शून्यमाळा

Submitted by भारती.. on 5 July, 2012 - 06:35

मDELETED

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लाल तारेसारखा तो कोंडला माझा जिव्हाळा
या नभाच्या पार होतो ..शून्यमाळा.. शून्यमाळा..... हे अतिशय छान Happy

सूर्यसूत्रे बदलणारे --- असं आहे का?

आभार ऑर्फिअस ,वैभव ,विभाग्रज,उल्हासजी,अंजली..शून्यमाळा शीर्षक छानच आहे..प्लॅनेटोरियम मधून होणार्‍या अवकाशदर्शनावरची ही कविता ..विश्वाच्या विराटतेसमोर मानवी अस्तित्वाच्या इवल्याश्या पण प्रखर जिद्दीची ज्योती..विश्वनिर्मितीच्या कालच्या महान संशोधनाच्या पार्श्वभूमीवर शेअर करावीशी वाटली.

मला समजायला जरा बोजड झाली. Sad

किरण जेथे विरहमापन ती जुनी घुमटी निळी
आदि नाही अंत ना अस्तित्वशाळा मोकळी

लाल तारेसारखा तो कोंडला माझा जिव्हाळा
या नभाच्या पार होतो ..शून्यमाळा.. शून्यमाळा..
>>>
ह्या ओळी डोक्यावरून गेल्यात. Happy कुणीतरी उलगडा प्लीज.

;)) खरेय निंबुडा सांजसंध्या ,प्रकरण सुबोध नाही..

किरण जेथे विरहमापन ती जुनी घुमटी निळी
आदि नाही अंत ना अस्तित्वशाळा मोकळी

आकाशाची सनातन निळी घुमटी,जिथे दोन वस्तूंमधले अंतर प्रकाशकिरणांमध्ये मोजले जाते,आदिअंत नसल्यासारखे तिचे आणि तिच्या पिलावळीचे अस्तित्व.तिच्यावर,तिच्या अन मानवाच्या नात्यावरची ही कविता.

लाल तारेसारखा तो कोंडला माझा जिव्हाळा
या नभाच्या पार होतो ..शून्यमाळा.. शून्यमाळा..

मानवी भावनांची हद्द,परिचयाचं आकाश ओलांडून्,शून्यांच्या प्रांतात प्रवेश..

थोडीशी दुर्बोधता माझ्याही काव्यवंशपरंपरेत असावी..

शून्यमाळा हा शब्द आवडला. पण अर्थ काय अपेक्षित आहे हे समजत नाही.

अवांतर :
कविता दुर्बोध नाही. विषय आहे. ही कविता जर्नेलिझम करते. म्हणून ती सोपी हवी. दुर्बोध म्हणून हिणवल्या गेलेल्या कविता या गूढवादी असल्याने सर्वसामान्यांना समजणे अपेक्षित नाही.

मुंगी उडाली आकाशी..

हे गाणं कितीदा तरी ऐकलेलं असेल पण अर्थ सांगा म्हटलं कि तारांबळ उडते. कारण त्यात प्रतिमांची, रूपकांची रेलचेल आहे. या गूढवादी कविता शक्यतो अध्यात्मातील प्रतिमांमधे गुंफलेल्या असल्याने अध्यात्म वगैरे विषयांत गती असलेल्यांना थोड्याशा प्रयत्नातच त्याचा उलगडा होतो. पौराणिक कथा, सूक्तं हे सर्व प्रतिमांमधूनच उलगडतं.

ना. घ. देशपांडे सारख्या मागच्या पिढीतल्या कवीच्या कविता असोत किंवा कवी बी यांची चाफा बोलेना असो. मुंगी उडाली आकाशी असो किंवा रस्त्यात कोणसा आंधळा गातो हे बा. भम. बोरकरांचं गीत असो. सहजासहजी न उलगडणारे असेच प्रतिमाविषय आहेत. विंदांची वेडी तर झटकन समजायचीच नाही. स्वतःच्या दु:खाला भरजरी प्रतिमांनी सुंदर बनवलेले ग्रेस हे माझे आवडते कवी. ते याच परंपरेतले. माझ्या विपुमधे ते स्वतःच्या कविता उलगडून सांगतानाचा व्हिडीओ आहे.

या कविता गूढ आहेत पण देखण्या आहेत. शब्दसौंदर्य, गेयता, माधुर्य असं काही नं काही त्यात असल्याने त्या आवडतात. अर्थ देखील समजला समजला म्हणताना हातातून निसटतो असा अनुभव येतो.
मात्र प्रस्तुत बाफवरच्या कवितेचा उद्देश एखादी घटना सांगणे असा असल्याने इथे दुर्बोधता अपेक्षित नाही. स्तुतीपर कविता, भाटकवन, प्रसंगवर्णन, काव्यकथा या सोप्याच असतात. असाव्यात असं म्हणत नाही.

कळली नाही, पण तरीही आवडली.
काही कविता अश्या असतात, ज्या केवळ अनुभूतीसाठी असाव्यात. त्यांचा अर्थ शोधणे अनावश्यक वाटते. तसं काहीसं जाणवलं.. Happy

सर्वांचे खूप आभार..किरण,तुम्ही म्हणालात की ही कविता जर्नलिझम करते म्हणून ती सोपी असायला हवी..मला असे वाटत नाही.

विषय दुर्बोध आहेच्,तो माझ्या काहीशा अ-सुबोध शैलीत ( ;)) ) अवतरला..मी मगाशी म्हटलेच की की थोडी दुर्बोधता माझ्या काव्यवंशपरंपरेत असावी..ही ग्रेसांच्या जात कुळीतील नाही हे तुम्हीही जाणता कारण तिथे अर्थ निर्णयनच होत नाही तसे इथे नाही.माझ्या व्यामिश्र विचारविश्वातून माझी कविता उमटते,ती बरीचशी अंतर्मुख आहे,ती मला सुस्पष्ट आहे .मी तिचे बांधकाम हलवत नाही!असो.

शून्यमाळा..शून्यांच्या एकापुढे एक पसरलेल्या 'वसाहती' ..(केशवसुतांना एका वेगळ्या संदर्भात स्मरून.) एका कवीच्या दृष्टीस दिसलेले हे खगोलाचे गोल..

ही ग्रेसांच्या जात कुळीतील नाही हे तुम्हीही जाणता कारण तिथे अर्थ निर्णयनच होत नाही तसे इथे नाही.

ग्रेसांच्या कवितेत अर्थ निर्णयन होत नाही असं तुमचं म्हणणं आहे ज्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. पण तुमच्यापुरतं ते समजून चालूयात. मात्र, माझ्या पोस्टमधे इतरही कवितांचा आणि कवींचा उल्लेख केला आहे. त्यांचा अर्थ आपल्याला उमगलेला आहे असं तुमच्या पोस्टवरून वाटतंय. तुम्हाला उमगलेला अर्थ इथे उद्धृत करावा ही नम्र विनंती. विशेषतः मुंगी उडाली आकाशी आणि रस्त्यात कोणता आंधळा गातो या कवितांचे अर्थ जाणण्याची इच्छा आहेच. विंदांच्या वेडीचा अर्थही जाणून घेण्याच्या प्रतिक्षेत आहेच Happy

बा.भ.बोरकर ,विंदा यांच्या कवितेत दुर्बोधता नाही,गूढता आहे.ती कवितेची खोली वाढवते.बा.भं.ची सौंदर्यासक्ती,आणि विंदांची तत्वदर्शिता या गूढतेने खुलून उठतात्,मला भावतात.बींची 'चाफा' मला आवडते,पण दुर्बोध वाटते..मुक्ताबाईंची मुंगी अध्यात्मप्रांतातील अ‍ॅब्सर्डिटी..तिचे निकष वेगळे.

अखेर इतकेच,ही माझी कविता जशी आहे,तशी आहे.. :))

मुक्ताबाईंची मुंगी अध्यात्मप्रांतातील अ‍ॅब्सर्डिटी..तिचे निकष वेगळे.

म्हणजे काय ? दुर्बोधता नाही का ?

नाही.'ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या'ची मराठी लोभस आविष्कृती.अगा जे घडलेची नाही तयाची वार्ता पुससी काई.. मिथ्या,अस्तित्वात नसलेल्या मायेने, (मुंगीने) ,सूर्याला (ब्रह्मजाणिवेला) गिळून टाकले हा मुक्ताबाईंच्या अनुभवाचा विषय आहे,तो अनुभवाचा वाण मला कुण्याही साहित्यिकाच्या अनुभवविश्वापेक्षा वेगळा वाटतो.दुर्बोध नाही.

अगा जे घडलेची नाही तयाची वार्ता पुससी काई.. मिथ्या,अस्तित्वात नसलेल्या मायेने, (मुंगीने) ,सूर्याला (ब्रह्मजाणिवेला) गिळून टाकले हा मुक्ताबाईंच्या अनुभवाचा विषय आहे,

ग्रेट !!
धन्यवाद Happy

मिथ्या,अस्तित्वात नसलेल्या मायेने>>>>>>>

माझे मत - माया नक्कीच अस्तित्वात आहे!!

ज्या वस्तू अस्तितवात नाहीत त्या आहेत व ज्या आहेत त्या नाहीत असा भास जीवाच्या ठायी उत्पन्न करणे हे तिचे काम आहे म्हणजे मोहाचे आवरण जीवाच्या भोवती निर्माण करणे होय ज्यात तो जीव (ओघानेच , त्याच्या सोबत जोडला गेलेला आत्माही ) गुरफटून जाईल अशी ही व्यवस्था आहे !!

माया ही अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे असे म्हणण्यापुरते का होईना तिचे अस्तित्व मनामध्ये काल्पावेच लागते ना? -होय,,!!
माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या वस्तूवे अस्तित्वात नसणे हा त्या वस्तूचा एक गुणधर्म आहे आणि ज्या अर्थी गुणधर्म आहे म्हणजेच ती अस्तित्वात आहे !!

हीच गोष्ट पुढे निरीश्वरवादास ही लागू पडते
देव नाही नाहे हे सिद्ध करण्यापुरेते त्याचे अस्तित्व मान्य करावेच लागते
तो आहे हे मानून चालले तरच मग तो कसा नाही आहे हे सिद्ध करता येते
तो नाहीच आहे नाहीच आहे असे घोकल्याने तो नाही आहे हे सिद्ध होत नाही त्याकरता सत्य व ज्ञान(सुन्दर) यांचा आधार पुराव्यासाराखा घ्यावा लागतो !!

तात्पर्य मिथ्या म्हणजे खोटी /असत्य जी त्या सत्यापासून (ईश्वर)आपल्याला दूर ठेवते याचा अर्थ ती अस्तित्वात नाही असा नव्हे !!
__________________________________

असो !!
सत्यं शिवं सुंदरम ...या एका वाक्यात किमान ५० लोक ५० प्रकारे अर्थ काढू शकतात जे कुणालाही बरोबरच वाटतील ; याचा अर्थ तो प्रत्येक अर्थ सत्य आहे असा नाही

अंतिम सत्य एकच आहे ते एकच असाणार असे मलातरी वाटते !!!

गंमत आहे वैभव,आपण खगोलापासून सुरुवात करून सनातन वादविषयांकडे जातोय.मुक्ताबाईंच्या रचनेला समजून घेताघेता.. इथे माझ्याकडे,पांडित्य नाहीच ,इतकेच नव्हे मला तर समर्थांची 'जगी हीत पंडित सांडीत गेले' ही उक्ती शिरोधार्य मानून पांडित्यापेक्षा प्रतिभा श्रेष्ठ मानणे बरे वाटतेय :)) (आळसाचे समर्थन??).
आपल्या तत्वदर्शनांमध्ये मायेच्या मिथ्यावादाला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनीही प्रतिपादलेला चिद्विलासवाद आहे,जो तुमच्या म्हणण्याला तत्वचौकट देतो.माया मिथ्या नसून तो ईश्वरी लीलेचा विलास आहे असे मानणारे जीवनदर्शन.'तू तुझ्या जाणिवेची कळा वाढवण्यासाठी हे सारे रचलेस 'असे ज्ञानोबा वेल्हाळपणे म्हणतात.

देवकण,विश्वरचना ,कवितेतील दुर्बोधता या सर्व पर्यटनस्थळांवरून हिंडत हिंडत आपण या infant terrible अशा 'बाप' भावंडांकडे पोचलोच! ग्रेट्!पर्याय नाही .

शेवटी,अंतिम सत्य नक्कीच एकच असेल पण त्याच्या आविष्काराचे तरंग अनंत असावेत.मतमतांतरांसारखे.

बद्ध भू शी सिद्ध तरी उल्लंघण्या सार्‍याच कक्षा
>>> भूशी असं हवंय माझ्यामते!

कविता आवडली. शून्यमाळा शब्दयोजनाही समर्पक!
शुभेच्छा..

शुभेच्छांबद्दल आभार आनंदयात्री,बरोबर आहे भूशी लिहावेसे वाटले होते,पण अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून.. :))

मस्त कविता! पटकन रीलेट करु शकलो! Happy एकदम भारी भारतीताई!
या नभाच्या पार होतो ..शून्यमाळा.. शून्यमाळा..>>>>> पटलंय!