उभ्या उभ्या विनोदः ५ जुलै सकाळी

Submitted by परदेसाई on 8 July, 2009 - 13:36

कार्यक्रमाबद्दल आता बरेचसे येईलच.
आमच्या कार्यक्रमाला बहुतेक मायबोलीकरांनी, 'रोजचेच विनोद .. कशाला ऐकायचे.. जाऊ सावकाश' (काशिनाथ नाडकर्ण्यासारखे : समजलं हो सुर्योदय... जाऊ सावकाश आठ साडेआठ वाजता) असा विचार केल्याने बहुतेकाना तो कार्यक्रम आणि मुख्य म्हणजे सुरूवात चुकली. चालायचेच. उलट 'नऊचा कार्यक्रम नऊलाच सुरूवात करायचा आगाऊपणा तुला कोणी करायला सांगितला?' असाही प्रश्न ऐकावा लागला. एकदा कार्यक्रम सुरू झाल्यावर लोकांनी कान बंद करून घेतले असावेत. ते पाहून संयोजकानी बाहेर दारं बंद करून घेतली.

विनय Lol

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हा पण धागा सुरू झाला का? मी इतरांची वाट पाहून मग लिहीन...

विनय, आशाची मैफिल १ वाजता संपली. त्यामुळेही बरेच लोकं उशीरा आली असावीत.

हो तसच झाल, 'मी आशा' संपवुन आम्ही रात्री दिड वाजता हॉटेलवर परतलो त्यामुळे सकाळी जरा उशीर झाला, तर हॉलचे दार बंद केलेले होते त्यामुळे कार्यक्रम आत सुरु आणि आम्ही बाहेर अर्धा तास उभे.
आता झक्कींच्या घरच्या ए.वे.ए.ठि. ला होवुन जावु द्या दणक्यात

विनयचा कार्यक्रम छान झाला. हाऊसफुल्ल होता एकदम! Happy विनय आणि मधुरा उभे राहून गेल्यानंतर मी निघाले, पूर्ण पाहता आला नाही कारण आमचा कार्यक्रम नंतर होता आणि मला तयारी करायला जायचे होते.

माझं पण अगदी रूनीसारखच झालं. तरी बाहेर उभ्या असलेल्या स्वयंसेवकाला म्हंटलं, अहो ते विनय देसाई आमचे मित्र आहेत. फार रागावतील कार्यक्रम पाहीला नाही तर, प्लीज आत सोडा. पाहीजे तर आम्ही उभ्या उभ्या पाहातो. पण त्याला काही दया आली नाही. Happy

'उभ्या उभ्या विनोद'... हा 'बसून बसून' पहायचा असतो म्हणून सोडलं नाही त्याने..

American Theater मध्ये Fire Marshal चे नियम असतात ते पाळावेच लागतात..

आमचा कार्यक्रम मी बरोब्बर नऊ वाजता सुरू करणार अशी घोषणा केल्यावर, आणि बरोब्बर नऊ वाजता सुरूही झाला म्हटल्यावर लोकानी टाळ्या वाजवल्या.

फार रागावतील कार्यक्रम पाहीला नाही तर <<< असं सांगण्यापेक्षा 'तुम्हाला लोळवतील' असं सांगायला हवं होतं Sad

विनय

मित्रानो, एक मदत हवीय...

'उभ्या उभ्या ...' हा कार्यक्रम काही लोकानी BMM ला पाहीला, आवडला. त्यापूर्वी आमचे काही प्रयोग कनेक्टीकट, न्युयॉर्क आणी DC ला पण झालेत...

त्या प्रयोगात काय काय चुका होत्या याची आम्हाला माहीती हवीय. सगळेच मित्र असल्यामुळे अश्या चुका काढणे जरा कठिण जातं, म्हणून एक वेगळी कल्पना...

ubyaubhya@live.com ( ubhya123ubhya) असा एक Hotmail अटाऊंट काढलाय. त्यावरून तुम्हाला वाटलेले दोष मला पाठवा (vinay63@yahoo.com). तुमचं नाव किंवा सही टाकण्याची गरज नाही त्यामुळे बिनधास्त लिहीता येईल.. आम्हाला 'कोण म्हणालं' पेक्षा 'काय म्हणाले' यात रस आहे.

BMM ला आमचा क्रम होता (विनय, मधुरा, प्रशा.त, देवेन, वैशाली, शुभदा, संदीप, सुरेश).
लिहीताना कार्यक्रम कुठे पाहीलात, कोणाबद्दल कॉमेंट आहे, आणि काय वाटलं...

उदा. BMM ला विनय दारू प्यालागत बोलत होता.. आम्हाला काहीच कळले नाही..

तुमचे विचार हवेच आहेत. तुमच्या कुणा मित्र मैत्रिणीला पण लिहायचं असेल तरी चालेल.
(दिलेले उदाहरण खोटे आहे.. Happy ).

विनय Happy

मी फार थोडा वेल ह्या कार्यक्रमाला होतो.एक किस्सा आथवतो मला.भारतात्,कोकनात एक मुलगी जेव्हा सुट्टी मध्ध्ये जाते,तेन्व्हा तीचे सासरे तीला म्हनतात्,तु बेटा चान्गले पूर्ण कपडे घाल्तेस्,हा किस्सा एका मुलिने सान्गितला होता्अ किस्सा खूप विनोदि होता,मी आता बर्याच मेह्फिल मध्ध्ये ह विनोदि किस्स सान्गतो. आभिनन्दन आणी आभार माझ्या जोकस्च्या लिस्ट मध्ध्ये एक विनोदि किस्सा वाडवील्या बद्दल.
आपला डाक्टर विजय दामोदर पान्ग्रेकर...
सध्ध्या बोस्टन जवळ्,मुलान्कडे,
नेहमी साथी,भारतात्,औरन्गाबाद ला...ह्यचि लिन्क पाथवा असेल तर.