अमृता ते ही पैजा जिंके ....

Submitted by Sanjeev.B on 24 September, 2012 - 06:38

तर मित्रांनो आणि मैत्रिणिंनो "माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके” असे संत ज्ञानेश्वरांनी " सांगितले आहेच. आपली मराठी भाषा गाव बदलले की भाषा ही बदलते ह्याचे प्रत्यय आम्हास आले.

तर आम्ही गेलो होतो आमच्या आजोळी बेळगावला, तेथे आमच्या अमृता पेक्षा ही गोड अश्या ह्या भाषेने आमचे जे वस्त्रहरण केले कि आम्हास दे माय धरणी ठाय झाले.

असे झाले, एके दिवशी आम्ही बसलो होतो आमच्या मित्र मंडळींसोबत असेच गप्पा मारत, तर गप्पांचे विषयाचे गाडी राजकारणावर च्या रुळा वर आले, तर आमच्या एका मित्रांने सांगितले, "तुमचं ते तेव्हढं सोडुन बोला कि वो". आता झाली का पंचाईत, आमच्या हातात सोडण्यासारखे असे काही आम्ही धरले नव्हते, काय सोडायचं ते आम्हास कळे ना, मग नंतर आमच्या मित्रवर्याने ने सांगितले कि "ते सोडा" म्हणजे तो विषय हो, विषय silent होता कि वो. तुम्ही मुंबई कडची माणसं म्हणजे लईच हे कि वो, आत्ता "हे" म्हणजे काय असा प्रश्न माझ्या मनात येणं स्वाभाविक आहे, आम्हास असे वाटले कि "लईच हे" म्हणजे लईच हुशार, पण कसचं काय, लईच हे म्हणजे लईच आचरट असे जेव्हा आम्हास कळले तेव्हा आम्हास ते "भुषणावह" वाटले.

एकदा आम्ही थांबलो होतो बस स्टॉप (थांबा) वर, बराच वेळ झालं होतं, एकदम गलकाच झाला, आलं आलं आलं असे आम्हास ऐकु आले, आम्हास वाटले कुणी तरी थोर व्यक्ति आलं असावं, तर पाहतो तर काय, बस आली ऐवजी फक्त आलं आलं. बस तसे भरलेलीच होती, आम्ही कसे बसे आत मध्ये शिरलो व एका बाजुला उभे राहिलो, हातातली पिशवी एक खिडकीला अडकवले व टिकीट काढण्यासाठी आम्ही पँटेच्या खिशात हात घातले, तेव्हढ्यात एका गृहस्थने आम्हास डरडावले, " तुमचे लागत आहे कि वो " एव्हढे सांगुन त्या गृहस्थाने जरा पॉज घेतले, तर आम्ही जरा बावरलोच, आणि जरा सावरुन उभे राहिलो तर त्या गृहस्थाने लगेच सांगितले "पिशवी कि वो, जरा नीट अडकवा कि".

"बशीतनं" (बस मधुन) उतरल्यावर आम्हास जायचे होते एका मंगल कार्यालया मध्ये, आमच्या एका स्नेहींचे लग्न होते. लग्न समारंभात शास्त्रीय संगीताची मैफिल होती, एक गृहस्थ तंबोरा वाजवत होते, आम्हास हे सर्व नवीन होते, आम्ही इकडे मुंबईत कधी असल्या शास्त्रीय संगीत मैफिलीत गेलो नव्हतो, अक्षता पडण्यास अजुन अवकाश होते, तर आम्ही विचार केले ऐकत बसु, आणि आम्ही एक सद् गृहस्थ च्या बाजुस विराजमान झालो.

"काय खाजवत आहे राव", त्या सद् गृहस्थाने एकदमच आम्हास सांगितले, आम्ही पुरते हादरलोच, चार चौघां मध्ये असले काही कृत्य करण्याचे कधी आमच्या ध्यानी मनी ही येणं शक्य नव्हते, आम्ही त्या सद् गृहस्था कडे पाहिले तर ह्या वेळेस म्हणाले कसले तंबोरा खाजवत आहे कि वो असे म्हणायचे होते मला. मी त्यांना सांगितले तुम्हास "वाजवत" आहे असे म्हणायचे आहे का, तर म्हणाले खाजवतच आहे कि वो ते, म्हणुनच तर एव्हढं बेसुर संगीत येत आहे त्या तंबोर्यातुन, वाजवलं असतं तर चांगलंच आलं असतं कि वो, संगीत म्हंटलं मी.

माझ्या आचरट मना मध्ये एक विनोद येऊन गेलं, कि ह्या माणसाच्या मुलीच्या लग्नात जेव्हा मुला कडची वरात येईल, तेव्हा वाजवा रे वाजवा ऐवजी हे गृहस्थ खाजवा रे खाजवा म्हणतील तर कित्ती मज्जा येईल नै.

आम्हास ही भाषा फारच आवडली, एव्हढे समृध्द भाषा,आणि आपण त्याचे अजुन पर्यंत कसे वापर केले नाही ह्याचे खंत आमच्या मनात होते. नेमक्या वेळी पॉज घेऊन आपणांस जे काही बोलायचे आहे ते नंतर बोलायचे असे एकदा तरी आम्हास करावयाचे होते.

तर झाले असे आम्ही आमच्या मित्रमंडळीं सोबत सिनेमा पाहत बसलो होतो, टिव्ही वर मल्लिका देवी आपल्या अफाट कला गुणाच्या मुक्त उधळण करत होत्या, एव्हढ्यात आम्ही म्हणालो किती हलत आहे कि वो, आणि पॉज घेतले, सगळे नजरा आमच्या कडे रोखले गेल्या नंतर आम्ही सांगितलो खुर्ची म्हणत होतो कि वो मी, एव्हढे म्हणताच आम्ही सारेच हास्यकळ्ळोलात बुडालो.

Wink Proud

- संजीव बुलबुले / २०.सप्टेंबर.२०१२

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही पडलात कि को, आमदारकीतून.

आपण देवाला फोडू ... नारळ.

तुम्ही जपून वापरत चला, साबण कि हो.

तुमचं झालं का, जेवन म्हणतो मी.

मी मायबोलीवर नवीन आहे. खूप अवघड आहे सर्व सेटटिंग समजायला पण खूप छान पोस्ट असतात इथे त्यामुळे लॉगिन करायचा मोह आवरला गेला नाही. तुमचे लेखन देखील छान आहे. मला पण लेखन करावेसे वाटते आहे पण प्रश्न असा आहे की ते पोस्ट कसे करावे बर :/