बसण्याची ठराविक वेळ असते - विडंबन

Submitted by स्पॉक on 3 May, 2015 - 02:38

मुळ कविता http://www.maayboli.com/node/53718
प्रेरणा - गप्पागोष्टी या धाग्यावर अप्पाकाका यांची कमेंट.

बसण्याची ठराविक वेळ असते
इथे बार केव्हाही उघडतो

कदाचित ही तुला झेपणार नाही
उघडतो बाटली तिकडे पेग असतो

कोणताही ब्रँड जांना न वर्ज्य
अश्या बेवड्यांमुळे हा बार सजतो

रिकामी जागा मला का सापडेना
आज फुटपाथ वरच बसतो

हवी ती व्हिस्की चाखुनी बघ
डान्स फ्लोर तुझी वाट बघतो

इथे होणार होती बार बंदी बहुधा
तरी कुणीतरी पैसे उधळतो

- स्पॉक

ता.क. - "विखार" विझुन समेट व्हावा आणि कोणताही गैरसमह होऊ नये म्हणून रितसर औपचारिक परवानगी मागितली होती. पन ज्याप्रमाणे ती विनंती दुर्लक्षिण्यात आली, त्या प्रमाणे, ते "दुर्लक्षिणे" ही दुर्र्लक्षिण्यात येत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण पहिल्यांदा बरसण्याची ऐवजी बसण्याची असंच वाचलेलं आणि त्यात काही वावगं हि वाटलं नव्हतं.
विडम्बनाचा माझा पण एक प्रयत्न.

बसण्याची ठराविक वेळ नसते
बेवड्यांना जगाची लाज नसते

कदाचित तुला हे पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व नसते

विखारी प्रतिसाद जे प्रतिदिन देती
अशा लोकांमुळे ही माबो धुमसते

असा धागा मला का सापडेना
जिथे जहर कोणाचे कोणा न डसते

खायचे अन दाखवायचे निराळे
नेत्यांना अशा भोळी जनता ही फसते

भर दुपारी झोपेतून जाग येते
बायको लाडाने जेव्हा मला "किसते"

जमीन कोणाची अन विडंबन कोणाचे
याची फिकीर या "टग्या" ला नसते