ऑल अबाऊट होस्टेल लाइफ

Submitted by मुग्धा केदार on 13 July, 2015 - 06:53

हॉस्टेल लाईफ़ मध्ये केलेली मज्जा, मस्ती, धमाल सगळ्यांच्या आयुष्यभर आठवणीत असते...
मी ७ वर्ष होस्टेलला राहिले, खुप अनुभव, खुप मैत्रीणी, त्यांच्याबरोबर घालवलेले सुख दु:खांचे मौज मजेचे दिवस, अभ्यासासाठी आणि अभ्यास नसतानाही केलेली जागरणं, हे दिवस आजही पुन्हा जगवेसे वाटतात. आता पुन्हा ते अनुभवणं शक्य नाही होणार कदाचित पण आठवणींचा आनंद नक्की घेता येइल.
चला इथे शेअर करुया होस्टेल लाईफ़ चे किस्से, मज्जामस्ती, सुपीक डोक्यातुन निघालेल्या कल्पना, केवळ उदरभरणम या हेतुने साकारलेल्या अफ़लातुन रेसिपी... ऑल अबाऊट होस्टेल लाइफ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात मीच करते
मी होस्टेल ला नुकतीच रहायला गेले होते, होस्टेलची मेस सुध्दा चालु झाली नव्हती, अचानक मध्यरात्री पॅसेज मधे भांडी आपटल्यासारखा आवाज यायला लागला, सगळ्या मुली चांगल्याच घाबरल्या पण रुमच्या बाहेर येउन बघायची कोणाचीही हिंमत होत नव्हती मधेच आवाज थांबायचा नंतर परत चालू, शेवटी पहाटे वॉचामन आल्यावर सगळं समजलं
त्यावेळी १-२ रुममधल्या मुली दुध आणुन मेसमध्ये फ़क्त चहा करायच्या, भांडी फ़ारशी नव्हती, त्या तांब्यामधे दुध ठेवत. एका रात्री त्या तांब्यामधे बोक्याने दुध प्यायला तोंड घातलं आणि ते अडकलं त्यामुळे तो पॅसेज मध्ये धावत होता, दमला की थांबत होता. शेवटी तो तांब्या कट करुन काढावा लागला आणि त्याची गोल रिन्ग त्याच्या मानेत तशीच राहीली.
आमची मात्र सकाळी हसूनहसून वाट लागली.

चांगला आहे हा धागा फ़क्त इथे पोरे काही बोलतील का नाही ही शंका आहे! कारण पोरांचे हॉस्टेल अनुभव सुसंस्कृत प्रकारात मोडत नाहीत (९९.९९%) अन त्याचे संस्करण करून सांगायचे झाल्यास त्यात काय मजाच उरत नाही

बोक्या बद्दल वाचुन हसून वाट लागली.:हहगलो: मला काही होस्टेलचा अनूभव नाही कारण कॉलेज जवळच होते. पण त्या अनूभवान्विषयी वाचायला आवडेल.

संस्कृत, असंस्कृत वगैरे काही नाही. सगळे त्या वयानुसार असते.
मी कॉलेजच्या पहिल्या तीन वर्षात घरीच रहात होतो. शेवटल्या वर्षी गंमत म्हणून हॉस्टेलमधे रहायला गेलो. पहिल्या दिवशी जेवायला गेल्या गेल्या सगळ्यांनी ओरडा सुरु केला, कांदा आणा, प्याज लाव! मी म्हंटले भाजी कुठली आहे, चव काय ते तरी बघा आधी. मुले म्हणाली, अरे ही होस्टेलची भाजी, कशाची केली आहे कळणार नाही, चव बेक्कार. भरपूर कांदा घालूनच खाववते!

माझ्या होस्टेलचे मॅनेजमेंट तेव्हा फडतूस प्रकारचे होते, अगदी रुममधल्या दोन ट्युबलाईटपैकी एक कायम बंद असायची त्याचा राग मनात धरुन आम्ही एका रात्री सर्व रेक्टर कॉर्टर्सच्या व्हरांड्यातईल ट्युबलाईट चोरल्या आणि आमच्या रुममध्ये लावल्या . ही मोहीम आम्ही ४ जणांनी गनिमीकाव्याने फत्ते केली. त्यातील दोन ट्युबलाईट काढण्यासाठी त्यावरची जाळी स्क्रूड्राईव्हरने उघडली ,पावलांचा आवाज होवू नये म्हणून अनवाणी गेलो मोहीमेवर . कुणाला सापडलो नाही हे महत्वाचे नाहीतर आमचे काय झाले असते ते सांगायलाच नको.

व्वा! डिग्री कशात मिळाली? चोरी करण्यात?
स्वतंत्र धंदा सुरु केला आहात की अशी कुठली कंपनी आहे जी अश्या लोकांना नोकर्‍या देते?

Light 1 Happy

झक्की तुमच्या अमेरिकेत सायबर चोर्‍या करणार्‍यांनाच कोतवालाच्या नोकर्‍या देणार्‍या आयटी कंपन्या आहेत की. कशाला दिवे देऊन चिमटे काढत आहात?
होस्टेल मधे एका ठिकाणचा काढून दिवा दुसरीकडे लावला त्यांनी. चोरुन विकून खाल्ला नाही काही. आता यावरून चोरी करण्यात डिग्री पर्यंत पोहोचणे म्हणजे हद्द झाली.

नंदिनी जी , पोरांचे सुसंस्कृत अनुभव नसतात ह्याचा अर्थ आपण पोरींचे असतात ऐसा घेतलेला दिसतोय, मला तसे काही म्हणायचे नव्हते Happy

पोरींचे हॉस्टेल अनुभव सुसंस्कृत असतात ही एक अंधश्रद्धा आहे.>> Lol
हो अ‍ॅक्चुअली. मी सुद्धा आधी या अंधश्रद्धेचा बळी होतो.
पण शिक्षणानिमित्त एक वर्ष मित्रांसमवेत पीजी राहिलोय आणि शेजारच्या बंगल्यात ४ पीजी म्हणूनच राहणार्‍या पोरी.. ज्यांनी माझे अंधश्रद्धा निर्मूलन करून टाकले Wink