पण तुझी आठवण येते

Submitted by अज्ञात on 5 July, 2008 - 03:52

मी उगमुन शिखरावरती
सागरात मिसळुन गेले
वाटेत किनार्‍यावरती
मन अगणित जागी रमले

अडवून कुणी वा मजला
बांधावर रोखुन धरले
मी भिजवुन हिरवी राने
शेतातहि फिरून आले

कधि असे वाटले इथेच मी थांबावे
अंगणात कल्पतरू, घर मनभर बांधावे....
नियतीच खरी चाले न काही तिजपुढती
मी मला समजवुन देते रे.......
........... पण तुझी आठवण येते

.............................अज्ञात
१२६७,नाशिक

गुलमोहर: 

एक लग्न झालेलि मनाविरुधा अश्या स्त्रि चि कता वातते ! पन सहि आहे !!!!

ड्रीम,
हमम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म................................... Happy

सुरेख!! तुमच्या सार्‍याच कविता!!

वाय के के,
अशी दाद खरंच मोहवून टाकते. आभार न मानून कसं चालेल ? आभारी आहे. असेच भेटत रहा.
......................अज्ञात

मला देखिल ड्रीम सारखेच वाटतेय.

छान मस्तच.. ही कशी काय मी मिसली...?