परवा रात्री माझी रुममेट कम मैत्रीण ऑफिसमधुन आली . रात्री ११.३० १२ पर्यंत सतत फोनवर होती . एकुणच खुप वेगळी वागत होती . नेहमी घरच्यांसोबत बोलत असताना हसत खेळत ओरडत चालणार बोलणं त्या दिवशी गरजेपेक्षा जरा जास्तच शांत आणि गंभीर होत . सुरुवातच काय, कधी, कसं अश्या शब्दांनी झाली. काहितरी विपरित घडल्याचा स्पष्ट संकेत होता तो..
तिच्या सख्ख्या मावसभावाने गळफास लावुन घेतला होता. नुकत्याच लागलेल्या १०वी च्या निकालात ६५% टक्के भेटले होते. घरचे दारचे सगळेच खुष होते त्याच्यावर. वडिलांनी मोबाईल प्रॉमिस केला होता महाशयांना म्हणून तोपन खुप आनंदात होता. पण सगळ्याच गोष्टी हव्या तश्या हव्या त्यावेळी तर होत नाहि ना. इथं पण तसच झालं. आता मोबाईल देणार तर होते पण त्याला आत्ताच्या आत्ता हवा होता.
आईवडिल कामानिमित्त मार्केट मधे जाताना याने वडिलांना मोबाईल बद्दल टोकलं . वडिल काय ती घाई म्हणुन कुरकुरले.. मनात आकस पकडून थांबा आता आणि बघाच मी काय करतो म्हणुन धमकी देऊन घरात गेला. हे नेहमीचच आहे म्हणुन आईवडिल पन मार्केट ला निघुन गेले. परतल्यावर पाहतो तर पोरगा आढ्याला लटकुन. वडिलांनीच खाली उतरवल त्याला.. 
बस एका वाक्याची देर आणि हातातोंडाशी आलेलं लेकरु परत कधी दिसलचं नाही ..
कुणाची चुकी ?
वडिलांची ? कि दम धर दोन दिवस म्हणून सुनावलं ?
काय दशा झालीय त्या मायबापाची.. एका मोबाईलपाई लेकरु नाहिसं झालं. आयुष्यभर खात राहिलं त्याच हे जाणं त्याच्या वडिलांना. राहुन राहुन स्वतःचा राग करणार ते.. शेवटपर्यंत क्षणाक्षणाला ती खंत वाटत राहाणार कि का ओरडलो त्याच्यावर आपण.. कदाचित, कदाचित तो एक मोबाईल घेऊन दिला असता तर घर असं खाली नसतं राहिलं ..
असे कसे हे पोर आजकालचे कि एक शब्द पन नाही झेलु शकत मायबापाचा ? धमकी दिल्यावर ते आत येतील अस त्या पोराला वाटल आणि त्या नादात घाबरवण्यासाठी केलेल्या प्रयोगात स्वतःचे प्राण गमावले ? कशासाठी ? कुठुन आला असेल हा दिमाग ?अशा कुठल्या घटनेतुन प्रेरणा घेतली असेल कि वाटल आपल्या ह्या धमकीपाई आपल्याला हव ते मिळून जाईल ?
महिन्यापुर्वी आधीचा मोबाईल हरवला होता त्याचा ; ज्यावर तोडगा म्हणुन वडिलांनी पेपर झाल्यावर नवा फोन देतो अस म्हटल होत.. मग काय दोन दिवस सुद्धा धीर धरता येऊ नये या पोरांना ..
I wonder आजकालच्या पोरांची स्वतःच्या मायबापाबद्दलची tolerence limit इतकी कशी कमी झालीय ?
झालीय हे नक्की . पण इतकी अतिरेकी ?
पोरगा तर त्याच्या मुर्खपणापायी गेला, but God bless his father .. 
(No subject)
अत्यंत दुर्दैवी घटना!
अत्यंत दुर्दैवी घटना!
दुर्दैवी घटना. मी तरी त्या
दुर्दैवी घटना. मी तरी त्या मुलाचीच चूक होती असं म्हणेन. आपल्याला आपले मायबाप लहानपणापासून पोसतात; प्रसंगी अर्ध-पोटी राहून मुलांच पोट भरतात. कधी कधी त्यांचाही पैश्यांचा प्रश्न असू शकेल हे या वयातल्या मुलांना कळू नये? १०वी ला असलेला मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नव्हे... असो.
योकु +१
योकु +१
आई गं काय लिहू कळत नाहीये पण
आई गं
काय लिहू कळत नाहीये पण देव त्या मुलाच्या घरच्यांना बळ देवो! आयुष्य फार सुंदर आहे and way more precious than a mobile phone!
हम्म!
हम्म!
योकु +१
योकु +१
हा फक्त ह्या मुलाचा दोष
हा फक्त ह्या मुलाचा दोष नाहिये.
सध्या आप्ल्या आजूबाजूला पाहिल्यास बरिच मुल अशी दिसतील.
नकार पचवण्यास आपण्च त्याना शिकवत नाही त्यामुळे असा आततायी निर्णय घेतात.
सर्व कहि मागितल्या बरोबर आपण
सर्व कहि मागितल्या बरोबर आपण देऊन त्याना
नाही मिळनार किन्वा नकार एकायला शिकू देत नाही.
मानसिक आजारी होत चाललो आहोत आपण.
देव त्या मुलाच्या घरच्यांना बळ देवो!
(No subject)
खुप वाईट वाटलं, वडील तर हतबल
खुप वाईट वाटलं, वडील तर हतबल झाले असतील.
यात दोष कुणाचा नव्या पिढीचा
यात दोष कुणाचा नव्या पिढीचा कि जुन्या पिढीचा हे सांगणं फारंच कठीण आहे. घडलेली घटना हि वाईटच आहे. पण या सगळयाला सध्यपिढींवर होणार्या बाह्यसंस्कार, बदलणारे राहणीमान कारणीभूत आहे असे वाटते. पुर्वीच्या काळातही हट्ट होते, घरातली आणि बाहेरची असलेल्या परिस्थितीनुसार थोड्याफार प्रमाणात ते हट्ट पुरवलेही जायचे. त्यावेळेसच्या पालंकांना समजूतही घालता येत होती. पण आताशा ते करणं तितकंसं सोप्पं राहीलेलं नाहीये. मध्यंतरी अशाच एका शाळकरी मुलाने जॅकेट घेण्यासाठी हट्ट धरला आणि तो पुर्ण न झाल्यामुळे आत्माहत्या केल्याचं वाचनात आलं होतं. बाहेरच्या जगात सहज उपलब्ध होऊ शकतं तर मग आपल्याकडे का नाही? असा प्रश्न उभा राहत असावा.
बाहेरच्या जगात काहीही उपलब्ध
बाहेरच्या जगात काहीही उपलब्ध असतं, मुलानी मागणी केली म्हणून काही गोष्टी घेऊन देण्यात पालक मागेपुढे पाहाणार नाहीत; कुठपर्यंत? जर ती गोष्ट सहज आवाक्यात असेल तर.
मोबाईल, ब्रॅंडेड कपडे काही अॅक्सेसरीज वगैरे अश्या सहज आवाक्यात नसतात, बर्याच लोकांच्या. पुन्हा, जरी बजेट अॅडजस्ट करून त्या घेऊन दिल्या तरी मुलांना त्या कश्या वापराव्यात, त्याकरता जे पैसे ओतलेयत ते कमवण्याकरता किती मेहेनत लागते ही पाचपोच नसते. मग त्या वस्तू लगेच खराब होतात. पुन्हा चक्र फिरतंच.
अतिशय दुर्दैवी घटना. मुलगा १२
अतिशय दुर्दैवी घटना.
मुलगा १२ वीत होता म्हणजे इतका लहान नव्हता. थोडे संस्कार आणि बराचसा पगडा हा पीअर गृपचा असतो अशा बाबतीत. सह अध्यायी मुलांच्यात बेट्स्/चॅलेंजेस असे प्रकार अनेकवेळा पहायला मिळतात आणि त्यातूनच अशा दुर्दैवी घटना घडतात. ओळखीत एक मुलगा रात्री जेवायला मित्रांसोबत गेला होता. ३ बाईक्स आणि टोटल ५ मित्र. येताना रस्ता पुर्ण मोकळा म्हणून रेस लावायची ठरली. गाडीची अधिक अधिक क्षमता वापरून वेग वाढत गेला. या मुलाची गाडी स्किड होऊन हा घसरत सरळ झाडाच्या बुंध्यावर डोक्यानिशी आपटला आणि तिथल्या तिथे गेला. यात आई बापांची काय चूक?
वरच्या घटनेत सुद्धा आई वडिलांची चूक नाही. वेळ चुक होती. आपल्या वेळी पण आई वडिलांना आर्थिक अडचणी होत्या. पोरांचे हट्ट पुरवणं वगैरे तेव्हा ही अवघडच होतं. आता पैसा आला आहे आणि हट्ट मोठे झालेत त्यामुळे येऊन जाऊन चोकिंग सिच्युएशन्स तशाच आहेत. एक्पोजर इतकं वाढलंय की आपल्या पाल्याला काय शिकवावं आणि किती शिकवावं हा एक मोठा प्रश्नच आहे.
वर कुणितरी लिहिल्याप्रमाणे नकार पचवणं ते ही त्या मागची परिस्थिती हेल्दिली समजावून घेऊन हे फार महत्वाचं आहे. किती घोर आई वडिलांच्या जिवाला
अजून एक ओळखिचे आहेत त्यांच्या पण १० वर्षाच्या मुलिने नायलॉनच्या दोरिने गळफास लावून घेतला होता. आई फक्त भाजी आणायला घरा बाहेर गेली होती. कारण काय, कशासाठी आजतागायत माहिती नाही. मुलांना बहुतेक अशा अॅक्ट्स से परिणाम काय होतील ते कळत नाहीत. मोठ्यांना घाबरवायला शस्त्र म्हणून वापरायला जात असतील आणि हकनाक जीवाला मुकत असतील
मोठ्यांना घाबरवायला शस्त्र
मोठ्यांना घाबरवायला शस्त्र म्हणून वापरायला जात असतील >>> पण शस्त्र म्हणून डायरेक्ट गळफास??
नक्की कसला परिणाम आहे पण हा? पीअर की टीव्ही डेलीसोप्स की इंटरनेट की अजून काही? जरा काही नाही/नको म्हटलं की भयंकर तनफन असते या मुलांची आणि अगदी तीही अत्यंत क्षुल्लक कारणांवरून.
मुलांना बहुतेक अशा अॅक्ट्स
मुलांना बहुतेक अशा अॅक्ट्स से परिणाम काय होतील ते कळत नाहीत. मोठ्यांना घाबरवायला शस्त्र म्हणून वापरायला जात असतील आणि हकनाक जीवाला मुकत असतील >>
पण शस्त्र म्हणून डायरेक्ट गळफास??
नक्की कसला परिणाम आहे पण हा? पीअर की टीव्ही डेलीसोप्स की इंटरनेट की अजून काही? जरा काही नाही/नको म्हटलं की भयंकर तनफन असते या मुलांची आणि अगदी तीही अत्यंत क्षुल्लक कारणांवरून. >>
हेच तर म्हणतेय . मुळात ना ऐकण्याची तयारीच नाही ..
दक्षिणा मुलगा १०वीत होता ..
यांना नेमक जगण्यामरण्याचच काही सोयरसुतक नाही अस वाटत मला .. एखाद्या गोष्टीचा बाऊ का करावा किंवा त्याचे परिणाम किती भयंकर असतात हेच जर माहिती नसेल तर मग त्या गोष्टींमधे भिती राहणारच नाही ना.. पोर जर आजच्या जगात मरणाला पण गम्मत / धमकी यात तोलत असणार तर पुढेमागे कठीण होणार ..
मित्र .. हाच विचार मला सुद्धा आला. या वयात माझ्यामते आईवडिलांपेक्षा मित्रमैत्रीणींचा जास्त इंपॅक्ट असतो पोरांवर आणि तेच जर चांगल फ्रेंडसर्कल मिळालं नाही तर पोर मोस्ट ऑफ द टाईम बिघडतात.. या घटनेतसुद्धा मलातरी मित्रांच्या उगा चढवण्याचा पण परिणाम वाटतो.. महिना दिड महिना जेव्हा तो बिनाफोनने राहतोय तर पुढले २ ३ दिवस तर नक्कीच काढू शकला असता ..
अत्यंत दु:खद घटना आहे. त्या
अत्यंत दु:खद घटना आहे. त्या आईवडिलांसाठी डोळ्यात पाणी आलं.
पण मला वाटतं ह्यात चूक / जबाबदारी बरीचशी त्यांचीही आहे. मुलं आपण घडवू तशी घडतात. आणि बहुतांशी त्यांच्या वागण्यामागे घरात जे बघतात त्याचच प्रतिबिंब दिसतं. अशी टोकाची भुमिका घेणे हे प्रत्यक्ष आयुष्यात दिसल्यावरच अनुकरण करायचे सुचतं. त्याशिवाय टीव्ही मालिकांमधे दिवसेंदिवस वाढत जाणारी विकृती बघून हेच वागणे बरोबर आहे अशी मुलांची समजूत होत जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा पालकांनी जागरुक राहुन मुलांच्या मनःस्वास्थ्याचा अंदाज घेत रहाणे ही काळाची गरज आहे.
कधी नकारच न मिळालेली व्यक्ती नकार पचवू शकत नाही. ह्या घटनेत मला तसेच काहिसे झाल्याची शक्यता वाटते.
आज १० वी ला ८०-८५% खाली मार्क मिळाल्यास पालकांच्या चेहर्यावर आठ्या पडतात. ह्या मुलाला ६५% मार्क असताना पालक खुश होते? मोबाईल घेऊन देण्याचे वचन वगैरे दिले होते? मग १२ वी ला जेमतेम पास झाला तरी लॅपटॉप, नवीन कोरी बाईक वगैरे देणार का?
कदाचित मित्रांपेक्षा कमी मार्क मिळाल्याचे नैराष्य तो नवीन कोरी मोबाईल मिळवून झालू ईच्छित होता. किंवा मनात साठलेल्या नैराष्याला वाट मिळायला मोबाईलचे निमित्त झाले. निकालानंतर आईवडिलांनी त्याच्याशी जरा "सिरियस टॉक" करायला हवा होता का? अशा निकालानंतर मुलावर जरा जास्त लक्ष ठेवणे हा धडा ह्या घटनेतुन शिकलो.
मान्य कि प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा/मुलगी राजपुत्रा/कुमारी प्रमाणे असतात आणी आपल्याला पडले ते कष्ट त्यांना पडू नयेत अशीच त्यांचे ईच्छा असते. पण जगात सगळं मनासारख मिळत नाही आणि कष्टाला पर्याय नाही हे सुद्धा त्यांनीच शिकवायचे असते. अपयश आल्यास नुसतं ठिक आहे न म्हणता प्रसंगी रागावणे / शिक्षा करणे हे लहानपणापासुन झाले नाही तर मोठेपणी असा त्रास होण्याची शक्यता अधिक.
टीना, मुलांना घरची आर्थिक
टीना, मुलांना घरची आर्थिक स्थिती माहीत नसते कि काय, असे वाटत राहते. आपल्या कुटुंबाची मिळकत किती, आपले खर्च किती याची कल्पना आपण का देत नाही.
आत्मप्रौढी म्हणून नाही, पण संदर्भ आहे म्हणून लिहितो. आमच्याही घरी वडील एकटेच मिळवते. खाऊनपिऊन सुखी होतो तरी मागेल ती वस्तू मिळेल अशी चैन परवडणारी नव्हतीच. त्यामूळे हट्ट केला तर आई किंवा वडील आम्हाला समजेल अशा भाषेत पण ठामपणे खरी परिस्थिती सांगत. आणि शक्य नसेल तर खोटी आश्वासने कधीच देत नसत.
आजकाल मूलांना ही जाणीव नसतेच ( किंवा करून दिली जात नाही. ) माझ्या मित्राकडे आहे ना, मग मला पाहिजे. जाहिरात होतेय ना, मग मला पाहिजे. असाच विचार डोक्यात असतो.
+१ दिनेशदा.
+१ दिनेशदा.
चौकट राजा ती फॅमिली साधारण
चौकट राजा ती फॅमिली साधारण होती .. वडिल नोकरी करत तर आई गृहिणी होती . एक छोटा भाऊ पण आहे ६वीत . गाव पण जास्त काही मोठ नाही . तालुक्याच ठिकाण आहे . राहता राहिला हट्ट पुरवण्याचा प्रश्न तर साधारण कुटुंबात सगळ काही लवकर हाती येत नाही .. पैश्याच्या तडजोडीपाईच वडिलांनी कुरबुर केली त्याच्यावर. प्रत्येक पालकाला आपलं लेकरु कुठवर मार्क घेईल हे माहितीच असतं त्यामुळे मी ६५% वर ते खुष होते अस लिहिलयं . तो मुलगा साधारण बौद्धिक क्षमता असणारा होता..
टीना, मुलांना घरची आर्थिक स्थिती माहीत नसते कि काय, असे वाटत राहते. आपल्या कुटुंबाची मिळकत किती, आपले खर्च किती याची कल्पना आपण का देत नाही. >> तेच तर दिनेशदा ..
माझ्याकडे आई पप्पा दोघेही नोकरीवर तरी १२वीत हरवलेला मोबाईल आत्ता तुझ्यासाठी म्हणुन घेउन दिला .. तोपर्यंत साधा मोबाईल आईचा चलता है चलने दो कॅटेगरीत ..गाडी (बाईक) पण स्वत:ची आता हाती आली.
उलट माझ्या कॉलनीमधे जे एकुणएक पोर नापास झाली ना त्यांच्या प्रत्येकाच्या हातात आठवडा दोन आठवड्यात गाडी.. तेव्हाचे टच स्क्रिन फोन .. सगळ टॉपटिप .
ह्या घटनेत तेच कळत नै.. तो पोरगा घरची परिस्थिती सगळ समजुन उमजुन होता. वडिल हरेक हट्ट पुरवणार्यातले पन नव्हते.. दक्षिणा म्हणते तसचं . वेळ चुकिची होती . कसलतरी गारुड होत त्याच्या मनावर आज आत्ता ताबडतोब हवं म्हणुन..
म्हणतात ना, Suicide is a permanent solution on a temporary problem.. मुर्खपणा बस..
सदर घटनेबाबत लगेच कोणाची चूक
सदर घटनेबाबत लगेच कोणाची चूक असावी असा निष्कर्श नाही काढू शकत. नेमकी परीस्थिती त्यांनाच ठाऊक.
पण पालकांसाठी अश्यावेळी खूप वाईट वाटते. त्यांचे काही चुकले नसण्याची शक्यताच यात जास्त वाटते.
योग्य संस्कार लावायला हवेत किंवा चाईल्ड सायकोलॉजी समजून घ्यायला हवी असे बोलायला सोपे असते पण लहान मुलांबाबत बोलायचे झाल्यास स्वभाव हा उपजत असतो, त्याचे सहजासहजी फार काही करता येत नाही.
हल्ली अश्या घटना कानावर बरेच ऐकू येतात हि चिंतेची बाब आहे खरी. पण आपल्यावेळीही एका भावनिक क्षणी असा विचार करणारी मुले असावीतच.
ईतर कश्याला माझ्याही मनात लहानपणी बरेचदा असे विचार यायचे की अमुकतमुक माझ्या मनासारखे नाही होत आहे तर स्वताच्या जिवाचे बरेवाईट करून घेतो मग बसतील रडत. पण भावनेचा आवेग ओसरताच दुसर्या बाजूने विचार करायचो की माझ्यावर आईवडिलांचे प्रेम आहे म्हणूनच तर माझ्या मनात असा विचार आलेला.
नंतर पुढे अक्कल आली तेव्हा जाणवले बरे झाले एखद्या नाजूक क्षणी कुठला वेडेपणा नाही केला.
स्वताच्या अनुभवावरून माझ्या मुलांशी कसे वागायचे हे मी मनोमन ठरवले तर आहे. पण माझ्या मुलांचा स्वभाव माझ्यासारखाच असेल असे नाही. त्यामुळे हे केस बाय केस बदलणार. म्हणून तुर्तास असे आपल्या शत्रूशीही होऊ नये हिच प्रार्थना.
टीना झाले ते खरच वाईट झाले.
टीना
झाले ते खरच वाईट झाले. त्याच्या आई बाबान्च्या भावना समजतायत.
पण आताच्या पिढीला नकार पचवता येत नाही हेच खरे. पण ते शिकले/ शिकवले पाहीजे.
दिनेशजी, खरच तुमच्या आई बाबान्मुळे तुम्ही पण उत्तम माणुस झालात.
पण भावनेचा आवेग ओसरताच
पण भावनेचा आवेग ओसरताच दुसर्या बाजूने विचार करायचो की माझ्यावर आईवडिलांचे प्रेम आहे म्हणूनच तर माझ्या मनात असा विचार आलेला.
नंतर पुढे अक्कल आली तेव्हा जाणवले बरे झाले एखद्या नाजूक क्षणी कुठला वेडेपणा नाही केला.
>> ऋन्मेष हे तु फारच समजूतदारपणे लिहिलं आहेस, असा विचार मुलं करत असतील असं मला नाही वाटत. अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसायचा तसं आजकालच्या मुलांना फक्त गॅझेट्स दिसतात. त्यासाठी आईवडिलांना खस्ता खाव्या लागतात इ. ची जाणीव असेल असं मला वाटत नाही. कारण इतर मित्रांकडे या वस्तू सहजगत्या आलेल्या पाहिल्या असल्या की आपल्याही हातात पटकन येतील असंच काहीसं वाटत असावं.
मी शाळेत असताना मला वादिला बाबा ड्रेस घ्यायला पैसे द्यायचे नाहीत मी रडून गोंधळ घालत असे. साधी ३०० रूपये तुम्हाला देता येत नाहीत का असा प्रश्न मी अनेक वर्ष त्यांना केला असेल. पण मोठं झाल्यावर ३०० रूपये कमवायला काय करावं लागतं याची जाणिव झाली आणि लाज वाटली. पण वेळ हातून निघून गेली होती. सुदैवाने आत्महत्या किंवा आईवडिलांना धडा शिकवण्याचा विचार कधी मनाला शिवला नाही.