लिस्बन ची होळी

Submitted by Sano on 14 April, 2015 - 02:56

लिस्बन ची होळी

'बलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी-साधी छोरी शराबी हो गई...
हिंदी गाणे? भर अस्सल युरोपीयन चौकात? आणि ते पण full-fledged साऊन्ड सिस्टीम वर... आपसूकच पाय आवाजाच्या दिशेने वळले. रस्त्याच्या टोकावर चौकात ओळखीची अशी गडबड आणि गोंधळ दिसत होता. नेहमीचा युरोपीयन उत्साह (party spirit) आज भारतीय गाण्यांवर बागडत होता आणि त्यात आप आपली पंजाबियत, गुजरातीपणा सांभाळत होणारी भारतीय नृत्ये आणखीनच बहार आणत होती. तरुणाईने भारलेले बातावरण.

लिस्बन (पोर्तुगाल) मधला हा रोस्सिओ चौक, मध्यवर्ती टुरिस्ट डीस्ट्रीकट मधला महत्वाचा चौक. आज इथे भारतीय मूळ असणाऱ्या लोकांनी होळी सण आयोजित केला होता. लिस्बन मध्ये अमेरिका-युके सारखी नवीन स्थलांतरित झालेले भारतीय नाहीत, जे आहेत ते तिसर्या किवा चौथ्या पिढीतले आहेत आणि काही काही तर अंगोला, मोझाम्बिक अश्या देशातून स्थलांतरित झालेले भारतीय वंशाचे लोक आहेत. पण ज्या प्रकारे त्यांनी भारत आपल्या मनात, हृदयात जिवंत ठेवलाय आणि हा वारसा ते ज्या प्रकारे आपल्या पुढच्या पिढीला सोपवाताय्त त्यासाठी त्यांचे कौतक करावे तेव्हढे थोडेच आहे.

ह्याच भारलेल्या वातावरणात अनुभवलेले काही क्षण...

प्र.चि. ०१

प्र.चि. ०२

प्र.चि. ०३

प्र.चि. ०४

प्र.चि. ०५

प्र.चि. ०६

प्र.चि. ०७

प्र.चि. ०८

प्र.चि. ०९

प्र.चि. १०

प्र.चि. ११

प्र.चि. १२

प्र.चि. १३

प्र.चि. १४

प्र.चि. १६

प्र.चि. १७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !! खूप छान वाटलं हे वाचून, पाहून. लिस्बनसारख्या विदेशी शहरात होळी दणक्यात साजरी होते हे पाहून झालेला आनंद अवर्णनीय आहे.

मस्त मस्त! सगळ्यांच्या चेहर्‍यावरील अगदी ओसंडुन वाहतोय.
लिस्बनसारख्या विदेशी शहरात होळी दणक्यात साजरी होते हे पाहून झालेला आनंद अवर्णनीय आहे. +१

मस्त.
लिस्बनसारख्या विदेशी शहरात होळी दणक्यात साजरी होते हे पाहून झालेला आनंद अवर्णनीय आहे<+१
प्रचि १०,११,१२ सुरेख.

मस्त !! खूप छान वाटलं हे वाचून, पाहून. लिस्बनसारख्या विदेशी शहरात होळी दणक्यात साजरी होते हे पाहून झालेला आनंद अवर्णनीय आहे.>>>>>+१

मस्त..

पुण्यात महागडे गॉगल्स पर्समधे ठेवतात आणि शक्यतो टाकून द्यायचे कपडे परिधान करून होळी खेळण्यात येते. पाश्चात्य जग अजून बाल्यावस्थेत आहे.

सगळे फोटो मस्त! इकडल्यापेक्षाही लाईव्हली वाटतंय होळीचं वातावरण.

विश्वासच बसत नाहिये........................... एक्दम झक्कास

धन्यवाद मिंत्रानो Happy

>>> लिस्बनसारख्या विदेशी शहरात होळी दणक्यात साजरी होते हे पाहून झालेला आनंद अवर्णनीय आहे.
- हो, माझ्या पण अशाच फिलिंग्स होत्या त्या दिवशी. छाती चार इंच मोठी झाली होती.

>>> बाळू पॅराजंपे - पुण्यात महागडे गॉगल्स पर्समधे ठेवतात आणि शक्यतो टाकून द्यायचे कपडे परिधान करून होळी खेळण्यात येते. पाश्चात्य जग अजून बाल्यावस्थेत आहे
- हसून हसून पोट दुखले कि राव...

वा! खरंच दणक्यात आहे लिस्बनमधली होळी ! आणि कॅमेर्‍यात छानच टिपलेत क्षण!

छानच