वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?

Submitted by विशाल कुलकर्णी on 2 July, 2015 - 04:46

फसवले काळासही मधुमास होते भोगले
जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले

राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला
जानकीने का इथे वनवास होते भोगले ?

दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना
सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले

पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी
प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले

रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली
यार, फसलेले किती अदमास होते भोगले

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?
स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले

विशाल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली
यार, फसलेले किती अदमास होते भोगले<<< बोलका शेर!

इतर शेर अजून प्रभावी होऊ शकले असते असे वाटले.

सुंदर