इस्ट युरोप - बर्लिन, ड्रेसडेन- भाग २

Submitted by मोहन की मीरा on 1 June, 2015 - 13:07

भाग १- http://www.maayboli.com/node/54087

बर्लिन शहर हे इतर युरोपियन शहरांसारख अति modern नाही. थोडी जुन्या वळणाची आजीबाई असावी तस त्याचं रूप आहे. अनेक बॉम्ब झेलल्याच्या खुणा जागोजागी आहेत. बर्लिन ला गेल्या पासून कधी एकदा बर्लिन wall चे अवशेष पहातोय असे होवून जाते. गम्मत म्हणजे आम्ही सहज म्हणून फिरून आलो तेंव्हा सारखी दुपदरी विटा सारखी ओळ पूर्ण रस्त्याच्या मध्ये नागिणी सारखी उठून दिसत होती. गाईड म्हणाली हीच बर्लिन भिंतीची खूण. भिंत जेंव्हा तोडली तेंव्हा त्याची आठवण म्हणून ही ओळ शहरातले रस्ते अजूनही छाती वर वागवत आहेत.

117 Wall marks germany_0.JPG

आमचा दुसरा दिवस सुरु झाला तोच मुळी भिंतीच्या अवशेष दर्शनाने. जेंव्हा जर्मनीचे लचके तोडायचे ठरले तेंव्हा रशियाने आपला भाग काढून घेतला. जास्त क्षेत्राफळाचा भाग त्यांच्या कडे राहिला. दोस्तांपैकी कोणालाही ह्याची पर्वा करायची गरज वाटली नाही. त्या रशियन अधिपत्या खालील जर्मनी मध्ये म्हणजे इस्ट जर्मनी मध्ये आत बर्लिन होतं. त्या बर्लिन चेही मग इस्ट आणि वेस्ट असे लचके तोडले गेले. खालच्या नकाशा वरून हे लक्षात येईल.

IMG_0121.JPG

बर्लिन ची फूट

IMG_0123_0.JPG

जर्मन लोकांना काहीही विचारण्याची सोय नव्हती. त्यांचे राष्ट्र हरले होते. त्यांचे नेते मेले, मारले गेले वा परागंदा होते. अनेक नागरिक इतर युरोपातील देशांमध्ये निर्वासित झाले होते. त्यांच्या माथ्यावर क्रूरकर्मा हिटलर ला साथ देणारे राक्षस असा शिक्का होता. निर्वासितांच्या ३५ ते ४० मैलांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांनी नंतर जर्मनी प्रस्थापित झाल्यावर परत जर्मनीत जाणे पसंत केले. एक भिंत बांधून रशियांस नी काय साध्य केले?.... म्हंटली तर भिंत, म्ह्म्ताल्म तर कायमचा दुरावा. त्या वेळेस इतकी भयानक परिस्थिती होती की अनेक कुटुंबे दुभ्म्गाली गेली. आई बाप एकीकडे, शिकायला गेलेली मुले दुसरी कडे. भाऊ भाऊ वेगवेगळे. एकाच शहरात पण कायमचे दूर. विचार करा आपलं माणूस त्याचं शहरात आहे पण एका भिंती मुळे ते वर्षानुवर्ष आपल्याला भेटू शकत नाही. आमच्या गाईडला तिचे वडील ह्या दुही मुळे भेटूच शकले नाहीत. जेंव्हा भिंत पाडली त्याच्या आधीच त्यांचा अंत झाला होता. तिची आई वेड्या सारखी जुन्या घराच्या दिशेने धावत होती. पण त्या खुणा कधीच पुसल्या होत्या. अश्या कहाण्या घरोघरी आहे. आजच्या बर्लिन वासियांना त्या आठवणी विसरायच्या नाहीयेत. म्हणूनच त्यांनी आज २४ वर्ष झाली तरी त्या भिंतीचे अवशेष जपून ठेवले आहेत.

111 German Wall 6_0.JPG

भिंतीला रशियन बाजूने खूपच संरक्षण होते. अमेरिका व रशियाच्या कोल्ड वोर काळात तर भिंतीचे संरक्षण भयानक क्रूरतेने केले गेले. वेस्ट हून इस्ट ला यायचा प्रयत्न कोणी करायचेच नाही. त्या मुळे तिकडे काहीच संरक्षण नव्हते. पण इस्ट हून वेस्ट ला जाण्या साठी मात्र अनेक तरुण आपल्या जीवाची बाजी लावायला तयार असायचे. इस्ट बाजूला भिंत सुरु व्हायच्या आधी एक खंदक होता (आता तिथे सुरेख फोटो म्युझियम आहे). तो खंदक पार करणेच अती भयानक होते. परत भिंत चढायलाही महा कठीण होती. त्या दिव्यातुनाही जरी कोणी पार पडलाच, तरी पलीकडे असलेल्या सैनिकांच्या हातात ते सापडायचे. तरीही हे दिव्य करायला लोक तयार असायचे. कारण रशियन राजवटी मध्ये कम्यूनिस्ट अतिरंजित कल्पनांमुळे अनेक गोष्टींची टंचाई असे. साध्या पावा साठी दोन तास रांगेत उभे राहावे लागे. मग फळे, भाज्या म्हणजे तर अप्राप्य गोष्टी. आणि एक भिंत ओलांडली की सगळी सुखं. ह्या विरोधाभासामुळे सगळ्यांनाच त्या भिंती पलीकडच्या जगाचे आकर्षण होते. रशियाच्या जोखडातून जर्मनी मोकळा झाला आणि पहिले त्यांनी ही भिंत तोडली. त्या वेळचे फोटो पहिले की दाटून येतं.

108 German Wall 3.JPG

आर्थात भिंत पाडल्यामुळे सगळ सुरळीत झाले असे मात्र झाले नाही. उलट नवे प्रश्न तयार झाले. इस्ट बर्लिन च्या लोकाना सामावून घेताना अनेक नवे प्रश्न तयार झाले. एकतर नोकर्या आणि घरांचे प्रश्न मुख्य होते. इस्ट मधल्यांना आता नुसत्या कार्डावर ब्रेड मिळणार नव्हता. त्या साठी काम करायला लागणार होते. ते पचनी पडायला खूप वेळ लागला. इस्ट मधल्या इमारती ठोकळेबाज, घर छोटी. त्यामुळे त्यांची मागणी कमी झाली. त्या उलट वेस्ट मधल्या चकचकीत इमारतींना भाव आला. एकाच शहरात इतकी तफावत झाली की शेवटी हे सगळ रेग्युलेट करे पर्यंत बराच काळ जावा लागला. मुळातच जर्मन लोक राष्ट्र प्रेरणेने भारलेले असल्याने त्यांनी पद्धतशीर पणे इस्ट जर्मनीला लौकरात लौकर नव्या जगात आणून सोडले. त्या करीता वेस्ट जर्मनीची राजधानी बॉन असतानाही, ती बर्लिन ला हलवली. त्या मुळे इतिहासाशी इमान राखणे सोप्पे गेले. लौकरात लौकर हिटलर आणि नाझींच्या खुणा पुसून टाकल्या. हिटलरच्या बंकर चा चक्क पार्किंग लॉट बनवून टाकला!!!!

67 Hitler Bunker1.JPG

आर्थात हल्ली ते रशियन्स नी आम्हाला कसे छळले ते जगाला ओरडून दाखवायच्या मार्गावर आहेत. त्या मुळे DDR म्युझियम ची निर्मिती झाली. तिकडे त्या काळातील घरे, गाड्या, करमणूक साधने इ.इ. कसे backward होते आणि ते आम्हाला कसे दाबून टाकत असत... असे प्रदर्शन आहे. म्हणजे आता नाझी गाडून ते रशियन्स ना शिव्या घालत आहेत. ह्या सगळ्या देशात नाझी पेक्षाशी रशियन्स वर राग आहे. कारण ही आत्ताची पिढी रशियन्स च्या प्रभावात वाढली. आपल्या भाषा, इतिहास सोडून त्यांना रशियन आणि रशियाचा इतिहास शिकायला लागला. कम्युनिझम च्या काळात सण साजरे करायची ही चोरी होती.... त्या मुळे ती भडास आता बाहेर येते आहे.
बर्लिन चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इमारती तशाच काळ्या मुद्दाम ठेवल्या आहेत. बॉम्ब मुळे जळलेल्या खुणा ते अजूनही वागवत आहेत. त्यांचे brandenberg गेट पहाण्यासारखे आहे. अठराव्या शतकातल्या नीओक्लासिकल शैलीतले हे गेट सुरेख आहे. जेंव्हा जर्मनी एकत्र झाली, तेंव्हा ह्या गेट ला प्रचंड महत्व आल कारण हे गेट भिंतीच्या अगदी लागताच होत. त्यामुळे जेंव्हा भिंत पाडली तेंव्हा लोक प्रचंड संख्येने इकडे जमा झाले होते. त्याच्या माथ्यावर ग्रीक नाईके देवीचा भव्य पुतळा आहे. मुळात अठराव्या शतकात ह्याची बांधणी शांतीचे प्रतिक म्हणू झाली होती. जेंव्हा दोन्ही जर्मनी एक झाल्या तेंव्हा लोकांनी इथे येवून अप्रत्यक्ष रीत्या शांतीचा संदेश दिला.

61 Freedom sq. Germany.JPG56 Freedom Sq. Berlin1.JPG

इस्ट आणि वेस्ट जर्मनी मध्ये एक वेस होती त्याला चेक पोइंट चार्ली म्हणत. तिकडे कोल्ड war मध्ये भिंती पलीकडे जायला एक चेक पोइंत होता. मुळात १९६१ मध्ये भिंत बांधलीच होती मुली ह्या उद्देशाने की रशियन जर्मनी मधून लोक वेस्ट जर्मनी मध्ये जाऊ नयेत. त्या मुले हा चेक पोइंत अजूनही जपून ठेवण्यात आला आहे. जेंव्हा भिंत फुटली, सगळ्या शृंखला तुटल्या तेंव्हा त्याचं एक सिम्बॉल म्हणून त्यांच्या अलेक्झांडर स्क्वेअर मध्ये सुरेख शिल्प उभे केले आहे.

41 Berlin sight seeing2.JPG

हिटलर च्या बंकर चे त्यांनी पार्किंग लॉट मध्ये रुपांतर मध्ये रुपांतर केले त्याचं प्रमाणे त्याच्या समोरच ज्यू लोकांचे स्मारक उभारून आता ते नव्याने सुरुवात करत आहेत हे जगाला सांगायला सुरुवात केली आहे. हे स्मारकही खूप सुरेख आहे. अनेक आकारांच्या शाव पेट्या असाव्या असे त्यांचे स्वरूप आहे. त्याचं बरोबर एखादा भूलभूलैय्या ( मेझ) असावे असे ते दिसते.

DSC06324_0.JPG

एकंदर जर्मन माणूस मात्र खूप रिझर्व्ह वाटला. फारसे हसणे बोलणे वाटले नाही. मी आणि नवरा रात्री एका पब मध्ये पण मुद्दाम जाऊन आलो. पण वातावरण थोडे मवाळ वाटले. आर्थात बर्लिन थोडे मागासलेले शहर आहे (आर्थात त्यांच्या मानाने). तिकडे इतर युरोपियन शहरांसारखी चमक दमक नाही. एका प्रकारचे गंभीर वातावरण आहे. बर्लिन मध्ये स्प्रि नदी वाहाते. या युरोपच्या शहरांचे एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्येक शहरात सुरेख नदी आहे. स्प्रि चे वैशिष्ट्य म्हणजे ही नागमोडी वळणे घेत इस्ट आणि वेस्ट दोन्ही बर्लिन मधून वहाते.

नंतर चा आमचा मुक्काम होता ड्रेस्डेन शहरात. ह्या शहराने दुसऱ्या महायुद्धात अपरिमित हानी सोसली. १३ ते १६ फेब्रुवारी १९४५ ला जर्मनीची सपशेल हार दिसत असतानाही. इंग्लो-अमेरिकन विमानांनी ह्या शहरावर अपरिमित बॉम्ब फेक केली. बॉम्ब चा वर्षाव एवढा जास्त होता की इअमारती तर बेचिराख झाल्याच पण त्याचं बरोबर रस्त्याचे डांबर पण वितळले आणि लोक त्या रस्त्यात भाजून, पोळून मेली. सगळ्या युद्ध पत्रकारांनी ह्याचे भीषण वर्णन केले आहे. खुद्द चर्चिल सुध्धा ह्या हल्ल्या च्या विरुध्ध होता. परत ड्रेस्डेन च का? कारण इथले प्रसिध्द केथीड्रील आणि ही नागरी पूर्वी राजाघाराण्याच्या खुणा बाळगून आहे. ऑगस्ट-II द strong च्या काळात ही नागरी दिमाखाने उजळून निघाली होती. ह्या चर्च बद्दल जर्मन माणूस खूप हळवा आहे. इकडे लग्न करणे हे खूप अभिमानाचे समजतात. त्या मुळेच इंग्लो-अमेरिकन नी ह्या शहराची निवड केली. परत हे बर्लिन ला जवळ.

IMG_0188.JPG

हेच ते केथीड्रील. हे पूर्ण बेचिराख झाल.. अनेक लोक त्या वेळेस ह्या इमारतीच्या आश्रयाला गेले. कारण त्यांचा विश्वास होता की काहीही झाल तरी ही इमारत पडणार नाही. आपला देव आपल्याला वाचवेल. पण कलीयुगात देव सुध्धा ऐकत नाही ह्याचे प्रत्यंतर त्यांना आले. आत मधली सर्वच्या सर्व माणसे इमारातीसकट भुइसपाट झाली!!!. नंतर हे चर्च त्यांनी जस च्या तसं बांधून काढलं. त्या करीता लग्नाचे जुने फोटो मागवून त्या बर हुकुम हा चौक परत बांधला. शक्य तेवढे जुने जळलेले दगड वापरले.

193 Dresden Germany 24.JPG202 Dresden Germany4.JPG

हा इथला राजवाडा. राजघराणे पहिल्या महायुध्धा नंतर लयाला गेले. पण ही वास्तू आता राजकीय शिष्टाचारा साठी वापरतात. बराक ओबामा दोन वर्षांपूर्वी इथे राहून गेला.

ह्या शहराच्या पुनर्बांधणी साठी अनेक धनिकांनी आपली तिजोरी सैल सोडली. जर्मन रियुनियन नंतर ह्या शहराच्या पुनर्बांधणी चा विषय चर्चिला गेला. खूप चर्चा झाली आणि मगच होतं त्याचं स्वरूपात पुनर्बांधणी करायचे ठरले.

हे शहर बघून एक प्रकारची उदासीनतेची छाया येते. ह्याचा नवा चौक नितांत सुंदर आहे. आम्ही बराच वेळ इकडे शांत पणे बसलो होतो. अगदी माझ्या मुलीलाही ह्या जागेने अंतर्मुख केले. एकेका शहराची महती अशीच असते.
जर्मनी मधून निघता निघता मन झाकोळून गेले होते. पण पुढल्या मुक्कामी जाताजाता आम्ही जर्मन अभिमानाच्या अजून एका जागेला भेट दिली. माय्सेन पोर्सेलेन factory. चायनीज पोर्सेलेन वापरायची युरोप ला प्रचंड सवय झाली होती. पण चीन च्या किंमती फारच चढ्या होत्या. ते आपली मुजोरी कायम ठेवून होते. हे मोडून काढण्या साठी ऑगस्ट-II द strong ह्या राजाने जर्मन संशोधकांना आव्व्हान केले की तुम्ही हे पोर्सेलीन बनवून दाखवा. त्यांनी हे आव्हान स्वीकारले व अनेक वर्षांच्या मेहेनती मधून मायसेन पोर्सेलीन कारखान्याची सुरुवात झाली. आज युरोपात इतका जुना व जुन्या पद्धतीने कलाकुसर करणारा इतर कुठलाही कारखाना नाही. इथले पोर्सिलीन संपूर्ण युरोपात विकले जाते. आणि हो चायना पेक्षा ह्याची मागणी जास्त आहे. आपल्या दृष्टीने हे फक्त पहायचे..... घेणे अपने बस की बात नही.

214 Mysen Porceilin1.JPG225 Porceilen factory Mysen.JPG

पुढचा भाग

भाग ३ - प्राग, पोलंड = http://www.maayboli.com/node/54122

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर मालिका. छान लिहिताहात.

परागला अनुमोदन. ह्या प्रवासादरम्यानचे तुमचे अनुभवही लिहा.

त्या बर्लिनवॉलचे तुकडे सुवेनियर्स म्हणून इतक्या ठिकाणी विकायला ठेवलेत की ते सगळे एकत्र केले तर आणखी २-३ बर्लिन वॉल्स बांधता येतील असं जर्मन मित्र म्हणाला. Happy

या बर्लिन भिंतीचे दोन-तीन मोठाले सेक्शन्स स्त्रासबोर्गला युरोपियन पार्लमेंटच्या बाहेर पुन्हा जुळवून - ग्रॅफिटी सकट - ठेवले आहेत. कायमचे रिमाइंडर म्हणुन.

खूप छान माहिती देतीयेस, फोटोज ही समर्पक..

ते केथीड्रील किती भव्य आहे.. सुंदर.. पोर्सिलिन वस्तू अतिशय नाजूक आणी अतीसुंदर आहेत..

इतिहासा बरोबर तुमचे अनुभव ही अधून मधून पेरून टाक... Happy

छान माहिती आणि फोटो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. Happy

दुसरं महायुध्द आवडीचा विषय असल्याने युरोपला भेट द्यायची इच्छा आहेच. तोपर्यंत या धाग्यामधून हौस भागवून घेतो.

विकिपीडिया उतरवून काढल्यासारखे वाट्ले वाचून.

हे स्मारकही खूप सुरेख आहे. अनेक आकारांच्या शाव पेट्या असाव्या असे त्यांचे स्वरूप आहे.>> हे सुरेख टुरिस्ट अ‍ॅट्रेक्षन? बराक ओबामांना अरे तुरे?

युनिफिकेशन वर बोलताना माझी एक जर्मन मैत्रीण् म्हटलेली हो आता तिथून त्राबीज खूप येतात इकडे वेस्ट मध्ये. त्राबांट त्यांची इस्ट मधली जुन्या टाइपची सरकारी प्रॉडक्षन असलेली कार. ती वेस्ट मधील हाय टेक गाड्यांच्यामानाने जास्त प्रदुषण करत असे. ती गाडी चालव्णारे ते त्राबीज... ते आठवले.

छान जमलाय हा भाग. हि भिंत तोडली त्यावेळी झालेला जल्लोश अजून आठवतोय मला.

मेक मी अ जर्मन, ही बीबीसी ची एक फिल्म आहे. जर्मन माणसाची मानसिकता छान उलगडून दाखवलीय त्यात.

हे स्मारकही खूप सुरेख आहे. अनेक आकारांच्या शाव पेट्या असाव्या असे त्यांचे स्वरूप आहे.>> हे सुरेख टुरिस्ट अ‍ॅट्रेक्षन? >>>>

हो आहेच सुरेख..... कारण तिकडे अजिब्बात उदासी वगैरे वाटत नाही. खुप कलात्मक वाटते. त्या गाइड नेही तेच सान्गितले की आम्ही आता त्या घटने कडे एक चुक म्हणुनच पहातो. ह्या स्मारकाने त्याची भरपाई झाली अशी त्यान्ची भावना आहे. ते नुसतेच स्मारक आहे. तिकडे कोणी येवुन फुलं बीलं ठेवत नाहीत. त्या दिवशीच्या लख्ख सुर्य प्रकाशात ते खुप व्हायब्रण्ट वाटत होते. टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन असण्या पेक्शा, जर्मन टुरीझम ची ती अटच आहे. बाकी काही बर्लिन मधे पहा नाहीतर पाहु नका हे आणि डी.डी.आर. म्युझियम पाहिलेच पाहिजे. आम्ही आता कसे बदललो आहोत हे दाखवायची त्यान्ची धडपड आहे.

बराक ओबामांना अरे तुरे?>>>>

ही अमेरिकन पद्धत आहे हो.... येवढे काय मनावर घेता. माझा एक अमेरिकन क्लायेंट जो ७५ वर्षांचा आहे, माझ्या वडिलांपेक्शा ही मोठा. तो ही स्वतःला एकेरी नावाने हाक मारायला आवर्जुन सान्गतो. मग ओबामा तर माझ्याच वयाचा आहे. येवढे मनावर घेवु नका हो.....

विकिपीडिया उतरवून काढल्यासारखे वाट्ले वाचून.>>>

आम्हाला जेवढी माहिती गाइड्ने दिली तेवढीच मी इकडे देवु शकले. कारण इतर माहिती मिळवण्या साठी फारसे कोणी बोलायला उत्सुक दिसले नाही. त्यांना इंग्लिश चा तिटकारा असल्याने लोक फारसे मिक्स होत नाहीत. परत मनातले बोलायला माझ्या ओळखीचे तिकडे कोणी रहातही नाही.

डी.डी.आर. म्युझीयम मधे ती गाडी ठेवली आहे. पण तिकडे आपल्याला काहीच बॅकवर्ड वाटत नाही. कारण त्या गाडी सारखी गाडी म्हणजे फियाट आपण त्या काळात इकडेही वापरत होतो. त्यांची सरकारी घरं जी साधारण दोन बेडरुम ची असायची ती आपल्या अत्ताच्या घरां पेक्शा आणि चाळीं पेक्शा फारच प्रशस्त वाटली. पण अति सुधारलेल्या वेस्ट जर्मनीला सहाजिकच ते बॅकवर्ड वाटणारच.

इतर देशात मात्र लोक बोलायला उत्सुक दिसली. प्रामुख्याने क्रोएशिया व पोलंड ला. सहाजिकच तिकडची वर्णने सविस्तर आहेत.

मस्त लिहिले आहे. आणि तुम्हा दोघांचा फोटो बघून खूप छान वाटल. तिसरा भागही वाचला तोही अतिशय छान आहे. मजा येत आहे. शैली आणि माहिती अतिशय छान.