकं छान, ओघवतं लिहीलंय.
पुढिल भागांच्या प्रतिक्षेत.
मस्त सुरुवात आहे. पुढचे भाग
मस्त सुरुवात आहे.
पुढचे भाग लवकर येउ देत
छान पुढचे भाग नियमित येऊ
छान
पुढचे भाग नियमित येऊ देत....
श्री माझ्या आयुष्यातील प्रथम
श्री
माझ्या आयुष्यातील प्रथम लिखाण... मायबोलीकरांच्या प्रेरणेने... >>>>> अजिबात वाटत नाही पहिल आहे.
पु.ले.शु
छान कथा पुढचे भाग लवकर येउ
छान कथा पुढचे भाग लवकर येउ द्या.
श्री माझ्या आयुष्यातील प्रथम
श्री
माझ्या आयुष्यातील प्रथम लिखाण... मायबोलीकरांच्या प्रेरणेने... >>>>> अजिबात वाटत नाही पहिल आहे.
पु.ले.शु>>>>>>१
मस्त लिहिलयं! पुलेशु पुढचा
मस्त लिहिलयं!
पुलेशु
पुढचा भाग लवकरच टाका!
पहिल्याच भेटित घरी !!!!
पहिल्याच भेटित घरी !!!!
शाळेच्या निबंधानंतर हे पहिला
शाळेच्या निबंधानंतर हे पहिला प्रयत्न. पाच-सहावेळा delete करून भीतभीत पोस्टला.
पण तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचुन खुप आनंद झाला. अंगावर मुठभर मांस चढला.
Thank you very much. (गुळगुळीत शब्द आहे. पण भावना खऱ्या आहेत.)
@संतोष, << पहिल्याच भेटित घरी !!!!>> हींच तर खरी गम्मत आहे. पुढच्या भागात सगळे clear होईल.
)
मला एका loose end ला गोष्ट तोडावी लागली. (न जाणो फसली तर काय करा
छान लिहिलयं ! पु.भा.प्र.
छान लिहिलयं ! पु.भा.प्र.
छान सुरुवात. वाचतोय.
छान सुरुवात. वाचतोय.
अरे वा, हे पण छान. लवकर पुर्ण
अरे वा, हे पण छान. लवकर पुर्ण करा.
छान...
छान...
सर्व वाचकांना त्यांच्या कौतुक
सर्व वाचकांना त्यांच्या कौतुक आणि प्रोत्साहनासाठी खुप खुप धन्यवाद.
वाह ।।। सुरुवात तर एकदम भारी
वाह ।।। सुरुवात तर एकदम भारी केलीत ।।। पुढचा पार्ट येउद्या लवकर ।।।। पु. ले. शु.