मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत...

Submitted by अज्ञ on 15 December, 2013 - 12:06

मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत....

प्रेषक, ज्ञानव, Sat, 14/12/2013 - 12:40
ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी?
त्याला साधा सोपा अभ्यास काय ?
तांत्रिक (आणि त्या मागील मांत्रिक )विश्लेषण बाजूला ठेऊन जर सुरवात करायची असे असेल तर एक सोपी पद्धत खालील प्रमाणे :-

कंपनी : बँक ऑफ इंडिया
वर्ष : २०१३

महिना ------- उच्च पातळी (हाय) ............ नीचतम पातळी (लो)

जानेवारी ------- ३९३ ............ ३३२.४०(अ)

फेब्रुवारी ------- ३५८.५० ............ ३१२.१०

मार्च ------- ३३०.७० ............ २८१.९०

एप्रिल ------- ३४५.८० ............ २९२

मे ------- ३४१ ............ २८५

जून ------- २९८ ............ २१९

जुलै ------- २४३.२५ ............ १६६

ऑगस्ट ------- १९०.४० ............ १२६.५० (ब)

सप्टेंबर ------- १९३.९५ ............ १३२

ऑक्टोबर ------- २१४.२० ............ १५६.५५

नोव्हेंबर ------- २४४.१० ............ २०४.२५

डिसेम्बर ------- (अजून पातळी ठरायची आहे.)

जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात करणार तेव्हा

१) प्रथम आजच्या महिन्या पासून मागे बँक ऑफ इंडियाने उच्चतम पातळी काय गाठली होती ते पाहू.
जसे वरील तक्त्यात(अ)ने दर्शवलेली पातळी जी जानेवारी महिन्यात होती ती रु.३९३ आहे. ती लिहून ठेवणे.

२) त्यानंतर आजच्या महिन्या पासून मागे बँक ऑफ इंडियाने न्यूनतम पातळी काय गाठली तेही पाहू.
जसे वरील तक्त्यात(ब)ने दर्शवली आहे जी ऑगस्ट महिन्यात रु.१२६.५० आहे.

३) ह्यावरून असा निष्कर्ष निघतो की (३९३ - १२६ = २६६.५०)रुपये २६६.५० इतके रुपये तो फिरतो हा "इतिहास" आहे.

ट्रेडिंग मध्ये खरेदी अत्यंत महत्वाची असते.
ती खरेदी झाल्यावर कोणती रण नीती वापरायची ते ज्याने त्याने आपआपल्या हाव-भावावरून ठरवावे
(म्हणजे ग्रीड(हाव) आणि वास्तव किंमत(भाव)...)पण त्यातही अनेक शास्त्रोक्त पद्धती आहेत.
मी स्कॅल्पिंग हि पद्धत वापरतो. (शुद्ध मारवाडी इष्टाइल)

ऑगस्टमध्ये गाठलेली न्यूनतम पातळी हि शेवटची पातळी आहे कसे ओळखावे ?
तर ते सप्टेंबर सुरु झाल्याशिवाय शक्यच नाही.

सप्टेंबरमध्ये न्यूनतम पातळी ही ऑगस्टमध्ये दर्शवलेल्या पातळीला मोडून नवी न्यूनतम पातळी गाठते आहे का ते पाहावे.
तसेच ऑगस्ट मधली उच्चतम पातळी मोडून नवीन उच्चतम पातळी केली का ते पाहावे
जर वरील दोनही अटी पूर्ण झाल्या तर ऑगस्ट महिन्याची उच्चतम पातळी + न्यूनतम पातळी ह्यांची बेरीज करून दोनने भागावे जे उत्तर येईल त्याच्या जवळ अथवा वर जर सप्टेंबर महिन्याचा बंद भाव असेल तर....

ऑक्टोबर महिन्यात, वर जो ऑगस्ट महिन्याचा मध्य आपण काढला आहे तिथे, तो शेअर घेण्यालायक समजावा (ट्रेडिंगपुरते.).

तुम्ही म्हणाल "काय भाई हे तुम्ही डिसेम्बर मध्ये का सांगताय सगळे घडून गेल्यावर ?"

त्याला कारण
१) वर दिलेली पद्धत हि स्विंग ट्रेडचा एक भाग आहे.(जो चार्ट किंवा तांत्रिक विश्लेशानापासून लांब असणार्या माझ्यासारख्या "माठ" माणसासाठी दिशा दर्शकतेचे काम करतो.
२) ह्यावरून तुम्ही वर्षाचा "इतिहास" पाहा आणि २०१४ जानेवारीमध्ये कुठे शिरकाव करता येईल ते ठरवू शकता
३)ह्या सायकल्स किंवा स्वीन्ग्स महिना,आठवडा, पंधरवडा अश्याहि असतात. त्यातले तत्व लक्षात घेऊन ते पडताळून पाहा.

मी बँक ऑफ इंडिया मध्ये बरेच ट्रेडिंग करतो म्हणून तो इथे उदाहरणार्थ दिला आहे. तुम्ही इतर शेअर्सही पाहावेत. ज्यांना आपल्याकडे अडकून पडलेले शेअर्स आहेत त्यांनाही हा ट्रेड उपयोगी पडू शकतो.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

???