रोजच्या पिण्याचे पाणी

Submitted by मामी on 8 May, 2011 - 10:48

रोजच्या पिण्याच्या पाण्याकरता RO technology वापरणारा वॉटर फिल्टर सर्वात उत्तम ठरू शकतो का? या टेक्नॉलॉजीचा वापर करणार्‍या कंपन्या - Eureka Forbes आणि Kent - सांगतात की, यामुळे पाण्यातले जवळ जवळ सर्व नैसर्गिक क्षार गाळून पाणी मिळते. पण जे अगदी आवश्यक क्षार आहेत ते मात्र पाण्यात राहतात. हे खरे आहे का? की केवळ मार्केटिंग गिमिक? असे पाणी दीर्घ काळाकरता वापरल्यास काही अपाय किंवा शरीराला क्षार न मिळणे असं काही होतं का? नविन वॉटर फिल्टर घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे निर्णय घेण्यास मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स अश्विनी. मला माझ्यासाठी नव्हे जे.ना. साठी हवे आहे. ते जिथे रहातात तिथे रेग्युलर सर्विसिंगला कोणी येण्याची शक्यताच नाही. त्यामुळे मिनिमम क्लिनिंग किंवा अशी काही जरुर नसलेले काही असेल तर ते हवे आहे. सध्या ते पाणी उकळणे पद्धत वापरतात. पण आता वयोमानानुसार रोजच्या रोज पाण्याची भांडी गॅसवर चढवणे आणि गरम भांडी उतरवणे फार रिस्की होतेय ( असे मला वाटते). नविन फिल्टर बसवल्यावरही दर महिन्याला स्वतःच क्लिनिंग करावे लागत असेल तर ते नक्कीच कंटाळुन ते वापरणे बंद करतील आणि पुन्हा उकळा पद्धत सुरु करतील.

सावली, अश्या ठिकाणी फिरॉल नावाचा एक तोटीलाच लावाय्चा फिल्टर आहे तो वापरावा किंवा टाटा स्वच्छ!!!!! बेस्ट ऑफ द लॉट. तसेच पाण्यात टाकायच्या गोळ्या मिळतात. त्या घेउन देता येतील.
वयस्कर लोकांच्या पिण्याच्या पाण्याची जास्त काळजी घ्यायला हवी कारण इन्फेक्षन, पोट बिघडणे ह्यामुळे अशक्त पणा येउन ते चक्कर येउन पडू शकतात किंवा जनरल आजार प ण येउ शकते.

धन्यवाद लोकहो,
फायनली PUREIT MARVELLA UV हा घेत आहोत, जेणेकरून आईचा पाणी भरण्याचा आणि साफ करायचा त्रास वाचेल.
http://www.pureitwater.com/IN/node/6
जुना डब्बा दिल्यास साधारण हजार कमी होतील असे म्हणाले आहेत.

आमच्याकडे आहे प्युरिट मार्वेला. चांगला आहे. ४ लिटर पाणी साठते. त्यामुळे दरवेळी पाणी हवे तर बटण चालू करुन ऑन होईपर्यंत थांबा असं करावं लागत नाही. चार लिटर संपल्यावर आपल्या सोयीप्रमाणे बटण ५ मिनीट चालू ठेवून परत कधीही रिफील करता येते.

mi_anu, Thanks for review.

Pureit chi after sales service kashi ahe?

Tumcha model no. konta ahe?

झकास आहे. तेव्हापासून आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. मी रोज ऑफिसमध्येही दोन बाटल्या त्याचेच पाणी घेऊन जातो. आणि ऑफिसातले पाणी फक्त चूळ भरायला वापरतो Happy

नुकतेच आम्हाला आणखी एक वॉटर प्युरीफायर घ्यायचा होता. आम्ही कुठचाही विचार परामर्श, चर्चा बैठक, उहा पोह न करता सेम घेतला.

वॉटर purifier ची annual servicing करणे गरजेचे असते का? नाही केले तर filter खराब होतो का?

हो गरजेचे असते.. फिल्टर तर बदलावा लागतोच पाणी किती क्षारयुक्त आहे त्यानुसार कालावधी ठरवून..
आमच्या इकडं खुपच हार्ड वॉटर आहे..सारखा म्हणजे दर चार-पाच महिन्यात एकदा ४०००-५००० खर्च यायला लागला.. टिडिएस वाढला कि पाण्याची चव बदलून पोटदुखी पण झाली एकदा.. मग आम्ही प्युरीफायर रिपेअर करण़ सोडून दिलं आणि can water मागवतो.. ते परवडंय सध्या आणि चांगल्या पाण्याची शाश्वती..
आम्हाला वॉशिंग मशिनला पण फिल्टर लावावा लागलाय..

पाणी बंडल असेल तर नकळत पिणे कमी होते व अन्य त्रास सुरु होतात. न्यु जर्सीमध्ये वॉटर गॅलन्सच मागवत असू. इथे सध्या ती सर्व्हिस फार म्हणजे फारच लाउझी असल्याने फिल्टर वापरतोय.

अमेरिकेत नळाला येणारं पाणी सगळीकडेच खराब असतं का? खराब म्हणजे पिऊ शकतो (अगदी फ्लिन्ट मिशिअन सोडूया) पण पिण्याच्या लायकीचं नाही. मला तरी जिकडे जिकडे फिरलोय तिकडे असाच अनुभव आहे. सॅन होजेतही नळाचं पाणी प्यायलं की पोट दुखी इ. होत असे. लोक रिवर्स ऑस्मॉसिस लावायचे. आम्ही तात्पुरते असल्याने गॅलन भरुन आणायचो.
कॅनडात जिकडे फिरलोत तिकडे सगळीकडे नळाचं पाणीच प्यायलं आहे.

प्री-फिल्टर म्हणजे पार्टीकल फिल्टर हळूहळू चोक्ड होतो.
Activated Carbon filter saturate होतो - adsorb करण्याची क्षमता रहात नाही.
हे पाण्यात न विरघळलेले पार्टीकल्स किती आहेत आणि disolved/free gases, volatile compounds किती आहेत त्यानुसार कमी अधिक कालवधीत होते. TDS मुळे नाही. हे फिल्टर्स TDS कमी करत नाहीत.
वर्षातून एकदा आमच्याकडे बदलतो. त्या आधीच पाण्याचा वास/चव बदलत आहे असे लक्षात आले की लौकर बदलावे लागतील.

RO असेल तर त्यात वरील फिल्टर्स असतातच, शिवाय TDS किती आहे यानुसार Membrane चे लाईफ ठरते. हार्ड वॉटर असेल तर वर मृणाली यांनी लिहिलेच आहे, अन्यथा १ ते २ वर्षे किंवा जास्त कदाचित.

>>>>अमेरिकेत नळाला येणारं पाणी सगळीकडेच खराब असतं का?
नाही सगळीकडे बंडल नसते.
विस्कॉन्सिनमध्ये छान होते. इथे न्यु यॉर्क (ग्रेट नेक) पाण्याला मचूळ चव आहे. टेक्सास (सॅन अँटॉनिओ) इथेही मचूळ चव असल्याचे स्मरते. पण तेव्हा माझ्या रुममेटस गॅलन्स आणत पण मी तसच भागवत होते. ते गॅलन्स कुठे वरती मजल्यावरती नेणार. लिफ्ट होती वाटतं पण तरीही काहीतरी कठीण होतं. आता नीट आठवत नाही. कॅलिफोर्निआ(चिनो) व पेन्सिल्व्हेनिआ (आता ठिकाणाचे नाव आठवत नाही) , डेलावेअर(नेवार्क) - पाणी ठीकठाक होते. व्हरमाँट (साऊथ बर्लिन्ग्टन) छान होते.

अमित, पाण्याची चव अर्थातच बदलते सगळीकडे पण काही स्टेट्समध्ये नळाचं पाणी अजिबात पिण्यासाठी वापरू नये (फ्लोरिडा) तर कनेटिकटसारख्या स्टेटमध्ये सेफ आहे असं मी वाचलं/ऐकलं होतं. पण आता सगळीकडेच पाणी कन्टॅमिनेटेड आहे म्हणतात. आमच्याकडे स्टेट गव्हर्नमेन्टनं असं काही जाहीर केलेलं नाही पण येल इ. कॉलेजेसमधल्या रीसर्च कमुनिटीचं तसं म्हणणं आहे. चार पायाच्या लोकांना तर टॅप वॉटर अजिबात देऊ नये.

याकरता तिकडे काय सोय आहे ? का इथल्यासारखे सर्रास आर-ओ फिल्टर्स वगैरे वापरल्या जातात?
एक ते टेबलटॉप पिचर टाईप फिल्टर्स फार सोयिचे वाटले मलातरी पण त्यात एकावेळी फार पाणी फिल्टर होत नाही आणि शेवटी ते अगदी साधं वॉटर पर्कोलेटिंग फिल्टर आहे...

बरेच उपाय आहेत. तो पिचर एकदम सोपा आणि स्वस्त उपाय आहे पण दिवसातून १० वेळा भरावा लागतो. काही लोकं रतीब लावतात. छोट्या, वन-टाइम बाटल्या ते मोठे बॅरल्स पण खूप प्लॅस्टिक जमा होते. अन्डरसिंक फिल्टर सगळ्यात बेस्ट उपाय आहे असं मला वाटतं.

कॅलिफोर्नियात टेंपरवारी अपार्टमेंट मध्ये रहात असताना आठवड्यातून दोन एकदा रात्रीची जेवणं झाल्यावर आम्ही रिकाम्या हंड्या कळशा घेऊन पाणी भरायला रांग लावायचो. डोंबिवलीकर असल्याने पाणी भरयला जाण्यात पण नॉस्टॅल्जिआ होता त्यामुळे मजा यायची. Proud

>>>>>>मोठे बॅरल्स पण खूप प्लॅस्टिक जमा होते.
नाही सिंडरेला, ते गॅलन्स ठराविक कालावधीत रिप्लेस होत रहातात. कंपनीचा माणूस येउन रिकामे गॅलन्स घेउन जातो व आपल्याला पाण्याचे गॅलन्स देतो.

सामो, ते माहिती आहे मला. १. बाटल्या घेतल्या तर त्याचा कचराच होतो. २. ते मोठे गॅलनवाले डबे २-३ घेतले एकावेळेला तरी एकेक करून घरात जमा होतात आणि जरी कंपनीनं परत नेले तरी त्या डब्यांचं लाइफसायकल आहे. बरं आय-सोअर घरात, बेसमेन्टमध्ये कुठेही ठेवले तरी.

अमित - मी बे एरियात असताना कधीकधी तो प्यूर की पर कंपनीचा फिल्टर सोडला तर बहुतांश काळ सनीवेल व कुपर्टिनो मधे कायम नळाचेच पाणी प्यायचो. इतरही अनेक लोक तसेच करताना लक्षात आहे. काही लोक नळालाच तो फिल्टर बसवून वापरायचे पण सगळे नाही.

इथे नवीन आलो तेव्हा "जर भारतातील पाणी आपण पचवू शकलो तर इथले (अमेरिकेत कंट्रोल जास्त असेल हे गृहीत धरून) तुलनेने जास्त स्वच्छ पाणी पचवायला काय प्रॉब्लेम आहे" अशा खर्‍या/खोट्या समजातून हे केले. नंतर इतरांचे पाहून कधीकधी फिल्टर्स आणले पण त्यात कन्सिस्टंन्सी नव्हती त्यामुळे बहुतांश वेळा थेटच वापरले.

मी कधीकधी इव्हन हॉटेल्स मधे नळाचे पाणी प्यायला वापरले होते सुरूवातीला. आजकाल नाही वापरत.

फ्लिंट मिशिगन वगैरे बद्दल नंतर वाचले तेव्हा नळाचे पाणी प्यावे की नाही असा प्रश्न पडला. आता फ्रिज ला जो फिल्टर असतो तोच वापरतो. पण नळाचे चुकूनही पीत नाही असे नाही.

Pages