कार सीएनजीवर करावी का?

Submitted by ferfatka on 26 July, 2013 - 10:32

माझ्या मित्राकडे नवीन मारुती आल्टो आहे. पेट्रोलवर गाडी असल्याने साहजिकच परवडत नाही. हिंडण्याकरिता गाडी वापरत आहे.
ही गाडी सीएनजीवर कार्न्व्हट करता येईल का?
गाडीचे इंजिन अजून वॉरंटी पिरीअडमध्ये आहे.
सीएनजी केल्याने एंजिनला काही प्रॉब्लेम येत नाही?
अंदाजे काय खर्च येतो?

यासाठी हा प्रश्न.

जाणकारांनी माहिती द्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जेव्हा LPG किट लावला होता तेव्हाच मला सांगीतले गेले होते की महिन्यातुन एकदातरी गाडी पूर्णपणे पेट्रोल्वर चालवत जा. मी किमान ६-७ वर्ष एल्पीजी वर सुझुकी बालेनो चालवली होती. मला एकदाही कसलाच प्रॉब्लेम आला नाही.

मी जेव्हा LPG Kit बसवला तेव्हा मलाही हाच प्रश्न होता की पिकप कमी होतो का? अनेक मित्रांकडुन ऐकले होते की कमी होतो. ज्यांनी बसवला होता त्यांच्या गाड्या ८०० सीसी होत्या म्हणुन की काय पण बालेनो (१६०० सीसी) ला कधीच हा त्रास झाल नाहे. घाटातुन सुद्धा ३ र्‍या ४ थ्या गियरवर गाडी व्यवस्थित चाल्त होती.

असे ऐअकले की काही पब्लिक पेट्रोल मध्ये साखर मिसळते (त्याने काय इथनॉल बनते ? ) जाणकारांनी प्रकाश टाकावा

<< काही पब्लिक पेट्रोल मध्ये साखर मिसळते (त्याने काय इथनॉल बनते ? ) जाणकारांनी प्रकाश टाकावा >>

पेट्रोलमध्ये साखर टाकल्यास इंजिन कायमचे निकामी होईल.

साखर टाकून ती तळाशी बसेल आणि गंज किंवा वाळू इ. मुळे जसा फ्युएल पंप क्लोग होऊ शकतो तसा jam होईल. ते ही पेट्रोलची पातळी पुरेशी खाली गेली आणि तुम्ही लकी असाल तरच.

हलकट रिस्पॉन्स सुरू/
महोदय,
आपणास परवडत नसताना चार चाकी पेट्रोल गाडी विकत घेण्याचा अट्टाहास का केलात?
सीएनजी म्हणजे ग्यास कीट बसवणे अन त्यात स्वयंपाकाचे ग्यास सिलिंडर वापरणे असा त्याचा सरळ सीधा अर्थ होतो. हे नस्ते उद्योग करत जाऊ नका हे नम्र विनंती. या असले धंदे करणार्‍या लोकांमुळेच सर्वसामान्यांना ६ सिलिंडरची सबसिडी इत्यादी प्रॉब्लेम उत्पन्न झालेले आहेत.
सीएनजी रिफिल सेंटर्स, टाकीत एकदा भरलेला सीएनजी, अन 'हिंडण्या'साठी वापरलेली गाडी याचा हिशोब कधीही सीएनजीपंप टू सीएनजी पंप असा होत नाही, हे मी पैज लावून सांगतो.
धन्यवाद.
/रिस्पॉन्स समाप्त.

Submitted by इब्लिस on 26 July, 2013 - 13:13

सीएनजी गाडी एलपीजीवर आणि पुढे डिझेल इंजिनला सी एन जी. मनोरंजक धागा आहे.

आजकाल ओला/उबर ई मधून येणार्‍या जवळजवळ सर्व गाड्या डिकीमधे ती टाकी बसवलेल्या येतात असा अनुभव आहे. परगावाहून येताना बॅगा तेथे ठेवता येत नाहीत. त्या गाडीतच ड्रायव्हरच्या बाजूला किंवा मागे आपल्या शेजारी ठेवूनच प्रवास केलेला आहे. या ड्रायव्हर्सशी गप्पा मारताना नुसत्या पेट्रोल वर परवडत नाही असे सहसा म्हणतात. पण हायवे ड्रायव्हिंग असेल तर पेट्रोल व शहरात सीएनजी वापरून गाडी चालवतो असेही म्हणतात.

पेट्रोल महाग आहे आणि cng तुलनेने थोडा स्वस्त आहे
इंधन खर्च कमी करणे हा एकमेव उद्ध्येश आहे ह्या मागे
CNG वर चालणाऱ्या गाड्या आता कमी आहेत म्हणून तो स्वस्त ठेवला असावा लालच म्हणून उद्या पेट्रोल वर आधरील कमी झाल्या आणि cng वर चालणाऱ्या वाढल्या की cng पण पेट्रोल पेक्षा महाग होवू शकतो.
मला आठवतो सुरवातीला lpg cylinder 100 रुपये होता.
केबल चे भाडे 80 ते 90 रुपये होते.
सवय लागल्या बरोबर भयंकर दर वाढले.

Pages