रंगोत्सव ( water colors ) - भाग १

Submitted by एम . प्रविण on 22 July, 2015 - 23:55

नमस्कार मंडळी ,

खूप दिवस झाले मी मायबोली फोलो करतोय, म्हणजे थोडक्यात मी स्वता सदस्यत्व nhanvte घेतले. आजपासून सुरवात करतोय
इथे चित्रकला विभागात खूप काही शिकत आले. मायबोली वरती खूप चांगले कलाकार भेटले त्यांनी share केलेली चित्रकला विविध माध्यमातील पाहता आली. विशेषता पाटील सरांची कार्यशाळा खूप आवडली. सर आपला खूप आभारी आहे. मला हि लहानपणापासून चित्रकला फार आवडायची पण ती आवड कामाच्या व्यापामुळे नाही टिकवता आली. इथली सर्व कलाकारी पाहून मनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि परत एकदा सुरवात करावी अशी इच्छा झाली. मी water color मधून सुरवात करतोय. आपल्या इतका छान नाही करता आले पण सुरवात केलिय. कृपया आपल्या प्रतिक्रिया समजू द्या. your tips on this more than welcome
आपण सर्वांनी सांगितलेल्या टीप्स या साठी पुन्हा खूप खूप आभार .

मी काढलेली काही water color चित्रे …. निसर्ग चित्र हा आवडता विषय सुरवात इथूनच !!!

१. mountain blue
MB-min.png

२. Spring summer
Summer.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!!

मायबोलीवर स्वागत!
दुसरे पेंटिंग खुप आवडले. पण पहिल्यात काहीतरी खटकतेय. निळे निळे डोंगर म्हणावे तर झाड, पक्षी अन डोंगर यांचे स्केल जुळत नाही अन जमीनीचे ऊंचवटे म्हणावे तर एवढी निळाई जास्त वाटते. अर्थात जाणकार सांगू शकतील यावर.

आपल्या प्रतिक्रियेबद्दल सर्वांचा खूप आभारी आहे. thanku आत्मधून, चैत्राली , पुरंदरे शशांक, प्राजक्ता , अश्विनी , हर्पेन, रश्मी आणि दिनेश यांचे.

@ चंबू : पण पहिल्यात काहीतरी खटकतेय >> आधी तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभर. आहो खूप दिवसनी अगदी वर्षांनी मी ब्रश घेतलाय हाती । हे ब्लुए mountain चित्र पहिले चित्र काढण्याचा प्रयत्न होता , काय काढावे कसे रंग वापरावे समजत न्हवते मग एका वर एक layer दिल्या त्यात हा सगळा प्रकार झाला. शिकतोय हळू हळू आपल्या कडून टिप्स ची अपेक्षा .

मला पडलेले काही प्रश्न : हे कसे करावे
१) काढलेल्या चित्राचा फोटो काढून मी ते upload करतोय पण त्याची size जवळपास २० mb होतीय , इथे upload limit १५५ kb आहे. इतक्या मोठ्या size चे फोटो छोटे कसे बनवायचे ( वरची चित्रे upload करताना खूप त्रासदायक प्रकार झाला ) आपण कसे उपलोड करताय , काही सोपा उपाय असेल तर सांगाल का ? मी सध्या website वापरतोय reduceimages.com
२) मला एखाद्याला या संदर्भात प्रश्न विचारायचे असतील तर वैयक्तिक कसे विचारावेत ?