एक पत्ता प्राक्तनाला...

Submitted by सत्यजित... on 29 July, 2015 - 06:38

वाटतो आहे हवासा,त्रास थोडा दे जरा...
वाटतो आहे नवासा,श्वास थोडा दे जरा!

मी अशी का एकटयाने,रात सारी जागवू?
वाटते,नाहीस तूही,भास थोडा दे जरा!

सागराच्या मुक्त लाटा,या नदीच्या भोवती...
या नदीला तो किनारा,पास थोडा दे जरा!

या जुगारी माणसांच्या,आतला नाहीच मी!
एक पत्ता प्राक्तनाला,खास थोडा दे जरा!

जिंदगीचा घोट होता,घेतला थोडाच मी...
घ्यायला थोडा पुन्हा तो,ध्यास थोडा दे जरा!

मी मिठी मागीतली ती,भेटला हा पाश का?
भेटला तो भेटला..दे,फास थोडा दे जरा!

मी कशाला जिंदगीला,भीक मागू सांग ना?
फक्त तू त्या कावळ्यांना,घास थोडा दे जरा!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मिठी मागीतली ती,भेटला हा पाश का?
भेटला तो भेटला..दे,फास थोडा दे जरा!>>व्वा

मी कशाला जिंदगीला,भीक मागू सांग ना?
फक्त तू त्या कावळ्यांना,घास थोडा दे जरा!>>व्वा