टेलीस्कोप विकत घेण्यासंदर्भात....

Submitted by विनार्च on 11 March, 2015 - 04:41

माझ्या १० वर्षाच्या लेकीसाठी टेलीस्कोप घ्यायचा आहे.( तिला ग्रह तार्यांच खूप वेड आहे. बरीच माहिती ही आहे तिला याबद्दल.)
कुठून घ्यावा... त्यात कोणत्या गोष्टी असाव्यात... तसेच लेन्स वै. संदर्भात माहिती हवी आहे. कुणी घेतला असेल वा माहिती असेल तर प्लीज हेल्प.... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्च
तुम्ही amazon वगैरे साइट्सवरून देखील खरेदी करू शकता. तुमच्या बजेट नुसार विविध पर्याय उपलब्ध आहेत. मी स्वत: celestron कंपनीचा टेलिस्कोप वापरतो, या कंपनीचे telescopes उत्तम असतात आणि हौशी निरीक्षणासाठी तर सर्वोत्तम.
थोडे लेंस इ. बाबत - शक्यतो ४-६ इंची घ्या. हे प्राइमरी मिरर/लेंसचे अपर्चर (माप) असते. यापेक्षा छोटा खूपच बेसिक होईल आणि मोठा १० वर्षाच्या मुलीला हाताळायला कठीण जाऊ शकतो.
आणि तुमच्या लेकीला अवकाश निरीक्षणाकरिता शुभेच्छा!

मुंबईत राहात असाल तर वरळीला नेहरू सेंटर मध्ये एक दुकान आहे तिथे विकतात. साधे मिळून जातील. नाहीतर अमॅझॉन झिंदाबाद. ते तारे दाखवायचे ऑडिटोरिअम असते ना त्याच्या बाहेर हे दुकान आहे.
ब्रायन कॉक्स ह्यांच्या मालिका तिला दाखवा अतिशय रंजक व माहिती दायक आहेत. मालिकेचे नाव
वंडर्स ऑफ द युनिवर्स.

स्टंबल अपॉन करताना खूप साइट मिळतात जिथे आकाशावर कॅमेरा लावूनच ठेवलेला असतो व ३६० डिग्री व्ह्यू देतात. त्याअनुसार तिला बघता येइल.

१० वर्षाच्या मुलीकरता हवे असेल तर सुरुवात १०x५० च्या दुर्बिणीने करा.
लगेच टेलेस्कोप घ्यायची काही गरज नाहीये.
नंतर आवड राहिली आणि उत्साह टिकला तर टेलेस्कोप घेण्याचा विचार करा.

माझं मत टेलिस्कोपला. तिला आवड असेल आणि माहिती असेल तर खरंच घ्या. त्यातनं आकाश बघायला फार मजा येते मुलांना आणि आपल्याला सुद्धा. आमचा कुठला आहे ते बघून सांगते.

भारतात असाल - विशेषतः मोठ्या शहरामध्ये - तर light pollution मुळे चंद्र, शुक्र, मंगळ, गुरु आणि काही ठळक तारे सोडता फार काही दिसत नाही.

शहरापासून दूर शेतावर वगैरे जाणार असाल तर टेलेस्कोप, ट्रायपॉड इ. गोष्टी सांभाळत घेऊन जाणे आणि तिथे गेल्यावर लेव्हल करणे, सेटअप करणे इत्यादि कटकटी बर्‍याच असतात. पहिल्यांदा उत्साह असतो पण नंतर धूळ खात पडतो टेलेस्कोप. त्यापेक्षा १०x५० ची चांगली (Nikon, Canon) बायनाक्युलर घ्या.

विचार करा.

विनार्च, बजेट किती आहे?

शहरात असलात तरी, आणि काही(च) गोष्टी दिसणार असल्या तरी आवड असल्यास टेलेस्कोपच घ्या.
स्टँडमुळे खूप फरक पडतो (शिवाय फोकललेंग्थ)

सिंडरेला +१.

फक्त पहिला टेलिस्कोप प्रचंड बजेटचा नाही घेतला तरी चालेल. इथले अभ्यासू सांगतीलच. पण नंतर जसा खरा इंटरेस्ट डेव्हलप होतो तसं महागाचा पण घेऊ शकाल. शिवाय दहा वर्षे म्हणजे अजून पाच वर्षेतरी एखादं उपकरण काळजीपूर्वक कसं वापरायचं ते शिकाल.

पक्षीनिरिक्षणाच्या बायनॅकला ते १० * ५० लॉजिक चालेल. ग्रह तारे पाहायचं उपकरण आणि सुरूवातीचं मेजरमेंट वेगळं.

खरतर मला सुधा एक टेलिस्कोप घ्यायचा आहे.......पण कुठून घ्यावा कळ्त नाहीये........तस मला आकाशातली सगळी ग्र्ह , राशी , नक्षत्र ओळखता येतात.... पहिला टेलिस्कोप कुठ्ल्या कंपनीचा घ्यावा..celestron ? orian? आणि रिफ्रॅक्टर की रिफ्लेक्टर घ्यावा............पुण्यात कुठे सोय आहे का? भिंग ४ इच ते ८ इच कस घ्याव सुरुवातीला???? कुणी विकत घेतला असेल तर कॄपया माहिती द्या

अगदि बेसीक, मुलांसाठी घेतलेला, मीड कंपनीचा. कामचलाउ आहे, आकाश निरभ्र असेल तर नजदिकचे ग्रह पहाता येतात. सध्या बेसमेंट मध्ये आहे... Happy

माझ्या कडे Celestronचा PowerSeeker 40AZ Telescope धुळ खात पडला आहे. पाहिजे असेल तर सांगा.

पुण्यात घोले रोडला एक संस्था आहे (नाव किंवा बाकी माहीती नाही Sad ) तिथे लहान मुलांना टेलीस्कोप बनवायला शिकवतात.

विनार्च, तुम्ही खगोल मंडळात जाता का? मुलीला घेऊन नक्की जा. वांगणी ला त्यांचे आ काश निरीक्षणाचे कार्यक्रम असतात. फार सुंदर व माहितीपूर्ण!

मुंबई मिड डे वृत्त पत्रात हे असे आकाशदर्शनाच्या कँपस चे नेहमी येते. साधारण वीकांताला असतात.
नेहरू सेंटर स्वतःच कोर्सेस घेतात. असे त्यांच्या साइट वर वाचले. सायन ला एक विज्ञान संस्था आहे तिथे ही असे कार्यक्रम असतात.

ग्रेट... विनार्च, हा विषय इथे काढल्याबद्दलच तुमचे आभार.
लहानपणापासूनचा अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय.... Happy
प्रतिसादकांच्या सूचना लक्षात घेतोय. त्यांना धन्यवाद.

इन्द्रा, मला पण मला पण....
तू असे कर, या इब्लिस अन अमाला एकेक झेरोक्स दे पाठवुन त्या दुर्भिणीची... !
ओरिजनल दुर्भिण मला दे....

विकायचा नाही... वापरायचा कसा ते शिकवणार असाल तर हौशे पुरता घेऊन जा.
ट्रेकिंगला जातो म्हणुन काकाच्या मित्राने गिफ्ट दिला होता. पण तो पसारा ट्रेकिंगला घेउन जाणार्‍यातला नाही.

>>>> विकायचा नाही... वापरायचा कसा ते शिकवणार असाल तर हौशे पुरता घेऊन जा <<<
अबे तू मुंबैत, तिथे नाही कधी स्वच्छ प्रकाशरहित रात्र, मुंबैतुन एक चांदणी दिसत नाही रात्री... काही दिवसात चंद्रच काय, सूर्यही दिसायचे बंद होईल प्रदुषणामुळे....
त्यापेक्षा अस कर, ती दुर्बीण मला दे, मी माझ्या गच्चीवर सेट करतो, स्वतः शिकतो, तुलाही शिकवतो. अन कधीमधी ती घेऊन लिम्बीच्या गावालाही जाऊयात. चालेल?

काऽऽशऽ... तेरे काका और काकाके मित्र जैसे लोग हमारे भी नसिब में होते..... Proud पर फिक्कर नॉट लिम्ब्या,,, इन्द्रासारखे मित्र आहेत की तुला.... Happy

Pages