परग्रहवासी आणि मनुष्यजन्म

Submitted by गुंड्याभाऊ on 29 August, 2010 - 07:07

तसे लहानपणापासुनच अवकाश आणि परग्रहवासी यांचे मला प्रचंड आकर्षण, पृथ्वीचि निर्मिती ,मनुष्याचा जन्म, सजीवस्रुष्टी, एक ना विविध प्रश्न आणि तितकेच जबरदस्त कुतूहल. त्यामुळे डिस्कवरी चॅनल वर पुरातन शास्त्र किंवा मध्यंतरी सुरु असलेली डर्विन वरची मालिका अशा विषयांवर अजुन विचार करायला भाग पाडते पण मनासारखे ऊत्तर नाहि मिळाले की चुकचुकल्यासारखे वाटत राहते..... असेच माहिती मिळवत असताना एक दिवस एक अफलातुन पुस्तक हाती लागले... डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "पृथ्विवर माणुस ऊपराच". आणि मनुष्यजन्माचा एक विलक्षण पैलु समोर आला, का कोण जाणे पण पुस्तकाचे एक एक पान वाचताना हेच विचार मनात येत होते कि यस्स कदचित इतके वर्ष जे प्रश्न मनाला भेडसावतायत त्यांची उत्तरे हेच पुस्तक देणार.
याचे कारण की लहान पणा पासुन माणुसाचे पुर्वज माकड होते हा डर्विन चा एकच सीद्धांत आपल्याला शीकवला गेला आहे त्यामुळे या विषयाचा कोणता दुसराही पैलु असु शकतो याचा आपण विचार नाहि केला.....हे पुस्तक ज्या मुळ इंग्रजी पुस्तकाचा (चॅरीऑट्स ऑफ गॉड) अनुवाद आहे त्याचे लेखक व शास्त्रज्ञ एरीक वॉन डॅनिकन याने डर्विन च्या सीद्धांताला आव्हान देत स्वतःचे संशोधन मांडले कि देव हे खरेतर अंतरळातील प्रवासी, हजारो वर्षापुर्वी हे प्रवासी पृथ्विवर आले आणि त्यांनी एक जीव निर्माण केला तो म्हणजे माणुस तेव्हा पासुन ते सतत एक चांगला माणुस बनविण्यासाठी धडपडतायत, ते दर सदतीस हजार वर्षांनी पृथ्विवर येतात चांगल्याना ठेवतात व निकृष्टांना नष्ट करतात. हे संशोधन करताना जगभर फिरुन अब्जाधिश डॅनिकन अगदी कफल्लक झाला, आणि पुन्हा आपल्या केलेल्या संशोधनाच्या जोरावर अब्जाधिश झाला. आज जगभरातुन असंख्य शास्त्रज्ञ डॅनिकन च्या या विचारावर संशोधन करीत आहेत. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णि हे त्या पैकीच एक. सुलभ मराठी भाषेत थक्क करणारी माहिती.(पण हे पुस्तक वाचताना मनाला वेदना होऊ शकतात).काही विचार करण्यास भाग पाडणारी माहिती जसे, १) नॉर्वे ला केंद्रबिंदु मानुन हजारो वर्षापुर्वि हरणाच्या कातडी वर चित्रीत केलेला जगाचा नकाशा, ज्या मध्ये अंटार्क्टीका चा बर्फाच्छिदीत भूभाग अचुक नोंदवला आहे जो आजच्या आधुनिक लेजर तंद्र्ज्ञानाने तयार केलेल्या नकाशाशी तंतोतंत जुळतो.जे तेव्हा माणसाला जमणे शक्यच नव्ह्ते कारण कोणत्याही प्रदेशाचा नीश्चित आकार ठरविण्यासाठी काही ठरावीक उंचीवर जावे लागते, पण जीथे विमानाचा शोधच दिड-दोनशे वर्षापुर्वि लागला तेथे हजारो वर्षापुर्वि मानवाला जगाचा नकाशा काढणे केवळ अशक्यच.हे त्यावेळी आपल्या अवकाशयानातुन पृथ्विवर येणाऱ्या परग्रहवासियांचेच काम असणार. २) ईजीप्त चा "द ग्रेट पिरामीड ऑफ गीझा" म्हणतात सुमारे साडे चार हजार वर्षापुर्वी मानवाने याची निर्मिती केली. एरीक वॉन डॅनिकन च्या मते तो पिरॅमीड तयार करण्यासाठी सुमारे सव्विस लाख दगड वापरले आहेत आणि ते सुद्धा एक एक दगड कमीतकमी दहा ते बारा टन वजनाचा. आज आधुनीक तंत्रज्ञान वापरुन जरी ईतक्या वजनाचे पंधरा दगड जरी माणसाने एकावर एक रचले तरी विक्रम होईल. तर त्या काळी हे कसे शक्य झाले असेल याचि कल्पनाच केलेली बरी. शिवाय त्या पिरॅमिडची प्रत्येक बाजु हि पृथ्विला बरोबर मधुन छेदते, ते कसे? ....... सर्वच माहिती येथे नाही लीहीता येणार. तुम्ही सुद्धा हे किंवा या विषयावर काही वाचले असेल तर जरुर कळवा. ( बाळ भागवतांचे "देव छे ! परग्रहावरील अंतराळविर" हे सुद्धा य विषयावरील एक छान पुस्तक आहे...)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी याच विषयावर लेखमाला लिहील्याचे स्मरते. पृथ्वीवरचा माणुस उपरा. पुन्हा स्मरण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. हा विषय संगणकाशी संबंधीत कसा ?

छान माहीती...:)

डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "पृथ्विवर माणुस ऊपराच".
पुस्तक वाचण्याची उत्सुकता लागलीय...!!!!!!!

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

या पुस्तकाबद्दल मी मागे लिहिले होते.
यातली काही माहीती आता कालबाह्य झालेली आहे. (उदा. इष्टर आयलंड वरील प्रचंड मूर्ती. यावर द लॉष्ट गॉड ऑफ इष्टर आयलंड असा एक अत्युत्तम माहितीपट सर अटेंबरो यांनी तयार केला आहे.)
शिवाय डॉ. नाडकर्णी यांनी यापैकी कुठल्याही स्थळाला भेट दिलेली नाही. अर्थात त्यामूळे माहीती त्याज्य आहे असे नाही. मला या पुस्तकातला आवडलेला भाग, म्हणजे यात कुठलाही दावा केलेला नाही, तर केवळ या दिशेने विचार व्हावा असे सुचवले आहे.
विश्वात इतरत्र जीवन असण्याची शक्यता किती कमी आहे यावर श्री मोहन भागवत (नावाबद्दल खात्री नाही) यांचे एक अभ्यासपुर्ण पुस्तक आहे.

काही जीवाणू बाहेरून पृथ्वीवर आले असण्याची शक्यता आहे. काही जीवाणू अत्यंत कमी किंवा अत्यंत जास्त तापमानात राहू शकतात. त्यांना प्राणवायू नसला तरी ते जगू शकतात याचा पुरावा या लेखात आहे -- http://www.telegraph.co.uk/science/space/7960816/Bacteria-from-Beer-clif...

धन्यवाद... प्रतीसाद नोंदविल्याबद्द्ल........ दिनेशदा तुम्ही म्हणताय ते खरयं..... या पुस्तकात कुठलाही दावा केलेला नाही, तर केवळ या दिशेने विचार व्हावा असे सुचवले आहे. त्यामुळे जो तो आपला स्वतंत्र विचार मांडू शकतो.

अमित....... खरोखर हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे..... लवकर वाचुन पुढिल प्रतीक्रिया नोंदव... Happy

नितीनभाऊ लेख प्रकाशीत करताना चुकुन संगणक च्या चौकटी वर टिक झाले..... पण पुन्हा संपादन केल्यावर.. केलेल्या प्रतीक्रिया डिलीट होतील का या विचाराने दुरुस्त केले नाहि.. Sad

>>पण पुन्हा संपादन केल्यावर.. केलेल्या प्रतीक्रिया डिलीट होतील का या विचाराने दुरुस्त केले नाहि
नाही असे संपादित केल्याने प्रतिक्रीया डिलीट होत नाहीत.

डॅनिकन फ्रॉड होता. त्या पुस्तकांमधील अनेक "पुरावे" असेच बनवाबनवीचे आहेत. त्याने पण ते कबुल केले होते.

उदाहरणादाखल हा एक दुवा पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Chariots_of_the_Gods%3F

वेगळी मते हवीतच, पण आपणही त्याबद्दल विचार करु शकतो आणि तो करायला हवा.

हे पुस्तक मी वाचले आहे.
डार्विनचा सिद्धांत आणि डॅनिकनचे भाकड दावे यात काहीही संबंध नाही. डेनिकेन उत्क्रांतीबद्द्ल काहीच बोलत नाही त्याचा सगळा जोर मायन, इजिप्तिशियन पिरामिड, नाझ्का लाइन्स इ.इ. वर आहे.
जुन्या काळात घडून गेलेल्या गोष्टीचे आपल्याला वाट्टेल तसे इंटरप्रिटेशन करता येते. ते गांभिर्याने सांगितले की 'शास्त्रीय' दावा होतो नाहीतर पुलंनीही कुठेतरी 'म्ह्टलेच आहे की 'व्हॅटीकन हे खरे तर विठूकान्हा पासून आले आहे'

आगाऊ,

आपली प्रतिक्रिया हा लेख वर आल्यावरच वाचण्यात आली.

माझ्या मते हे पुस्तक डार्वीनच्या उत्क्रांतीच्या सिध्दांताला चॅलेंज करते. प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी हा सिध्दांत खुलेपणाने चॅलेंज न करता एक दुसरा विचार प्रवाह म्हणुन लिहले आहे. पुण्यात सकाळ मधे ही लेखमाला प्रसिध्द करताना ज्या काय अडचणी आल्या त्यामुळे खुलेपणाने त्यांनी लिहले नसावे. हे पुस्तक त्या लेखांचे एकत्रीकरण आहे. स्वतंत्र प्रबंध नाही.

त्यावेळेस चे संपादक विजय कुवळेकर यांनी प्रत्येक लेख स्वतः वाचुन प्रसिध्द करायला परवानगी दिल्याचा उल्लेख आहे.

आपण माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करता. आपले मत खोडण्यासाठी ही प्रतिक्रिया नाही.

Please watch Ancient aliens serial who are interested in this topic यातही डार्वीनच्या सिध्दांताला कुणीही हात घातलेला नाही. या सेरीज अमेरीका गुप्तपणे असे काही करत आहे इतकाच विचार प्रवाह मांडलेला मलातरी दिसला. फार झालेतर परग्रहवासीयांकडे आपल्यापेक्षा जास्त प्रगत तंत्रज्ञान आहे. अमेरीका जी काय शेखी मिरवते त्यात हे सर्व तंत्रज्ञान त्यांच्याकडुन घेतले असावे इ..

पुण्याचेच एक सर्जन डॉ भावे यांची अशीच एक लेखमाला आणि पुस्तक प्रसिध्द झाले. हे थोडेसे विषयांतर असले संदर्भहीन नाही. डॉ भावे यांनी कालीदासाचे मेघदुत अभ्यासले. मेघदुतात नागपुर ते हिमालयापर्यंतचा ढगाचा प्रवास आहे ज्यात शापीत गंधर्व आपल्या प्रेयसीला ढगाच्या माध्यमातुन संदेश पाठवतो अशी कल्पना आहे.

या प्रवास वर्णनाचा अभ्यास करण्यासाठी डॉ भावे यांनी याच पारंपारिक नसलेल्या मार्गाने स्वतः विमान चालवुन प्रवास केला. त्यांना जे आश्चर्यकारक वाटले ते असे की हजार वर्षांपुर्वी लिहलेल्या या काव्यात जे वर्णन कवी या प्रवास मार्गाचे करतो ते १००० फुट उंचीवरुन तसेच्या तसे दिसते.

यावर डॉ भावे प्रश्न विचारतात की १००० वर्षांपुर्वी एकतर विमान प्रवास केल्याशिवाय ही कल्पना सुचणे अशक्य आहे किंवा कालीदासाला १००० फुट उंचीवर जाण्याची आणि आकाश मार्गाने प्रवास करण्याची सिध्दी अवगत असावी. हे दोन्हीही आज अशक्य मानले जाईल.

अशाच अमानवी कलाकृती आणि कल्पना आज प्रत्यक्षात आहेत ज्यावरुन सुरेशचंद्र नाडकर्णी पृथ्वीवरचा माणुस उपरा हा डॅनिकन च्या सिध्दांत अधोरेखीत करतात.

माणुस पृथ्विवर उपरा आहे, किंवा
सर्व धर्मात पुजल्रे गेलेले जुन्या काळातले देव हे परग्रहवासी आहेत, किंवा
आपल्याकडे पुराणकाळात विमान होते,
हे सगळे कदाचित खरे असु शकेल. आपण त्या सगळ्या गोष्टी योग्य त्या पुराव्यानिशी सिद्ध होण्याची वाट पाहायला हवी.
हे असे खरे नसेलच असे नाही, याची जाणीव ठेवुन.
कारण संशोधन हा विशिष्ट वेळेत एकदाच होणारा विषय नसुन, ती एक सतत चालणारी प्रक्रीया असते आणि त्यात सतत नवीन माहीत मिळत जाते.

एखाद्या शेकडो / हजारो वर्षे जुन्या लेखकाची किंवा कवीची क्रियेटीविटी हा केवळ एकमेव दुवा आपला पुरावा होऊ शकत नाही.
असे करुन आपण त्या लेखक किंवा कविच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अपमान करत आहोत.

अगदी अलिकडच्या काळातही, माणुस चंद्रावर जाणे, परग्रहावर मानवाची वस्ती, लेझर किरण आणि ईतर ब-याच गोष्टी विज्ञान कथालेखकांनी त्यांच्या पुस्तकांत मांडलेल्या आहेत. त्या गोष्टी खरच घडण्याच्या कितीतारी वर्ष आगोदर.
यावरुन फक्त उपलब्ध ज्ञानावरुन भविष्यात काय घडु शकेल याची जास्तीत जास्त अचुक "कल्पना" करण्याची त्या लेखकाची ताकद दिसुन येते. यामधे फक्त "जे न देखे रवी...." एवढाच अर्थ आहे. ईथे विज्ञानाने मान्य केलेला कुठलाही पुरावा नाही.

ज्यावेळेला त्या लेखकाच्या क्रियेटीविटी सोबतच ईतर एखादा किंवा अनेक तपासुन बघता येण्याजोगे पुरावे मिळतील तेव्हा अशा एकत्रित पुराव्याला मान्यता देऊन एखादी गोष्ट स्विकारली पाहीजे.

असे "ईतर" पुरावे मिळतील या द्रुष्टीने संशोधन व्हायला हवे आणि आपली पैशाची किंवा कॉन्टॅक्ट्स्ची किंवा स्वता:च्या वेळेची ताकद आपण अशा संशोधनासाठी वापरली पाहिजे.

Ancient aliens टिवी सिरियल मधे किंवा ज्या लेखकांच्या पुस्तकांवर ती आधारीत आहे त्यामधे कुठेही, विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होणारे पुरावे दिलेले नाहीत. फक्त हा असे म्हणाला, त्या पुस्तकात तसे लिहिलेले आहे, या चित्रात असे दाखवलेले आहे या थिमवरचेच दावे आहेत. त्यातुन सिद्ध काहीच होत नाही.

जर आधुनिक माणसाला विमान शोधायला एकढी वर्ष लागली तर त्याचा अर्थ असा कसा काय होतो की जुन्या काळातल्या मानसाकडे पिरॆमीड बांधन्याचे तंत्रज्ञान नव्हते?
याचा अर्थ एवढाच होतो की "आपल्याला अजुन हे समजलेले नाही की त्याकाळात पिरॆमीड कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आले". ईथे परग्रहवासी कुठुन आले? नसतीलच असे नाही. पण मग तसे संशोधन होऊ द्या. थोडी वाट बघा.

"मध्यंतरी" रोमन लोकांच्या सिमेंटचे तंत्रज्ञानही गायब झाले होते. अंदाजे १००० वर्षानंतर आधुनिक माणसाल ते परत सापडले. मग यावरुन रोमन लोक परग्रहवासी होते असे म्हणता येईल का?
असे म्हणन्याएवजी या मधल्या हजारो वर्षाते ते तंत्रज्ञान गावब का झाले याचा शोध नको का घ्यायला?

या सारख्या टिवी सिरियल्स किंवा पुस्तक लेखकांमुळे सगळ्यात जास्त तोटा आपलाच होतो.
कारण मग आपण प्रत्यक्ष संशोधन न कराता अशा दाव्यांना सोशल मिडियामधे दामटवण्याचा प्रयत्न करतो आणि मग वैज्ञानीक त्याकडे निव्वळ एक् पोकळ गर्वाची गोष्ट म्हणुन पाहतात आणि सोडुन देतात.
यामधे मग १००% गोष्टींपैकी ज्या ५०% गोष्टी खरेच अस्तित्वात होत्या त्या ही खोट्या पडतात.

सरसकट सगळ्याच जुन्या गोष्टी आणि दावे नाकारण्यात काही अर्थ नाही.
पण ते स्विकारण्याआगोदर, नवीन काळात त्याचे परत संशोधन आणि पडताळणी झाली पाहिजे, आणि ते होऊन निकाल पॉझिटीव्ह येईपर्यंत, नुसते पो़कळ दावे करणे नको, ईतकेच.

यासाठी आपला भर हा या सर्व पैराणिक गोष्टींच्या परत संशोधन करुन पडताळुन आणि मगच मान्य करण्यावर असायला हवा.

पलिकडच्या गल्लितील चर्चेतील माझे मत इथे कॉपी पेस्ट करुन ठेवत आहे:

मुळात ज्यांना खरोखर वैज्ञानिक दृष्टीकोन आहेत ते इतक्या छातीठोकपणे नास्तिक असुच शकत नाहीत!
सतत आपल्या मान्यता बदलायची तयारी असणे हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूळ आहे
>> मी चर्चा आत्ताच वाचली.
या वाक्याला हजार अनुमोदन.
१) माझा एक नव-नास्तीक मित्र काही वर्षांपुर्वी मला म्हणाला होता की त्याच्या हातात जगाची सत्ता आली तर तो सर्व धर्म बॅन करेल व अतिधार्मीक लोकांना मारुन टाकेल.
२) डिएनए शोधणा-या शास्रज्ञांच्या जोडगोळीने नोबेल मिळाल्यवर (की शोध लागल्यावर लगेच) अशा अर्थाचे विधान केले होते की, आता संपले सगळे. अजुन काही करायचे आता शिल्लक नाही. आम्ही डिएनए शोधला. निसर्गाची ब्लुप्रिंट. आता देवबिव काही नाही हे सिद्ध झाले.
प्रत्यक्षात त्या नंतर इतके वर्ष होऊनही केवळ डिएनए या क्षेत्रातच किती प्रचंड नवे नवे संशोधन होते आहे.

इजिपत्यच्या पिरॅमीड किंवा , हिंदु मायथॉलॉजी, मायन कॅलेंडर्स व इतर एन्सिएंट एलियन्स किंवा आणखी काही याबाबतीत अ-शास्त्रीय लोक हे नेहमी विसरतात की,
या थियरीच खोट्या असतील, याचा अर्थ असा नव्हे की असे काही झालेले "असुच" शकत नाही
याचा अर्थ हा आहे की "आपल्याला" अजुन याच्यामागचे पुर्ण सत्य कळलेले नाही. धुव्व है तो आग तो लगी होगी. वो वैसी नही होगी जैसा हम समझ रहे है. पर होगी. ती काय ते आपण शोधायला हवे.
असो.

खरोखर कंटाळा आला आस्तिक नास्तिक आणि विज्ञान यांची सरमिसळ करण्याचा. वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे काय यावर मायबोलीवर अनेकदा विस्तृत लिखाण झालेले आहे, लिंका दिल्या गेल्या आहेत, गुगलवर बरंच मटेरियल आहे. इच्छा असल्यास शोधून घ्या म्हणजे तुमचं मत रुंदावण्यास मदत होईल.

हे शोधुन घ्यायला मला सांगणारा कोण? वाद-विवाद करताना स्वतःचे मुद्दे संपले म्हणून माझ्यावर चिखलेफेक करुन बदनामी करण्यावर उतरणारा व्यक्ती?
तेव्हा कुठे गेली होती वैज्ञानीक दृष्टी?
एखाद्या मराठी संस्थळावर एखादी व्यक्ती एखाद्या समुहाबद्दल काय म्हटली यावुरन असे म्हणणारी व्यक्ती ज्या समुहातील आहे, त्या समुहामधले सगळेच असे म्हणतात अशी ठाम समजुत करुन घेऊन, जिथे तिथे विखार पसरवत असणारी व्यक्ती?
एलओअल.
तुम्हीच जाउन नीट शोध ह्या वैज्ञानीक काय याचा.
माझे प्रतिसाद नीट वाचा. 'सामान्य' बुद्धीच्या लोकांना लगेच कळतील असे ते नाहीत याबद्दल क्षमस्व.

अभि.नव म्हणजे स्पॉक का ?
हे माहीत असतं तर हा प्रतिसाद दिलाच नसता. अतार्किक व्यक्तींशी संभाषण करण्यात रस नाही.

इब्सिल आणि माझ्यात चाललेले विपु संभाषण चोरुन चवीने बरे वाचता येते.
इथे माझा प्रोफाईल उघडुन बघितलाच नव्हता, मी कोण ते माहितच नव्हते असा खोटा आव माझ्यासमोर आणु नका.

तुमचे संभाषण वाचायला स्वतःला काय ओबामा आणि मोदी समजता का ? इथे दिलेल्या प्रतिसादाला अनुसरून तो प्रतिसाद आहे. चोरून वाचायला तुमच्या मालकीची मायबोली आहे का ? अ‍ॅडमिन लक्ष द्या कृपया.

धाग्याच्या विषयावर "डिस्कव्हरी (हिस्ट्री?) " चॅनेलवर बरेच काही दाखविलेले बघितले. ते हरण्याच्या कातड्यावरील नकाशा , क्रॉप सर्कल्स, विविध ठिकाणची दगडी कोरीव कामे इत्यादी. Happy

लिंबुकाका, 'डिस्कव्हरी' नव्हे 'हिस्ट्री टीवी १८' वर 'एन्शिएन्ट एलियन्स' या कार्यक्रमात वरील विषयाशी संबंधित माहिती दाखविली जाते.

वॉव, फारच भारी आहेत ही पुस्तके
१. पृथ्वीवर माणूस उपराच
२. देव ! छे, परग्रहावरील अंतराळवीर
अगदी अधाशासारखी एका बैठकीत वाचून काढली होती दोन्ही.
त्यातल्या बर्याच गोष्टी अगदी लॉजिकल वाटतात.

एरिकने भारताचा फारसा अभ्यास केलेला दिसत नाही,
तो केला असता तर त्याला अजुन बरीच आश्चर्ये सापडली असती असे वाटते.

महेश, हे लॉजीकल वाटणे हे गणीतातील अझ्युम एक्स, असोशिएटीव्ह थेयरी ई सारखे असते.
त्यापेक्षा थेट पुरावे नसतात. ते तसे जिथे असतील तेवढेच आपण घ्यायचे.
बाकी सुरस कथा म्हणुन करमणुक म्हणून वाचायचे / पहायचे.

तस नव्ह अभि.नव !
केवळ क्ष मानू सारखे नाहीये ते. कारण एरिकच्या थिअरीमधे त्याने अस्सल पुरावे दिलेले आहेतच की. आणि त्यातले अजुनही असंख्य पुरावे सहजी पडताळून पाहता येण्यासारखे आहेत.

Pages