रोजच्या पिण्याचे पाणी

Submitted by मामी on 8 May, 2011 - 10:48

रोजच्या पिण्याच्या पाण्याकरता RO technology वापरणारा वॉटर फिल्टर सर्वात उत्तम ठरू शकतो का? या टेक्नॉलॉजीचा वापर करणार्‍या कंपन्या - Eureka Forbes आणि Kent - सांगतात की, यामुळे पाण्यातले जवळ जवळ सर्व नैसर्गिक क्षार गाळून पाणी मिळते. पण जे अगदी आवश्यक क्षार आहेत ते मात्र पाण्यात राहतात. हे खरे आहे का? की केवळ मार्केटिंग गिमिक? असे पाणी दीर्घ काळाकरता वापरल्यास काही अपाय किंवा शरीराला क्षार न मिळणे असं काही होतं का? नविन वॉटर फिल्टर घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे निर्णय घेण्यास मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन वॉटर फिल्टर घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे निर्णय घेण्यास मदत होईल. >>
आमचा Eureka Forbes चा वॊटर फिल्टर आहे. एक्वागार्ड. आय नोव्हा.
खुप चांगल प्रोडक्ट आहे. Company has long history ( as per their website). Their products are very high quality. पाणी खुप छान शुद्ध करतो.
But their CUSTOMER SERVICE IS VERY VERY VERY POOR.
BEWARE of their service persons, service providing franchise and their call center.

सुरुवातीला त्यांचा माणुस एक वर्षाचे पुर्ण पैसे घेउन जायचा ज्यामधे दर तीन महीन्यंनी candle रिप्लेसमेंट आणी साफसफाई समाविष्टा होती - आणि मग तो एक वर्षांनीच उगवायचा. त्याने कधीच ती तीन महीन्यांची सेर्वीस दीली नाही. दर वेळेला त्याला फोन करून बोलवाव लागायच. मग तो वर्षातून एक-दोनदाच यायचा. Each time he replaced the old candle with new one, he took the old candles with him despite our resistance. He told that its necessary and we need to show it to company. Initially he took it, as it is but as we started to resist more he then started to break those candle in front of us and told that now since its broken you can trust me that I will not use this candle in someone else's aquaguard.

नंतर एक्वागार्ड काही कारणामुळे खराब झाले ते तसच पडुन होत बरेच महीने. नंतर ते दुरुस्त करण्यासाठी आणि maintenance contract renew करण्यासाठी Eureka Forbes च्या कॊल सेंटर ला फोन केला (माझ्याकडे अजूनही 'त्या' कॊलचा रजिस्टर नंबर आहे) आणि त्यांनी एक नवीन माणुस पाठवला. (आधिच्याने ही कंपनी सोडून गेला होता). त्याने सर्कीट बदलावे लागेल असे सांगीतले. त्याचा खर्च ₹ ४००/- सांगीतले. आम्ही सांगीतल ठीक आहे दे बदलून. मग तो म्हणाला की आत्ता या क्षणी नवीन सर्कीटा माझ्याकडे नाहिये मी उद्या घेउन येतो. मी म्हटल बर. आणि तो आमच जुन खराब झालेल सर्कीट घेउन जायला लागला. मी विचारल तर म्हणाला की "ते आम्हाला कंपनीत दाखवाव लागत. आणि जर तुम्हाला हे जुन सर्कीट मला द्यायच नसेल तर नव्या सर्कीटचे ₹ ४०० ऐवजी ₹ १,२०० /- होतील." आणि मग तुमच्या साठी मी ४०० रु किंमत सांगीतल, पण मार्कॆट मधे कशी किंअत १,००० च्या वर आहे हे मला सांगायला लागला. तो फसवतॊये हे सरळ दिसत होत. तरी मी म्हटल तू उद्या नवीन सर्किट घेउन तर ये मी विचार करून उद्या सांगतो.

दुसर्या दिवशी तो अला आणि नवीन सर्कीट बसवल तरी एक्वागार्ड चालू होत नव्हत. मग तो म्हणाला की aquaguard सर्वीस सेंटर मधे न्याव लागेल. आम्ही त्याला बजावून कबूल करून घेतल की दो बरॊबर दॊन दिवसात ते दुरुस्त करून आणुन देइल. तो हो म्हणाला. पण ४-५ दिवस् झाले तरी त्याचा पत्ता नव्हता. रोज काही ना काहीतरी कारण. मग परत Eureka Forbes च्या कॊल सेटर ला फोन केला. That lady first listened to me, then told me to hold - here she was asking her boss what to reply and then she came on line and said - हा आमचा माणुसच नाही. या सर्वीस प्रोवायडरशी आमचा काहीही संबंधा नाही.
Then I said, ok, this is not your authorised service provider now I am going to courst against this service provider they are using your name, and misleading customer, what stand you are going to take? She told me they can't do anything in this. They have nothihg to do with this.
Then I called to that franchise service provider from where that person came, and scolded him on phone, talked harshly and then within 30 minitues that person came to return our aquaguard.
जर हा तुमचा माणुस नाही, या सर्वीस प्रोवायडर कंपनीला तुम्ही ओळखत नाही तर मग मी EUREKA FORBES च्या कॊल सेंतर मधे फोन केल्यानंतर् हा मानूस माझ्या घरी कसा आला?
नंतर आमचे हात दगडाखाली अडकलेले असल्याने अम्हाला त्यला ते जुन सर्कीट द्याव लागल. तो आता त्यच्यामदे नवीन IC टाकुन की जी 50-100 रुपयाला मिळते आमच ते जून सर्कीट दुसर्या कोणालातरी ४०० रुपयामधे विकनार.

त्यांच्या वेबसाइटवर आलेला माणुस त्यांचास असल्याची खात्री पटावणारी सोय आहे हे मला नंतर कळल. तुम्ही त्या सोयीच नक्की फायदा घ्या. आलेल्या माणसाकडे ID मागा. त्याव्ह्यावरच नंबर कोल सेंटर वाल्या बयेला सांगा मग ती सांगेल की तो त्यांचाच authorised माणुस आणि authorised service providing franchise आहे की नाही ते.

And they are going to take candles and parts of your aqua guard 'owned' by you. And they will sale it to others. This is third class customer service. Everyone in there is corrupted.
BEWARE!

-
आपलाच,
Eureka Forbes च शुद्ध थंड पाणी पिउन पोळलेला ग्राहक.

धन्स अभिजित, खुप उपयोगी माहिती आहे ही. आम्हालाही त्यांच्या कस्टमर सर्व्हीसचा चांगला अनुभव नाही.

रोजच्या पिण्याच्या पाण्याकरता

रोजच्या पिण्याच्या पाण्याकरता RO technology वापरणारा वॉटर फिल्टर सर्वात उत्तम ठरू शकतो का? >>>
या काही नेट वर सापडलेल्या लिंक्स :-
Rolling revision of the WHO Guidelines for drinking-water quality
www.who.int/water_sanitation_health/dwq/nutdemineralized.pdf

Reverse Osmosis Water Filter Guide - Truth, Lies, Minerals & Your Health
http://knol.google.com/k/reverse-osmosis-water-filter-guide-truth-lies-m...

The Dangers Of Distilled And Reverse Osmosis (RO) Water
http://www.snyderhealth.com/water_ionizers/distilled_and_reverse_osmosis...

Health effects of Reverse Osmosis Water
http://truthofwater.com/answers/2008/12/01/health-effects-of-reverse-osm...

Gastrointestinal health effects associated with the consumption of drinking water produced by point-of-use domestic reverse-osmosis filtration units.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC182827/

मामी..
चांगला प्रश्न आहे..

माझाही एक प्रश्न आहे

अ‍ॅक्टीव्हेटेड कार्बन ने पाणी शुद्ध होतं हा दावा करून याच कंपनीने भारतात बरेचसे फिल्टर्स विकलेत. अ‍ॅक्टीव्हेटेड कार्बन ने पाणी कसं शुद्ध होतं याचं आयसओ / जेसएस / ड्ब्ल्यूएचओ / बीएस / अ‍ॅश्रे स्पेसिफिकेशन किंवा हॅण्डबुक मधे विवरण आहे का ? हे प्रॉडक्ट्स विकणा-या कंपन्यांचे दावे आपल्या जागी.. पण कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा जर्नलमधे असा दावा केला आहे का ?

आपली जुनी पद्धतच बेष्ट.. गा़ळुन, उकळुन थंड केलेले पाणी. मी स्वतः तेही पीत नाही. बाटली नळाच्या पाण्याने भरुन घ्यायची आणि फ्रीजात टाकायची. थंड पाण्यात जंतु मरत असावेत ( अजुनही मी ठणठणीत आहे यावरुन वाटतय)

धन्यवाद अभिजीत नवले. बघते त्या लिंक्स वाचून.

युरेका फोर्ब्ज बद्दल डिटेलमध्ये सांगितल्याबद्दलही धन्यवाद. ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

भ्रमर, Proud

माझ्याकडे उलटी समस्या असावी. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात आमच्याकडे ९०% पाणी टँकरचे होते. ( आमची सोसायटी = ५०० लिकांचे गाव ) अजूनही पाणी पिताना चव वेगळी कळते.
काहींनी टेस्ट केली त्यानुसार आवश्यक असलेल्याच्या दुप्पट क्षार पाण्यात आहेत. असे कळते की अ‍ॅक्वागार्ड ( नोव्हातूनही) क्षार गाळले जात नाहीत. आमच्याकडे सगळ्यांची केस गळण्याची तक्रार सुरू झालेली आहेच. काहींना ( मलाही) किडनी स्टोनचा अचानक त्रास झाला.
या सर्वातून पाण्यातील क्षार कमी करण्यासाठी काय करावे याचे कोणी मार्गदर्शन करू शकेल का? पाणी उकळवण्यातून क्षारांचे प्रमाण कमी होईल ? गाळुन घ्यावे का? की तुरटी फिरवावी? प्लिज मदत करा. धन्यवाद !

चांगला धागा..पिण्यायोग्य पाणी हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे
जड पाणी, हलके पाणी, पाण्यात विरघळलेले क्षार, क्षारांचा शरीरावर होणारा परिणाम, पाणी पिण्यायोग्य करण्याच्या कमी खर्चिक पद्धती, यावर मार्गदर्शन करा.

विरघळलेले क्षार वेगळे करणे कठीण असावे. उकळले तर क्षाराचे प्रमाण आणखी वाढणार, तूरटीने फक्त अविद्राव्य घटक खाली बसतात ( शिवाय क्षार वाढतातच ) बाकिच्या उपकरणांनी, जिवंत बॅक्टेरिया वेगळे होणार. क्षाराचे काय ?

आमच्याकडेही सद्ध्या बोअरचं पाणी आहे. ते अ‍ॅक्वागार्डमध्ये फिल्टर करून त्यानंतर उकळून वापरतोय आम्ही. उकळल्यावर खाली थोडा साका जमतो, आणि वरही एक तवंगासारख थर असतो, तेवढं काढून टाकून मधलं पाणी वापरतोय. याने क्षार कमी होत असतील का?

दिनेशदा मलाही हेच वाटतय. क्षार कमी कसे करावेत हे खुप शोधुन नीट कळत नाहीये. म्हणुनच इथे विचारले.खरच कोणी तरी प्लिज मदत करा.

दिनेशदा मलाही हेच वाटतय. क्षार कमी कसे करावेत हे खुप शोधुन नीट कळत नाहीये. म्हणुनच इथे विचारले.खरच कोणी तरी प्लिज मदत करा.

अवल, आमचे पुण्यात ज्या सोसायटीत घर आहे त्या सोसायटीने वॉटर सॉफ्टनर बसवून घेतला आहे. कारण हेच की बोअरिंगचे पाणीच जास्त वापरले जाते आणि त्यात फार जास्त क्षार असतात. अर्थात हा सामूहिकरित्या करायचा उपाय आहे त्यामुळे सगळ्यांची मोट वळणे कठीण काम आहे. मोठी सोसायटी असेल तर प्रत्येक घरामागे तुलनेने कमी खर्च येईल ( आम्हाला बहुतेक हजार-दीडहजार आला होता. नीट आठवत नाही. )

दुसरा उपाय जो आम्ही अमेरिकेत आणि युकेतही करतो तो म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी ब्रिटा वॉटर फिल्टर आणायचे. असे दिसतात. ते जंतू मारत नाहीत. फक्त ( क्षार जास्त असलेले ) मचूळ पाणी अगदी गोड चवीचे, पिण्यायोग्य होते.
पण हे फिल्टर्स दर दोन महिन्यांनी बदला अशी कंपनीची सूचना असते. आम्ही एकदा बरेच महिने बदलायचे विसरुन गेलो होतो तरी पाण्याच्या चवीत काहीच फरक पडला नव्हता. पण एरवी बॅक्टेरियल ग्रोथ होऊन पाणी खराब होऊ नये म्हणून बदलतोच. जर भारतात मिळत नसतील तर इथल्या कुणाकडून दरवर्षी सहा मागवावे लागतील Happy शिवाय पिण्याच्या पाण्याची चव बदलेल पण केस गळण्याचा प्रश्न तसाच राहील कारण एवढे सगळे पाणी फिल्टर करुन घेता येणार नाही.

ग्रेट. आत्ता सहज शोधून पाहिले तर ब्रिटा फिल्टर्स भारतातही आलेले दिसत आहेत. ही त्यांची वेबसाईट. फक्त आपल्याकडे नळाचे पाणी सहसा कुणी तसेच पित नसल्याने त्यांनी बरीच प्रॉडक्ट्स आणलेली दिसत आहेत. पाण्यातले क्षार कमी करण्यासाठी असलेला फिल्टर बघून घ्या Happy

मागे कधीतरी मायबोली आयडी परागनं त्याच्या भावाच्या वॉटरफिल्टरिंग युनिट्सच्या व्यवसायाबाबत माहिती दिली होती. (बहुतेक इंडस्ट्रीजसाठीचे युनिट्स). त्याला संपर्क करून घरांसाठी काय उपलब्ध आहे हे विचारता येईल.

जी मोठी शहरे आहेत (पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, इ.) तिथे म्युन्सिपाल्टीची वॉटर प्युरिफिकेशन्सची मोठ मोठी केंद्रे असतात. या ठिकाणी पाण्याच्या क्षारांचे प्रमाण ठरवणे इथपासून क्लोरिनेशन (जे बॅक्टेरिया, व्हायरस यांचे नियंत्रण करते) वगैरे सर्व गोष्टींची व्यवस्थित दखल घेत असतात. यामुळेच अशा सुसज्ज यंत्रणेतून येणारे पाणी जसेच्या तसे पिण्यायोग्यच असते (कुठलाही वॉटर प्युरिफायर वापरायची गरजच नसते).

क्षार संपूर्णपणे काढलेले पाणी आपण पिऊ शकणार नाही, त्याची गरजही नसते. अतिक्षार असलेले पाणी पिण्यायोग्य नसते. क्षाराचे प्रमाण टेस्ट करणार्‍या अनेक लॅब्ज आहेत - त्यांच्याकडे जाऊन कोणीही हे करु शकेल. (शहरात याची गरज नाही) ज्या ठिकाणी बोअरचे/ विहीरीचे वगैरे पाणी पिण्यासाठी वापरत असतील त्यांनी हे क्षार टेस्ट करुन तज्ज्ञांच्या सल्ल्याने आयन एक्स्चेंज रेझिन्स वापरुन ते क्षार नियंत्रण करणे गरजेचे आहे. तीच गोष्ट - फिल्ट्रेशन युनिट्सची - तज्ज्ञांचा सल्ला.

शहरात जे पाणी येते त्यात प्रचंड क्लोरिन वापरलेला असतो -त्यामुळे हे पाणी, परत निर्जंतुक करणे (फिल्टर व उकळणे) याला काहीही अर्थ नाही. जेव्हा हे पाणी साठवण्यात येते (घरात, अंडर ग्राऊंड/ ओव्हरहेड टाक्यांमधे) तेव्हा खरा प्रश्न येतो. पण वारंवार टाक्यांची निगराणी राखणे, त्या स्वच्छ ठेवणे हा यावरचा साधा उपाय आहे.

पुणे शहरातील - वॉटर फिल्टर वापरणार्‍या लोकांचे आरोग्य व साधे नळाचे पाणी वापरणारे लोकांचे आरोग्य असा सर्व्हे मला वाटतं डॉ मिलिंद वाटवे (पुणे) यांनी त्यांच्या काही विद्यार्थ्यांकरवी केलेला होता -त्याचा निष्कर्ष -साधे नळाचे पाणी वापरणारे लोकांचे आरोग्य जास्त चांगले असा होता.

अर्थात आपण घरात पाणी ज्या भांड्यात, माठात, पिंपात साठवतो ते सर्व व्यवस्थित स्वच्छ ठेवणे याला खूपच महत्व आहे.

खुप खुप धन्यवाद, अगो, मृण्मयी आणि शशांक.

अगो, धन्यवाद. पाहते ती प्रॉडक्ट्स. फक्त आता प्रश्न आला की मी दोन्ही एकत्र कसे करू ? दोन्हीला जोडून काहीतरी नवीन पाईपलाईन करावी लागणार बहुदा. खरच मनापासून धन्यवाद Happy

मृ शोधते परागची लिंक. धन्यवाद.

शशांक, अगदी पटले. फक्त मी वर लिहिल्याप्रमाणे आमच्या सोसायटीमध्ये मधल्या काळात कोठलेही पाणी आलेले आहे. तपासणी केल्यावर क्षारांचे योग्य प्रमाणाच्या डबल आहे. त्यातून आमच्याकडे डायरेक्ट कार्पोरेशनचा पाण्याचा जोड नाही. ९ व्या मजल्यावर ते चढणे तसेही शक्य नव्हतेच. त्यामुळे आधी खालच्या टाक्यांमध्ये नंतर ते वरती चढवून वरच्या टाक्यातून असेच पाणी सगळ्याला, अगदी पिण्यालाही वापरावे लागते. मोठ्या सोसायटिचे प्रश्न मोठे या तत्वाने रेग्युलरली टाक्या धुतल्या जातातच असेही नाही Sad त्याचा आग्रह धरतो आम्ही पण नेहेमीच ते होत नाही. स्वाभाविकच वॉटर प्युरीफायर गरजेचा होऊन बसतो.
त्यातून मधल्या काळात वेगवेगळ्या ठिकाणच्या विहिरींतून आणि आमच्या बोअरिंग मधून इतके क्षारयुक्त पाणि टाक्यांमध्ये पडले. त्या टाक्याही अजून धुतल्या गेल्या नाहीत. या सर्वाचा परिणाम म्हणजे हे अति क्षारयुक्त पाणी. यावर सोसायटीच्या स्तरावर काम होणे एक तर अवघड आणि वेळाचे. त्यामुळे घरगुती पातळीवरच काही करावे लागेल असे दिसते. पण तुझ्या माहिती बद्दल मनापासून धन्यवाद.

अगो तू म्हणतेस तसे सोसायटीच्या लेव्हलवर वॉटर सॉफ्टनरची व्यवस्था होते का ते पाहते.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

मायबोलीवर एखादी समस्या मांडली अन लगेच उत्तर मिळाले हा नेहमीचा समाधानकारक अनुभव पुन्हा एकदा Happy

अवल -
या सर्वाचा परिणाम म्हणजे हे अति क्षारयुक्त पाणी. यावर सोसायटीच्या स्तरावर काम होणे एक तर अवघड आणि वेळाचे. त्यामुळे घरगुती पातळीवरच काही करावे लागेल असे दिसते. >>>> घरगुती पातळीवर हे फार खर्चिक व जिकीरीचे होईल, त्यामुळे तुझ्या ओळखीच्या काही लोकांना हे पटवून एक ग्रुप करुन हे करता येईल का पहा. दुसरे असे की अशी कुठलीही यंत्रणा (आयन एक्स्चेंज रेझिन्स व फिल्ट्रेशन युनिट्स) एकदा बसवली की काम झाले असे होत नाही -प्रोफेशनली त्याचे सर्विसींग होणे अतिशय गरजेचे आहे -असे काम करणार्‍या कंपन्याही असतात - हे सर्व सोसायटी / मोठा ग्रुप करु शकेल, एकट्याचे हे काम नाही. धन्स.

मुंबईत तरी आम्ही नळाचे पाणी थेट पितो. मुंबईत पाण्याला थोडासा क्लोरीनचा वास येतोच, त्यामूळे शुद्धतेची खात्री ! सोसायटी केवळ ५० घरांची असल्याने, टाक्या नियमित साफ केल्या जातात.

मुंबईच्या पाण्याची एवढी सवय झाली होती, कि वसईचे पाणी पण मचूळ लागायचे. मला गुजराथ आणि हैद्राबाद सारख्या ठिकाणचे पाणी पण बेचव वाटले होते.

नमस्कार अवल. सध्या मी पुण्यात रहाते. माझ्या ईथेसुद्धा पाणी मिक्स येते. मूळची मी मुंबईची असल्याने मला मचूळ पाण्याची सवय नाही.
मी पाणी उकळून बघितले, पण त्याने पातेल्याला पांढरा राप बसला. जो घासून निघून गेला. पण नेहेमी पाणी तापवत राहिले तर नाही जाणार तो.
शिवाय पाण्याची चव काहि बदलणार नव्हती उकळून.
म्हणून मग Eureka Forbes वाल्यांना बोलावलं.
Eureka Forbes चा माणूस घरी येउन पाणी टेस्ट करुन गेला. त्याने सांगितलं की लेवल २०८ आहे. जी मिक्स पाण्यामुळे येते. त्याने एक्वागार्ड आरओ ग्रीन घ्या असं सांगितलं.
मी त्याला सांगितलं की पाण्याची चव न बघता मी घेणार नाही. तेव्हा त्याने मला त्यांच्या ऑफीस मधे चव बघण्यासाठी बोलावलं. तिथे मी फिल्टर शिवाय आणि फिल्टर मधील अशा दोन्ही चवी बघितल्या आणि मग आम्ही तो फिल्टर घेतला.
फिल्टर आत्ताच घेतला आहे त्यामुळे CUSTOMER SERVICE चा अनुभव नाही. पण पाण्याची चव मात्र चांगली लागते आता.
त्यांच्या सांगण्यानुसार हा फिल्टर ७०% क्षार घालवतो. पण ३०% ठेवतो ज्यामुळे मुलांची immunity maintain होते. खखोदेजा !!!

युरेका फोर्ब्स सर्विस सेंटर वरुन आलोय असे सांगुन माझीही फसवणुक झालीय. आणि वर ह्या लोकांकडे आपले मॉडेल न., घरचा पत्ता,, फोन नं सगळे असते. एकतर मुळ फोर्ब्सच्या कॉलसेंटरमधले कोणी ही माहिती विकत असतील किंवा तिथे काम करणारे ती माहिती चोरुन नंतर स्वतःचा लोकांना लुबाडण्याचा धंदा सुरू करत असतील..

एनीवेज्, त्यांच्या माणसाकडे ओळखपत्र मागवणे आणि तो आला की कंपनीने दिलेल्या नंब्नरवर लगेच फोन करुन खात्री करुन घेणे हे दोन उपाय कंपनीने सांगितलेत पण फसवले जायचे नशिबी असले की नेमके आयत्या वेळी काही आठवतही नाही. Sad

तरीही, अ‍ॅक्वागार्ड विकत घेणा-या लोकांनी सर्विसिंग करुन घेताना नीट माणसे पारखुन करुन घेतलेली बरी.

आमच्याकडील लोड शेडिन्ग लक्षात घेऊन आम्ही हिन्दुस्थान लिवरचा प्युरिट वापरतो कारण त्याला वीज लागत नाही म्हणुन. उजनीचे प्रदुषित पाणी महापालिका आम्हाला पुरवीत असली तरी ती यंत्रणा पुरंदरे म्हणतात तित्की चांगल्या पद्धतीने काम करतेच असा अनुभव नाही. त्यामुळे नळाचे पाणि चोविस पदरी फडक्यातून गाळून १२-१४ तास स्टीलच्या पातेल्यात (क्लोरीन निघून जावा हाही एक उद्देश) सेटल झाल्यावर तांब्याच्या पिपात निदान ८ तास ठेवून मग प्यूरिटमध्ये भरतो. गेली चार वर्षे तरी ठीक गेली आहेत. यांचीही सर्विस अगदि यथातथाच आहे. फक्त ती अक्वागार्ड इतकी वारंवार लागत नाही म्हणून सुसह्य होत असावी.

त्यांच्या सांगण्यानुसार हा फिल्टर ७०% क्षार घालवतो. पण ३०% ठेवतो ज्यामुळे मुलांची immunity maintain होते. खखोदेजा !!! >>>> इथे एक सांगावेसे वाटते - क्षाराचा इम्युनिटीशी काहीही संबंध नाही.
पोटेबल वॉटर या नावाने गुगलून पहा -त्याच्या ज्या क्रायटेरिया असतात त्या पूर्ण करणारी जी यंत्रणा ती परिपूर्ण यंत्रणा.
पिण्याच्या पाण्यात जास्त क्षार चालत नाही - हे क्षार कसे कमी करतात ते त्या त्या वॉटर प्युरिफायर विकणार्‍याकडून समजावून घेणे, वाटल्यास त्यांच्या तंत्रज्ञांशी चर्चा करणे हे महत्वाचे आहे. बर्‍याच वॉटर प्युरिफायर विकणार्‍या कंपन्या मार्केटिंग गिमिक्स पद्धतीने उत्पादने विकतात - जे अयोग्य आहे. आपणच जागरुक राहून तज्ज्ञांचा सल्ला, चर्चा या पद्धतीने ते प्रॉडक्ट विकत घ्यावे. दुसरे महत्वाचे - या सर्व प्रॉडक्ट्सचे वारंवार सर्व्हिसिंग - फिल्टर युनिट साफ करणे/ बदलणे, आयन एक्सचेंज युनिट असल्यास त्याचे अ‍ॅक्टिव्हेशन करणे, इ. - अतिशय गरजेचे आहे - ते ही व्यवस्थित समजाऊन घेणे व तसे योग्य त्या एजन्सीकडून करवून घेणे.

मोठ्या शहरात पिण्याचे पाणी टेस्ट करणार्‍या अनेक लॅब्ज असतात - त्यांच्याकडे जाऊनही ही माहिती मिळेल. आपल्या सोसायटीतील पाण्याची सँपल्स त्यांना अधूनमधून देऊन आपण पितो ते पाणी कुठल्या क्वालिटीचे आहे हे तपासणे गरजेचे आहे (पुणे -मुंबईसारख्या ठिकाणचे नळाचे पाणी जे पितात त्यांना याची गरज नाही - हे सर्व बोअर वगैरे सारख्या स्त्रोतातून पिण्याच्या पाणी मिळवण्याबाबत आहे.)

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
शशांक, खुप महत्वाची माहिती सांगतो आहेस, मनापासून धन्यवाद.
शशांक म्हणतो आहे तशी आपापल्या सोसायटीतल्या पाण्याची टेस्ट करून घ्या. निदान ज्यांच्याकडे बोअरिंग/ टँकरने पाणि घेतले जाते. माझ्यासारखा आजार सहन करण्यापेक्षा टेस्ट करून घेणे केव्हाही जास्त बरे.

चेन्नईचे पाण अति सुप्रसिद्ध आहे. चव तर मचूळच्या पुढच्या लेव्हलची. पाणी दिसतानाच गढूळ गढूळ दिसतं. पाणी उकळून वापरा नाहीतर गाळून वापरा. आमच्या आजूबाजूचे कित्येक जण तर रोजच्यारोज वॉटर कॅन विकत घेतात (हे लोक "बिसलेरीचे पाणी" म्हणून हा कॅण विकतात. प्रत्यक्षात हे साधेच पाणी फिल्टरमधून क्षार काढलेले असते) आम्हाला नेहमीचा साधा अ‍ॅक्वागार्ड काढून आता आरओ बसवावा लागलाय. पाण्याची चव चांगली आहे आणि पाणी स्वच्छ पण दिसतय.

मुंबई-मंगलोरला तरी अ‍ॅक्वागार्डवाल्यांची सर्व्हीस चांगली होती. कधीच काही प्रॉब्लेम आला नाही.

सगळं वरचं वाचून तर असं वाटतय की आरओ बेस्ट राहील...
सगळ्यात महत्त्वाचं- कुणी कुठलाही इले. वर चालणारा फिल्टर घेताना एक मात्र लक्शात ठेवावं- कॅन्डल वा कुठलीही सिस्टिम जर बरोबर नसेल तर फिल्टर नी पाणीच द्यायला नको. आधी दुरुस्त करणे... Lol
कारण फिल्टर च्या पाण्याची सवय असलेल्यांना जनरली दुसरं पाणी लगेचंच बाधतं... असा मलातरी अनुभव आहे...

डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड या धुळे जिल्ह्यातील अवधान एमआयडीसी स्थित नामांकित उद्योग संस्थेने आपल्या कर्मचार्यांकना स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळावे या करिता युरेका फोर्ब्ज या पुणे स्थित कंपनीकडे विचारणा केली असता युरेका फोर्ब्ज तर्फे श्री. पियूष अरोंडेकर यांचेकडून दिनांक १४.०८.२०१२ रोजी अ‍ॅक्वागार्ड आर ओ (रिवर्स ओस्मोसिस) प्युरिफायर कम कुलर चा प्रस्ताव देण्यात आला. सदर प्रस्तावावर संचालक मंडळात चर्चा होऊन त्यानुसार युरेका फोर्ब्जला डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड व्यवस्थापनाकडून प्युअरचिल आर ओ अ‍ॅक्वागार्ड ची मागणी दिनांक २२.०९.२०१२ रोजी नोंदविण्यात आली व तत्काळ दिनांक २६.०९.२०१२ रोजी या प्युरिफायरची संपूर्ण खरेदी किंमत रु.८२,५००/- (रुपये ब्याऐंशी हजार पाचशे फक्त) देखील चूकती करण्यात आली.

मागणीनुसार युरेका फोर्ब्ज तर्फे प्युअरचिल एफ एस एस ८० आर ओ अ‍ॅक्वागार्ड हे वॉटर प्युरिफायर कम कुलर दिनांक २७.०९.२०१२ रोजी पाठविण्यात आले. परंतू सदर वॉटर प्युरिफायर कम कुलर चे पॅकींग डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड ने केवळ युरेका फोर्ब्ज च्या अधिकृत अभियंत्याच्या उपस्थितीतच उघडावे व त्यानंतरच त्यास कार्यान्वित केले जावे अशा स्पष्ट सूचना युरेका फोर्ब्ज कडून डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड यांस देण्यात आल्या. त्यानुसार दिनांक ०८.१०.२०१२ रोजी युरेका फोर्ब्जचे अभियंता श्री. राजेंद्र कोल्हे यांच्या समोर पॅकींग उघडण्यात आले असता आतील वॉटर प्युरिफायर कम कुलर मोडलेल्या अवस्थेत दिसून आले. तसा तपासणी अहवाल श्री. कोल्हे यांनी युरेका फोर्ब्ज यांना पाठविला व त्यानुसार वॉटर प्युरिफायर कम कुलर बदलून देण्याची जबाबदारी युरेका फोर्ब्ज यांनी स्वीकारली.

ठरल्यानुसार दिनांक २२.१०.२०१२ रोजी युरेका फोर्ब्ज यांनी वॉटर प्युरिफायर कम कुलर बदलून पाठविला. सदर वॉटर प्युरिफायर कम कुलर श्री. राजेन्द्र कोल्हे यांनी दिनांक २५.१०.२०१२ रोजी कार्यान्वित केला. चार दिवसातच वॉटर प्युरिफायर कम कुलर मधून शुद्ध पेय जल मिळणे बंद झाले. डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड व्यवस्थापनाकडून ३०.१०.२०१२ रोजी युरेका फोर्ब्ज कडे तशी तक्रार नोंदविण्यात आली. सदर तक्रारीवर युरेका फोर्ब्जकडून कुठलीच त्वरीत कृती न केली गेल्याने दूरध्वनी तक्रार निवारण केंद्र (०२०३९८८३३३३), ईमेल customercare@eurekaforbes.com व संकेतस्थळ http://www.eurekaforbes.com/servicerequeststeps.aspx अशा सर्वच ठिकाणी तक्रार नोंदविण्यात आली. तरीही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी फेसबुक पेज https://www.facebook.com/EurekaForbes येथे देखील तक्रार नोंदविली गेली. त्याच प्रमाणे दूरध्वनी तक्रार निवारण केंद्रावरही (०२०३९८८३३३३) पुन्हा पुन्हा तक्रारीचा पाठपुरावा करण्यात आला. यासंबंधी झालेले सर्व संभाषण डीसान अ‍ॅग्रोटेक व्यवस्थापनाने ध्वनिमुद्रित करून ठेवले आहे. तसेच ईमेल व संकेतस्थळावर वेळोवेळी केलेल्या तक्रारींची नोंदही आहे.

त्यानंतर दिनांक ०८.११.२०१२ रोजी श्री. राजेंद्र कोल्हे यांनी डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड येथे येवून वॉटर प्युरिफायर कम कुलर ची दुरूस्ती केली. परंतू त्यानंतर सदर वॉटर प्युरिफायर कम कुलर फक्त दोनच दिवस कार्यरत राहिले व पुन्हा नादुरूस्त झाले. या घटनेनंतर अनेकवेळा तक्रारी व पाठपुरावा करून युरेका फोर्ब्ज कडून डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड यांस कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. उलट तुम्ही चूकीचे वॉटर प्युरिफायर कम कुलर निवडले. हे तुमच्या पाण्याकरिता योग्य पर्याय होऊ शकत नाही असे उत्तर देण्यात आले. खरे तर हे वॉटर प्युरिफायर कम कुलर युरेका फोर्ब्जचेच श्री. पीयुष अरोंडेकर यांनी सूचविले होते; परंतू तरीही अशा प्रस्तावाची जबाबदारी डीसान अ‍ॅग्रोटेक वर टाकणे हे सर्वथा अयोग्य आहे.

तेव्हा हे वॉटर प्युरिफायर कम कुलर पुन्हा युरेका फोर्ब्ज यांनी ताब्यात घेवून त्याची खरेदी किंमत डीसान अ‍ॅग्रोटेक यांस त्यांनी परत करावी अशी मागणी डीसान अ‍ॅग्रोटेक व्यवस्थापनाने केली. परंतू या मागणीसही युरेका फोर्ब्ज यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.

डीसान अ‍ॅग्रोटेकचा कर्मचारी वर्ग तसेच खरेदी व विक्री निमित्त रोज आस्थापनेला भेट देणार्या अनेकांस आता युरेका फोर्ब्जच्या तथाकथित कार्यक्षमतेची तसेच विक्रीपश्चात सेवेची सत्यता ध्यानात आली आहे. एका मोठ्या व नामांकित उद्योग संस्थेला ग्राहक म्हणून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य ग्राहकांची युरेका फोर्ब्ज कडून काय पत्रास ठेवली जात असेल? असा सवाल धुळ्यातील नागरिक आता विचारू लागले आहेत.

युरेका फोर्ब्सच्या फेसबुक पानावर https://www.facebook.com/EurekaForbes येथे पाहणी केली असता हजारो त्रस्त ग्राहकांच्या तक्रारी व असमाधान व्यक्त करणारी शेरेबाजी आढळून येते आहे.

तरी युरेका फोर्ब्जने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा डीसान अ‍ॅग्रोटेक व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

फिल्टरने क्षार कमी होतात का ? >>>> माझ्या माहितीप्रमाणे फिल्टरने क्षार कमी होत नाहीत - फिल्टर ही साधी गाळणी - काही प्रमाणात प्रोटोझोन्स, काही मोठ्या आकाराचे बॅक्टेरिया यांना प्रतिबंध करते. क्षार कमी करायला आरओ सिस्टिम असलेला फिल्टर लागेल.
आरओ - रिव्हर्स ऑसमॉसिस - जास्त क्षार असलेल्या पाण्यातील क्षार कमी केले जातात जेणेकरुन पाणी पिण्यायोग्य होते.

हा बाफ काढला त्यावेळी प्युरीफायर बदलावा की काय? अशी शंका मनात निर्माण झाली होती. पण इतर कंपन्यांची पत्रके वाचून, आमच्या गरजा, रनिंग वॉटर करता लागणारी वेगळी पाईपलाईन टाकून घेणे, स्वैपाकघरात जागा असणे इ सगळ्या बाबींचा विचार करता प्युरीटच सुरु ठेवण्याचे ठरले.

त्यांची सर्व्हिसही अतिशय चांगली आहे. एकदा त्यांचा माणूस तुमच्याकडे आला, की त्याचा नंबर घेऊन ठेवा. तो तुमच्या एरीयाकरता काम करत असतो. त्यामुळे काही समस्या उदभवल्यास डायरेक्ट त्याला फोन करून बोलावून घेणे सोपे पडते.

सध्या हिवाळ्यात सकाळी साधारण कोमट पाणी पितोय. पण ऑफिस मध्ये प्युरिफायर मधून एकदम कडक आणि एकदम थंड असं पाणी मिळत असल्याने ते मिक्स करुन कोमट करून घ्यावे लागते.
हे असे मिश्रण चांगले आहे का तब्येतीला?

माझ्याकडे आक्वागार्डचा अ‍ॅक्वाशुअर आहे. गेली ४-५ वर्षे तरी वापरतेय. नीयमित सर्विसिंग करुन घेतेय. काल सर्विसिंगला जो बाब्या आला त्याने आल्याआल्या मिरॅकल नावाचे एक नविन मशिन बाहेर काढले. सर्विसिंग बाजुला ठेऊन तो आमच्या मशिनवर कसा ताण येतोय, मशिन कशी ४०% च कशी काम करतेय, मिरॅकलमुळे हेवी मेटल्स निघुन जातात पाण्यातुन व.व. सांगायला सुरवात केली.

त्याचा एकुण आविर्भाव पाहिला असता तो हे मिरॅकल माझ्या गळ्यात मारण्याच्याच हेतुने आलेला हे दिसत होतेच. शिवाय याची किंमत २००० आणि आकार आधिच्या मशिनएवढाच.

मी त्याला लगेच काही कमीट न करता शनवारी यायला सांगितले. तोवर नेटवर गुगलले तर मिरॅकलबद्दल अ‍ॅक्वागार्डाच्या साईटखेरीज इतर कुठेही माहिती नाहीय.

नव्या मुंबईचे पाणी ब-यापैकी बरे आहे. त्याच्या हेवी मेटल्स मिसळली असावीत अशी बोंब अजुन तरी ऐकली नाहीय. अशा परिस्थितीत उगीच २००० घालवण्यात अर्थ नाही असे मला वाटतेय.

कुणी घेतलेय का हे मिरॅकल?

धागा वर काढतोय.

मुंबईचे म्युन्सिपालटीचे बरेपैकी चांगले पाणी असेल तर कोणते वॉटर प्युरीफायर वापरणे योग्य.

या आधी हिंदुस्तान लीवरचे प्युरीट वापरायचो.. किमान गेले ७-८ वा जास्त वर्षे चालले .. ते आता बिघडलेय, पाणी खालीच उतरत नाही..

तर या काळात मार्केटमध्ये काही नवीन आले आहे का, ते उपयुक्त आणि गरजेचे आहे का, याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का.. गूगाळून काही समजत नाहीये..

ऋ, ‍माझ्याकडेही pureit आहे. त्यांच्या कस्टमर सर्विसवाल्यांकडून साफ करून घेत जा ते मशिन. ब्येश चालेल.

धन्यवाद मामी, आपल्या आधीच्या पोस्टमध्ये वाचलेले हे.

आमचा प्युरीट डबा फार जुना आहे. म्हणजे बहुधा ते नवीनच आलेले तेव्हापासूनचे आहे. गेले ३-४ महिने पाणी खाली उतरायला त्रास देतेय म्हणून आई बदलायच्या मागे लागली आहे. साफ करून घ्यायलाही हरकत नाही पण पुन्हा दर चार महिन्यांनी जैसे थे आणि साफ करायला पुन्हा कोणाला बोलवा अशी झंजट नकोय ईतकेच.

आता कोणीतरी तिला आरओ प्युरीफायर १५-१६ हजारांवाली मशीन सांगितली आहे, पण मला नाही वाटत मुंबईच्या पाण्याला उगाच या फॅडची गरज आहे. माझ्यामतेही नवीन घ्यायचे झाल्यास पुन्हा असाच एखादा डब्बा घेणे उत्तम. बस्स या एवढ्या वर्षात टेक्नोलॉजी पुढे गेली असल्याने असेच साधेसोपे लेटेस्टमध्ये काय चांगले आहे हे बघत होतो. नसल्यास तेच पुन्हा घेणे हा पर्याय देखील ओपन आहेच. बाकी आपलाही माबोवरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता आपण कोणतीही ऐसेवैसी चीज नक्कीच वापरत नसणार. पण बस्स हे माझ्या आईला पटवून द्यावे लागेल. त्या बिचारीलाही किचनमध्ये चेंज हवा असेलच ना.. Happy

मगाशी व्हॉटसपवर एक मित्र म्हणाला की "केन्ट" कंपनी चांगली आहे. त्याला त्याचा आणखी एक मित्र म्हणालेला जो याच्याशीच सबंधित वॉटर टेस्टींग लॅब मध्ये कामाला आहे. तर आता केन्टची साईट चाळल्यास "KENT MAXX UV WATER PURIFIER" म्हणून प्रकार दिसला जो ८५०० चा आहे. आणि युवी म्हटले तर मला युवराजच आठवतो ईतपतच माझे जीके. तर आता यातले UV WATER PURIFIER म्हणजे काय हे उद्या गुगाळायला लागेल. कोणी इथे सांगितल्यास ईन अ‍ॅडव्हान्स धन्यवाद Happy

यू व्ही म्हणजे अल्टरा व्हायोलेट. अतिनील किरण पाण्यातून पास करतात शुद्ध करण्यासाठी. युरेका फोर्ब्ज
चा लेटेस्ट अ‍ॅक्वागार्ड पन चेक करा. दर तीन महिन्यानी सर्विसिंग करावे लागते. मी हे मशीन एकेकाळी विकले आहे व डेमो देउन देउन रचना पाठ झालेली होती. आता अर्थात खूप बदल झाले आहेत. ह्याची जाहिरात सध्या नेने कुटुंब करते आहे. पाण्यातील क्षारांबरोबरच बँक्टेरिया व इतर रोगजंतू नाहिसे होणे महत्वाचे आहे. पावसाळ्यातील पाणी प्रदुषणाद्वारे होणारे रोग टाळण्यासाठी फिल्ट र्ड पाणीच प्यावे. डायरेक्ट नळाचे पाणी किती वर्शात प्यायलेले नाही मी. मूड आला तर अ‍ॅकवा गार्ड चे पाणी देखील उकळून ठेवते. पाणी जन्य रोगांपासून प्रेव्हेन्शन करू तितके बेस्ट.

प्युरीटच्या एक्स्चेंज ऑफरचे समस येत होते मधे. चौकशी करा.
मला तरी प्युरीटचा काही प्रॉब्लेम नाहीये. माझे मशिन ५ वर्षांपूर्वीचे आहे. सगळा किट बदलला की पाणी यायला काही प्रॉब्लेम येत नाही.
फक्त ते मशिन घेतल्यावर ३ वेळा घर बदलून झाल्यामुळे ब्राऊन टेपांच्या खुणा वगैरे फार आहेत. वाईट दिसतं. आल्यागेल्याला त्यातून पाणी प्यायला नको वाटेल असं वाटतं त्यामुळे घर बदलल्यावर तेही बदलणार आहे.

पाणी उतरायला त्रास देतेय म्हणजे बॅटरी संपलीये, आणि कोळश्याचा तो वरच्या टाकीतला अर्धगोल आणि खालच्या टाकीतला दंडगोल क्लॉग झालेत.

Evdha mahagacha filter ghyaychi tashi garaj nahiye Mumbai punyat. Mahanagarpalika takes care of filtration and chlorination. Tumchi overhead tank jar regularly clean hot asel tar kuthlahi filter wapraychi garaj nahi. Agdich watat asel tar Pureit/ Tata Swacch etc low cost tarihi effective aslele filters wapra.

Ya filtration war Abhijit Ghorpade yancha ek changla blog aahe.
Mobile waroon logged in aslyani link sapdat nahiye. PC waroon login karoon link deto ithe.

नळातून स्वच्छ घासलेल्या पातेल्यात पाणी भरताना स्वच्छ फडक्याने किंवा बाजारात मिळणार्‍या नळाच्या गाळणीने गाळून घ्या. नंतर पाणी खळखळून उकळवा. दुसर्‍या दिवसाच्या आत ते पाणी संपवा. उद्यासाठी आज रात्री पाणी गाळून उकळवून ठेवायचे. सकाळला रुम टेम्परेचरला येते.

सकाळला रुम टेम्परेचरला येते.>> हो मी दोन मोठी पातेली अ‍ॅक्वा गार्ड च्या पाण्याची भरून उकळवून ठेवते. व अशी गार झाल्यावर फ्रिझ मध्ये बाटल्यात भरून ठेवते.

पाण्याची पाइपलाइन व सांडपाणी पाइपलाइन ह्यातले द्रव मिक्स झाल्यास प्यायलेल्या पाण्याने कावीळ होउ शकते. सोसायटीच्या टा़क्या कवर्ड नसतील व असल्या तरी नीट साफ केल्या नसतील तर
गाळ, शेवाळ झाडाची पाने व इतर कचरा, गंज ह्यमुळे पाण्यात इंप्युरिटीज येउ शकतातच. फिल्टर बंद पडल्यास इमर्जन्सी वापरा सा ठी एक बिस्लेअरी/ अक्वा फिना तत्सम पाण्याचा छोटा कॅन घरी असू द्यावा. गावाला जाताना देखील मी एक स्टील डब्यात फिल्टर पाणी भरून झाकण बंद करून ठेवून जाते. आल्यावर पाण्याची काय परिस्थिती असते माहीत नाही. तर हाताशी निदान प्यायला व वरण भाताचा कुकर लावायला स्वच्छ पाणी हवे.

मी आंध्रात पाणी दुर्भिक्ष असलेल्या जागी राहिलेली आहे. अगदी एक लिटरच्या पातेल्याने पाणी जिना
चढून वरच्या घरात भरले आहे( प्यायचे पाणी ) त्यामुळे आय ट्रीट वॉटर लाइक गोल्ड. Happy

प्रत्येकी २/३ महिन्यांनी सर्विसिंग लागणार नाही असा काही फिल्टर आहे का? किंवा जे क्लिनिंग कराय्चं ते आपले आपणच करता येईल असे काही आहे का?

सावली, सगळ्या फिल्टर्सचं स्वतः क्लिनिंग करता येतं. सोबत एक प्लॅस्टिकचा पंप दिलेला असतो. सगळी असेम्ब्ली सुटी करायची आणि त्या पंपने आतले पार्ट्स फ्लश करुन पुन्हा जोडून टाकायचे. पुन्हा पाण्याचा फ्लो नीट होतो. माझ्याकडे अ‍ॅक्वाशुअर होतं तेव्हा दर रविवारी किंवा १५ दिवसांनी हा उपद्व्याप करत असे. नंतर कंटाळा आला. पुन्हा जुनी गाळा उकळा पद्धत सुरु केली. उकळून गार झालेलं पाणी छोट्या तांब्याच्या पिंपात ओतून ठेवते.

Pages