रणबीरचा फसलेला अमिताभ (Movie Review - Bombay Velvet)

Submitted by रसप on 17 May, 2015 - 00:35

प्रत्येक प्रसिद्ध नावाच्या भोवती त्या प्रसिद्धीच्या वलयाच्या आत अजून एक वलय असतं. अपेक्षांचं वलय. ते नाव डोळ्यांसमोर आलं की काय अपेक्षा करायची, हे आपल्याला समजत असतं. उदा. 'प्रीतम चक्रवर्ती' म्हटलं की 'ढापलेलं सुमधुर संगीत' किंवा 'सूरज बडजात्या' म्हटलं की 'अतिरंजित कौटुंबिक कंटाळा' किंवा 'आशुतोष गोवारीकर' म्हटलं की 'किमान सव्वा तीन तास' किंवा 'रोहित शेट्टी' म्हटलं की 'तडातड उडणाऱ्या गाड्या आणि माणसं' वगैरे. तद्वतच 'अनुराग कश्यप' म्हटलं की मी अपेक्षा करतो 'विस्कळीत तरी ऐटबाज, अंधारी पण वास्तववादी आणि अतिरंजित मात्र भेदक अशी मांडणी.' 'बॉम्बे वेलवेट' ह्या अपेक्षांच्या समीकरणाचा फक्त पहिला भाग पूर्ण करतो. 'विस्कळीत, अंधारी आणि अतिरंजित' मांडणी. अपेक्षाभंगाची निराशा सगळ्यात मोठी निराशा असते. हा अपेक्षाभंग, माझ्यासाठी तरी, ह्या वर्षातली आत्तापर्यंतची तरी सगळ्यात मोठी निराशा घेऊन आला. दिलासा इतकाच की अगदी सुरुवातीपासूनच आपल्या मनाची तयारी होत जाते की अखेरीस आपल्या खिश्यातून गेलेल्या पैश्यांची जागा निराशा घेणार आहे.

ह्या मानसिक तयारीची सुरुवात श्रेयनामावलीत होते. 'Introducing Karan Johar' असं आपण वाचतो आणि क्षणार्धात आपल्याला 'अरे ! मग 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मध्ये शाहरुख खानसोबत बागडणारा त्याचा टोपीवाला मित्र कोण होता ?' हा प्रश्न पडतो. अनुरागरावांचा अर्धा गुण ह्या अशुद्धलेखनासाठी आपण तडकाफडकी कापतो. (फराह खानने 'ओम शांती ओम' मध्ये शाहरुखसाठी 'Re-introducing' लिहिलं होतं, तसं तरी लिहायचं होतं ना !)
मग कहाणी सुरु होते.

१९४९ साली एका मुलाला घेऊन मुंबईत आलेली एक निराधार स्त्री. कामासाठी वणवण भटकते आहे. (लगेच आपल्या मनात १९७५ सालच्या 'दीवार'च्या आठवणी ताज्या होतात.) त्या स्त्रीला देहविक्रयाच्या धंद्यात जबरदस्ती ओढलं जातं. (कट - 'प्रहार' आठवतो.) तो मुलगा - बलराज - एका बिघडलेल्या मुलाच्या - चिमन - नादाला लागून चोऱ्यामाऱ्या करायला लागतो. (गेल्या ६० वर्षांतले अनेक चित्रपट).

मग मोठे होतात. बलराज (रणबीर कपूर) आणि चिमन (सत्यदीप मिश्रा) दोघे जिगरी यार पार्टनरशिपमध्ये डल्ले मारायला लागलेले असतात आणि साईड बाय साईड गोव्याहून मुंबईला आलेली एक जाझ गायिका व सुंदरी सोझी नोरोन्हा (अनुष्का शर्मा) बलराजला आवडायला लागलेली असते. आता इथून पुढे एक कुणी तरी बडी असामी ह्या दोघांना पंखांखाली घेऊन, त्यांच्याकडून काम करवून घेऊन आपला फायदा करून घेणार, हे चित्रपटलिखित जसंच्या तसं घडतं ! इन कम्स 'कैझाद खंबाटा' (कारण जोहर). सुज्ञ प्रेक्षकाला पुढील कहाणी सांगायची आवश्यकताच नाही.

ह्या चौघांव्यतिरिक्त एका वृत्तपत्राच्या संपादकाच्या (जिमी मिस्त्री) भूमिकेत मनीष चौधरी, बॉम्बेच्या महापौराच्या (रोमी मेहता) भूमिकेत सिद्धार्थ बसू आणि पोलीस इन्स्पेक्टर कुलकर्णीच्या भूमिकेत के के मेनन झळकतात. अनुराग कश्यप तर दगडाकडूनही काम करवून घेऊ शकतो, हे तर मुरलेले, तगडे लोक ! त्यातही मनीष चौधरीचा संपादक मात्र भाव खाऊन जातो. जबरदस्त ऐटबाज मिस्त्री त्याने सुंदर उभा केला आहे. सिद्धार्थ बसू बेरकी राजकारणी मस्तच वठवतात. आणि दुर्दैवाने 'बेबी'नंतर पुन्हा एका चित्रपटात के के मेनन वाया गेला आहे. त्याच्या भूमिकेची लांबी आणि व्याप्ती खूपच सीमित आहे आणि तेव्हढ्यातही तो आपली छाप सोडत असला, तरी ते पुरेसं वाटत नाही.

करण जोहर मुख्य खलनायकाच्या भूमिकेला बऱ्यापैकी न्याय देतो. खंबाटा भयावह वाटत नाही, पण प्रभावी नक्कीच वाटतो. त्याच्यातल्या दिग्दर्शकाच्या सावलीत लपलेला त्याच्यातला अभिनेता अनुराग कश्यपने बाहेर काढला आहे.
सत्यदीप मिश्राने 'चिमन'च्या भूमिकेत जान ओतली आहे. हतबुद्ध, निराश, चिडलेला, सच्चा, सांभाळून घेणारा अशी एका मित्राची अनेक रूपं त्याने दाखवली आहेत. 'चिमन'शिवाय 'जॉनी बलराज' मध्ये मजा आली नसती आणि 'सत्यदीप'शिवाय 'रणबीर'सुद्धा कंटाळवाणा वाटला असता.
रणबीर कपूर 'रॉकस्टार'च्या पुढे जात नाही, हे खेदाने नमूद करावं लागतं. काय कमी किंवा काय जास्त झालं, हे सांगण्यापेक्षा 'त्याचा अमिताभ बनायचा प्रयत्न फसला आहे', ह्या सरळसाध्या शब्दांत नेमका सारांश सांगता येईल. बलराजच्या व्यक्तिरेखेच्या नाण्याच्या एक तडफदार प्रेमी आणि एक अँग्री यंग मॅन ह्या दोन बाजू आहेत. रणबीर ह्या दोन्हींपैकी कुठलीच चकचकीत करू शकला नाही.
रोझीच्या भूमिकेत अनुष्का शर्मा अतिशय सफाईदार वाटली. दिसलीही सुरेख आहे. सगळ्या मोठमोठ्या नावांत अनपेक्षितपणे ती सगळ्यांत जास्त उठून दिसते. NH10 नंतर पुन्हा एकदा तिने दमदार काम केलं आहे. गाण्यांवर ओठ हलवताना ती सूर समजून घेऊन काम करत आहे, हे चाणाक्ष प्रेक्षकाच्या नजरेतून सुटत नाही.

संवादलेखनात 'काहीच लक्षात न राहू शकणे' हीच एक लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. अमिताभचा अँग्री यंग मॅन यशस्वी होण्यामागे सलीम-जावेद जोडीचे दमदार संवाद खूप महत्वाचे होते. ती मदत इथे रणबीरला न मिळाल्याने त्याचा अमिताभ होऊ शकण्यात महत्वाचा अडसर आला आहे.

अमित त्रिवेदीचं संगीत कर्णमधुर आहे. सगळीच गाणी श्रवणीय झालेली आहेत. 'चित्रपटात श्रवणीय संगीत असू शकते', हा समज मागे सोडणाऱ्या जमान्यात अमित त्रिवेदी, शंतनू मोईत्रा ह्यांच्यासारखी काही नावं माझ्यासारख्या चित्रपटसंगीतप्रेम्याला दिलासा देतात.

अखेरीस, एखाद्या दिवशीच्या मळभाने सूर्य लपत नसतो, तसंच एखाद्या अपयशाने कुणी गुणी कलावंत खचतही नसतो. एका चित्रपटात रणबीर अमिताभ बनू शकला नाही आणि अनुराग कश्यप प्रकाश मेहरा बनू शकला नाही. पण त्यांच्या पुढील कामांतून 'बॉम्बे वेलवेट'ची पुटं नक्कीच झटकली जातील. तोपर्यत चाहते ह्या आधीचे चित्रपट बघू शकतील.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/05/movie-review-bombay-velvet.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१७ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह...........आज पहाण्याचा (एक डळमळीतच!) प्लॅन होता...................................................................................................................................................................................................................

फार मवाळ लिहीले आहे रसप Happy

कास्टींग जाम गंडले आहे. जॅझ सिंगर म्हणून रणबीर हवा, अनुष्का फायटर हवी - तिच्या ओठातही मसल्स बिल्ट झाले आहेत, चिमन म्हणून करण जोहर हवा, सत्यदीप इंस्पेक्टर हवा आणि केके खंबाटा हवा !

तिच्या ओठातही मसल्स बिल्ट झाले आहेत, >>>>>>>>>>> सीमंतिनी आपने तो एकदम मेरे "होटों"की बात छीन ली.
आमीरच्या पीके त ही गोष्ट पहिल्यांदा प्रकर्षाने जाणवली. प्रोफाइलमधे काय हॉर्रिबल दिसतात तिचे ओठ!

रसप, review बद्दल धन्यवाद. वाटच पाहात होते. एकूण पिक्चर बघू नये असं मत झालं आहे समहाऊ.

सी Proud मस्त पोस्ट!

@सीमंतिनी,
धिस मे सर्प्राईझ यू, पण मला तर अनुष्का खूप सुंदर दिसली ह्यात. कामही उत्तम आणि अगदी लव्हेबल वाटली !

किल दिल, गुंडे वगैरेचे मिश्रण दिसतेय कथा म्हणजे.. कथा या खात्यावर कधी विचार करणार हे हिंदी सिनेमावाले ?

मी पाहिला .करण जोहरच काम मस्त झालय. रणबीर ठीक ठाक .जुनी मुंबईच दर्शन घडत. माझ्यासारख्या आजच्या पिढितल्या मुंबईकरांना मस्त वाटल जूनी मुंबई पाहुन. सत्यदीप मिश्राने भारी काम केलेय. अनुष्का सुंदर दिसलीये.
के के मेनन बाबत रसपशी सहमत. वाया घालवल आहे त्याला.

backbay reclamation आणि त्याच्या सन्दर्भात येणारे मुद्दे या भोवती चित्रपट फिरतो .शेवट अपेक्षित आहे. पहिला भाग रंजक आहे . दुसरा भागही बऱ्यापैकी जमलाय . एकन्दरीत चित्रपट ठीक ठाक आहे. आवर्जून पाहावे अस नाही . मात्र जूनी मुंबई पाहायची तर पाहवा

असा चित्रपट आहे, येऊन गेला हे देखील आज समजले, तर बघण्याचा प्रश्नच नव्हता. आता तर मुळीच नाही.. पण आपले परीक्षण आवर्जून वाचतोच.

जर रणबीरने अमिताभ बनायचा प्रयत्न केला असेल (किंवा त्याला तसे बनवायचा प्रयत्न केला असेल) तर ते फसणारच होते कारण तो त्याचा पिंडच नाहीये.

मला तो सर्वात बेस्ट "अजब प्रेम की गजब कहाणी" मध्ये वाटला होता. त्याच्यासाठीच पुन्हा पुन्हा बघतो तो चित्रपट.

करण जोहरचा एक संवाद मात्र आख्खे थिएटर हसवून जातो...

रोझीमे तुमने ऐसा क्या देखा जो मुझमे नही था.....

बाकी डायरेक्शन, टेकिंग, फोटोग्राफीला जेवढे कष्ट आणि खर्च केला आहे तितकेच कथेवर घेतले असते तर खूपच सुसह्य झाला असता....

करण जोहरचा एक संवाद मात्र आख्खे थिएटर हसवून जातो...

रोझीमे तुमने ऐसा क्या देखा जो मुझमे नही था.....>>>>> अगदी अगदी .फ़िस्सकन हसायला आल या संवादाला Lol Proud

" एका वृत्तपत्राच्या संपादकाच्या (जिमी मिस्त्री) भूमिकेत मनीष चौधरी, बॉम्बेच्या महापौराच्या (रोमी मेहता) भूमिकेत सिद्धार्थ बसू ..."

हे लोकं मला आठवतही नाहीयेत , ईतकी मी कंटाळले होते बाँबे वेलवेट पाहतांना!!

कमीतकमी पन्नास वेळा तो फायटींगचा सीन का दाखवलाय? बर्फी मधे तो खांब पाडायचा सीन जीतक्या वेळा येतो आणी असह्य बोर करतो, साधारण तितक्याच वेळा हा फायटींग प्रकारही वैतागवाणा होतो.

एकवेळ रणवीर सिंगचा थिल्लरपणा परवडतो, पण रणवीर कपूर कायमच असह्य पकाउ वाटतो... त्याच्या कपूर खानदानामुळेच त्याचा ईतका उदोउदो केला जातो की काय? मला तर तो फक्त वेक अप सिद मधे जरा सुसह्य वाटला होता...पण अर्थात त्यातही त्याच्यापेक्षा लक्ष वेधून घेणारी कोंकणा सेनशर्माच होती.

अनुष्काने पहिल्यांदा नॉन-दिल्ली मुलीचा रोल केला आहे. त्यामुळे वेगळी वाटली. रोलमध्ये अपेक्षित व्हल्नर्लेबलिटी ही दाखवते पण सुंदर किंवा लव्हेबल वाटली हे निश्चितच आश्चर्यकारक आहे Happy पसंद अपनी अपनी.

अनुष्काचे गाऊन्स आणि एकूणच वॉर्ड्रोब मस्त आहे.

>> अनुराग कश्यप प्रकाश मेहरा पेक्षा भारी आहे. <<

गोंडस विधान आहे. मात्र जंजीर, शराबी सारखे चित्रपट त्या काळाच्या चित्रपटांचा विचार केल्यास आजच्या अनुराग कश्यपपेक्षा खूपच भारी होते, असं माझं मत आहे. बीसाईड्स दॅट, प्रकाश मेहरा वेगळाच जीनियस होता. त्याने खूप सुंदर गाणीसुद्धा लिहिली आहेत. 'मंज़िलें अपनी जगह हैं...', 'लोग कहतें हैं मैं शराबी हूँ..' सारखी गाणी त्याने लिहिली आहेत.
खरं तर कश्यप व मेहरा ह्यांची तुलना होऊ शकत नाही. पण ह्या चित्रपटात जसा मेहराने अमिताभला 'अँग्री यंग मॅन' बनवला, तसा प्रयत्न कश्यपने रणबीरसाठी केला आहे. म्हणून ते वाक्य टाकलं आहे.

मात्र जंजीर, शराबी सारखे चित्रपट त्या काळाच्या चित्रपटांचा विचार केल्यास आजच्या अनुराग कश्यपपेक्षा खूपच भारी होते,>> I don't agree. These movies were having a typical story. Only the handling was different.Sharabi was boring at the end. But Anurag's movies are different. Bombay Velvet may be not upto the mark. Anyway we may have different likes and dislikes.

जंजीर, शराबी पेक्षाही मला प्रकाश मेहरा खून पसीना करिता जास्त लक्षात राहिला. त्यात अमिताभच्या घरी मेजवानीच्या वेळी त्याच्याकडे असलेले कादर खानचे घड्याळ हरविते हे दृश्य तर अफलातून आहे. एरवी अभिनयाबाबत टीका सोसाव्या लागलेल्या भारत भूषण यांच्याकडूनही फार छान अभिनय करवून घेतला आहे.

'बॉम्बे वेल्व्हेट' हा 'अँग्री यंग मॅन'चा चित्रपट नाही. चित्रपटात रणबीर मारामारी करतो, त्याचा एक मित्र असतो म्हणून त्याची अमिताभशी तुलना व्हावी, हे पटलं नाही.

ट्रेलर वरुन रणबीर यात बराचसा यन्ग रॉबर्ट डि नेरो सारखा वाटतोय, डिनेरो चे अगदी यन्ग असतानाचे सिनेमे पाहिले तर बरच साम्य जाणवत..

+

रसपचे रिव्ह्यु निरस होत चाललेत.

बच्चनशी तुलना अनाठायी वाटते.

उलट , मला हा षिनेमा राजकपुरच्या जागते रहोचा सिक्वल वाटला.

राज कपुर असता तर रणवीरला बोल्ला असता ... भविष्यात मुम्बैचं काय होणार हे जागते रहो मध्ये मी१९५१ सालीच दाखवलं होतं. त्यात झलक होती. मुम्बै वेल्वेटमध्ये पूर्ण चित्रण आहे.

अनुराग कश्यप म्हणे पॅरीसला चाललाय कायमचा भारत सोडुन. का तर म्हणे हा पिक्चर आपटला.:अओ: मटाला बातमी आहे, खरे का?

Pages