ओपिनियन पोल - काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य आणि भरवशाचे उमेदवार कोण?

Submitted by मधुकर विनायक देशमुख on 10 June, 2015 - 14:39

गेल्या सुमारे दोन वर्षांतील सर्व निवडणूकींत एक बाब प्रकर्षाने पुढे आलेली आहे ती म्हणजे १२५ वर्षांचा इतिहास मिरवणार्‍या काँग्रेस पक्षाची झालेली दारुण अवस्था! अनेक राज्यांच्या निवडणूकीत काँग्रेसला सतत हार पत्करावी लागली. लोकसभेची निवडणूक हा त्याचा कळसाध्याय होता. नंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत आम आदमी पक्षाने सर्वांचीच दिल्लीतली सद्दी संपवली.

सोनिया गांधी वयोमानपरत्वे काँग्रेसचं नेतृत्व किती काळ करु शकतील याची कोणालाच कल्पना नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेवर खुद्द काँग्रेसमध्येच किती जणांचा विश्वास आहे हा वादाचा मुद्दा. राहता राहिल्या प्रियांका गांधी, परंतु आपल्या पतिराजांच्या जमिनीच्या घोटाळ्यांमुळे त्या कोणत्याही क्षणी विरोधकांचा निशाणा ठरण्याची शक्यता.

अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कोणाच्या हाती देण्यात यावी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, पंतप्रधानपदासाठी जी व्यक्ती लायक वाटते तिलाच आपले मत द्या. आणि तिलाच काँग्रेसचा अध्यक्ष बनवा.

अपार्ट फ्रॉम जोक्,भारतातल्या डायवर्सिटीला अकॉमोडेट करू शकेल अशा मध्यममार्गी पक्षाची भारतीय लोकशाहीला गरज नेहमीच लागणार आहे अन्यथा हा देश टिकणार नाही. काँग्रेस ही गरज नकीच भागवू शकेल प्रोव्हाइडेड त्यानी मुसलमानांबद्दल स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. अनुनयाच्या नावाखाली मुस्लिमांची फसवणूक आधी बंद केली पाहिजे. अन्यथा एम आय एम वाढेल. भाजप मुस्लिमांची मते कधीच घेऊ शकणार नाही कितीही नाटके केली तरी. कारण त्यांच्या अनधिकृत 'प्रवक्त्यां'च्या श्रीमुखातून जे काही येते आहे त्याना डिसओन ' केले जात नाही आहे त्यामुळे तीच खरी त्यांची भूमिका आहे हे आता स्पष्ट होत चालले आहे. भारतासारख्या संमिश्र समाजजीवनात तराजू कोणत्याही एका बाजूला जाणे मान्य होत नाही हे सिद्ध झाले आहे . सध्या भाजपची सत्ता हे काँग्रेसच्या मूर्खपणाला आलेले फळ आहे. राहुल गांधीला जर हाकलले नाही तर काँग्रेसचे मरण अटळ आहे. काँग्रेस केवळ आणि केवळ राहुल गांधीमुळे हरली आहे हे जोवर ते मान्य करत नाहीत तोवर काँग्रेसला भवितव्य नाही....

रॉबिनहूड,

>> भाजप मुस्लिमांची मते कधीच घेऊ शकणार नाही कितीही नाटके केली तरी. कारण त्यांच्या अनधिकृत 'प्रवक्त्यां'च्या
>> श्रीमुखातून जे काही येते आहे त्याना डिसओन ' केले जात नाही आहे त्यामुळे तीच खरी त्यांची भूमिका आहे हे आता
>> स्पष्ट होत चालले आहे.

गुजराती मुस्लिमांनी भाजपला भरघोस मते का दिली असावीत? गुजराती मुस्लिमांचा थोडा जरी विरोध असता तर लोकसभेची किमान एक तरी जागा भाजपकडून निसटली असती. सव्वीसच्या सव्वीस जागा भाजपला मिळाल्या नसत्या. गुजरातेत प्रवीण तोगडिया जाहीरपणे बेताल वक्तव्ये करायचे.

गुजराती मुस्लिमांनी भाजपला भरघोस मते का दिली असावीत? काय अंदाज आहे आपला?

आ.न.,
-गा.पै.

>>>सध्या भाजपची सत्ता हे काँग्रेसच्या मूर्खपणाला आलेले फळ आहे.<<<

'मूर्खपणाला' ह्या शब्दाच्याजागी 'कंटाळ्याला' असा शब्द हवा आहे असे मला वाटते. Happy

हा कंटाळा यायला इतका वेळ लागला की त्याचाच कंटाळा आला हे वेगळे! Happy

>>> राहुल गांधीला जर हाकलले नाही तर काँग्रेसचे मरण अटळ आहे. काँग्रेस केवळ आणि केवळ राहुल गांधीमुळे हरली आहे हे जोवर ते मान्य करत नाहीत तोवर काँग्रेसला भवितव्य नाही.<<<

बेसिकली आत्ताच्या काँग्रेसला भवितव्य नाही आहे. मोदी धूर्त आणि डूख धरणारे आहेत. ते आता नाही येऊ द्यायचे इतर कोणाचे सरकार! आता जबरदस्त करिष्मा आवश्यक आहे जो प्रियांकांच्या आवाक्यातील नाही. काँग्रेसकडे आत्ता नेमका पत्ता नाही आहे. भाजपच्या वाचाळवीरांकडून मोदी सरकार जितके बदनाम होईल त्याच्या शतपट ते बदनाम करणे हे ते फार तर करू शकतील पण त्यातही ते लूझरच वाटतील.

करिष्मा करिष्मा!

Happy

आदरणीय किरण बेदी आणि सदावंदनीय शाजिया इल्मी यांची भाजपला गरज राहिली नसल्यास दोघीही

काँग्रेस केवळ राहुल गांधींमुळे हरली असावी असे मलाही वाटत नाही. पण राहुल गांधी असूनसुद्धा हरली हे महत्त्वाचे आहे. म्हणजे गांधी घराण्याचा करिष्मा कामी आला नाही. पण हरण्याचे कारण गेल्या अनेक वर्षांत सतत पुढे आलेला भ्रष्टाचार, त्यावर कारवाई वेळेवर न होणे, मनमोहन सिंगांची वेळोवेळी पुढे आलेली असमर्थता आणि काही बाबतीत मूक संमती किंवा "पक्षहिता" करता भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई न करणे याला लोक कंटाळले होते.

भाजप येण्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोरात असावा असे वाटत नाही. एक कार्यक्षम सरकार मिळणार आहे व नेहमीच्या भ्रष्टाचाराला विटलेल्या लोकांना काही बदल हवा होता म्हणून अनेकांनी भाजपला मते दिली असावीत. प्रत्यक्ष मतदानात काही टक्क्यांचा फरक आहे त्यामुळे कुंपणावर असलेल्यांनी भाजपला प्राधान्य दिले असे वरकरणी दिसते. पण भारताच्या लोकशाही बद्दल अधूनमधून जे प्रचंड आश्चर्य वाटते तसेच काहीतरी यावेळेस ही झाले - जवळजवळ प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपची टक्केवारी ५-१० टक्क्यांनी वाढली. म्हणजे शक्यता अशीच आहे की कट्टर काँग्रेसवाले त्यांच्याबरोबरच राहिले, कट्टर भाजपवाले भाजपकडेच आले पण काही 'मधले' लोक होते ते यावेळेस भाजपकडे आले - यातले आश्चर्य म्हणजे २००-३०० मतदारसंघांत हे स्वतंत्रपणे झाले. या लोकांनी एकमेकांत ठरवून केल्यासारखे!

बाकी या पोल ला उत्तर काँग्रेसच्या बाजूने विचार केला तर कदाचित प्रियांका गांधी. करिष्मा शिल्लक असू शकेल अशी ती एकच व्यक्ती आहे. नाहीतर पुन्हा सोनिया गांधी, अजून एक प्रयत्न म्हणून. कारण गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस म्हणजे मोदी पुढे येण्याच्या आधीचे भाजप किंवा नेह्मीची विविध जनता दले यांच्यात संघटनात्मक दृष्ट्या काहीच फरक नाही. निर्नायकी अवस्था. कोणी कोणाचे नेतृत्व जास्त काळ मान्य करत नाही. फक्त टॉप ला एक गांधी असला/असली की फरक पडतो.

फारएण्ड,

१.
>> म्हणजे शक्यता अशीच आहे की कट्टर काँग्रेसवाले त्यांच्याबरोबरच राहिले, कट्टर भाजपवाले भाजपकडेच आले पण
>> काही 'मधले' लोक होते ते यावेळेस भाजपकडे आले -

ही शक्यता बरोबर आहे. मोदींच्या उदयापूर्वी भाजपचे लोकसभा मतटक्केवारी १८% च्या आसपास होती. मोदींमुळे ती ३१% वर जाऊन पोहोचली.

२.
>> यातले आश्चर्य म्हणजे २००-३०० मतदारसंघांत हे स्वतंत्रपणे झाले. या लोकांनी एकमेकांत ठरवून केल्यासारखे!

हे शिस्तबद्ध प्रचारामुळे होऊ शकले. कुंपणावरची मते फिरवणे अशी अमित शहांची व्यूहनीती होती. त्यासाठी उदासीन मतदार घराबाहेर पडावा लागतो. जो राजकीय पक्ष उदासीन मतदाराला घराबाहेर काढतो त्या पक्षाकडेच मतदान करण्याचा उदासीन मतदाराचा कल असतो. म्हणूनच अमित शहांनी उत्तर प्रदेशात मतदारांशी घराघरात जाऊन संपर्क साधण्याची योजना बनवली. त्यासाठी तिथे त्यांनी तब्बल आठ नऊ महिने मुक्काम ठोकला होता.

मोदींची हवा अगोदरच झाली होती. फेक्युलर माध्यमांनी गुजरात दंगलींची बोंबाबोंब त्यांचं नाव घराघरात पोहोचवलं. धूर्त मोदींनी आपल्या फुकट प्रसिद्धीचा बरोब्बर वापर करून त्यावर मतं मिळवली. काँग्रेस बसली हात चोळत.

या घडीला काँग्रेसी नेतृत्वात लोकसंपर्काची कितपत जाण आणि आवड आहे? कोण नेता अनुयायांत उत्साह संचारवू शकतो? या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्याच्या हाती सूत्रं जायला हवीत.

आ.न.,
-गा.पै.

>>>कोण नेता अनुयायांत उत्साह संचारवू शकतो?<<<

एक्झॅक्टली! हाच प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचा! की त्यांच्याकडे असलेले सर्वाधिक व एकमेव चलनी नाणे (म्हणजे गांधी-नेहरू परिवारातील व्यक्तीमत्त्व) आता चालेनासे झालेले आहे. त्यांच्यासाठी हे अचानक व धक्कादायक पद्धतीने घडलेले आहे व अजूनही पाठीराख्यांची हे बोलायची हिम्मत होत नाही आहे की आता त्या घराण्याचे महत्त्व थोडे बाजूला ठेवून आपण काहीतरी नवे नियोजन करू. ज्यांनी ही हिम्मत केली त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे.

अजूनही प्रियांका आली तर खळबळ नक्की होऊ शकेल. पण आत्ता सध्या मोदी सरकार जोरात असल्यामुळे आत्ता प्रियांकाचे येणे निरुपयोगी ठरेल. अजून तीन वर्षांनी ती बहुधा समाजासमोर येईल असे वाटत आहे.

२००४ साली भाजप लोकसभा हारला त्यानंतर राज्यांच्या निवडणुकीत देखील हारला. २००९ साली तर त्यांची अवस्था अजुन बिकट झाली दिल्लीच्या लोकसभेच्या सर्व जागा काँग्रेसपक्षाला मिळाल्या वर इतर राज्यांच्या विधानसभेत देखील भाजपाचा दारुण पराभव झाला. सलग दोन अत्यंत दारुण पराभव झाल्यामुळे भाजप रसातळाला गेली त्यामुळे त्यावर चर्चा करण्याकरीता मायबोलीवर धागा निघाला असल्यास कृपया सांगावा तो वाचण्यास फार उत्सुक्ता आहे.

धन्यवाद

शिस्तबद्ध प्रचारामुळे होऊ शकले. कुंपणावरची मते फिरवणे अशी अमित शहांची व्यूहनीती होती. त्यासाठी उदासीन मतदार घराबाहेर पडावा लागतो. जो राजकीय पक्ष उदासीन मतदाराला घराबाहेर काढतो त्या पक्षाकडेच मतदान करण्याचा उदासीन मतदाराचा कल असतो. म्हणूनच अमित शहांनी उत्तर प्रदेशात मतदारांशी घराघरात जाऊन संपर्क साधण्याची योजना बनवली. त्यासाठी तिथे त्यांनी तब्बल आठ नऊ महिने मुक्काम ठोकला होता.>>>

धूर्त मोदींनी आपल्या फुकट प्रसिद्धीचा बरोब्बर वापर करून त्यावर मतं मिळवली. काँग्रेस बसली हात चोळत. >>>

अशा प्रकारे भारतातिल जनतेला बेवकुफ बनवले गेले.बिच्चारे अच्छे दिन आयेंगेची वाट पहात हात चोळत बसली आहे.

गापै - पॉइंट आहे.

बहुधा सोनिया गांधीच पुन्हा सूत्रे हाती घेतील अशीच शक्यता वाटते.

अजूनही पाठीराख्यांची हे बोलायची हिम्मत होत नाही आहे की आता त्या घराण्याचे महत्त्व थोडे बाजूला ठेवून आपण काहीतरी नवे नियोजन करू. >>> त्याचे कारण असे आहे पूर्वी एक दोन वेळा अशी बंडखोरी करायचा प्रयत्न झाला पण ती टिकली नाही, आणि पुन्हा जेव्हा गांधी घराण्याकडे सत्ता आले तेव्हा अशा बंडखोरांचे राजकीय करीयर जवळ्जवळ संपले. १९७५ मधे इंदिरा गांधी अडचणीत होत्या तेव्हा व नंतर नरसिंह रावांच्या काळात. त्यांचे राजापेक्षा राजनिष्ठ असलेले सहकारी जोपर्यंत जोरात आहेत तोपर्यंत ही डेअरिंग कोणीही करणार नाही.

दुसरे म्हणजे सर्वमान्य नेताच कोणी नाही. २००४ मधे सुद्धा काय झाले तिवारी, अर्जुन सिंग, पवार वगैरे, यातील कोणीही एक सर्वमान्य नव्हता. शेवटी गांधी घराणे-अ‍ॅप्रूव्ह्ड सिंग साब आले.

दिनेश्क,

>> सलग दोन अत्यंत दारुण पराभव झाल्यामुळे भाजप रसातळाला गेली त्यामुळे त्यावर चर्चा करण्याकरीता
>> मायबोलीवर धागा निघाला असल्यास कृपया सांगावा तो वाचण्यास फार उत्सुक्ता आहे.

माझ्या माहितीप्रमाणे असा कोणताही धागा मायबोलीवर नाही. तुम्ही स्वत:च सुरू करा म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

काँग्रेसपक्षाचा सध्या एक पराभव झाल्यावर किमान ३ धागे या विषयावर दिसून आले म्हणून भाजपाचे मागील काही वर्षात बरेच पराभव झाले असल्याने किमान १ धागा तरी चिंतनशिबिराप्रमाणे चिंतनकुमारांनी भरवला असेल अशी भाबडी आशा मनात होती. सर्च करून देखील सापडला नसल्याने शेवटी इथे विचारणा केली.

धन्यवाद

फारएण्ड,

१.
>> बहुधा सोनिया गांधीच पुन्हा सूत्रे हाती घेतील अशीच शक्यता वाटते.

त्याचं वय होत चाललंय. ही समस्या आहे.

२.
>> दुसरे म्हणजे सर्वमान्य नेताच कोणी नाही.

१९९१ साली आलेले नरसिंह राव हे काँग्रेसचे सर्वमान्य (वा किमान अमान्यत्व असलेले) एकमेव बिगर गांधी/नेहरू नेते होते. असं नेतृत्व पूर्वी म्हणे १९९० च्या आधी निर्माण होऊ दिलं नव्हतं. आताही म्हणजे १९९५ च्या नंतर आत्ता २०१५ पर्यंत निर्माण होऊ दिलं जात नाहीये. नरसिंह राव नेतेपदी अपघाताने (=राजीव हत्या) आले होते. खुद्द राजीवही नेतेपदी अपघातानेच आले होते.

यापुढचा नेतृत्वबदल अपघाती असेल का? चघळायला म्हणून चांगला विषय आहे. पण हा काही लोकांसमोर ठेवायचा पर्याय नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

<<< अजूनही प्रियांका आली तर खळबळ नक्की होऊ शकेल. पण आत्ता सध्या मोदी सरकार जोरात असल्यामुळे आत्ता प्रियांकाचे येणे निरुपयोगी ठरेल. अजून तीन वर्षांनी ती बहुधा समाजासमोर येईल असे वाटत आहे. >>>
अगदी अगदी !
मलाही असच वाटत ..
कारण जनतेची मेमरी कमी असते हे सगळ्यांना माहितीये त्यामुळे पहिले तीन चार वर्ष फार काही कोणी जोर लावायच्या फंदात पडत नाही .. निवडणुक एक दीड वर्षावर आली कि उतरवतील त्यांना मैदानात ..
त्यांच्या नवऱ्याचे पांडित्यप्रचुर व्यवहार त्यांना (कॉंग्रेसात) सर्वमान्यता मिळवण्यास थोडा अडथळा आणू शकतात बाकी अडचण फारशी नाही ..

लोकहो, पंतप्रधानपदासाठी जी व्यक्ती लायक वाटते तिलाच आपले मत द्या. आणि तिलाच काँग्रेसचा अध्यक्ष बनवा.

>>>

अरे? हे काय? कॉंग्रेस अध्यक्ष म्हणजे पंतप्रधान? Lol !

पगारे,

सहमत, संघवाले फार फार संयमी (वाट पाहणारे) आणि न विसरणारे असतात! मग तो द्वेष असो का लोभ Happy

बाकी कॉंग्रेसने मायबोलीवरील पोल का बघावा ह्याचे उत्तर ही पोल घेणाऱ्याने द्यावे ...

काँग्रेसने हा पोल पहात असतील तरच पोल अथवा चर्चा चालवावी ह्यात काय लॉजिक आहे. ? अगदी पारावर चालणार्‍या चर्चा सुद्धा झाल्या पाहिजेत यातून लोकमत बनत जाते. अगदी दणकवली टाईम्समध्ये देखील ओबाम्याला उपदेशाचे डोस पाजले जातात (आपण म्युन्शिपाल्टीत उंदीर मारायच्या खात्यात आहोत हे विसरून देखील) ..प्पण हेही झाले पाहिजे ना लोकशाहीत . ते जिवन्तपणाचे लक्षण आहे.

?

नुसत्या गफ्फा मारायाच्यायात होय ... मला वाटल की हिथन कॉंग्रेस अध्यक्ष निवडला जातुय Lol चालुद्या गुर्हाळ!
गप्पा मारून जिवंत असल्याचे दाखवून देऊया Happy

१) अध्यक्ष कसा हॉट हवा
२) तरून पिढीला आवडणारा
३) पारदर्शक - काहीही न लपवणारा
४) कृतीप्रधान - व प्रत्यक्ष " करणारा"
५) "रोमांचका"
६) ज्याला बघून उभे राहतील ( आदराने)
७) विदेशी "अनुभव" असलेला

--- सनी लिओनि .....

२००४ व २००९ मध्ये भाजपची धुळधाण झाली नव्हती. २००४च्या निवडणुकीत भाजपा चारीमुंडया चीत झाले नाहीत व् कॉँग्रेसदेखील फार सीट घेऊन आली नाही. पण भाजपाचे मित्रपक्ष पार गाडले गेले व् एन्टी भाजपा पक्ष एकत्र आले कम्युनिस्ट सहित.

दोन वाचनीय लेख

http://www.india-seminar.com/2015/665/665_suhas_palshikar.htm

http://indianexpress.com/article/opinion/columns/can-it-hit-the-road/

इंदिरा कॉंग्रेस सारखं मोदी भाजप अस भाजपच नाव ठेवाव असं मला वाटतंय. > भाजप उरलीय कोठे ? मोदीच आहेत आणी कांग्रेसने जसे महात्मा गांधी वापरले ६० वर्षे तसे वापरायला वाजपेयी आहेत

>>>अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कोणाच्या हाती देण्यात यावी?<<<

असा मूळ विषय असल्याचे मधेच आठवले.

>>>अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कोणाच्या हाती देण्यात यावी?<<<

असा मूळ विषय असल्याचे मधेच आठवले. >>>> मलाहि आत्ताच आठवले. आधी वाटले कि पवार व ठाकरे कांग्रेसमध्ये गेले.

माणुस१,

>> भाजप उरलीय कोठे ? मोदीच आहेत आणी कांग्रेसने जसे महात्मा गांधी वापरले ६० वर्षे
>> तसे वापरायला वाजपेयी आहेत

Uhoh ????????????????????????????????????????????????
Rofl !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आ.न.,
-गा.पै.

Pages