व्यापम घोटाळा मप्र भाजपाचे "अच्छे दिन"

Submitted by किशोरडी on 30 June, 2014 - 06:02

व्यापम घोटाळ्याला बाहेर पडुन इतके दिवस झाले तरी मायबोलीवर चर्चा नाही?
व्यापम घोटाळा . शिवराज चौहान यांच्या तथाकथित रामराज्याचा बुरखा फाडणारा घोटाळा ठरला आहे. भाजपा मधे अलबेल आहे म्हणार्यांच्या सणसणीत वाजवणारा घोटाळा आहे. कारणच ते आहे . राज्यात सरकारी नोकर्यांमधे दलाला मार्फत परिक्षा देणार्यांना नकल करुन देणे, अधिकार्यांबरोबर साठगाठ करुन नंबर मागे पुढे करुन घेणे, सामुहिक नकल करुन परिक्षार्थिला उत्तीर्ण करणे, इतकेच नाही तर परीक्षार्थी ऐवजी दुसर्यालाच बसवुन पेपर लिहुन घेणे, असे बरेच प्रकार मध्यप्रदेशात या घोटाळ्यांमधे झालेले आहेत. यामुळे सरकारी नोकरीवर निकृष्ट दर्जाची व्यक्ती नेमण्यात आलेली आहे.

http://www.patrika.com/news/ats-asks-questions-in-vyapam-scandal-in-mp/9...

इंदौर। व्यापमं घोटाले की जांच प्याज छिलके की तरह हो गई है, जिसकी जितनी परत खोली जा रही है, उतने नए-नए कारनामे बाहर आ रहे हैं। पूरे घोटाले के उधेड़बुन में लगी एटीएस का ध्यान इंदौर के लॉ कॉलेज पर भी चला गया है। पता लगाया जा रहा है कि आखिर इतने सरकारी कॉलेज हैं, लेकिन पंकज त्रिवेदी व्यापमं में पहुंचे लॉ कॉलेज में ही व्यापमं की परीक्षा क्यों होती थी?

कुछ महीने पहले डॉ. जगदीश सागर को पकड़ने के बाद एटीएस ने प्रदेश के सबसे पड़े फर्जीवाड़े का खुलासा किया। उसके बाद तो जैसे घोटालों की बाढ़ सी आ गई। आखिर में एटीएस ने सारे घोटालों की जड़ यानी व्यापमं के चेयरमैन डॉ. पंकज त्रिवेदी और उनकी टीम को पकड़ लिया। पुलिस और शिक्षकों की भर्तियों से लेकर घोटाले निकलकर आ रहे हैं। लगातार एटीएस घोटालेबाजों की धरपकड़ कर रही है। उसे कई संस्था और लोगों पर शंका भी है जो व्यापमं से जुड़ी हुई परीक्षा और उसके चेयरमैन डॉ. त्रिवेदी से जुड़ी हुई है। उनकी नजर अब गवर्नमेंट लॉ कॉलेज पर टिक रही है।

गौरतलब है कि डॉ. त्रिवेदी के बनने के बाद शहर के कई बड़े सरकारी कॉलेजों को छोड़कर लॉ कॉलेज को ही लगातार परीक्षा का केंद्र बनाया गया। हर परीक्षा उसी कॉलेज में होती थी तो क्यों? जबकि लॉ कालेज से लगा हुआ अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला एवं वाणिज्य महाविद्यालय या सामने का होलकर कॉलेज भी था। दोनों ही कॉलेजो में बैठने की व्यवस्था लॉ कॉलेज से बेहतर थी। स्टाफ भी कई गुना अधिक था फिर भी लॉ कॉलेज को ही सेंटर बनाया जाता रहा। पता लगाने का प्रयास किया जा रहा है कि आखिर घोटालेबाज डॉ. त्रिवेदी का कॉलेज से क्या कनेक्शन है? कहीं यहां फर्जीवाड़ा करने में उसे आसानी तो नहीं हो रही थी। बच्चों को पास कराने में क्लीन चिट तो नहीं मिलती थी। ये सारी सुविधा मिलने की वजह से डॉ. त्रिवेदी उसे परीक्षा सेंटर तो नहीं बना रहे थे। लॉ कॉलेज में कौन है, जिसके डॉ. त्रिवेदी से गहरे संबंध रहे हैं। जांच कर रहे अफसरों के सामने कुछ बड़े नाम भी आए हैं। चर्चा है कि उनकी घेराबंदी करने के पहले पुख्ता व्यवस्था की जा रही है। यह पता लगाया जा रहा है कि अरविंदो कॉलेज के मालिक डॉ. विनोद भंडारी से उनके कोई संबंध तो नहीं है या उनसे लाभ तो नहीं लिया गया है?

- See more at: http://www.patrika.com/news/ats-asks-questions-in-vyapam-scandal-in-mp/9...

More than 42,000 candidates had appeared in PMT 2013 conducted by MP Professional Examination Board (Vyapam)

Vyapam admitted in the High Court that 1020 forms were missing and 346 imposters had appeared in the exam. Vyapam officials admitted in the court that 1120 candidates appeared in the exam but their forms were missing because Vyapam official and accused Nitin Mahindra had tampered with the Computers in which the record was stored.

The STF has presented charge-sheet against 28 accused, including Jagdish Sagar, in Indore Court. The fact that the charge-sheet includes details of 3292 different offences and more than 92,176 documents is indicative of the enormity of the scam.

----------
ज्यात मुख्यमंत्री त्यांचे मंत्रीमंडळातले नेते च्या शिफारसी ने लोकांना नोकर्या मिळाल्या आहेत असे आरोप देखील आहेत काही ठिकाणी तर संघाचे लोकांवर ही आरोप केलेले आहे. आजतक वर दाखवलेल्या कागदपत्रांमधे नाव दाखवली आहेत तर दुसरी कडे मप्र पोलिस हे आरोप निराधार आहे म्हणत आहे कशामुळे बोलत आहे जगाला माहीत आहे.
१०वी १२वी नापास लोकांना मुन्नाभाई एमबीबीएस बनवुन लोकांचे भविष्य अश्या लोकांच्या हातात सोपवण्याचा प्रकार "रामराज्यात" चालु होता. एकिकडे इतर पक्षांवर घोटाळ्याचे आरोप करायचे आणि दुसरी कडे व्यापम सारख्या घोटाळ्यावर तोंडावर बोट ठेवायचे त्याला मिडीयात जास्त प्रसिध्दी मिळवु नये म्हणुन प्रयत्न करायचे हे भाजपाचे दुतोंडी राजकारणाचे धिंडवडे निघत आहे. नरेंद्र मोदी मोठा आव आणुन ज्या पध्दतीत इतरांवर टीका करायचे ते सध्या या घोटाळ्यावर तोंड लपवत फिरत आहेत. इतर वेळी टिव टिव करणारे सोशल मिडीया मधे खालच्या पातळीवर विरोधकांवर कमेंट्स करणारे नेते या विषयावर मुग गिळुन बसलेले दिसुन येते यावरुन या घोटाळ्याची गंभीरता दिसुन येत आहे. आता केंद्रात सरकार देखील भाजपाचे आहे तर काही दिवसांनी हे प्रकरण दाबुन टाकण्यात येईलच यात संशय नाही परंतु इतरांकडुन नैतिकतेच्या आधारावर राजिनाम मागत फिरणारे आता का नाही मुख्यमंत्र्यांचा राजिनामा मागत.? कुठे गेली भाजपाची नैतिकतेची चाड?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MT: ‘व्यापमं’ घोटाळ्यात भाजप मंत्री, संघाचे नेते?
http://maharashtratimes.indiatimes.com//nation/Vyapam-scam-Congress-dema... via @maharashtratimes देशभक्ति,प्रखर राष्ट्रवाद,त्याग ह्याचे उदाहरण असलेला संघ ह्याचेही नाव ह्या घोटाळयात येणे हे खेदजनक आहे.

राजकिय, सामाजिक विषयावर अत्यन्त पोटतिडकीने मत मान्डणारे व्यापम सारख्या विषयावर शान्त का ? प्रत्येक भ्रष्टाचारावराच्या प्रश्नावर पुढाकाराने मत मान्डणारे या महत्वाच्या विषयावर शान्त का? वृत्तपत्रातही फार काही पाठपुरावा होताना दिसत नाही. हा प्रश्न मला सतावतो आहे.

प्रत्येक ज्वलन्त प्रश्नावर प्रत्येकानेच प्रत्येक वेळी विचार मान्डणे अशक्य आहे हे मला समजते पण कुठेतरी फार मोठा, अत्यन्त समतोल विचार करणारा वर्ग पैकी बोटावर मोजण्या एव्हढीच मते वाचायला मिळणे खटकते. माझ्यासाठी अशी शान्तन्ता व्यापम प्रकरणापेक्षाही जास्त चिन्ताजनक आहे. Sad

<<राजकिय, सामाजिक विषयावर अत्यन्त पोटतिडकीने मत मान्डणारे व्यापम सारख्या विषयावर शान्त का ? प्रत्येक भ्रष्टाचारावराच्या प्रश्नावर पुढाकाराने मत मान्डणारे या महत्वाच्या विषयावर शान्त का>>

अपनी जान बचाने का है रे बाब्बा! Wink

१०० हून अधिक लोकांचा जीव गेलाय, अगदी डीन सारख्या मोठ्या लोकांचाही.
मग कोण रिस्क घेणार या भानगडीत पडायची.

बाकी यावेळी सगळ्याच महत्त्वाच्या वृत्तपत्रात एक किंवा दोन पाने भरून व्यापम घोटाळ्यावर विशेष वृत्तांत आले होते.
विशेषतः मागच्या रविवारी.

लाडक्या पक्षाचा राष्ट्रवादी देशहिताचा घोटाळा आहे कसे तोंड उघडणार आणि जर उघडलेच तर तोंडातून "मरण पावलेले तर आरोपीच होते ना" असे निर्लज्जपणे वाक्य बाहेर पडतात
असल्या कुजक्या मनोवृत्तीची लोक इथे आहे हे बघवत नाही

इडियन एक्स्प्रेस मधे निधन पावलेल्या सम्बन्धितान्चा आढावा घेण्यात आलेला आहे.

http://indianexpress.com/article/india/india-others/tracking-vyapam-deat...

हे सम्पुर्ण अपघात सदृश हत्या सत्र अत्यन्त चिन्ताजनक आहे. या मधे काही आरोपी आहेत, काही चौकशी करणारे, काही साक्षिदार आहेत.

मला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. समाधानकारक असे काही उत्तर मिळत नाही.
केन्द्रिय गृहमन्त्री आणि प्रशासनावर अत्यन्त घट्ट पकड असल्याचा लौकिक असणार्‍या देशाच्या पन्तप्रधानान्ची ह्या महत्वाच्या विषयावर काय भुमिका आहे ?
देशातला सामान्य नागरिक हा सुरक्षित आहे का ? देशाला आणि मानवतेला सर्वात मोठा धोका कोणता आहे ? अजुन किती निरपराधी लोक गेल्यावर (नैसर्गिक, अनैसर्गिक, अपघाती मृत्यु) आपण तोन्ड उघडणार आहेत?

पन्तप्रधानान्ची ह्या महत्वाच्या विषयावर काय भुमिका आहे ? > जरा मोदी साहेबांना सत्तेवर तर येउ द्या मग बघा व्यापमचा कसा शहानिशा करतात. आताचे पंतप्रधान निव्वळ बघ्याची भुमिका घेतात. बोलतच नाही गेले. अशांकडून काय अपेक्षा ठेवतात. २०१९ साली आमचे साहेब निवडून आल्यावर बघा पाकिस्तानची काय गंमत होते. आज मिठाई परत करून गोळीबार केला. आमचे साहेब सत्तेवर असते तर मिठाई घरपोच घेउन आले असते गोळीबार करण्याची काय बिशाद. फक्त २०१९साल उजडु द्या. मग बघा.

बासनात गुंडाळले जाइल २/३ महिन्यात.
सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, दुष्यंत सिग, निहालचंद, इराणी, शिवराजसिंग, रमेश भादुरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे --
लिस्ट UPA पेक्षा एका वर्षातच मोठी झाली आहे.

आसाराम बापूंच्या केसमध्ये १८ मेले, व्यापम मध्ये १०० च्या वर. सर्वच बाबतीत कडी केली आहे मोदी सरकारने UPA वर.

- वैद्यकीय विद्यार्थिनी नम्रता दामोरच्या शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्टपणे 'हत्या' असा अहवाल आलेला असताना पोलिसांनी 'तिने आत्महत्या केली' असं सांगितलं. Sad
- राज्यपाल रामनरेश यादव ह्यांचं नाव FIR मध्ये आहे. पण पदामुळे त्यांना चौकशीविरुद्ध इम्युनिटी मिळत आहे. त्यांना का हटवलं जात नाही?

व्यापमसंबंधात कपाटभरून कागदपत्रे सांभाळणार्‍या क्लार्कला जीवाची भिती वाटत आहे म्हणे. साहजिक आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यापम आणि ललित मोदी प्रकरणावर एकदाही अवाक्षर काढलेलं नाही. जंतरमंतरवर गजेंद्रसिंगने गळफास लावून घेतल्यावर अर्ध्या तासात फुल्ल टु इमोशनल भाषेत ट्वीट आलं होतं. व्यापममध्ये मरणार्‍यांबद्दल पंप्रंचं हृद्य द्रवायला आणखी किती बळी जावे लागतील?

काल राष्ट्रवादिचे आमदार जितेंद्र आव्हाड, 'मीच मराठी माणसांचा कैवारी आहे' असे असल्यासारखे एबिपी माझावर ओरडत होते.

काय दिवस आलेत, आता 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या तिकीटावरुन ही, लोकांमध्ये हाणामारी होऊ लागल्यात, पुर्वी विलेक्षणच्या तिकिटावरुन व्हायच्या.

<<पंतप्रधान मोदींनी व्यापम आणि ललित मोदी प्रकरणावर एकदाही अवाक्षर काढलेलं नाही. जंतरमंतरवर गजेंद्रसिंगने गळफास लावून घेतल्यावर अर्ध्या तासात फुल्ल टु इमोशनल भाषेत ट्वीट आलं होतं. व्यापममध्ये मरणार्‍यांबद्दल पंप्रंचं हृद्य द्रवायला आणखी किती बळी जावे लागतील?>>

----- मनमोहनसिन्ग यान्च्यावर ते महत्वाच्या प्रश्नावर मौन बाळगुन बसतात असा आरोप होत असे.... त्यान्च्या मौनव्रता बद्दल मी देखिल पण टिकेने लिहीले होते, टिका करण्याचा आनन्द घेतला होता...

त्या काळात १७६,००० कोटी, अनेक लाख कोटी असे मोठ-मोठे आकडे वाचले होते, टिका केली होती... पण व्यापम प्रकरण म्हणजे हे सर्व प्रकार क्षुल्लक वाटावेत असे गम्भिर प्रकरण आहे.

प्रत्येक क्षुल्लक राजकारणाच्या विषयावर बेछुटपणे टिका करणारे, प्रतिसासादान्ची रतिब ओतणारे मायबोलीकर टिकाकार आज कुठे लुप्त पावले आहेत ? चुकीच्या गोष्टीला चुक आहे असे म्हणायला धाडस लागत असेल तर ते लोकशाहीला घातक आहे.

मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळातील म्हणजे व्यापम घोटाळ्यात सामील असलेले माजी मंत्री व भाजप नेते विक्रम वर्मा यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणात जागल्याची भूमिका पार पाडणारे सरकारी डॉक्टर आनंद राय यांची इंदूर येथून धार जिल्ह्य़ात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी या बदलीला न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले आहे

आता पुढची 'बातमी' त्यांची नसावी म्हणजे झालं.

बाकी आजपासूनच्या अधिवेशनात विरोधक या मुद्द्यावर राळ ऊठवणार म्हणतात.
मोदीकाका काय उत्तर देतात पहायला हवं.
'सत्याचा शोध घेतला जाईल, अपराध्यांना कडक शासन होईल, कुठल्याही पक्षाचा असो' हे तर ठरलेले उत्तर आहेच.

व्यापम घोटाला मामले पर सवाल उठाकर बीजेपी सांसद शांता कुमार ने आलाकमान की नाराजगी मोल ले ली है. सूत्र बता रहे हैं कि अमित शाह को लिखी उनकी चिट्ठी लीक होने से पार्टी के शीर्ष नेता खफा हैं.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा ने शांता कुमार से बात की और मीडिया से बात न करने को कहा. इससे पहले 'आज तक' से बातचीत में शांता कुमार ने कहा, 'हां मैंने अमित शाह को चिट्ठी लिखी है और मैं अपनी बात पर कायम हूं. मैं जनसंघ के समय से बीजेपी में हूं.'

हिमाचल प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री शांता कुमार ने बीजेपी अध्यक्ष अमित शाह को इस बारे में चिट्ठी लिखी थी. उन्होंने लिखा कि व्यापम घोटाले से एनडीए सरकार की छवि को धक्का लगा है और 'हम सब का सिर शर्म से झुक गया है.

मोदीकाका काय उत्तर देतात पहायला हवं.
'सत्याचा शोध घेतला जाईल, अपराध्यांना कडक शासन होईल, कुठल्याही पक्षाचा असो' हे तर ठरलेले उत्तर आहेच.>>> हे कांग्रेसवाले बोलायचे. मोदी सरकार त्यापुढे आहे. ते एवढे देखील बोलत नाहित.

व्हॉटसपवर फिरतोय हा घोटाळा.
त्यावरच्या पोस्ट बहाद्दरांना आपला जीव जाईल याची भिती नसते बहुधा

असो,
मायबोलीवर या घोटाळ्याची चर्चा करत त्याला प्रसिद्धी मिळवून देणे हे अपघाती मृत्युला आमंत्रण ठरेल का? गेला बाजार आयडी उडाला असा प्रकार तरी होण्याची शक्यता आहे का?

<<व्हॉटसपवर फिरतोय हा घोटाळा.
त्यावरच्या पोस्ट बहाद्दरांना आपला जीव जाईल याची भिती नसते बहुधा>>
------ जिव हा जाण्यासाठीच आलेला आहे.... किती दिवस भित भित जगायचे ? अशा भित्र्या जगण्याला काय जगणे म्हणायचे ?

<<मायबोलीवर या घोटाळ्याची चर्चा करत त्याला प्रसिद्धी मिळवून देणे हे अपघाती मृत्युला आमंत्रण ठरेल का? गेला बाजार आयडी उडाला असा प्रकार तरी होण्याची शक्यता आहे का?>>
------ अन्यायाला वाचा फोडायला धाडस लागते आणि जे लोक असे धाडस दाखवतात ते परिणाम भोगण्यास तयार असतात.

चुकीचे आचरण (भ्रष्टाचार) कोणत्या पक्षाने केले आहे यावर येथे प्रतिक्रिया काय द्यायची ते ठरते.

चुकीचे आचरण (भ्रष्टाचार) कोणत्या पक्षाने केले आहे यावर येथे प्रतिक्रिया काय द्यायची ते ठरते.>>>>>
100% खरे बोललात

<<जिव हा जाण्यासाठीच आलेला आहे.... किती दिवस भित भित जगायचे ? अशा भित्र्या जगण्याला काय जगणे म्हणायचे ? अन्यायाला वाचा फोडायला धाडस लागते आणि जे लोक असे धाडस दाखवतात ते परिणाम भोगण्यास तयार असतात. चुकीचे आचरण (भ्रष्टाचार) कोणत्या पक्षाने केले आहे यावर येथे प्रतिक्रिया काय द्यायची ते ठरते.>>

है शाबास !
१००% सहमत Happy

तिकडे गजेन्द्रसिह यान्च्या धाग्यावर ३०० प्रतिक्रिया... अनेक जाणकारान्नी आपली अमुल्य अशी मते नोन्दवली. आपण मानवी जिवाची किती काळजी घेतो हे प्रकर्षाने दिसते...

येथे व्यापम प्रकरणात १०० बळी गेले आहेत... बळी गेलेल्या लोकान्मधे महत्वाचे साक्षिदार, तक्रार दाखल करणारे, पाठपुरावा करणारे पत्रकार होते. पण या धाग्यावर प्रतिक्रिया १०० पण नाही. हे काय गौडबन्गाल आहे ?
गजेन्द्रसिह हे जसे निरपराधी होते तसेच हे १०० व्यापम ग्रस्त लोक, ज्यान्नी आता आपले सर्वस्व (बहुमोल प्राण) गमावले आहे, निरपराधी आहेत. जर आपण आज नापसन्ती दाखवली नाही तर उद्या अजुन ५-१० निरपराधी प्राण गमावतील....

कोर्टाचा निर्णय समोर ठेवलेले पुरावे बघुनच होत असतो... जर साक्षिदार परस्पर नाहिसे होत असतील (मारले जात असतील) तर कोर्टात केस चालेल कशी? दोषी लोकान्ना शासन होणार कसे ?

Pages