आम्हीच करु .....आमचा विकास!

Submitted by यदु on 16 July, 2015 - 05:08

मी मायबोली वर बहुदा पहील्यादाच लिहत आहे...मात्र मूक वाचक म्हणून जुनाच....खाली लिहत असलेल्या लिखाणात मी हा कुठेच नसुन फक्त आम्ही आणि आम्हीच आहोत... मी फक्त गेल्या ३ महीन्यापासुन सुरु असलेल्या या कामात सोशियल अप वर जे काही तोडके मोडके शब्द पकडुन जे काही लिहन्याचे शिकलो आहे.... तेवढाच माझा संबध...........

इतर गावा सारख्या असख्य समस्या सोबत बेरोजगारी, शिक्षणा विषयी अनास्था, जुगार, अशा भरपूर समस्यानी ग्रासलेल आमचे ही गाव आहे. याच गावाच्या जिल्हा परीषदे च्या शालेत शिकलेलो आम्ही बरेचसे लोक नोकरी धंद्या साठी इतरत्र स्थायीक झालो. काही कालानंतर वाट्स सारख्या सोसियल अप मध्ये विनोद, थिल्लरपणा करत एकमेकाची टर उड़वत एकत्र आलो. गाव खेड्यात तर वाट्स अप/ फेसबुक म्हणजे रीकामटेकड्या लोकांचे बोटांना व्यायम देणारे उपकरण!!!

तर याच उपकरणा तल्या वाट्स अप सारख्या सोसियल अप वर आम्ही 'पातोंडा परिसर विकास मंच' नावाचा गृप बनवून गावासाठी काही उपयुक्त, शैक्षणीक काहीतरी करण्याच्या उद्देशाने एक एकाला जोड़त गेलो, प्रत्येक गोष्ट शासन च करेल आणि आपण त्यावरच विसबुन राहु हे काही खरे नाही हे माडत गेलो... भरमसाठ चर्चा रंगायाला लागल्या गावाशी आस ठेवणारे ..मातीशी नाळ जोडलेल्याना आमच्या आव्हनात प्रत्येकात स्व:त मध्ये असलेली अंतरीक जाणीव उमजायला लागली ...राज्य व् केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा साठी आमच्या गावातील मुलांनी सज्ज व्हावे या उद्देशाने एक छान वातावरण असलेली सर्व सुविधासहीत स्पर्धा परिक्षा साठी अभ्यासिका उभारण्याचे आम्ही ठरवले. सुरवात अभ्यासिकेचे नाव काय असावे, लोगो कसा असावा असे विषय चर्चेत घेत प्रवास सुरु झाला. गावात एक मंदीर असून महाराष्ट्रात जेव्हा शिक्षणाची गंगा गावोगावी पोहचत होती त्या कालात आमच्या पुर्वजानी मंदीराच्या वर दोन खोल्या बाधून त्या ठीकाणी शाळा सुरु केलेली. आता मात्र ही जागा आणि या खोल्या खंगायाला लागल्या होत्या ही वास्तु जीर्ण होत चाललेली. आम्हीही मग याच जागॆवर अभ्यासित लागणारे साहित्य..गरजेचे पुस्तके , या खोल्याना डागडुजी, रंग रागोटी करायला लागणारा खर्च असे माडत एक एक पाऊल पुढे टाकत गेलो. महीण्याला प्रत्येकाने शंभर रुपये म्हणजे वार्षिक बाराशे रुपये जमा करण्याचे आव्हान केले गेले. गावातूनच सरकारच्या दरबारी अड़मीनीस्ट्रेटीव खात्यात काम करणाऱ्यानी पुढाकार घेतलेला बघून विश्वासाचे वातावरण तयार होत गेले ...खारीच्या वाट्याने प्रत्येकाने हातभार लावायला सुरवात केली. सुशिक्षीत सधन..गावाविषयी आस्था बाळगाणारे ..सुरवात खारीच्या वाट्याने करत कधी सिंहाच्यागतीने काम करायला लागली हेच कळाले नाही.
गावातील होतकरुच्या अपार कष्टाने ...वाट्स अप जिवंत जागृत ठेवत ..कामात सातत्यता राखत .... वेळोवेळी मदतीचे आव्हान करत एक एक पल्ला पार करत गेलो...राज्यात/ परराज्यात /विदेशात गावातील असलेल्याना शोधात गेलो, ज्यानी गाव सोडून वीस बावीस वर्षे झाली त्यानाही मुख्य धारेत ओढ़त गेलो... कुठून काही मदत मिळते का याची चाचपणी करत राहीलो.

आलेल्या समस्यावर मार्ग काढत तीन महीण्याच्या या अथक परीश्रमातुन ....नुकताच आम्ही ५ जुलै २०१५ रविवारी रोजी ....१०० झाडांचे गावालगताच्या रस्त्यात वृक्ष रोपण करून युवा जागर अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा तालुका जिल्हा पाताळी वरीलमान्यवाराच्या हातून पार पाडला. सतत येत असणारे उत्सव..जयंत्या..भंडारे...गावात अधे मधे येणारे राजकारणी च्या व्यतिरीक्त वेगळा स्वरूपाचा कार्यक्रम गावाकऱ्यानी बघितला.

मित्रानो, आनंद होतोय..काहीतरी केल्याचे समाधान आज मिळाले..हा सोहळयात सहभागी होता आले...एका जीर्ण होत चाललेल्या वास्तुत आम्ही परत जिव ओतल्याचॆ सुख आज मिळाले. या अंतर जाळ्याच्या माध्यमातुन वाट्स अप सारख्या अस्त्र चा आज सद उपोयोग केल्याने मन भरुन आले आहे. गावात असलेल्या समस्यावर आशादायी वातावर निर्माण करण्याचे सौख्य आज लाभले!!!!

आम्ही पातोंडे कर!!!

खाली काही क्षण चित्रे देतोय आणि दुरुस्त केलेल्या जागेचे आजचे बदलेले रुप.

1433248973757.jpg

आम्ही कधी काळी याच वर्गात बसुन पाठ केलेली बाराखडी.

1433248973911.jpg
हा आमच्या मंच चा लोगो.

1437018583135.jpg1435853931951.jpg

आताचे बदलेले रुप

1435387643196.jpg

आम्ही स्वःता बनवलेली आमत्रण पत्रिका

1436110334057.jpg

कार्यक्रमाची उपस्थीती

1437018457892.jpg

ही आजची परीस्थीती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरचं छान उपक्रम!!!

पण लेख थोडा वाढवला पाहिजे होता. गावांकडे बहुदा राज्य व् केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा सर्वांना माहित असतात. इथे शहरात त्यांची तेव्हढी दखल कोणी घेताना दिसत नाही. कदाचित माहितीचा अभाव ... म्हणुनच अश्या लेखांतून थोडी माहिती दिली जावी.

राज्य व् केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा साठी आमच्या गावातील मुलांनी सज्ज व्हावे या उद्देशाने एक छान वातावरण असलेली सर्व सुविधासहीत स्पर्धा परिक्षा साठी अभ्यासिका उभारण्याचे आम्ही ठरवले.>>>
फक्त अभ्यासिका नि सर्व सुविधासहीत स्पर्धा परिक्षा साठी अभ्यासिका यांतील फरक जाणून घ्यायचा आहे.

आणि हो आम्हीच करु .....आमचा विकास! हा दृष्टिकोण आवडला.

संदीप आहेर जी!

सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे यात..लोकसेवा, राज्यसेवा, Staff Salection, UPSC, Banking, Railway Board, CSAT व इतर राज्य व केन्द्राकडुन घेतल्या जाण्यार्या विविध परीक्षा येतील. यात गावातील व परीसरातील कोणताही मुलगा निशु:ल्क अभ्यास करायला येऊ शकतो.

सोयी म्हणजे एकंदरीत अभ्यासपुर्ण वातावरण तयार ठेवत अभ्यासिकेत येणार्‍या मुलांच्या गरजेनुसार त्याना आवश्यक त्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. आठ्वड्यात परीसरातील या परीक्षामध्ये उतीर्ण झालेल्या व या क्षेत्रात मार्गदर्शन करु शकतील अश्या व्यक्ती कडुन मार्गदर्शन घ्यावयाचे आहे.

सध्या तरी सर्व प्रकारच्या पुस्तकांची जमवा जमव सुरु असुन अभ्यासिकेत CSR , लोकराज्य, योजना आणि क्रुक्षेत्र ही मासिके साठी आपणाला डोनर मिळाले असुन या व्यतिरीक्त विविध प्रश्न संच, Competition Science Vision Civil Services Times, Competition Master,Chronicle, स्ट्डी सर्कल चे मासिके साठी डोनर शोधत आहोत.

तसेच ........साहसकथा, थरारकथा, गुप्तहेरकथा, थ्रिलर्स, विज्ञान-साहित्य, एव्हरेस्ट वा तत्सम साहसी मोहिमांविषयीची पुस्तकं, चित्रपट, आत्मचरीत्र या पुस्तके मिळाली तर वातावरण तयार होऊ शकते. रोजच्या घडामोडी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय-सामाजिक घडामोडी यासरखी बौध्दीक खाद्य पुरवणारी सर्व प्रकारची पुस्तके हवी आहेत.

या व्यतिरीक्त घरातली जुनी किंवा नवीन पुस्तकं देणगी म्हणून मिळू शकतील का? पुस्तकांना विषयाचं, किंवा वयोगटाचं बंधन नसुन 'लोकप्रभा', 'सा. सकाळ', 'अनुभव', 'माहेर', 'मेनका', 'तनिष्का', 'चित्रलेखा' अशा मासिकांची वर्गणी भरून ही मासिकं अभ्यासिकेत नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येते का त्याची लगबघ सुरु आहे..

आम्हीच करु .....आमचा विकास! हा दृष्टिकोन खुप आवडला.

तुम्हाला पुढच्या कामासाठी खुप खुप शुभेच्छा.

पुस्तक देणगीसाठी तुम्ही आवाहन केलेले आहे. तर तुम्हाला पुस्तके वगैरे पाठवायची असल्यास कुठल्या पत्त्यावर पाठवावी किंवा कशी पाठवावी यासंबंधी माहिती दिलीत तर उपयोग होईल.

ज्याना कुणाला पुस्तके द्याययाची असतील ते खालील दिलेल्या पत्यावर पाठ्वु शकतात कीवा खाली माझा मोबाईल नंबर देत आहेत. तुम्ही जर मुंबई-पुण्या सारख्या शहरात राहत असाल तर गावातील कुणी व्यक्ती आसपासच्या परीसरात असेल त्याकडुन आम्ही हातोहात अभ्यासिकेत पोहचते करु.

पत्ता:- पातोंडा परीसर विकास मंच
युवा जागर अभ्यासिका, मु.पो. पातोंडा,
ता:- अमळनेर, जि. जळगाव
पिनः- ४२५४०१

मोबाईल नंबरः- ९९८७५४७३६५

व्वा फारच छान उपक्र्म! प्र्त्येक गावात हे व्हायला हवे.

मी हा कुठेच नसुन फक्त आम्ही आणि आम्हीच आहोत...>>> +१

अतिशय उत्तम उपक्रम. शासनाच्या मदतीचिवाय तुम्ही शाळेचा विकास करताय, तसाच शेतीचाही विकास कराल, ही लहानशी अपेक्षा.

आम्हीच करु .....आमचा विकास! हा दृष्टिकोन खुप आवडला.

तुम्हाला पुढच्या कामासाठी खुप खुप शुभेच्छा. >>>>+१०००००००००००००

आमचा उपक्रम इथे मांडू दिल्याबद्दल व कौतुक केल्याबद्दल सर्वाचे मनापासुन धन्यवाद!!

आणि इथल्या लिखाणावर विश्वास ठेवत आभ्यासिकेत लागणार्‍या पुस्तकासाठी मदत करणार्‍या मायबोली सदस्याचे मनपुर्वक धन्यवाद!!!

पिंगु जी........ पुढचा उपक्रम निश्चीत शेती ला पुरक असाच असेल.

गावातील व परीसरातील जलसंधारण व जमीनीतील पाण्याची पातळी वाढवणे हाच आहे.