ध्वनी प्रदुषण तक्रारीबद्दल सल्ला हवाय!

Submitted by अग्निपंख on 11 June, 2015 - 23:58

नमस्कार मायबोलीकर्स..
ध्वनी प्रदुषणामुळे होणार्‍या त्रासाबद्दल सल्ला हवा आहे.
माझा एक शेजारी आहे, तो वारकरी आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण तो डोक्याने बर्‍यापैकी सरकलेला आहे.
तो आणि त्याचे कुटुंबीय सकाळी ४ ते ७ आणि रात्री २-३ तास (वेळ ठरलेली नसते पण ६ ते १० ह्या वेळेत कधीही) जोरजोरात टाळ वाजवुन 'इठ्ठला'ची भक्ती करत असतात. शिवाय दिवसाही जर वेळ मिळाला तरी कधीही टाळ वाजु शकतात.
एक दोन वेळेस समजाउन सांगितल की बाबारे घरी आइ आजारी असते, माझी लहान मुलगी ह्या आवाजाने झोपु शकत नाही, शिवाय शेजरी एक मुलगी ह्या वर्षी दहावी ला आहे, ह्यानंतर थोडे दिवस त्रास कमी झाला परंतु आता पुन्हा नव्या जोमाने टाळ कुटणे सुरु झाले आहे. ह्या वारकर्‍याच्या फेबु वर मेसेज केला की मी पोलिसात तक्रार करेन म्हणुन पण काही फायदा झाला नाही.
माझे काही प्रश्न आहेत.
१. ही तक्रार पोलिसात करता येइल का? पोलिस दखल घेतिल का? (घेतिल असे वाटत नाही कारण त्यांच्याकडे इतर भरपुर महत्वाच्या केसेस असताना ह्या किरकोळ गोष्टीसाठी वेळ देणे अवघड आहे)
२. पोलिसांशिवाय इतर ठिकाणी ही तक्रार करता येइल काय? जसे की मनपाचे पर्यावरण अधिकारी?
२. तो त्याच्या घरात टाळ वाजवत असतो, ह्याला मी आक्षेप घेउ शकतो का? कायदा ह्या बाबतीत काय सांगतो हे माहित करुन घ्यायला आवडेल.
३. कायदेशीर बाबीत गुंतणे आणि तेवढा वेळ देणे आर्थिकदृष्ट्या आणि वेळेबाबत किती महागात पडेल?
४. टाळाचा आवाज बर्‍यापैकी जास्त आहे (तो बहुतेक मोठे टाळ वाजवत असावा) परंतु कदाचित कायदेशिर डेसिबल लिमिटमध्येच असावा, डेसिबल मोजण्याचा प्रयत्न डिबी मिटर अभावे अजुन तरी केलेला नाही.
५. ह्या कृत्या मध्ये त्या घरच्या स्त्रियाही असतात त्यामुळे हाणामारी करुन शकत नाही.

मायबोलीकरांना योग्य सल्ला आणि उपाय सुचवण्याची नम्र विनंती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायदेशीर सल्ला नाही माहिती. प्रश्न ४ साठी - डेसिबल्स मोजायला अ‍ॅप्स आहेत. सेलफोनवर ती डाऊनलोड करू शकता. सामान्यपणे ७० डे. च्या वर आवाज आसपास असू नये.

अजुन एकदा तुम्हा दोघांच्या ओळखीतल समाजातले वजनदार व्यक्ती तसेच ४-५ ईतर शेजारी मध्यस्थ घेऊन नम्रपणे त्या घरातील सगळ्यांना समोर बसवुन समजावुन बघा.
तरीही नाही एकले तर,
एक मोठा स्पिकर आणा आणि त्यांच्या ईठ्ठलाची भक्ती सुरु झाली की ईकडे तुम्ही जिझसची भक्ती सुरु करा.

आमच्याकडे अशिच केस होती पण ते लोक जिझसची भक्ती करत होते. आणि एकटे नव्हे तर १२-१५ आणिखी इतर फॅमीली बोलावुन ग्रुपने. टाळ्या वाजवुन गाणे म्हटले जात असे. आम्हाला डायरेक्ट त्रास नव्हता पण दुस-या एका शेजा-यांना त्यांचा खुप त्रास होत होता.

आमच्याकडे अशिच केस होती पण ते लोक जिझसची भक्ती करत होते. आणि एकटे नव्हे तर १२-१५ आणिखी इतर फॅमीली बोलावुन ग्रुपने. टाळ्या वाजवुन गाणे म्हटले जात असे. आम्हाला डायरेक्ट त्रास नव्हता पण दुस-या एका शेजा-यांना त्यांचा खुप त्रास होत होता.>>
स्पॉक, कोणत्या उपायाला यश मिळाले?

पोलिसात तक्रार करुन पाहा. आवाजाचाही त्रास होत असतो हे तुमच्याकडच्या पोलिसांना पटले तर ठिक.

मला आवाजाचा भयानक त्रास होतो. दुर्दैवाने आमच्या शेजारी पाजारी बर्‍याच जणांना कमी ऐकु येते. त्यामुळे सगळीकडे मोठ्याने टीवी लावण्याचे प्रकार आहेत. कमी ऐकु येणारे सारेच सिनियर सिटीझन्स, आजोबा कॅटेगरीतले, त्यामुळे भांडायला स्कोपच नाही. काहींच्या घरात तरुणांनाही मोठ्याने टीवी लावण्याची सवय. घरात ऐकु न येणारी माणसे त्यामुळे घरुन कसलाच विरोध नाही.

या सगळ्या प्रकारामुळे अभ्यासाठी कॉलेज्/युनिव्हर्सिटीत जाउन बसणे हा एकमेव उपाय मी माझ्यासाठी शोधुन काढलाय.

पण तक्रार कराल तर वाईट होण्याची तयारी ठेवा, देवा धर्मावर श्रद्धा नाही असे टोमणे सतत ऐकायचीही तयारी ठेवा.

मोठा आवाज होत असताना रात्री १०.०० नंतर १०० ला फोन लावा. तिथे तक्रार करा आणि त्यांना सांगा स्थानिक पोलिस पाठवा. तक्रार करताना हे म्हणा की मा. हायकोर्टाचा आदेश आहे ना की रात्री १०.०० नंतर ध्वनिवर्धक बंद ठेवले जावेत? येतोय ना तुम्हाला आवाज ? असे बोलणे रेकॉर्ड होत असते. यावर जर काही झाले नाही तर दुसरा फोन करा. १०:३० वाजता. पोलीसांना सांगा १०:०० वाजता केलेल्या तक्रारीवर जर दखल घेतली नाही तर न्यायालयाचा अपमान झाला अशी तक्रार करीन.

जमल्यास या फोन कॉल चे व्हीडीओ रेकॉर्डींग करुन ठेवा ( तुमचा मोबाईल अथवा लँड लाईन स्पीकर मोड वर ठेऊन तक्रार नोंदवता त्या अधिकार्‍याचे नाव विचारा. )

आवाजाचा अतिभयानक त्रास आमच्या कॉलनीच्या गणपतीत अनुभवला आहे. ह्या भक्तांना आवरणे कठीणच नाही तर नामुम्कीन आहे हे लक्शात असूद्या. मनस्वास्थ्य सांभाळायला मेडिटेशन वगैरे करा. फार कठीण दिवस आले आहेत शांतताप्रेमींसाठी.

अगोदर शेजार्‍यांना विचारा हे किती दिवस चालणार आहे?.थोड्या काळासाठी असेल तर त्यांच्या बद्द्ल क्षमाभाव ठेऊन सहन करा.

शेजार्‍यांशी वाईट पणा न घेता स्पॉक म्हणतायत तसे तुम्हा दोघांच्या ओळखीतल समाजातले वजनदार व्यक्ती तसेच ४-५ ईतर शेजारी मध्यस्थ घेऊन नम्रपणे त्या घरातील सगळ्यांना समोर बसवुन समजावुन बघा.
तरीही नाही एकले तर,पोलिस कंप्लेंट करणे योग्य ठरेल.

मोठा आवाज होत असताना रात्री १०.०० नंतर १०० ला फोन लावा. >>>
नितिन चंद्र, आधी एकदा सांगितल्यावर रात्री १० नंतर वाजवयचं बंद केलय, पण सध्या पहाटे ४-७ किंवा रात्री १०च्या आधी वाजवणे चालु असते. थोडे दिवस सहन करु शकतो रोजच रोज सहन करणे अवघड झाले आहे.

शेजारी म्हणजे त्यांची आणि तुमची भिंत कॉमन आहे का ?
तसे असेल तर त्याचा आवाज तक्रार करण्याइतका मोठा आहे का हे पडताळून पहा आणि मगच तक्रार करा. तक्रार करताना आनखी काही शेजारी बरोबर घ्या.
आवाज तक्रार करण्याच्या मर्यादेच्या आत असेल तर व्ययक्तिक पातळीवरच प्रश्न सोडवावा लागेल.

अग्निपंख,

हा जर हरिपाठ असेल तर दिवसात एकदाच केला जातो ज्याची वेळ सहसा सायंकाळी ७ वाजता असते. हरीपाठ अर्ध्या तासात संपतो. यापेक्षा जास्त म्हणजे पहाटे फक्त काकड आरती असते ती सुध्दा कार्तीक महिन्यात. सध्या त्याचे प्रयोजन नाही. ध्वनीवर्धक लाऊन हरीपाठ कुठे केला जात नाही.

अती उत्साही भक्तांचे हे काम दिसते. थोडे दिवसात बंद पडेल. ज्या ठिकाणी हे चालले आहे ते मंदीर / घर बेकायदेशीर आहे का याचा तपास करा. मंदीराच्या आड बरीच बांधकामे लपविण्याचा प्रयास असतो. मंदिराला नोटीस आली की हे असले उपक्रम सुरु होतात.

Samopacharanech ha prashn suTel. Maajhya mate high court order fakt loud speakers baddal aahe. Normal aavaajaasaaThee naahee. Itar shejaRyanche sahakary miLatey kaa Te bagha. Sarvaanee Tharavun tynchya gharee jaa aaNi vinanti karaa.

शेजारी म्हणजे त्यांची आणि तुमची भिंत कॉमन आहे का ?>>
भिंत कॉमन नाही मध्ये एक २० फुटी रस्ता आहे तरीही हा आवाज येतो, (सध्या दारे खिडक्या साउंड प्रुफ नाहित, करुन घ्यायचा विचार चालु आहे). हे मंदिर नाही त्या व्यक्तिचेच घर आहे.
नितिनचंद्रजी->
भक्त अतिउत्साही आहेच, तो वारी वगैरे सर्व करतो, ध्वनीवर्धक लावत नाही पण जो टाळ वाजवतो तो बर्‍याच मोठ्या आवाजात वाजवतो, डोक्यावर बसुन कोणीतरी हातोडी मारत असल्याचा भास होतो.

हे किती दिवसांपासुन चालले आहे ? >>
नाही हो बर्याच दिवसांपासुन हे चालु आहे, एकदा-दोनदा समजवल्यावर थोडे दिवस बंद झालं होतं आता पुन्हा सुरु झालय Sad

कानात बोट घालुन उभा आणि प्रचंड वैतागलेल्या विठ्ठलाच पोस्टर लावा तुमच्या घरावर.....
इतर पब्लिक आणि ते वारकरी नक्कीच विचारणार... त्यावेळेस सौम्य भाषेत सांगा आमचा इठठल मोठ्या मोठ्याने टाळ कुटल्यामुळ खुपच वैतागलेला आहे. काय कराव जरा सांगाल का?????

किलोभर कापुस आणि वातींच मोट्ठ पाकिट गिफ्ट म्हनुन द्या त्यांना. देताना सांगा आमच्यासाठी आणला होता. १ किलोवर १ किलो फ्री होता म्हण्टल तुम्हाला पण कानात घालायला लागत असणारच. आणि वाती देवापुढ लावायला आणल्यात.

कानात बोट घालुन उभा आणि प्रचंड वैतागलेल्या विठ्ठलाच पोस्टर लावा तुमच्या घरावर....

हा जबर्‍या उपाय आहे . नक्की लावा !

देवाची आरती करत आहे ना ? यात काय प्रोब्लेम ? गणपती उत्सवात तर घरोघरी १-२ तास आरती चालते. देवाचेच नाव घेतोय कुठला अश्लिल गाणे जोरजोरात तर वाजवत नाही ना. एक वेळ अजानच्या आवाजाचा त्रास होत आहे हे समजू शकतो. पण देवाच्या आरतीचा त्रास होतोय हे नवलच आहे.
विनंती करुन थोडे आवाज कमी करा म्हणून सांगावे. अन्यथा घर साउंडप्रुफ करुन घ्यावे.

धन्यवाद

सुशांत जबरदस्त उपाय आहे आवडला..
पण त्याआधी सगळ्यांनी सुचवल्याप्रंमाणे (पुन्हा) एकदा शजारील व्यक्तींना बरोबर घेउन समजावण्याचा कार्यक्रम करतो..
दिनेश्क : गणपती, नवरात्र इ इ १० दिवसांचा प्रश्न आहे, रोजच असेल तर काय करणार.. (आणि हो घर साउंड प्रुफ करायचच आहे (वरतीसुद्धा लिहिलय तसं) पण खिडक्या बदलण्यासाठी बरिच तोडफोड होइल ते लगेच करता येणार नाही)
आणि हो, देवाची आरती काय किंवा अश्लिल गाणे काय, स्पिकर/ वाद्ये आणि मानवजातीचे कान यांना त्याने काहीही फरक होत नाही, स्पिकर्/वाद्ये तेव्हढ्याच db चा ध्वनी करणार आणि तो तेवढ्याच जोराने कानावर आदळणार तुम्ही आरती लावा नाहीतर अश्लिल गाण लावा.

ह्या भक्तांना आवरणे कठीणच नाही तर नामुम्कीन आहे हे लक्शात असूद्या. मनस्वास्थ्य सांभाळायला मेडिटेशन वगैरे करा. फार कठीण दिवस आले आहेत शांतताप्रेमींसाठी.>>>>>>>>>>>>>>> मेधाव्ही+१०००००००

अगोदर शेजार्‍यांना विचारा हे किती दिवस चालणार आहे?.थोड्या काळासाठी असेल तर त्यांच्या बद्द्ल क्षमाभाव ठेऊन सहन करा.

>>

किती दिवस म्हणजे काय ? अहो ते वैकुंठाला जाईपर्यन्त चालणार हे उघड आहे ::फिदी:

वैकुंठाला जाईपर्यन्त चालणार हे उघड आहे>>
तो तरुण आहे,(२५-२६ चा असावा) इतक्यात वैकुंठाला जायची शक्यता कमी आहे. इतके दिवस एकटाच वाजवत असे आता बायको, आणि पुज्य मातोश्री पण वाजवतात..

काही दिवसानी पोरे पण सामिल होतील आणी ल्हान पोर कस्स वाजवतय याच कौतिक बघायला तुम्हाला बोलवतील अशी आता शन्का आहे.

Pages