
वन लाईन स्टोरी फॅमिली मॅटर. तर एक उच्चभ्रू कुटुंब मेहरा. नवरा बायको नि त्यांची दोन मुलं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या. प्रत्येकांच वेगळंच गाणं चाललय. कुणी (आनिल कपूर) बिझनेस मध्ये लयाला जाताना स्व: टिकवण्याच्या तयारीत तर कोणी (प्रियंका चोपडा) बिझनेस मधे नाव कमावून स्वः अजूनही हरवलेलाच, सुखाचं आयुष्यही शोषिता प्रमाणे जगणारी (शेफाली शहा), स्वः शोधावा अशी वेळच न आलेला (रणवीर सिंग), पुरोगामी असण्याची झूल मिरवणारा जावई (राहूल बोस), प्रक्टिकल (फरहान अख्तर), अजून एक प्रक्टिकल (अनुश्का शर्मा) ह्या सगळ्यांचा जीवनाचा कोलाज व्यवस्थितपणे आपल्या समोर येतो.
हिन्दी सिनेमा वेगळ्या वळणावर जाऊ पहातोय त्यांची एक (पुसटशी का होईना) झलक ह्यात दिसते. आता पर्यंत हिरो हिरोईन यांची प्रेम प्रकरणं, त्रिकोण - चौकोण नुकतिच कुठे याची पुढची पायरी म्हणून लग्नानंतरचं आयुष्य इथवर गाडी आलेली तर ह्यात ती अजून पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे.
संपूर्ण पणे पांढर किंवा काळं असं काही नसतं ना आयुष्य... प्रत्येकांत ग्रे शेड्स असतातच ना... ह्या ग्रे शेड्स खुबीने दाखवण्याचं काम बर्याचदा लो बजेट आर्ट फिल्मस् उत्तम करतात. तेच इथे भव्य दिव्य पणे पूर्ण कर्मशियल सिनेमा करु पाहतो, पण ही रियालिटी नि रियल माणसं काही ह्या कर्मशियल सिनेमाला झेपत नाहीत. शेवटाकडे जाता जाता सगळंच कसं फिल्मी होऊन जातं. संगीत काही जमलं नाही एकही गाणं थियेटर मधून बाहेर पडल्यावर लक्षात राहत नाही. सिनेमॅटोग्राफी ही यथा तथाच. आर्ट/कर्मशियल मिश्रण काही एकजीव होत नाही रिमा काग्ती नि झोया अख्तर द्वयीकडून जे अपेक्षीत असं होतं ते काही गवसतं नाही. एवढं भव्य क्रू़झ नि त्यातून विदेश पर्यटन पण कुठेच ती भव्यता टिपली गेली नाही. ज्या व्यक्तिरेखा अस्सल म्हणून बारकाव्यांसहित सुरवातीला उभ्या राहतात... क्षणात फिल्मी पध्दतीने वागू लागतात. ना धड हे ना धड ते.
त्यातूनही काही सीन्स् अगदी जमून आलेत, नाविन्य ही आहेच थोड्सं. अभिनयात तर चढाओढच... त्यातूनही लक्षात राहते प्रियंका... (आयेशा मेहरा) मूलगी असण्याचं मोल प्रत्येक ट्प्प्यावर चुकवणारी त्यातून आलेला समंजसपणा... परिस्थितीशरण राहणं ते तो बुजरेपणा झट्कून स्वतःहा साठी जगणं ह्यात अचानक नि तीव्र बदल न होता तो ज्या हळुवार पणे भुतकाळाशी सुसंगत होतो ... हे अगदी उत्तम साकारलं आहे.
एकूणच भारतीय समाजाचं दुट्प्पीपण व्यवस्थित पणे समोर येतं सिनेमातून. एकदा पहावाचं जरुर... टिकावू नाही आहे पण टाकावू ही नक्कीच नाही.
फारच असहमत!! आवर्जून एकदा
फारच असहमत!!
आवर्जून एकदा पहावा, सिनेमा खास आहे!
संगीत चांगले आहे - गल्ला गुडिया, पहली बार (खास जावेद अख्तर!! दिल के मश्वरे इ इ.) आणि दिल धडकने दो मस्त गाणी आहेत. अनिल कपूर बंदर बूढा हो गया तो भी गुलाटी मारना नही भूलता गटात. शेफाली 'स्टार पॉवर' मध्ये कमी पडते पण अभिनयाच्या जोरावर बाजी मारते. रणवीर-प्रियांका भाऊ बहिण मस्त शोभतात. दोघे अॅक्टींग पण करतात :). अनुष्का सोसेल एवढीच आहे. इतर सहकलाकार अ मे झिं ग आहेत. त्या 'काकू ब्रिगेड' मधल्या बायांना अगदी एक एक लाईनच आहे पण काय मन लावून केले आहे. राहुल बोस फार कमी वेळ आहे.
सिनेमॅटोग्राफी पण मस्त आहे - ब्लू-व्हाईट कॉम्बो!!
त्यातूनही लक्षात राहते
त्यातूनही लक्षात राहते प्रियंका... (आयेशा मेहरा) मूलगी असण्याचं मोल प्रत्येक ट्प्प्यावर चुकवणारी त्यातून आलेला समंजसपणा... परिस्थितीशरण राहणं ते तो बुजरेपणा झट्कून स्वतःहा साठी जगणं ह्यात अचानक नि तीव्र बदल न होता तो ज्या हळुवार पणे भुतकाळाशी सुसंगत होतो ... हे अगदी उत्तम साकारलं आहे. एकूणच भारतीय समाजाचं दुट्प्पीपण व्यवस्थित पणे समोर येतं सिनेमातून. एकदा पहावाचं जरुर... टिकावू नाही आहे पण टाकावू ही नक्कीच नाही.
+१११११११
अगदी!! राहुल बोसचा एक सीन चांगलाच लक्षात राहतो. "आम्ही नाही त्यांच्यातले" म्हणणारे हेच, आणि तसे वागणारे हेच.
एवढा खास नाहीये (ZNMD मुळे जास्त अपेक्षा होत्या) पण या गोष्टींसाठी खूप खूप आवडला.
सर्व आवडते कलाकार आहेत,
सर्व आवडते कलाकार आहेत, म्हणून नक्की बघेन.
(थोडं अवांतर पण ज्ञान द्या
(थोडं अवांतर पण ज्ञान द्या कुणी तरी) शेफालीच्या रोलसाठी अमृता सिंगची फार फार आठवण झाली. 'साहेब' च्या आठवणी ताज्या झाल्या असत्या. अमृता सिंगने काम करणे बंद केले का आता ??
.
.
मला आवडला. जिन्दामिदो एवढा
मला आवडला. जिन्दामिदो एवढा नाही आवडला पण ठिक..
अधुनमधुन थोडासा रेंगाळल्यासारखा वाटला तरी पैसे ब-यापैकी वसुन होतात. पडद्यावरचे रंग सुखद आणि वातावरण नयनरम्य आहे. परदेशातली स्थळे नेहमीपेक्षा वेगळी आणि फ्रेश वाटली.
कुठल्याही वर्गातला असो, भारतीय समाज सगळीकडे सारखाच आहे. तोंडाने कितीही आधुनिकतेचा जप केला तरी त्याने आपली जुनाट नीतीमुल्ये आजही उराशी तशीच कवटाळलीत. गेल्या पिढीला जुनाट म्हणणारे आजही तीच मुल्ये वेगळ्या रुपात जपताहेत हे चित्रपटात अधोरेखित होते.
अर्थात हा सिरीयस पिक्चर नाहीय, कॉमेडी म्हणुनच जाहिरात केली गेलीय त्यामुळे शेवटाची पंधरा मिनिटे जे काही चालते ते फार्सिकल या लेबलाखाली खपुन जाते. अन्यथा नेहमीच्या गंभीर चित्रपटात असे अचानक मतपरिवर्तन आणि नंतरचा गोंधऴ विसंगत वाटला असता.
चित्रपटातली खुप दृष्ये खुप जमुन आलीत. अगदी शेवटच्या सिनमध्ये रणवीर झरिनाला सुरी देतो तोही पुर्ण सिन आणि त्यातला हा छोटा सिन दोन्ही खुप जमुन आलेत. चित्रपट तुकड्यातुकड्यांमध्ये खुप चांगला जमलाय.
रणवीर प्रियांकाचा धाकटा भाऊ म्हणुन खुप छान शोभलाय. नशिबाने अनुष्काला काम खुप थोडे आहे. फरहानचेही काम शॉर्ट अॅण्ड स्विट. मला सतत भिती वाटत होती की फ्लॅशबॅकला जाताहेत की काय.
प्रियांकाने अतिशय सुरेख काम केलेय. अनिल कपुर आणि शेफालीही मस्त. हॉस्पिटलातल्या सिननंतर त्या दोघांचा एकत्रित सिन आहे त्यात केवळ डोळ्यांमधुन ती खुप छान व्यक्त झालीय. बाकी सगळ्या भुमिकांमधले लोक्स अगदी आपापल्या जागी फिट, त्या चार भोचक बायांसकट. नुरी आणि राणा जोडी तर खुप क्युट. राणाला याआधी लुटेरामध्ये पाहिलेले. यातही आवडला.
एकदा पाहण्याजोगा जरुर आहे. चित्रपटातल्या गाण्यांचे चित्रिकरण खुप छान झालेय, त्या मजेदार चित्रिकरणा गुंतल्यामुळे गाण्यांचे शब्द आपल्यापर्यंत पोचत नाहीयेत हे लक्षात येत नाही
चित्रपटगृहाबाहेर पडल्यानंतर ही गाणी जर परत ऐकली तर ही मी पडद्यावरही पाहिलीत हे माझ्या लक्षातही येणार नाही
चित्रपट फार छान आहे लेखात
चित्रपट फार छान आहे लेखात काही लिहीले नाही प्रत्येक सीन ला एक वेगळे महत्व आहे इव्हन गाण्यात देखील नातेसंबंध कसे बदलत जातात हे दाखवले आहे बघू अजून कोण काय काय लिहीतो
बहूदा नात्यातले मुखवटे गळून पडताना मीच बघितले काय ?
ZNMD मुळे जास्त अपेक्षा
ZNMD मुळे जास्त अपेक्षा होत्या>>
ZNMD म्हणजे नक्की काय?
जिंदगी ना मिलेगी दोबारा. याच
जिंदगी ना मिलेगी दोबारा. याच दिग्दर्शिकेचा आधीचा चित्रपट.
ओके. मी नाही पाहिला पण बघायचा
ओके. मी नाही पाहिला पण बघायचा आहे.
काल आयुष्यात पहिल्यांदाच
काल आयुष्यात पहिल्यांदाच फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिला. चित्रपट थोsssडासा संथ वाटला. सगळ्यांची कामं छान. मुळात गोष्ट अशी फार मोठी नाही. त्यामुळे सादरीकरणावर भर आहे. भारतातल्या उच्चभ्रू, चकचकीत कुटुंबात असलेले प्रॉब्लेम्स, त्या कुटुंबातल्या मुलींच्या / स्त्रियांच्या परीस्थितीवर, भारतीय समाजमनावर, दुटप्पीपणावर (मार्मिक वगैरे नाही) भाष्य करतो. चित्रपट कुठेही कंटाळवाणा नाही, पण आपली छापही सोडत नाही. झोया अख्तरकडून जास्त अपेक्षा होत्या म्हणून असेल पण "ठिक आहे" असा वाटला. एकदा बघण्यासारखा.
पण भारतात अजूनही मुलींना इतकं गृहित धरलं जातं का? तेही इतक्या श्रीमंत, सुशिक्षित, उच्चभ्रू समाजात? नवल वाटलं खरं.
पण भारतात अजूनही मुलींना इतकं
पण भारतात अजूनही मुलींना इतकं गृहित धरलं जातं का? तेही इतक्या श्रीमंत, सुशिक्षित, उच्चभ्रू समाजात? नवल वाटलं खरं
फरहान अख्तर : रॉक्स अ ब्लु
फरहान अख्तर : रॉक्स अ ब्लु शर्ट.
राहुल बोसः अरेरे काय झालं ह्याचं
अनुश्का फारच गोड दिसते आणि २० ज मधला ड्रेस छान
कपडे पट एकंदरी तच छान आहे.
खरे अमृता सिंग हवी होती.
प्रियांका कपडे फार सुरेख कॅरी केले आहेत आणि रोल ही.
प्लुटो मेहरा ,इन जनरल रॉक्स.
पण भारतात अजूनही मुलींना इतकं गृहित धरलं जातं का? तेही इतक्या श्रीमंत, सुशिक्षित, उच्चभ्रू समाजात? नवल वाटलं खरं.>> हो? डुगर कुटुंबात मुलग्याने मुलींना इनॅप्रोप्रिएटली टच केलं मुलींची बाजू ऐकूनही घेत नाहीह ये कुणी. मुलग्यालाच सावरऊन घेणे चालले आहे. ढोंगी व दुट् टपी पणा सर्वत्र आहे.
हा एक साधा मजेशीर चित्रपट आहे. त्याला कृपया भारत अमेरिका स्वरूप देउ नका. एन एच १० नावाचा सिनेमा बघा. मुलींची परिस्थिती खरेच फार वाइट आहे.
>>>रणवीर-प्रियांका भाऊ बहिण
>>>रणवीर-प्रियांका भाऊ बहिण मस्त शोभतात. दोघे अॅक्टींग पण करतात स्मित>>> +१
>>>शेफालीच्या रोलसाठी अमृता सिंगची फार फार आठवण झाली.>>> तुम्ही म्हटल्यावर खरच हा विचार इंटरेस्टिंग वाटला!
प्रियांका छान वाटली.
>>> चित्रपट तुकड्यातुकड्यांमध्ये खुप चांगला जमलाय. >>> खरय. पण एक पूर्णाकृती म्हणून तितका परिणाम साधत नाही. मध्यंतराआधी १०-२० मिनिटे तर कंटाळवाणा होत होता. मध्यंतर झाले आणि नंतर गल्ला गुडिया गाणे लागले आणि परत थोडी जान आली. पण आधी नात्यांचा जो घोळ दाखवलेला त्यानंतर माणसे अशी केवळ समाजात दिखाऊ दाखवू शकतात या बद्दल खूप आश्चर्यचकित व्हायला झाले.
हो? डुगर कुटुंबात मुलग्याने
हो? डुगर कुटुंबात मुलग्याने मुलींना इनॅप्रोप्रिएटली टच केलं मुलींची बाजू ऐकूनही घेत नाहीह ये कुणी. मुलग्यालाच सावरऊन घेणे चालले आहे. ढोंगी व दुट् टपी पणा सर्वत्र आहे.
हा एक साधा मजेशीर चित्रपट आहे. त्याला कृपया भारत अमेरिका स्वरूप देउ नका. एन एच १० नावाचा सिनेमा बघा. मुलींची परिस्थिती खरेच फार वाइट आहे.>>> absolutely unnecessary comment!
हा भारत अमेरीका वाद नाहीये, तुम्ही त्याला तसं रूप देत आहात, कृपया देऊ नका.
माझ्या आत्तापर्यंतच्या भारतवारीत जे काही महिना दोन महिने तिथे रहाते, त्या वास्तव्यामधे आजूबाजूला जे बघते त्याला अनुसरून सांगायचे तर मुली आता अगदी शालेय वयापासून स्वतःच्या शिक्षणाचे, नंतर नोकरीचे, लग्नाचे, परदेशी शिक्षणासाठी जाण्याचे, तिथे रहाण्याचे, तिथे नोकरी करण्याचे किंवा परत येण्याचे निर्णय सक्षमपणे घेताना दिसतात. 'मुलींनी' काही करावं किंवा करू नये याचा आईबापही फारसा बाऊ करत नाहीत, उलट मुलींना प्रोत्साहन देताना दिसतात. काही वर्षांपूर्वी मी भारतात असताना ही परीस्थिती नव्हती, आता दिसणारा हा बदल स्वागतार्ह आहे. आणि ही सगळी अगदी मध्यमवर्गीय, मराठमोळी कुटुंबं आहेत. आता अपवादानानेच मुलींवर बंधनं घालणारी, त्यांच्यावर कुठल्याही गोष्टींसाठी दबाव आणणारी कुटुंब दिसतात. फार लांब कशाला, अगदी मायबोलीवर दिसणारं जर्बेराचं कौतुकास्पद उदाहरणही आहेच की. असं असताना चित्रपटामधे दाखवलेले उच्चभू, सुशिक्षीत कुटुंबामध्ये मुलींना गृहीत धरण्याच्या प्रसंगांमुळे मला खरोखरच नवल वाटले. बरं ही मुलगीही 'सेल्फमेड' आहे. असो.
राहता राहिली डुगर कुटुंबियांची गोष्ट. हे चित्र संपूर्ण अमेरीकेचं आहे का? नाही, माझ्यापेक्षा तुम्हालाच इथली जास्त माहिती आहे म्हणून विचारते
हा या बाफचा विषय नाही, म्हणून इथेच पूर्णविराम.
झिंदगी ना मिलेगी दोबारा
झिंदगी ना मिलेगी दोबारा पाहिलेला.. बरा होता पण बरेपैकी बोअरही झालो होतो.. दिग्दर्शकाला काही पोहोचवायचेही होते पण कमर्शिअल गणितेही सांभाळायची होती.. अर्थात हे नक्कीच चुकीचे नाही, राजू हिराणीला हे बेस्ट जमलेय, पण यातच कुठेतरी तो फसल्यासारखा वाटला..
हा दिल धडकने दो (नाव नाही आवडले) चित्रपट अजून पाहिला नाही, बघण्यास फार उत्सुक नाही, कारण चित्रपटाचे प्रोमोज बघून करण जोहार मूवीचा फील येतो, अर्थात तसे मूवी मला आवडतातही पण हा झोया अख्तरचा असल्याने तसाही नसणार याची खात्री आहे..
अगदीच सर्वांकडून कौतुक झाले जसे तनूमनूचे झालेले तरच हा बघण्याची शक्यता आहे.. अन्यथा नॉट माय टाईप.. तापेक्षा येता विकेंड मराठी चित्रपट संदूक साठी खर्च करेन
आवड्ला चित्रपट.
आवड्ला चित्रपट.
(थोडं अवांतर पण ज्ञान द्या
(थोडं अवांतर पण ज्ञान द्या कुणी तरी) शेफालीच्या रोलसाठी अमृता सिंगची फार फार आठवण झाली. 'साहेब' च्या आठवणी ताज्या झाल्या असत्या. अमृता सिंगने काम करणे बंद केले का आता ??
<<
सी,
करते कि ती काम अजुन, लेटेस्ट 'टु स्टेट्स ' मधली पंजाबी आईचा रोल काय अप्रतिम केला होता तिनी :).
अंजली,
नॉर्थ मधे आहे गं अजुन मुलींसाठी दुटप्पी धोरण.. शिकलेले- उच्चभ्रु असण्याने नाही फरक पडत काही !
>> अंजली, नॉर्थ मधे आहे गं
>> अंजली,
नॉर्थ मधे आहे गं अजुन मुलींसाठी दुटप्पी धोरण.. शिकलेले- उच्चभ्रु असण्याने नाही फरक पडत काही ! <<
'नॉर्थ'पर्यंत कशाला ? इकडे या औरंगाबादेत, मराठवाड्यात. धर्म, जात, लिंग, प्रांत कुठलाही भेदभाव आम्ही आजही जपलेला आहे.
मी मुंबईत माझ्या घरात पाहिलाय
मी मुंबईत माझ्या घरात पाहिलाय हा भेदभाव. आणि तोही अचानक, मुलगी निर्णयक्षम झाल्यावर पालकांनी पलटी मारली.
धन्यवाद! काही लिहण्याचा
धन्यवाद!
काही लिहण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सर्व प्रतिसाद देता नि हुरुप येतो.
चुका सांगत जा... सुधारण्याचा प्रयत्न राहिल.