मन

Submitted by desh_ks on 26 February, 2008 - 06:33

कधी काळजाचा तुझ्या ठाव होते,
कधी पैलतीरी उभी नाव होते ।

कधी निग्रही मौन, केव्हां दुरावा,
कधी आर्जवी लीनसा भाव होते ।

कधी जीत उन्मत्त द्वंद्वातली, तर
कधी हारला पूर्ण पाडाव होते ।

कधी तृप्त मौनातला शब्द होते,
इरेला कधी पेटला डाव होते ।

कधी मुक्त निर्लेप यात्री, तसे मन
स्मृतींचा कधी जागता गाव होते ।

-सतीश

गुलमोहर: 

कधी मुक्त निर्लेप यात्री, तसे मन
स्मृतींचा कधी जागता गाव होते ।

मस्त आहे कविता

सुधीर