रानवाटा प्रस्तुत "महाराष्ट्र देशा"

Submitted by जिप्सी on 9 June, 2015 - 12:18

वैविध्यतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात एकिकडे सह्याद्रीचे उत्तुंग शिखरं आहे तर दुसरीकडे मनाला मोहविणारे समुद्रकिनारे, इथे प्राचीन कोरीव लेणी आहेत आणि विविधतेने नटलेली वन्यसंपदाही. श्री छ्त्रपती शिवाजीमहाराजांच्या या महाराष्ट्रात जवळपास ३५० गडकिल्ले आहेत. असा हा विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र. "रानवाटा" संस्थेने याच आपल्या महाराष्ट्राचे विस्तृत दर्शन "महाराष्ट्र देशा" या मालिकेद्वारे युट्युब मार्फत आपल्या भेटीस आणले आहे. छायाचित्रण, गड किल्ले भटकंती व संवर्धन, नवोदित छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन इ. गोष्टींबरोबर आता "रानवाटा मोशन पिक्चर" हा अनवट, देखणा महाराष्ट्र आपल्यासमोर घेऊन येत आहे. याच मालिकेतील हा पहिला भाग युट्युबवर उपलब्ध आहे.

स्वप्निल पवार यांचे मनोगतः -)
बरीच वर्ष ब्लॉग लिहायला घ्यायचं म्हणत होतो…
सह्याद्रीतले किल्ले फिरताना जे काही अनुभव आले किंवा माझ्या गेल्या १० वर्षांच्या भ्रमंतीत मी जे काही experiments केले ते सर्वांसमोर मांडण्याची इच्छा होती…
पण कॅमेरा सोबत जेवढे सूर जुळले तेवढे लेखणी ने साथ दिली नाही, असं म्हणता येईल…
गेल्या ४-५ वर्षांमध्ये मात्र Cinematography, Direction, Travel Show ह्या गोष्टी मनामध्ये ठासून भरल्या होत्या…
आज ५ जून २०१५… पर्यावरण दिनानिमित्त 'महाराष्ट्र देशा' ही मालिका YouTube वर सुरू करतोय…
पहिला भाग आहे हरिश्चंद्रगडावरच्या स्वछता मोहिमेचा…
त्यात आम्ही अनुभवलेले, जगलेले क्षण जसेच्या तसे मांडण्याचा प्रयत्न केलाय…
डोंगरात राहणारे आदिवासी, त्यांच जगण, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यासोबत शहरात राहणारा एक ध्येयवादी तरूणांचा संकल्प या गोष्टींचा सुंदर मिलाफ मांडण्यात आला आहे…
ही Documentary Film नव्याने ट्रेकिंगकडे वळणारी मंडळी, शाळा- महाविद्यालयीन तरूणांना एक स्फूर्ती देणारी, प्रेरित करणारी ठरेल ही अपेक्षा…

महाराष्ट्र देशा भाग पहिला - हरिश्चंद्रगडावरची स्वछता मोहिम…

अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या Documentaries पाहण्यासाठी YouTube वर Raanvata Channel ला subscribe करा…आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा अनवट महाराष्ट्र पोहचवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पाहिला पहिला विडिओ हरिश्चंद्रगडावरचा तलाव साफ करण्याचा.

सतत बंद पडणारी मोटर पाहुन वाटत होते की या मंडळींनी किंवा इतर कोणी बाहेरुन म्हणजे कंपन्या इ. मदत मिळवायचा प्रयत्न केला तर त्यांचे अनावश्यक कष्ट वाचतील आणि त्यांना अजुन जास्त कामांकडे लक्ष देता येईल.

किंवा या त-हेच्या कामाचा युटुब चॅनेल आणि इतर मार्गांनी प्रसार करुन अधिकाधिक तरुणांना या कामाकडे आकर्षित केले तरीही खुप मदत होईल.

या मंडळींना खुप शुभेच्छा!!!!

अतिशय सुंदर उपक्रम ! व्हिडिओ पाहिला ..किती अवघड काम केलयं या टिम ने . यु टयुब चॅनेल आणि डॉक्युमेंटरीची कल्पना आवडली.

अतिशय सुंदर उपक्रम ! व्हिडिओ पाहिला ..किती अवघड काम केलयं या टिम ने . यु टयुब चॅनेल आणि डॉक्युमेंटरीची कल्पना आवडली. >>>> +१०० Happy

अतिशय स्तुत्य उपक्रम..व्हिडीओमुळे आम्हालाही तुमच्यासोबत येता आलं..खूप खूप शुभेच्छा!

खरच बोलणे सोप्पे असते आणि अश्या समाजोपयोगी कामे करणे मात्र फारच अवघड असते. रानवाटाच्या टीमला माझा मानाचा मुजरा.....!