कुटुंबातील व्यक्तीलाच घर/जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य सरकारचा निर्णय-माहिती हवी आहे

Submitted by संदीप पांगारे on 30 April, 2015 - 00:49

कुटुंबातील व्यक्तीलाच घर/जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य सरकारचा निर्णय-माहिती हवी आहे,

दिव्या मराठी मधील बातमी नुसार ....

नमस्कार ..

रक्ताच्या नातेवाईकाला घर अथवा फ्लॅट विकायचा असेल किंवा हस्तांतर करायचा असेल तर त्यावर संपूर्ण स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण व लोकप्रिय निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता फक्त 500 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्थावर मालमत्ता हस्तांतरित करता येईल. सध्या नातेवाईकांना घर, फ्लॅट हस्तांतर करताना मालमत्तेच्या सरकारी किंमतीवर 5 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.

नव्या नियमानुसार, वडिलांकडून मुलगा, मुलीच्या नावावर तसेच मुलांकडून आई-वडिलांच्या नावावर, भाऊ-भाऊ व भाऊ बहिणीच्या नावावरील स्थावर मालमत्ता केवळ 500 रूपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हस्तांतर करता येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयामुळे रक्ताच्या नातेवाईकाला मिळकत हस्तांतरित करणे अधिक सुकर होणार आहे.

राज्य सरकारने स्थावर मालमत्तेच्या मालकी हस्तांतरण व विक्रीबाबतच्या नियमांत बदल केले आहेत. त्यात रक्ताच्या नात्यातील मिळकतीवरील हस्तांतरण करताना संपूर्ण स्टॅम्प ड्युटी रद्द करण्यात आली आहे. मात्र, सरकारी नियमानुसार कोणत्याही व्यवहाराबाबत व अदलाबदलीसाठी 500 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर हस्तांतरण होईल.

सरकारी किंमतीनुसार एखाद्या घराची, फ्लॅटची 20 लाख रूपये किंमत असेल तर 1 लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मुंबईत तर 1 कोटींचा फ्लॅट खरेदी केला तर संबंधितांना 5 लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यामुळेच कुटुंबातील व रक्तातील व्यक्तीच्या नावावर घर करायचे झाल्यास नागरिकांना फायदा होणार आहे.

माहिती हवी आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वारसा हक्काने मिळत असेल, तर इतर वारसांकडून फक्त हक्क-सोड प्रमाणपत्र रजिस्टर केले की काम होईल. विकणे विकत घेण्याची गरज नाही.

घर किंवा जागेचे बक्षिसपत्र असल्यास मुद्रांक शुल्क माफ होणार आहे असे वाचनात आले. बहुदा सकाळ मधे.
विकल्यास नाही.

नक्की काय आहे ?

म्हणजे समजा मला माझ्या वडिलांकडून घर विकत घ्यायचे आहे आणि मी ५०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर हस्तांतरण केले.

पण मला त्यांना १५ लाख रूपये द्यायचे आहेत. मी त्यातल्या १० लाख रूपये साठी बँकेकडे अर्ज केला. तर मला त्या स्टँम्प पेपर लोन मिळेल कि मुद्रांक शुल्क आणि अ‍ॅग्रीमेंट ची कॉपी लागेल ?