स्टॉक म्हणजे काय?

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मी लहान असताना आमच्या शेजारी माझी मावशी पण रहायची. माझी मावस बहीन मनीषा नी मी बरोबरीचेच. लहानपनी एके दिवशी माझ्या काकानी तिला एक पिगी बैन्क आनून दिली. मनीषा मला म्हनाली की ति बचत करनार आहे.

"सेव्हीग्स." पहिलेन्दा तो शब्द ऐकला. आनी सोडुन दिला.

"कल की हमको क्यौ हो फिकर हम तो आज मे जीते है"

माझे वडील मला खूप पॉकेट मनी द्यायचे. आनी मी तो सर्व खर्च करत होतो, त्याच वेळेस माझी बहीन काही पैसे खर्च करुन बाकीचे बचत करत होती. ३-४ वर्षानी, तिच्या बचती मधुन एका दिवशी तीने मावशी ला घड्याळ दिले. त्या वेळेस आम्ही दोघेही १३-१४ वर्षाचे असु.
2nd Incidance about Sevings
अनेक वर्षानी माझ्या वडीलान्चे भाउ माझे काका वारले. ते एक मोठे ऑफ़िसर होते पन त्यानी ही भवीष्याची कधीही काळजी घेतली नाही, खूप पैसे वाटेल तसे ( दारु पीउन नाही) खर्च केले. ते गेल्यावर १-२ वर्षानी माझ्या काकू ची वाट लागली, कारण "नो ईनफ सेव्हीग्स."

यथावकाश माझे लग्न झाले. नवीन माणस. नवीन व्हैल्यूज. माझे सासरे एक शाळा शिक्षक. पगार तो कीती असनार. पण ह्या माणसाला "सेव्हीग" हा शब्द आनी त्याच अर्थ लहानपना पासून माहीत होता. ते दर महीन्याला १०% बचत करुन त्याचे पोस्टाचे बॉन्ड घ्यायचे. दर महीन्यात एक बॉन्ड, तो मैच्युअर झाली की त्याचे पैसे व त्या महीन्यातील १०% असे दोन्ही परत बॉन्ड मधे. असे अनेक वर्ष सुरु होते. त्यानी किती पैसे साठवले असतील? ते पण कंजुषपना न करता?

"कल की हमको क्यौ हो फिकर हम तो आज मे जीते है" चा मी आता "जीनमे हिम्मत है नही वो ऐसी बाते करते है" म्हनू लागलो. Ref. Rangeela Song in Visual mode

तर मुद्दा असा की आता मला पन बचती चा अर्थ कळाला. माझ्या सासर्‍यान्ची गोष्ट मी ७ वर्षाखाली ऐकली आनी तेव्हापासून मी पन थोडीफ़ार बचत करने सूरु केले. बचत केलेली रक्कम invest करायला सूरु केली. माझे Financial Background ह्या सर्व investment मध्ये मला कामी आले.

आता इन्ट्रेस्ट रेट्स पण कमी झाले आहेत, म्हनून बैन्क सेव्हीग्स आनी बॉन्ड्स मधे पैसे गून्तवन्यापेक्षा मी स्टॉक आनी म्युचवल फन्ड्स ला प्रिफर करतो. पन एका चान्गल्या पोर्टफोलीओ साठी बैन्क सेव्हीग्स,बॉन्ड्स, स्टॉक आनी म्युचवल फन्ड्स सर्व आवश्यक आहेत.

माझा अनूभव मी सर्व मायबोलीकरा सोबत शेअर करत आहे. पूढील काही लेखातून मी stock, mutual funds, charting, trading ह्या बद्दल लिहेल.

आपन आता सर्वाबद्दल प्राथमीक माहीती घेउ. माझ्या सर्व इनव्हेस्टमेन्टस भारतात आहेत. त्या मुळे उदाहरण देताना मी भारतीय स्टॉक मार्केट चे देईल. पन ह्या माहीतीचा वापर तुम्ही कुठल्याही देशा साठी करु शकाल कारन चार्टीग, टेकनीकल अनेलीसीस वैगरे यूनीव्हर्सल आहेत.
------------------------------------------------------

स्टॉक म्हनजे काय?
स्टॉक म्हनजे एक समभाग. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे काही शेअर्स घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे काहे प्रमानात मालक व्हाल.
हे समजन्यासाठी आपन एक उदा. घेउ.
माझा कंपनीला ( अ ईन्डस्ट्रीज) बाजारातून १००००० रु. उभे करायचे आहेत. हे पैसे मला कर्जातून उभे करता येतील किवा मी त्या बदल्यात काही प्रमानात माझा मालकी हक्क सोडेल.
मी जर मालकी हक्क देउ केला तर माझा कंपनी चे तुम्ही भागधारक पर्यायाने मालक व्हाल पण मी भाग न देता तुमच्या कडुन पैसे घेतले तर तुम्ही डिबेन्चर होल्डर व्हाल. सद्द्या आपण भाग ह्या विषया बोलूया.

अ कं. ला १०००००० उभे करन्या साठी १०००० शेअर्स प्रती १०० रु भावाने विकावे लागतील.

अ ने २०० शेअर्स १०० रु भावाने घेतले. म्हनजे तो २०००० रु चा मालक झाला.
मालक म्हनजे काय? तो एखाद्याचा पगार वाढवू शकेल काय? एखादे प्रोडक्ट डिझाईन करु शकेल काय?
नाही. पण त्याला काही हक्क प्राप्त होतात, जसे की मतदान. शेअर होल्डर कं. च्या पॉलीसीज वर मत देउ शकतात.
थोडक्यात काय. लिमीटेड मालक.

मी वर लिहील्या प्रमाने माझा कं. नी ने १०००० शेअर्स १०० ने विकायचे ठरवले. पण विकनार कुठे नी कोनाला? ईथेच magic word IPO येतो. IPO = Intial Public Offer

अ कं. सेबी कडे जाउन आयपीओ साठी लिस्टीग करते.
जनरल पब्लीक आयपीओ साठी अप्लाय करते. जर १०००० शेअर्स साठी १०००० पेक्षा जास्त अप्पलीकेशन आले तर तो शेअर ओवरसब्सक्राईब होतो.
ओवरसब्सक्राईब झालेला आयपीओ रेशो ने अप्लाय केलेल्या पब्लीक ला दीला जातो.

आता आपन सेकन्डरी मार्केट बोलू.
सेकन्डरी मार्केट मधे शेअर्स ची खरेदी आनी विक्री होते. हे खूप मोठे मार्केट असते. रोज कित्येक श्रीमंत होतात आनी त्यापेक्षा जास्त गरीब होतात. रोज करोडो रुपये हात बदलतात.
शेअर्स ची खरेदी आनी विक्री करन्यासाठी डिमैट अकाउन्ट असावे लागते. डिमैट अकाउन्ट वीथ ऑनलाईन ट्रेडीन्ग अनेक ब्रोकर्स ऑफर करतात जसे की आयसीआय बैन्क, शेअरखान, कोटक इत्यादी.
शेअर्स चा भाव रोज कमी जास्त होत असतो. डिमान्ड सप्लाय रुल इथे अपलाय होतो.
आता काही महत्वाचा टर्मस पाहू.

ओपन प्राइज. - रोज सकाळी ज्या भावाने शेअर ओपन होतो तो भाव.
डे हाय त्या दिवसातील त्या शेअरचा सर्वात जास्त भाव.
डे लो. - त्या दिवसातील त्या शेअरचा सर्वात जास्त भाव.
क्लोज त्या दिवसातील त्या शेअरचा दिवसा अखेरचा भाव.
५२ वीक हाय ५२ आठवड्या मधील त्या शेअरचा सर्वात जास्त भाव.
५२ वीक हाय ५२ आठवड्या मधील त्या शेअरचा सर्वात कमी भाव.
व्हॉलूम नंबर ऑफ़ शेअर्स. त्य दीवसातील खरेदी विक्री

पुढील भागात Mutual Fund & Bonds बद्दल प्राथमीक माहीती घेउ.

प्रकार: