ओपिनियन पोल - काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य आणि भरवशाचे उमेदवार कोण?

Submitted by मधुकर विनायक देशमुख on 10 June, 2015 - 14:39

गेल्या सुमारे दोन वर्षांतील सर्व निवडणूकींत एक बाब प्रकर्षाने पुढे आलेली आहे ती म्हणजे १२५ वर्षांचा इतिहास मिरवणार्‍या काँग्रेस पक्षाची झालेली दारुण अवस्था! अनेक राज्यांच्या निवडणूकीत काँग्रेसला सतत हार पत्करावी लागली. लोकसभेची निवडणूक हा त्याचा कळसाध्याय होता. नंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत आम आदमी पक्षाने सर्वांचीच दिल्लीतली सद्दी संपवली.

सोनिया गांधी वयोमानपरत्वे काँग्रेसचं नेतृत्व किती काळ करु शकतील याची कोणालाच कल्पना नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेवर खुद्द काँग्रेसमध्येच किती जणांचा विश्वास आहे हा वादाचा मुद्दा. राहता राहिल्या प्रियांका गांधी, परंतु आपल्या पतिराजांच्या जमिनीच्या घोटाळ्यांमुळे त्या कोणत्याही क्षणी विरोधकांचा निशाणा ठरण्याची शक्यता.

अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कोणाच्या हाती देण्यात यावी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कोणाच्या हाती देण्यात यावी? >> मला तर दोनच पर्याय दिसत आहेत... नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल.

नरेंद्र मोदी!
या माणसाचा परिसस्पर्श झाल्याशिवाय भारतातली एकही पॉलिटिकल पार्टी तगणे शक्य नाही.
मोठमोठी बिझनेस हाऊसेस कशी एकमेकांचे एंपायर टेकओवर करतात तशी मोदींनी आता काँग्रेस टेक ओवर करावी.
आप सुद्धा करावी.
मुद्दामहून छोटे मोठे इनसिग्निफिकंट पक्ष मोकळे राहु द्यावेत.

मज्जा येईल.

कोण प्रमुख व्हाव यापेक्षा

कोण प्रमुख व्हाव यापेक्षा गांधी घराण्याची एकाधिकारशाही संपवण महत्वाच आहे अस मला वाटत ..
कितीही काहीही होउदे सत्ता त्यांच्याकडेच राहणार हे खुप विचित्र वाटत ..
ते गेल्यावर एकदा मग पायलट येवो किंवा ज्योतिरादित्य येवो चालेल ..
भाजप मध्ये वरुण आणि मेनका गांधी यांची जी पातळी आहे तशी कोंग्रेस मध्ये राहुल आणि सोनिया गांधी यांची असायला हवी ..

एकाच गोष्टीवर 3 धागे? ते ही मतभिन्नता असणार्यांकडून निघाले यातच उद्देश कळून चुकतो.
चालू द्या

धन्यवाद

काँग्रेसने आपला कारभार दिल्लीतून चालवू नये.
प्रत्येक राज्यात कॉग्रेसच्याच नावाने वेगळे प्रादेशिक पक्ष तयार करावेत , जसे क्ष कॉन्ग्रेस, य कॉग्रेस वगैरे आणि सर्व कारभार प्रादेशिक पातळीवरच पहावा,निर्णय, चर्चा जिथल्या तिथेच कराव्या आणि राष्ट्रीय पातळीचे पश्न मतदानाने सोडवावे, कॉग्रेस पक्षात आता कोणीही नेतृत्व केले तरी ते इतरांना खूपते त्यामुळे राष्ट्रीय पक्ष विदाउट लिडर असे समीकरण केले तरच कॉग्रेस टिकेल .

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य आणि भरवशाचे उमेदवार कोण असायला हवे हे ठरवण्याचा अधिकार त्या पक्षाच्या कार्यकर्त्यान्नाच असायला हवा.

काँग्रेस पक्षात घराणे शाही आहे अशी अनेक दशके तक्रार करणार्‍या बाळासाहेब ठाकरे यान्च्या शिवसेने मधे काय आहे ? आज उद्धव यान्च्या कडे सुत्रे आहेत आणि भविष्यात आदित्य यान्च्याकडे नेतृत्वाची धुरा येणार आहे. उद्धव यान्ची निवड झाल्यावर बाळासाहेब म्हणायचे "मी नाही त्याला निवडले, सामान्य सैनिकान्नीच उद्धवची निवड केली, राजने पुढाकार घेतला". हजारो लायक शिवसैनिक पक्षात असताना पुत्रप्रेमापुढे सर्व थिटे पडले. पवारान्च्या राष्ट्रवादीमधे काय आहे ? ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट हे पण घराणेशाहीचाच वारसा पुढे नेत आहेत. मग कॉन्ग्रेसमधेच घराणे शाहीची तक्रार कशाला करायची.

राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला राजकारणात येण्याचे अधिकार आणि स्वातन्त्र्य दिले आहे. राहुल गान्धी यान्चे पणजोबा, आजी, वडिल राजकारणात होते, देशाचे पन्तप्रधान होते ह्या गोष्टीन्मुळे खरे तर त्यान्च्यावर (काही तरी सिद्ध करण्याचे) अनेक पटीन्नी दडपणच येत असेल. त्या दडपणामुळे त्यान्ना फायद्यापेक्षा अडचणच जास्त होत असेल.

मी कुणाचेही नाव सुचवणार नाही कारण मी कॉन्ग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किव्वा साधा सभासदही नाही आहे. Happy

पवार व ठाकरे ह्यांचे पक्ष त्यांनी स्वतः स्थापन केलेले पक्ष आहेत. > काँग्रेस (आय) ईंदीरा गांधीनी स्थापन केलेला पक्ष आहे. Happy

काँग्रेस (आय) ईंदीरा गांधीनी स्थापन केलेला पक्ष आहे > बरोबर टिव्ही. दुसर्‍या एका धाग्यावर जुनी काँग्रेस विसर्जित केली वगैरे बोलणारे लोकच आता अगदी विरुध्द बोलत आहे. Happy

धन्यवाद

एका विनोदी पक्षासाठी दिग्गज लोक किती गहण चर्चा करत आहेत!
गंमत आहे.

चर्चा करणार्‍यांना विनोदी म्हणाव की पक्षाला?

काँग्रेस (आय) ईंदीरा गांधीनी स्थापन केलेला पक्ष आहे.

>>> हे माहीत नव्हते. पण मग काँग्रेस आय आणी आपण जी काँग्रेस आत्ता बघतोय ते पक्ष एकच का वेगवेगळे आहेत?

माणिकराव गावित.
अराउंड नऊ वेळा विधानसभेत बिनविरोध का काय ते निवडुन आल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

कावळा म्हणे एकाक्ष असतो, त्यामुळे "प्रोयंका गांधी " झाल वाटत !

आणि कदाचीत त्यांच्या धर्मात " प्रियांका " म्हणण चालत नसाव कदाचीत !!

आदरणिय वंदनिय मायबोली अ‍ॅडमिन महोदयांनाच हे जमु शकेल. एवढा मोठा मायबोलीचा पसारा आणि काँग्रेस मधे फारसा फरक नाही.शिवाय त्यांना जास्तच डोईजड झालेल्यांना 'उडवायचे' कसे याचेही ज्ञान आहेच. कुणाकडे डोळेझाक करायची, कुणावर पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारायचा अशा गोष्टी ते लिलया करु शकतात. त्यामुळे माझे मत माबो अ‍ॅडमिननाच! Light 1

प्रत्येक विषयावर पचकण्याची आणि येनकेन प्रकारेण दुसर्‍याला उचकवण्याची खोड काही जात नाही!
शेवटी मानसिकताच ती असल्याने असले प्रकार होत असावे

धन्यवाद

पगारे साहेब,
वरच्या काही प्रतिक्रीया वाचून कोण दीर्घद्वेषी आहे हे तुम्हीच ठरवावे.
दुर्लक्ष या शब्दाचा अर्थ न कळणार्‍या लोकांपुढे शहाण्याला शब्दाचा मार ही म्हणही खोटी ठरते.

Pages