अँटीऑक्सिडंट्सच्या वापराबाबत

Submitted by देवकी on 8 March, 2015 - 12:17

ऑफिसमधील एकजण अँटीऑक्सिडंट्सच्या गोळ्या रोज घेते.अर्थात हे अपघाताने कळण्यात आले.ती व्यक्ती फिगर/हेल्थ कॉन्शस आहे.त्या व्यक्तीला डायबेटीस असून डॉक्टरांनी,त्या गोळ्या दिल्या असे ती म्हणते.वय ५४ असूनही तिची स्कीन अतिशय छान असून स्लीमही आहे.
या गोष्टीं विचारात न घेता मला एवढंच विचारायचे आहे की अशा अँटीऑक्सिडंट्सच्या गोळ्या कोणीही घेतल्या तर चालतात का? फायद्याबरोबर काही साईड इफेक्ट्स आहेत का? एक उत्सुकता म्हणून विचारीत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे तुम्ही खाता त्यावर त्वचा अवलंबून असते. त्याचबरोबर जेनेटीक मुळे प्राप्त झालेली त्वचा पण एक कारण असते.

पण मूळात ती भेट(जेनेटीक मुळे मिळालेली त्वचा) कशी राखता हेच खरं.

तेलकट, तूपकट खाणं कमी खाणं, पाणी पिणं वगैरे नेहमीच चांगलं.

अ‍ॅनटाय ऑक्सीडेंट वर लिहितीलच कोणीतरी तज्ञ.

आनुवंशिकता,आहार यातून मिळालेली भेट वेगळी.फिगर/हेल्थ जपण्यासाठी एखादी व्यक्ती अहा गोळ्या नेहमी घेत असेल तर यातून काही अ‍ॅडव्हर्स इफेक्ट होतात का? हे विचारायचे आहे.

देवकी, माझ्यामते कुठल्याच प्रकारच्या गोळ्या नियमित घेऊ नये. उत्तम आहार आणि नियमित व्यायाम हेच निरोगी शरीराचे गमक आहे.

हो बी, मलाही पटते.पण ती व्यक्ती ह्या गोळ्या रोज घेत आहे ते पाहून कुतुहल वाटतेय. तिलाच हळूहळू सांगण्यासाठी हा प्रपंच..माझ्या अल्प माहितीनुसार्,यामुळे किडनीवर परिणाम होतो.पण अ‍ॅऑबद्दल काही माहित नाही.

कोणता ब्रँड आहे? अ‍ॅम वे का? डायबेटीस असेल तर किडनी हळू हळू अफेक्ट होणारच. त्यासाठी वेगळी उपाययोजना आवश्यक आहे. वैद्यकीय सल्ल्या शिवाय असल्या काही गोळ्या घेउ नयेत. औषधा बद्दल अधिक माहिती द्या. तुम्ही ते पाहिले आहे का? ऐकीव माहितीवर उगीच गैरसमज होतील. कॉस्मेटिक्स मधील अँटी ऑक्सीडंट वेगळे.

साध्या भाज्या फळे व फिश ऑइल मधून नैसर्गिक रीत्या मिळेल तेव्ढे ठीक.

त्यांना सांगायची जबाब्दारी त्यांच्या डॉक्टरची आहे.

अ‍ॅमवे असेल बहुधा. कारण त्यांचे 'न्यूट्रीशन कन्सलटंट' या गोळ्या रेग्युलर घ्यायला हरकत नाही असेच सांगत फिरत असतांत.

.

.

"अँटीऑक्सिडंट्स" म्हणजे काय?

बायदिवे, अ‍ॅमवे किंवा तत्सम उत्पादनांच्या जाहिरातींवर श्रद्धा ठेवुन रोजच्या रोज गोळ्या/पावडरी/सरबते यांचा खुराक घेणे ही बाब "अंधश्रद्धे"मधे बसू शकते काय?
(का श्रद्धा फक्त अन फक्त देवधर्मावरील, ती देखिल हिंदू देवधर्मावरील असेल तरच अंधश्रद्धा म्हणून धोपटत सुटायचे असा काही एक नियम आहे? Proud अन्निसवाल्यांकडून खुलासा अपेक्षित आहे, पण खुलासा मिळेल ही देखिल कदाचित माझीच अंधश्रद्धाच असू शकेल. Lol )

देवकी , आम्ही फक्त तुमचा तिनदा आलेला प्रतिसाद पाहु शकतोय. Proud

लिंब्या कधितरी बरा होईल अशी माझी अंधश्रद्धा आहे. Wink

लिंबाजींना शंका आली रे आली की अंनिसवाले उत्तर देण्यासाठी मागेमागेच फिरत असावेत असे मानायला वाव आहे. झालेच तर बुप्रावादी, समाजवादी, कम्युनिस्ट, नक्षली वगैरेही.

लिंबू:

An antioxidant is a molecule that inhibits the oxidation of other molecules. Oxidation is a chemical reaction involving the loss of electrons or an increase in oxidation state. Oxidation reactions can produce free radicals. In turn, these radicals can start chain reactions.

औषध घेण्यासाठी तिने पाकिट टेबलवर काढले असता मी ॲॲ एवढेच पाहू शकले.>> शक्यतो असे स्नूपिन्ग करू नये. त्यांना काही वैयक्तिक रोग/ त्रास असतील व त्याच्या त्या गोळ्या असतील तर ते तुम्हाला कसे सांगणार म्हणून त्यांनी काही तरी बोलून वेळ मारून नेली असेल. प्रत्येकाच्या हेल्थ स्टेटसची एक प्रायवसी असते व ती त्यांनी त्यांच्या बॉसबरोबर बोलणे योग्य. स्वतःहून तुम्हाला सांगितले नसेल तर कृपया त्यांची प्रायवसी म्हणून हा विषय सोडून द्या. अशी माझी विनंती आहे. वेब एम्डी किंवा तत्सम सायटींवर तुमचे कुतुहल शमवण्याइतपत माहिती नक्की मिळेल. इथले डॉक्टर्स ही सांगतीलच.

अमाचे बरोबर आपल्या रोजच्या जेवणातून अर्थात पारंपरिक जेवणातून आपल्याला पुरेसे antioxidant मिळतात. काळे द्राक्ष, आमसुल, जांभळं, पालक, बीट रुट, लाल मुळा, लाल कांदे, लाल रंगाच्या डाळी जसे की रेड बीन्स, राजमा; लालमाठ ह्यातून खूप antioxidant मिळतं.

<<लिंबाजींना शंका आली रे आली की अंनिसवाले उत्तर देण्यासाठी मागेमागेच फिरत असावेत असे मानायला वाव आहे. झालेच तर बुप्रावादी, समाजवादी, कम्युनिस्ट, नक्षली वगैरेही.>>
---- ब्रिगेडी... राहिले ना. त्यान्चा अनुल्लेख कशाला?

शक्यतो असे स्नूपिन्ग करू नये.>>>> मी तिच्याकडे गेले असताना तिने गोळ्यांचे पाकिट काढून टेबलवर ठेवले व अजून काहीतरी ती पर्समधून काढत होती.पाकिटाचे नाव, नेमके माझ्यासमोर आले म्हणून मला ते कळले.त्यानंतर मी तिथून उठूनही गेले.मी तिला काही विचारले नाही.यात स्नूपिन्ग निश्चितच नाही.

(औषध घेण्यासाठी तिने पाकिट टेबलवर काढले असता मी ॲॲ एवढेच पाहू शकले. ही माझीपोस्ट मोबाईलवरून माझे स्टेशन येतायेता लिहित होते.नंतर पूर्ण करू असं ठरवले होते,पण नंतर विसरले.यामुळे झालेला गैरसमज असावा.)

अँटीऑक्सिडंट्स" म्हणजे काय >>>
ऑक्सिडेशन म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या गोष्टीची ऑक्सिजन सोबत रासायनिक होवून कार्बन किवा इतर molecules तयार होणे . कार्बन ची निर्मिती
जेवढी जास्त तेवढं म्हातारपण लवकर . म्हणून अँटीऑक्सिडंट्स घेवून स्वताला तरुण ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय . पण ह्याचे दुष्परिणाम सुधा असतील . मला एवढी माहिती नाही त्याबद्दल