अकादमी 4 : मैत्री चा रंग

Submitted by सोन्याबापू on 5 April, 2015 - 01:25

पीटी सुरु झाल्या नंतर डे 2 ला आमची अवस्था काय बिकट झाली होती हे मागच्या भागात तुम्ही पाहिलेच आहे मित्रहो. त्याच दिवशी दुपारी लंच नंतर आमचे आयजी ओपनिंग एड्रेस देणार होते. रजक स्टाफने (धोबी, त्यांना कोणी ही धोबी म्हणत नाही रजकसाब किंवा वॉशरड्यूटीमेन असे म्हणतो आमच्या अकादमी ला) खाकी यूनिफार्म आणुन ठेवले होते रूम वर.खरे पाहता त्या यूनिफार्म वर काहीच बिल्ले नव्हते तेव्हा, विद्यार्थी लोकांचे गणवेश ते, एनसीसी ला असतात तसे खाकी. सोबत बुट्स अन बॅरेट कॅप अन नावाची नेम प्लेट. आधीच पीटी ने अंगाची वाट लावलेली त्यात मिठाच्या पोत्या चा एपिसोड. मी अन पुनीत दोघे मढ़े असावे तसे कड़क झालो होतो. कुथतकुथत यूनिफार्म चढ़वला अन बाहेर पडलो हॉस्टेल पासुन ऑडिटोरियम जवळपास 800 मीटर्स. त्यात जायचे ते दौड़ चाल मधे, ते ही एकटे नाही व्यवस्थित फॉलइन होऊन. फॉलइन होणे हे psycological regimentation साठी सर्वोत्कृष्ट टूल असते. उस्तादजी आले अन आम्हाला पळवत ऑडिटोरियम ला नेले. ऑडिटोरियम सही होते तिथे आम्हाला सिंगललाइनतोड़ करायला लावुन आम्ही खुर्च्यात बसलो माझ्या शेजारी समीर अन त्याच्या शेजारी अन्ना होता समोरच नीमा सांगे होता शेजारी पुनीत होता. मोसाय अन सरदार मधे अजुन सीझफायर झाले नव्हते बहुतेक. तसेही माझ्यात अन अन्ना अन सांगे ह्या त्रिकोणात तरी कुठे झाले होते म्हणा!!!. व्ही एस सर अन सिंह सर आले फॉर्मल इंट्रोडक्शन्स झाली अन त्या परिचयाच्या गोंधळात एक गोष्ट विलक्षण लक्षात राहिली व्हीएस सरांच्या हातावर कापल्याची एक वित् लांब खुण. ते बोलायला उठले तेव्हा pindrop silence होता. आतून आम्ही बोरच झालो होतो म्हणले आता परत लेक्चर ऐका वैल्यूज एथोज अन काय काय पण पुढची 15 मिनट्स जबर होती!!! सर बोलु लागले!!

"welcome tigers, firstly I congratulate u 35 toppers for being men apart from the rest lacs u have beaten!! keep the carnivore instinct alive, but with a sense of teamwork and belonging, fight with your shortcomings towards excellence,you know why I am telling you this?? because you are synonym to the future borders of this great nation. the border would be literally as much strong as you chaps become by the end of this training"

अंगावर सरसरून आलेला काटा आवरत आम्ही त्या शब्दांत भिजु लागलो

"people say and talk about 3 armed forces with great respect , they obviously deserve that respect. its similarly ur duty to bring laurels to your unit and force. if god forbid war clouds accumulate on us you chaps would be first to have the honor of defending ur holy motherland and bear the first round (bullet). अब ज्यादा बोर नहीं करूँगा! मैंने भी यहीसे ट्रेनिंग ली है! आजकी आपकी हालत मैं जानता हूँ अब हम सब सिंधिया हॉल में साथ में चाय पिएंगे बॉयज"

आम्ही निःशब्द बसुन होतो . तेवढ्यात खणखणीत आवाजात बड़े उस्ताद ची ऑर्डर आली

"सिंगल लाइन दौड़के सिंधिया हॉल, तेज चल!!"

अन अंगदुखी विसरत आम्ही विद्युतवेगाने उठलो!! ह्याला म्हणतात "पेपटॉक" "आपण महान काम करू शकतो ह्याची एका वरिष्ठाने जाणीव करुन देणे"

सिंधिया हॉल ला मस्त इंतजाम होता , चहा कूकीज, समोसे इत्यादी. व्ही एस सर u आकारांत बसलेल्या एकेक विद्यार्थ्याशी हात मिळवत पुढे येत होते . मझ्यासमोर आले तसे मी कप सारून उभा राहिलो अन एक कड़क सैल्युट मारला. तितकाच कड़क प्रतिसाद आला सोबत सिंह सर होते त्यांना पण सैल्युट केले माझी नेमप्लेट वाचुन ते व्हीएस सर म्हणाले

"ओहो वी हॅव टु गणपतस् विथ अस थिस टाइम, गुड लक सन"

मिलिट्री परलंस मधे मराठी सैनिकांस "द गणपत्स" ह्या नावाने ओळखले जाते. भारतीय थल सेनेच्या सर्वाधिक जुन्या इन्फंट्री रेजिमेंट, मराठा लाइट इन्फंट्री ने हे नाव अजरामर केले आहे ते आपल्या गुणा मुळे , इन्फंट्री रेजिमेंट्स मधे सर्वात जुनी आहे ती (स्थापना 1757). मी अन किश्या दोघे गणपत होतो. किश्या echo कंपनी ला होता सोलंकी उस्ताद च्या अंडर, सांगे त्याचा कंपनी बडी होता अन रूम पार्टनर पण.

चहा झाला तेव्हा आम्हाला मस्त न्यूज़ मिळाली. आज सेकंड हाफ ऑफ दिला होता वेपन उद्या पासुन होते तेव्हा आज बस ने सगळ्यांना ग्वालियर ला नेणार होते किल्ला पहायचा अन मग काही एसेंशियल शॉपिंग चा कार्यक्रम होता. पण जोवर आम्ही ड्रिल ला परफेक्ट होत नाही तोवर खाकी घालून सिविल लाइफ मधे जायचे नाही अशी ऑर्डर होती सो आम्ही चेंज करायला रूम वर आलो होतो.

"बापुसाहब तेरा सांगे का क्या हुआ बे?" समीर

"च्युxx है साला बकवास कर रहा था गांx" मी मग त्याला पूर्ण किस्सा सांगितला

"अबे कोई नहीं काक्के सांगे मेरेको भी ऐसेही बोला हो जायेगा नॉर्मल" समीर

वरच्या मजल्यावर गिल अन मोसाय चा प्रेमसंवाद ही तारस्वरात आला होता

अन,

मिठाचे रिकामे पोते न्यायला आलेल्या बड़े उस्ताद ने सारे ऐकले!

आमच्या रूम्स ची नावे घेऊन फॉलआउट ची ऑर्डर निघाली अन आम्ही थिजलो! असे वाटले संपले ग्वालियर इथेच.

चोरा सारखे बाहेर पडलो न मुकाट उभे राहिलो

"तुम सब लोग आज झगड़ रहे हो कल सालो सगे भाई बन के रोने वाले हो पास आउट परेड पे"

मला सांगेचे तोंड पाहुनच राग येत होता मी कधी नव्हे ते हिंमत गोळा करुन विचारले

"बड़े उस्तादजी हमारा एक भी पॉइंट नहीं मिलता हम कैसे भाई बनेंगे???"

उत्तर ऐकून आम्ही सर्द झालो होतो

"तुम सब एकही पॉइंट पे भाई बनोगे,यही बोल कर बनोगे की चौधरी उस्ताद ने हम सब की बोहोत मारी थी एकसाथ मारी थी!, अब चुपचाप बस में बैठो.

ग्वालियर चा किल्ला मस्त होता. तिथेच किल्यात एक गुरुद्वारा पण होता तिथून ग्वालियर शहराचे विहंगम दृश्य दिसत असे एखाद तास तिथे भटकुन आम्ही बस ने परत कॅन्टोन्मेंट ला आलो तिथेच जवळ बिग बाजार होते अजुन काही शॉपिंग साठी ऑप्शन्स होते. मी समीर अन पुनीत नेहमीप्रमाणे सोबत होतो. मला वाटेत एक ग्रामीण माणुस दिसला, तो काही रानभाज्या, फळे ,मध् वगैरे घेऊन बसला होता.मी तिकडे वळलो. पुनीत म्हणाला

"तुम देखो यहाँ जो देखना है, मैं थोड़ी एसेंशियल दवाएँ ले लेता हूँ अपने लिए"

समीर पण त्याच्यासोबतच गेला. शक्यतो गावठी मध् हे उत्तमप्रतीचे मिळते इतके माहिती होते.रोज पहाटे पीटी ला जाताना एखाद चमचा मध् खाल्यास ऊर्जा मिळत राहील असा माझा अदमास होता.त्या दुकानदाराला मी म्हणले

"भाई शहद चाहिए था"

"आइये आइये सर, सबसे उमदा शहद दूँगा आपको"

त्याने एक मोठा डालड्या चा ड़बा उघडला अन दोन थेंब मध् चखायाला दिला , चवीला तरी बरा लागत होता. माझे लहानपण जरी वस्तीला गेले असले तरी मला मधाची वगैरे पारख नव्हती. तो दुकानदार आता घाईला आला होता

"बोलिये सर कितना?? आधा किलो दे दू क्या???"

मी त्याला होकार भरणार इतक्यात मागून आवाज आला

"वन्न मिनट अन्ना इफ़्फ़्फ़् यो डोंड माइंड"

चमकुन मागे पाहिले ते दिवाकर होता. त्याला हिंदी इतके नीट येत नव्हते तरी तो धडपडत म्हणाला

"मैं हनी चेक करती अन्ना तुम वेट"

मी काही बोललो नाही, तीच संमती समजुन अन्ना त्या दुकानदाराला म्हणाला

"आमाको तोड़ा टेस्ट ओना"

दूकानदार आता अस्वस्थ झाला होता , तरीही त्याने अन्ना ला अर्धा चमचा मध् दिलाच अन्ना ने त्यातले मोजून 2 थेंब हातातल्या बिसलेरी च्या बाटली मधे घातले अन बाटली चांगली हलवली मध् विरघळून गेला!!!

"अन्ना बापुसायब ये नकली हनी रहती !! it is molassess तुम काली पेट खायेगी थो एसिडिटी होती, please dont buy it, original honey dissolve नही होती अन्ना, बिलीव मी!"

आता मी दूकानदारा कड़े वळलो , तो म्हणाला

"साहेब असली माल है ये कुछ गलत बोल रहे है"

मला भड़भडून येत होते!! अन्ना ने मला जिंकले होते!! मी आवाज करडा करत त्याला झाड़ला

"ओये, ये बोहोत बड़े फौजी साहब है साले!, 15 मिनट में दूकान समेट के भाग जा, नहीं चाहिए तेरा शहद".

"हम अब आपको बेचेंगे भी नहीं सरजी".

उगा शब्दाला शब्द नको म्हणुन मी पुढे झालो. ह्यावेळी मात्र माझा हात अन्नाच्या खांद्यावर होता!.

"थैंक्स अन्ना, lets go!".

औषधांच्या दुकानात पुनीत अन समीर ला जेव्हा भेटलो तेव्हा , समीर अन पुनीत ने कड़क शेक हैण्ड ने आमच्या युती चे स्वागत केले, पण काहीतरी मिसिंग होते, मी अन्ना कड़े पाहिले काळ्या मजेत हसत होता. चिमणी इतके तोंड करुन मी म्हणालो

"I am sorry anna i was rude with you earlier , please forgive me and accept my friendship".

"आम इंदी सिकेगा, अन्ना आमसे इंदी बात करो!!!, no formalities my brother we are friends now".

आयुष्याच्या पायात मैत्रीचे मजबुत कंक्रीट ओतले गेले होते.

आता आम्ही चौघे बाजारात हिंडत होतो , लेवीज च्या शोरूम मधुन आम्ही बाहर पडत होतो तेव्हा रस्त्यावर एक आवाज आला,

"एsssss देख साला चाउमिन हाहाहा"

7-8 टारगट पोरांची एक गँग एका नॉर्थईस्टर्न पोराला छेड़त होती, तो सांगे होता.

अपमान झाला अन आपण एकटे आहोत ह्या भावनेने तो माझ्याकडे पाठ करुन उभा होता अन मान खाली घातली होती, अन्नाच्या गूडविल ने माझ्यात काहीतरी आले होते, माफीची ताकद अन मैत्री जोडायची कला!.

"चाउमिन किसको बोला रे हीरो??? साले भाई है वो मेरा"

सांगे चमकुन माझ्याकडे पाहत होता, अन तो टपोरी बोलला

"अबे ओ फौजी, दो ही लोग हो गायब ऐसा करेंगे की पैलेस में वापस नहीं पहुंचोगे"

मराठी रक्ताचा एक दोष असतो, बेटे गरम फार लवकर होते ! इथे मारामारी ती ही फर्स्ट मार्केट विजिट ला केल्यास माझ्यावर disciplinary action घेतली जाऊ शकते हे विसरून मी मुठी आवाळल्या अन त्याला म्हणालो

"इधर आ रे भोसड़ीके!".

तेवढ्यात एक हात खांद्यावर पडला , समीर सांगवान ,सहा फूटी जाट

"हरामखोरो तुमको ऐसे क्यों लगा की मेरे दो भाई अकेले ही है?"

आता आम्ही पाच होतो!.

तरीही समोरचे आठ होते अन आता उठत होते , तितक्यात अजुन एक आवाज आला, आज रंगभवन पैलेस ची सारी पोरे एक होत होती

"दादा ई ना चोलबे!" आमचा डे वन चा हीरो मोसाय.बाजुच्याच हॉटेल मधुन बाहर पडून सामील झाला होता

तितक्यात ही मी त्याला विचारुन घेतले

"दादा तबियत ठीक ऑशबेन की नाही?"

मातृभाषा ऐकून खुश झालेला मोसाय बोलला

"भालो बापुसाहब खूब भालो"

तितक्यात टपोरी लोकांचा म्होरक्या बोलला "आ गया बंगाली भी मार खाने"

अन त्या दिवशीच्या मैत्रीपर्वातला अत्युच्च क्षण आला

"ओये की होया, तु मारेगा बंगाली को??" गर्दी पाहून कुतुहलाने घुसलेला आमचा सातवा भाऊ सरदार अंगदसिंह गिल आला होता!, सात लोक त्यातले हेअरकट वाले 6 पाहून गर्दीला ही तोंड फुटले

"सर इन लोगो का रोज का है कभी बेटियो को छेड़ा तो कभी बूढ़े बुजुर्गो को, आप छोड़िये सर आप जाइये यहाँसे".

तो गृप पांगला तरी आम्ही तिथेच उभे होतो, अन सरदार मिश्किलपणे बोलला

"हाय मेरी बंगालन कुतिया अपने यार को माफ़ नहीं करेगी क्या??"

मोसाय ने त्याच्याकडे पाहिले अन खो खो हसत सुटला!!!

"साले हरामी सरदार! इधर आ!" पगड़ीवाल्याची अन मोसाय ची भरतभेट त्या दिवशी ग्वालियर च्या मार्केट न पाहिली
पण,

सांगे

सांगे मान खाली घालुन दुर निघुन जात होता , आम्हाला कळायच्या आत रिक्षा पकडून तो गायब झाला होता!!

ज़रा लवकरच 5 वाजता आमच्या बस ने आम्हाला परत पैलेस ला आणून कोंडले अजुन डिनर ला तीन तास होते, परत येताना सांगे एकटा त्याची रक्सैक मांडी वर घेऊन शून्यात पाहत सगळ्यात मागच्या सीट वर बसला होता अन आमच्या सहा जणांच्या सोबत बसुन हसण्या खिदळण्याला उत् आला होता.

परत आल्यावर माझ्या रूम नंबर 13 ला मैफल जमली होती गप्पा रंगात आल्या होत्या, अन्ना ऑथेंटिक सांबर ची रेसिपी सांगत असताना दारावर टकटक झाली अन आम्ही एकदम शांत झालो.

समीरने सावधपणे दार उघडले तर सांगे उभा होता.

"मै अंदर आऊ??"

"!!!!.....आजा आजा"

तो आत आला समीरच्या बेड वर गिल शेजारी बसला, मी पसरलेल्या मोसाय च्या अंगावर रेलून बसलो होतो , मी एकदम conscious झालो , अन सांगे ने बोलायला सुरवात केली,

"बापुसाहब, I am sorry but let me please tell u and other guys why i am so reserved if you may buddy?"

सगळ्या नजरा माझ्याकडे वळल्या अन मी म्हणालो

"बोल सांगे बोल, नो फॉर्मेलिटी ब्रदर"

"मेरा एक भाई है बापुसाहब ,real brother elder one, उसको ग्रेजुएशन के बाद तुम्हारे यहां में जॉब लगी थी, not fancy simple bpo job, उसके साथ उसके कॉलेज की ही शीतल थापा को भी जॉब लगी थी, दोनों साथ में रहते थे वहां लेकिन उसको भी ऐसे टीसिंग का तकलीफ हुआ, उसने इग्नोर किया, लेकिन तकलीफ बढ़ता गया , एक दिन कुछ लोगो ने शीतल को छेड़ा बोले नेपाली लड़की है तु, आती क्या खंडाला वगैरह, वो बोहोत humiliate हुई , मेरा भाई उनको समझाने गया तो उसको खूब मारा , वो लोग लोकल कॉर्पोर्टेर के लोग थे, बादमे तकलीफ और बढ़ी उपरसे नाईट शिफ्ट में काम और सबकुछ....."

आम्ही श्वास रोकुन ऐकत होतो

"...फाइनली वो जॉब छोड़ के वापस आया ! फ्रस्ट्रेट हो गया था कहता था मेनलैंड वाले कभी हमको नहीं अपनाएंगे चाहे दिल्ली हो या मुंबई कही नहीं एक्सेप्ट करेंगे, उसी फ्रस्ट्रेशन में वो अल्कोहॉलिक हो गया और आज rehab में है, इसिलए मैं रिजर्व्ड हो गया, यहाँ जॉब इसलिए एक्सेप्ट किया की ट्रेनिंग के बाद पहाड़ी में पोस्टिंग होगी तो जिंदगी मेनलैंड से दुर कटेगी, मुझे किसीपर भरोसा नही रहता था, लेकिन साले आज तुने जता दिया आदमी सब एक जैसे नहीं होते सब मराठे अच्छे होते है बस मेरा भाई unlucky था ! I am sorry बापुसाहब sorry for lashing out at you brother"

विचित्र क्षण होता तो, मी उठलो , सांगेच्या खांद्यावर हात ठेवला अन म्हणालो

"सब ठीक होगा सांगे, और सुन तु अकेला नहीं है! हम सब साथ है ".

सांगे शांतपणे खाली बसला बॅगपॅक काढले अन म्हणाला,

"तुम लोग दारु पीते हो क्या???"

आत्ताच त्याच्या भावाचा विषय ऐकल्याने आम्ही ह्या प्रश्नावर अवघड़लो , घसा खाकरून पुनीत बोलला

"देख सांगे हम एंजॉय करते है दारु , पर तुझे तकलीफ होगी तो तेरे सामने नहीं पियेंगे भाई"

अन मिश्किल हसत सांगे हरामी बोलला
"मैं भी तो एंजॉय करता हूँ कमीनो!" असे म्हणत त्याने रम चा खंबा काढला सैक मधुन.

"बोलो नीमा सांगे महाराज की जय!" आम्ही 6 कोरस मधे कोकललो! अन एकच दंगा झाला! ज़रा दंगा कमी झाल्यावर मिठ्या सैल झाल्यावर सांगे बोलला

"यार एक बात कहूँ, मेरा रूममेट बोहोत होमसिक हो गया है, अकेला रो रहा है वो अपना उमरीकर, गलती मेरी है यार मैं अपने रिजर्व्ड रहने के चक्कर में उससे बात ही नहीं किया उसको भी बुलाऊँ क्या???"

मी म्हणले "रुक अपन ही जाते उसको चीयरअप करने तेरे रूम में ही बैठेंगे, यार पुनीत फिर गौड़ा को भी बुला ले यार अच्छा बन्दा है"

लगेच प्लान वर शिक्कामोर्तब झाले अन पुनीत अमित गौड़ा ला आणायला पळाला, तो अन अमित आले तेव्हा आम्ही सगळे 22 नंबर बाहेर जमा होतो,

"किशोर दार उघड रे, मी बापूसाहेब" हळूच दार उघडले त्याने ते आमची वरात भसकन आत घुसली!".

"अरे तुम सब इधरकु!, आओ आओ बसो ना अंदर" किश्याच्या हिंदीला इलाज नव्हता!!!.

"तु लेका होमसिक होतोय असे ऐकले रे भाड़खाव...."

"ए हिंदी में बोलो बे हमको नहीं समझेगा ना" समीर.

"हा ते आपलं बरं किश्या होमसिक मत हो इधर सब तेरे भाई है!, चल दारु पीते है, अरे गौड़ा किधर गया! गौड़ा नो फॉर्मेलिटी नो रिजर्वेशन! फील फ्री".

गौड़ा ने हसुन मान डोलावली , दारू पिताना गोल करुन बसायचे, ही माणसाला बहुतेक उत्क्रांति ने दिलेली अक्कल असावी अश्या सराइतपणे आम्ही 9 नवे दोस्त बसलो!, किश्याने चक्क चकल्या काढल्या

"सब खावो रे!!! मेरी वैनी ने बनाया है!".

आता 9 पोरे एक खंबा, काय होणार होते तेवढ़याने! पण आज सेलिब्रेशन होते! दारुत कालवलेली, दुखर्या अंगाची, व्हीएस सरांच्या पेपटॉक ची देन अन बड़े उस्ताद च्या दूरदृष्टी चे परिपाक असली ती आयुष्यभराची जोडलेली मैत्री आम्ही आमचे स्मॉल पेग अन चकली घेऊन एकमेकांची टंगड़ी खेचत सफल संपूर्ण केली होती.

आता सुरु होणार होते टीमवर्क! असली ट्रेनिंग अन तावुनसुलाखून बाहेर पडणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग एकदम सही झालाय. एखाद्या पुस्तकामधला भाग वाचल्यासारखं वाटलं. मज्जा आली.

तुमचं लिखाण मस्त खुसखुशीत आहे. लव्कर पुढले भाग लिहा.

खूप आवडला हा भाग ही!!!

रच्याकने नॉर्थ ईस्ट इंडिअन्स ना प्रत्यक्ष आर्मीत कशी असते ट्रीटमेंट?? जस्ट फॉर इन्फो..

खूप पूर्वी मुंबई तील एका सालोन मधे काम करणारी मणिपुरी मुलगी आम्हाला तुम इंडिअन्स असं संबोधित होती ते

ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं होतं पण जनरल पब्लिकडून त्यांना मिळणारी वागणूक बघता , त्यांच्याही

मानसिकतेत असा निगेटिव्ह बदल झाला असावा अशी खात्रीच पटली!!!

पुण्यात कोंढव्यात घडलेला किस्सा. माझा मित्र तिथल्या एका नॅशनलाई ज्ड बँकेत काम करीत होता. एकदा त्या शाखेत मिचमिच्या डोळ्यांचे, मंगोलॉइड्स चेहर्‍याचे ३-४ जण आले. तिथे पुढे झालेला संवाद असा....
'We want to open an account with your branch "
'OK , Please give ur passporTs and other papers"
"passports? why ? We are Indians . we are Manipuris' ...
भारतातच त्याना पावलापावलावर आम्ही भारतीय आहोत हे बोंबलून सांगावे लागत होते ही जाणीव निश्चितच आनन्ददायक नसणार. आणि पाकिस्तानी आणि बांगलादेशी , लंकन घुसखोर रूप्साधर्म्यामुळे बिनधास्त घुसत आहेत .

आमच्या अकादमीत कलीग असलेल्या नागालॅन्डच्या अधिकार्‍याला विचारले होते की तुम्हाला डिटॅच झाल्यासारखे वाटते का? त्याने प्रांजळपणे हो म्हणून सांगितले. नागालँड म्हटले बरेच लोक विचारतात 'इज इट इन आसाम? " इतका मेनलॅन्ड भारतीयांचा , भारताचाच भूगोल कच्चा असतो....

रॉबिनहुड , आपण काय करता?? आपले कुठल्या अकादमी ला ट्रेनिंग झाले होते? (गैरसोईचे नसल्यासच सांगा!)

जनरल आर्मी/ फोर्सेज मधे मॉंगोलोइड लोकांचा वावर (लेपचा भूटिया गोरखा लिंबु वगैरे लोकं आजकाल मणिपुरी नागा अन चकमा शरणार्थी) खुप आधी पासुन आहे, एकदा सर्विस मधे आलो की आम्ही अन ते ही assimilate होऊन जातो , सो इतका प्रॉब्लेम नाही येत त्यांना अन आम्हाला ही!!! डार्क ह्यूमर टाइप चेष्टा चालतात पण ते अज्ञानोद्भव जोक्स नसतात सो ते आरामात असतात! आजकाल नॉर्थईस्ट खुप मेनस्ट्रीम मधे आले दहा पंधरा वर्षे आधी परिस्थिती हॉरीबल होती असे एकतो!

नॉर्थ ईस्टवाल्यांना मॉंगोलाईड म्हणणे कधीपासून सुरु झाले?
यापूर्वी कधीही ऐकले नव्हते मी तरी.

बाकी निवेदनशैली आणि धाटणी छानच आहे लेखनाची.
तुमची अकादमी पाहिलीय, तळ्याकाठची इमारत सुरेखच आहे.

तुमचे कदाचित "मंगोलियन" अन "मोंगोलोइड" ह्या संज्ञा मधे confusion झाले असावे

मंगोलियन = मंगोलिया ह्या राष्ट्राचे नागरीक

मोंगोलोइड = एंथ्रोपोलॉजी मधे जो रेसेसचा अभ्यास होतो त्यात वेगवेगळ्या रेसेस असतात चीनी तोंडवळा असणार समस्त लोकांस मोंगोलोइड म्हणतात, ब्लैक्स ना नेग्रिटोस वगैरे

रॉबिनहुड, आपण युपीएससी थ्रू अधिकारी दिसताय देवा, ऑल इंडिया सर्विसेज का?

मिलिट्री परलंस मधे मराठी सैनिकांस "द गणपत्स" ह्या नावाने ओळखले जाते. Happy

मस्त चालू आहे...
साला पण लफडा होईल तुमचा मार्केटमध्ये असे वाटलेले.. फुल्ल चक दे आठवलेला Happy

नाही फिल्मी काही झाले नाही देवा पुर्ण ट्रेनिंग मधे!! कारण सिविल लाइफ मधे पहिल्या विजिट ला राडे केले असते तर आम्हांस विशष्ट भागावर लाथ घालुन घरी हाकलले असते!! डिसिप्लिन इज डिसिप्लिन!!! स्वतःला आवर घालावा लागतो कठीण असते पण जमते सरावाने!!

नाही हो मी आर्मी मधे नाहिए मी सेंट्रल पैरामिलिट्री फोर्सेज (CPMF) च्या अंतर्गत येणाऱ्या एका निम्लष्करी दलात अधिकारी आहे.

पण अहमदनगरला आम्ही ए सी सी च्या ट्रेनीना गावात येऊन सिविलिअन्सला अगदी पोलीसाना मारहाण केल्याच्या घटना अनुभवल्या आहेत . त्यात काहीही कारवाई झाल्याचे दिसले नाही. अगदी अधिकारी म्हणूनही त्यात हस्त्क्षेप करण्याची वेळ आली पण आर्मीवाले त्याण्च्ज्या रेकॉर्डला हे ट्रेनी कॅम्पसम्ध्ये असल्याचे दाखवतात. आता व्हिडेओ मोबाईल शूटिंग ची सोय झाल्याने निदान गुन्हे तरी दाखल होत आहेत. कालांतराने आर्मी-सिविल को ओर्डिनेशन मीटिंगमध्ये रफा दफा होत असावे...

आर्मी चे टोटल वेगळे पड़ते त्यांच्या केसेस आर्मी एक्ट नुसार चालतात शिवाय ते लोक एम् ओ डी च्या अंडर येतात, आमचे तसे नसते, फ़ोर्स पैकी असुन आम्ही एम् एच ए अंतर्गत येतो त्यामुळे किचकटपणा वाढतो , शिवाय अधिकारी म्हणुन मला काही संयमन लागतेच् लागते कारण एरवी ही सीआरपीएफ किंवा बीएसएफ च्या जवानांनी चालत्या ट्रेन मधुन प्रवासी फेकुन दिले वगैरे केसेस ऐकायला येतात, सुदैवाने आमची फ़ोर्स अजुन असल्या केसेस मधे हाईलाइट झालेली नाही पण त्याची काळजी घेणे आमच्या जबाबदारीत येते म्हणुन हा संयम !! आम्हाला ट्रेनिंग च्या वेळीच अश्या प्रकारची इंस्ट्रक्शन्स देतात

फारच सुर्रेख लिहिलंय .....

अंगावर सरसरून आलेला काटा आवरत आम्ही त्या शब्दांत भिजु लागलो >>>> असे अनुभवी बोल ऐकताना त्यात काय धार असते हे मी अनुभवले आहे त्यामुळे हे सगळ्यात जास्त आवडले ...

तुमची टीम कशी हळुहळु एक होत होती हे वाचताना मन भरुन येत होते ...

पुलेशु ..

मी पण मालिका उत्सुकतेने वाचत आहे. माझ्या नात्यातले एकजण आर्मित असून ओटीए चेन्नै मध्ये प्रथम वरील प्रमाणेच साधारण ट्रीट्मेंट चे किस्से ऐकले आहेत त्यांच्याकडून. मग ते डेहराडून च्या ऑफिसरअ‍ॅकेडमीत इन्स्ट्रक्टर होते तेव्हाचे ही किस्से ते आठवले.

मार्के ट मधील प्रसंग वाचून चक देचीच आठवण झाली.

Pages