अंदमान सफर

Submitted by सुनिल परचुरे on 11 March, 2015 - 09:22

नोव्हेंबर मध्ये मि व सौ. सुषमा श्रिलंका - मालदिव ट्रिप करुन आलो. श्रिलंके चि टुर मस्तच झालि.पण मालदिवला आम्हि एका मोठ्या अपघातातुन बचावलो होतो. पॅरासेलिंग करताना पॅराशुट व स्पिड बोटला असलेला दोर तुटला व आम्हि दोघेहि भर खोल समुद्रात पडलो. पुढिल पाच सात मिनिटे मि जिवन मरणाच्या झुल्यावर होतो. त्याचा आम्हा दोघांवर जबरदस्त मानसिक परिणाम झाला होता.

तो घालवण्याकरता कुठेतरि समुद्रकिनरिच जाण्याचे मि मनात ठरवले होते.२६ फेब्रुवारि हि स्वातंत्रविर सावरकर ह्यंचि पुण्यतिथि. त्यानिमित्ताने अंदमानला जायचे ठरवले.तशि त्याला लागुन दोन दिवस पुढे सुट्टीहि होति. त्यामुळे आम्हि दोघांनिहि तिथे जायचे नक्कि केले.

२६ तारखेला दिवसभर सेल्युलर जेलमध्येच होतो....

IMG_0083.jpgIMG_0084.jpgIMG_0082.jpg

त्यांच्या कोठडिला जाणारा रस्ता.......

IMG_0095.jpg

सुर्यकिरणांचाहि स्पर्श......

IMG_0098.jpg

साऊंड आणि लाईट शोचि जागा.....

IMG_0113.jpg

समोर दिसणारे रोस आयलंड.....

IMG_0127.jpg

तिथल्या वरच्या मजल्यावरुन .......

IMG_0114_1.jpgIMG_0118_0.jpg

दुसर्‍या दिवशि दिवसभर ....हॅवलोक आयलंड......

IMG_0211.jpgIMG_0212.jpg

काला पत्थर बिच........

IMG_0168.jpgIMG_0172.jpgIMG_0176_0.jpgIMG_0196.jpg

हा एखाद्या युरोपिअन बिच सारखा....राधानगरि बिच.......

IMG_0204_0.jpgIMG_0205.jpg

तिसर्‍या दिवशि प्रथम पोर्ट्ब्लेअर पासुन ५० कि.मि. अंतरावर बाराटांग जागा आहे. तिथुन पुढे ५० कि.मि. घनदाट जंगल आहे.त्यात जारवा जमातिचि माणसे राहतात. त्यांना संरक्षित जमात म्हणुन ठरवल्याने सरकारने त्यांना भेटण्यावर बरिच बंधने घातलि आहेत. त्या दिवशि जवळ जवळ १०० गाड्यांचा ताफा होता. प्रथम पुढे पोलिस नंतर मध्ये सर्व गाड्या...परत शेवटि पोलिस...अशि वरात रस्त्याने ४० कि.मि. च्या वेगाने जाते. तुमचे नशिब असेल तर रस्त्यात मध्ये जारवा माणसे दिसतात.रस्ता सतत वळणा वळणाचा आहे. त्यांच्याशि बोलायचे नाहि, ते दिसल्यावर मध्येच गाडि थांबयायचि नाहि , त्यांचे फोटो काढायचे नाहित अशि बंधने आहेत.

आम्हाला जाताना २ व येताना एक लहान मुलगा दिसला...तशि नायजेरियन माणसांसारखि दिसतात. हातात तिरकमठे... डोक्याला लाल काहिसे बांधलेले... हळुहळु हि जमात माणसाळत आहे

तिथुन पुढे लाइमस्टोन केव्हज बघायला गेलो....जातान तेथिल मॅनग्रोव्हज...

IMG_0269.jpgIMG_0243.jpgIMG_0254.jpgIMG_0259.jpgIMG_0264.jpg

नंतर जवळच ९ कि.मि.वर मड व्होल्क्यॅनो आहे तिथे गेलो. तिथे रस्त्या पासुन वर जातानचि वाट...

IMG_0291.jpgIMG_0289.jpgIMG_0280.jpgIMG_0272.jpgIMG_0278_0.jpgIMG_0279.jpg

सुषमाच्या मनातिल कित्येक वर्षांचि २६ फेब्रुवारिला अंदमानला जाण्याचि ईछा पुर्ण झालि. तसेच आता आम्हा दोघांचि पाण्याचि मनातिल भिति बरिच कमि झालि होति....हेहि करायचे होते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो, तिथे एवढे बघण्यासारखे आहे याची कल्पना नव्हती. आता जायला पाहिजे.

छान आहेत फोटोज.. मलाही माहीत नव्हतं तिथे इत्कं आहे पाहायला..

बाप्रे पॅरासेलिंग चा अनुभव खतरनाक आहे.. थायलँड आणी गोव्याला खूप वेळा केलंय.. पण नेक्स्ट टैमाला तुझा हा अनुभव खात्रीने आठवेल .. ऊप्स!!! Happy

"अंदमान"....कोणत्याही कारणास्तव हे नाव आले समोर म्हणजे आपोआपच नतमस्तक व्हावे वाटते.

परचुरे पतीपत्नींचे खास अभिनंदन एवढ्यासाठी की पॅरासिलिंगच्या जीवावर बेतलेल्या आणि भयावह वाटणार्‍या अनुभवातून गेल्यावरसुद्धा त्या बाबतीत मनी वसलेली भीति घालविण्यासाठी पुन्हा समुद्रसफारीचाच उतारा त्याना आवश्यक वाटला आणि तो त्यानी अंदमान भेटीतून पूर्ण केला याबद्दल.

छायाचित्रांद्वारे तुम्ही घडवून आणलेली ही भेट अभिनंदनीय अशीच आहे.

आम्ही २००५ मधे अंदमान सफर केली होती. ४/५ दिवसांची होती. पण स्वतः आखली होती. आता डिसेंबर १४ मधे परत केली. ७ दिवसांची जेट एअरवेज बरोबर. दोन्ही उत्तम झाल्या. २००५ मधे बॅरन ज्वालामुखी बघायला मिळाला. आणि या वेळेस हॅवलॉकला मुक्काम, नीलला मुक्काम, बारातांग भेट यामुळे ही सफर पण खूपच आनंददायक.