परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

Submitted by तुमचा अभिषेक on 18 July, 2015 - 17:18

साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी माबोवर माझ्या मुलीच्या (परीच्या) जन्माची कहाणी लिहिली होती. तेव्हा येणार्‍या काळात तिच्या छोट्यामोठ्या आठवणी लिहून काढायच्या असे मनाशी ठरवले होते. पण हल्ली आठवणींची साठवण फोटो आणि विडीओमध्येच सोयीस्कर पडत असल्याने अगदी तसेच काही झाले नाही. पण फेसबूक स्टेटसच्या निमित्ताने मात्र काही आठवणी कागदावर उतरल्या. काल सहज त्या पहिल्यापासून वाचतानाही गेल्या वर्षभराच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि म्हणूनच त्या संकलित करून ब्लॉगवर ठेवायचे ठरवले. बस्स त्याच ईथेही अपडेटतोय Happy

............................................................

२० मार्च २०१४

आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीच्या बघताक्षणी प्रेमात पडलो......... एका मुलीचा बाप झालो.
काल शिवजयंतीच्या मुहुर्तावर राणी लक्ष्मीबाई घरात आली.
BLESSED WITH BABY GIRL ...नाचो .....

.
.

८ एप्रिल २०१४

परी सारख्या मुलीचे `परी' हेच नाव ..
My Little Angel is named "Pari" Happy

.
.

१५ जुलै २०१४

कन्फर्मड्..!!
माझी मुलगी माझ्यावरच गेलीय..
फोटो काढायची अॅक्शन करत, मोबाईल तिच्यासमोर धरायचा अवकाश ..
रडायचे थांबून हसायला सुरुवात Happy

.
.

१९ जुलै २०१४

चार दिन की झिंदगी, चार महिने गुजर गये, तेरे बिना.... जिया जाये ना ..
हॅपी बड्डे फोर मन्थस बेबी परी ..
कम सून Happy

.
.

२१ जुलै २०१४

लंगोट आणि कानटोपी ..
दोघांतील फरक कसा ओळखायचा याचाही आता क्लास लावावा लागणार ..
कठीण आहे !

.
.

२ ऑगस्ट २०१४

एक चांगली बातमी ! एक वाईट बातमी !!
आधी चांगली बातमी - उद्या परी येणार घरी Happy
आता वाईट बातमी - बरोबर बायको सुद्धा येणार Sad
Bachelor Life Over Sad
पण बालपण सुरू Happy

.
.

३ ऑगस्ट २०१४

पाच वर्षांपूर्वी फ्रेंडशिप डे च्या दिवशीच माझी माझ्या बायकोशी ऑर्कुटवर ओळख झाली होती.
आज "फ्रेंडशिप डे" च्या दिवशीच मुलीला पहिल्यांदा घरी नेतोय.
बापलेकीच्या नात्याची सुरुवात करायला यापेक्षा चांगला मुहुर्त असू शकतो का Happy
हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ माय फ्रेंडस !!

.
.

४ ऑगस्ट २०१४

पंधरा मिनिटांची खटपट करुन आज लंगोट बांधायला शिकलो...
फक्त दहा मिनिटे टिकला !
मेहनतीवर पाणी पडने म्हणजे काय माहित होते,
आज सुसू पडणे अनुभवले Wink

.
.

८ ऑगस्ट २०१४

हतबल .. हताश .. हात टेकले !
आजवर मी कित्येकांना चिडवून चिडवून छळले,
आज माझी मुलगी मला छळून छळून चिडवतेय .. Sad

.
.

१० ऑगस्ट २०१४

चार वर्षांपूर्वी गणपतीच्या मिरवणूकीत शेवटचे नाचलेलो,
ते आज पोरीबरोबर नाचलो.
स्टॅमिना पार गंडलाय राव,
तिच्या आधी मी दमलो.
माकडाचा माणूस व्हायला उत्क्रांतीची हजारो वर्षे जावी लागली.
लेकीने मात्र एका दिवसात माणसाचा माकड केला..
तो देखील चावीवाला Happy

.
.

१० ऑगस्ट २०१४

(हे स्टेट्स परीच्या आईचे)

दरवाजे की घंटी ४-५ बार बजाने वाले,
आज कल दबे पाव आने लगे
ऊंची आवाज मे बातें करनेवाले,
अब ईशारोंमे बतियाने लगे
खुदके काम दुसरोंसे करवाने वाले,
अब चुपचाप अपने काम करने लगे
घोडे बेच के सोने वाले,
अब हलकी आंहट पर जागने लगे
घंटो लॅपटॉप मे डूबे,
आजकल उसकी शकल तक देखना भूल गये
तेरी एक हंसी के लिये,
आज ये क्या क्या करने लगे..
माय डीअर परी,
ये तूने क्या किया???
मेरे Lazybone Husband को,
एक Responsible Father बना दिया..
Love U pari Happy
- अस्मिता नाईक

.
.

२६ नोव्हेंबर २०१४

माझी मुलगी माझ्या सिक्स पॅकच्या प्रेमात पडलीय,
हल्ली रोजच माझ्या अंगावर कार्यक्रम उरकते आणि मला बनियान काढायला लावते. Happy

.
.

७ डिसेंबर २०१४

असे म्हणतात, देव आपले संकटांपासून रक्षण करतो..
पण हल्ली बिचार्‍या देवांवरच माझ्या पोरीपासून स्वत:चे रक्षण करायची वेळ आलीय..
देव्हारा वरती न्यायची वेळ झालीय Happy

.
.

३१ जानेवारी २०१५

"जादूची चटई" आजवर केवळ परीकथांमध्येच वाचले होते.
पण हल्ली परीने माझीच जादूची चटई बनवलीय.
तिला उचलून घ्यायचे.. आणि मग ती जिथे बोट करेल, तिथे मुकाट जायचे Happy

.
.

१८ मे २०१५

चुकून नाव परी ठेवले..
शैतान जास्त सूट झाले असते.. Happy

.
.

३१ मे २०१५

जगातली सारी खेळणी एकीकडे आणि आईबापाचा ड्रॉवर उपसण्यातील आनंद एकीकडे...
आधी पाकिटाची जागा बदलावी लागली, मग घड्याळ हलवावे लागले, काल पट्टाही तिथे ठेवायची सोय राहिली नाही.. आता ते ड्रॉवर माझे फक्त नावालाच राहिले आहे. अगदी त्यात बसून खेळते..
सव्वा वर्ष पुर्ण व्हायच्या आतच बापाच्या प्रॉपर्टीवर कब्जा करायला सुरुवात.. स्मार्ट जनरेशन Happy

.
.

६ जून २०१५

परी मागच्या जन्मात बहुतेक चिमणी असावी.
काऊ आणि कब्बू'चे कमालीचे आकर्षण.

राणीच्या बागेत पिंजर्यातील रंगीबेरंगी पक्षी, पंख फडफडवत बिचारे आमच्या एका नजरेसाठी आस लाऊन राहतात,
पण आम्ही मात्र खुल्या फांदीवरच्या कावळ्यांनाच भाव देतो.

समुद्राच्या लाटा हिंदकाळत राहतात, वारा बेभान बागडत सुटतो, क्षितिजावरचा सूर्य लाल तांबड्या रंगांची नुसती उधळण करत असतो, अगदी काव्यमय संध्याकाळ असते.
पण आम्ही तिथेही आकाशातले कावळेच टिपत असतो.

गेले कित्येक वर्षे डॉकयार्ड रेल्वेस्टेशन वरून प्रवास करतोय. पण आजवर कधी माझ्या नजरेस पडले नव्हते. परीने मात्र आज पहिल्याच फटक्यात छ्तावरच्या लोखंडी सांगाड्याच्या बेचकीत लपलेले काऊकब्बू हुडकून काढले, आणि माझ्याबरोबरच प्लॅटफॉर्मवरच्या ईतरही काही अज्ञानी लोकांच्या ज्ञानात भर टाकली ज्यांची नजर रेल्वे ईंडिकेटरच्या वर कधी गेलीच नव्हती Happy

.
.

१३ जुन २०१५

मॉडेल, डान्सर, जिम्नॅस्ट, आणि आता मिमिक्री आर्टिस्ट..
परीच्या करीअरची चिंता नाही, काही ना काहीतरी करेलच पोरगी

.
.

२१ जून २०१५

मुलीला खेळवणारे शेजारीपाजारी, दादा मामा, काका आजोबा, मित्र सवंगडी बरेच असतात..
पण तिने सू सू केल्यावर जो लंगोट बदलतो, तो बाप असतो. Happy
HapPy FatheRs Day 2 all Happy

.
.

१ जुलै २०१५

आजवर कधी घरी आल्यावर माझ्या बायकोने मला साधे पाणी विचारले नाही, पण परी मात्र आल्या आल्या माझ्या पायातले बूट काढायला धावते. बूटांना हात नको लाऊस म्हटल्यावर शू रॅकचा दरवाजा उघडून मला बूट ठेवायला मदत करते. सेवा ईथेच संपत नाही.
त्यानंतर माझे बोट पकडून माझे कपडे बदलायला मला बेडरूमकडे नेते. तिथून आमचा मोर्चा बाथरूमकडे वळतो. मी बाहेर येईपर्यंत माझी वाट बघत दारातच उभी राहते. मला आत उशीर होतोय असे वाटल्यास बाहेरून दरवाज्यावर थडाथड लाथाबुक्के बसतात. कारण....
कारण त्यानंतर तिला माझ्याबरोबर "चहा बिस्किट" खायचे असते..
तो मॉरल ऑफ द स्टोरी.., पोरगी शेवटी आईवरच गेलीय Happy

.
.

७ जुलै २०१५

दोघींचा जन्म जणू काही मला छळायलाच झालाय..
पण आयुष्यात जे काही मनोरंजन आहे ते दोघींमुळेच आहे..
मला लुटणे हा दोघी आपला जन्मसिद्ध हक्क समजतात..
पण सोबत आनंदही अनमोल देऊन जातात..
माझ्याकडून आपले लाड करून घेणे, हट्ट पुरवणे..
कारण नसताना उगाचच चिडणे, उगाचच रडणे..
सरते शेवटी मीच हात जोडून त्यांची समजूत काढणे..
कधी कधी वाटते मला दोन बायका आहेत..
तर कधी वाटते, दोन पोरींना सांभाळतोय..

.
.

१२ जुलै २०१५

शनिवार-रविवारची आंघोळ म्हणजे आमच्यासाठी तासाभराची वनडे पिकनिक असते.
बाथटब म्हणजे स्विमिंग पूल.. शॉवर म्हणजे वॉटरफॉल.. आणि बापाच्या अंगाखांद्यावर बागडणे या झाल्या स्लाईडस..
अगदी पिकनिकला काढतात तसे या सर्वांचे फोटोही घेतले जातात,
फक्त ते ईथे प्रदर्शित करू शकत नाही ईतकेच Happy
बरे, पाण्याची आवड तरी किती..
मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर तो सुद्धा जेवढा तडफडत नसेल तेवढा दंगा आमची जलपरी घालते.
या आधी सुट्टीच्या दिवशी कुठे कामानिमित्त बाहेर जायचे असेल, तर आणि तरच आंघोळ करणारा मी..
अन्यथा आंघोळीलाही सुट्टी देत बिछान्यातच लोळत पडणारा मी..
आणि स्साला त्यातच सुख सुख म्हणजे आणखी काय असते असे म्हणनारा मी..
पण हल्ली माझी देखील सुखाची व्याख्या बदलू लागलीय..
हल्ली मी देखील सुट्टीच्या आंघोळीची वाट बघू लागलोय.

.
.

१४ जुलै २०१५

Quiz Time -
पहिल्याच चेंडूवर विकेट काढणारी भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण?
....
ऊत्तर - परी अ नाईक.
विकेट - आपल्याच बापाची.
अनपेक्षित वेगाने येणार्‍या पहिल्याच चेंडूवर अंदाज पार फसला आणि मी क्लीन बोल्ड!
सारे स्टेडियम तिच्या आईच्या शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून उठले Happy

.
.

१५ जुलै २०१५

लोकांची एबीसीडी शिकण्याची सुरुवात " A for Apple " पासून होते.
आमची " i for ice cream " पासून झाली. Happy

.
.

१६ जुलै २०१५

आम्ही लहान आहोत म्हणून आमचे सर्वांकडून लाड होतात, की आमचा हावरटपणा आमच्या चेहर्यावर दिसून येतो, काही कल्पना नाही.
पण आम्ही मिठाईवाल्याकडे गेलो की न मागता आम्हाला एक पेढा मिळतो.
आम्ही तो संपवतो आणि आणखी एक मागतो. आम्हाला आणखी एक मिळतो.
मेडीकलवाल्याकडे गेलो की चॉकलेट मिळते, मॅकडोनाल्डवाला आईसक्रीम देतो.
हारवाला देखील काही नाही तर एक फूल हातात चिपकवतो.
आम्ही ते देखील तोंडात घालतो.
परवा नाक्यावर सहजच उभे असताना जवळच्या अंडेवाल्याने उकडलेले अंडे ऑफर केले.. आणि मला हसावे की रडावे समजेनासे झाले .. Happy

.
.

१७ जुलै २०१५

जंगलचा राजा सिंह असेल, पण आमच्यासाठी मात्र तो वाघ आहे.
कारण आमची लायनपरी फक्त तोंडातल्या तोंडात गुरगुरते,
आणि टायगरपरी मात्र सिंघम स्टाईलमध्ये पंजा दाखवत, तोंडाचा आ करून डरकाळी फोडते.

.
.

१८ जुलै २०१५

डेलीसोप मालिका कितीही रटाळ का असेनात, जोपर्यंत त्यांचे टायटल सॉंग हिट आहेत आणि परी त्यावर नाचतेय तोपर्यंत आमच्याघरी त्यांचे स्वागतच आहे.
सध्याची टॉप 3 लिस्ट आहे -
१. दिल दोस्ती दुनियादारी
२. जय मल्हार
३. होणार सून मी या घरची Happy

...........................
- तुमचा अभिषेक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं गोड लिहीलं आहे. सगळा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला Happy

परीला सव्वा वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. परी आल्यापासून तुमचे माबोवर लिहीणेही कमी झाले आहे, हे आमच्या लक्षात आले आहे. : P

soo cute

लहानपण दे गा देवा .
मुंगी साखरेचा रवा.

.....

अआमची मुलगी म्हणते .. बाब्या ते असे पाहिजे..

लहानपण दे गा देवा .
मुलगी साखरेचा रवा..

Happy

सर्व प्रतिसाद Happy

दिनेशदा, हो नक्की यापुढेही चालू राहीलच Happy

प्राची, हो खरेय. माझ्या लिखाणाची मेथेडॉलॉजी गंडलीय खरे. पहिल्यासारखे सुचले की ईतर सारी कामे सोडून डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावून लिहिणे आता शक्य नाही होत. पण प्रायोरिटीज क्लीअर आहेत Happy

ललितशिंदे, मुलगी साखरेचा रवा Happy

निधी, धन्यवाद, तिच्या आजोबांनी सुचवलेले नाव आहे, सूटही होतेच तिला ..

छान लिहिले आहे...
परी च्या आईची कविता ही छान आहे.. लहान बाळाच्या येण्याने आई वडिलांच्या जीवनात कित्ती बदल होतात नै? ते सर्व छानच टिपले आहेत.. खूप मस्त!!
परी नाव खूप गोड आहे!
पुढेही असेच लिहित रहा..

Pages