गझल

Submitted by मोहन ब. शिंदे on 30 April, 2015 - 04:17

इथे..
चालले आयुष्य आहेच साधारण इथे
काय घेवू मोजमापे, विनाकारण इथे..

वाटेवरी थांबली सावलीपेक्षा उन्हे
ठेवते नियती कुठे दुःख हे तारण इथे..

सरळ मार्गाची किती ही पराकाष्ठा तुझी
ऐकतो दुसरेच कां नांव उच्चारण इथे..

यायचा त्यांचा कुणी ओळखीचा राहिला
ते तुला करतील कां सांग पाचारण इथे..

हा असा हळवेपणा.. हा तुझा साधेपणा
थांबवेना हे तुझे मुक्त संचारण इथे..

तो असो वैशाख किंवा असो श्रावण कधी
कर दयाळा वाटते रूप जे धारण इथे..

------मोहन ब. शिंदे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा असा हळवेपणा.. हा तुझा साधेपणा
थांबवेना हे तुझे मुक्त संचारण इथे..

>> मस्त..

हा असा हळवेपणा.. हा तुझा साधेपणा
थांबवेना हे तुझे मुक्त संचारण इथे.. <<< मस्त!

ही गझल नीट लयीत म्हणता आली नाही मला तरी! पण खयाल आवडले.

हा असा हळवेपणा.. हा तुझा साधेपणा
थांबवेना हे तुझे मुक्त संचारण इथे

छान.